बालमानसशास्त्र :
(चाइल्ड सायकॉलॉजी). मानसशास्त्राची
एक शाखा बालमानसशास्त्र
म्हणजे मुलांच्या वर्तनाचा व शारीरिक-मानसिक विकासाचा शास्त्रोक्त अभ्यास. ह्या शास्त्रात मुख्यत: खालील विषयांचा अभ्यास होतो :
(१) बाल्य कालापासून म्हणजे जन्मापासून तो किशोरावस्थेपर्यंत
होणारे मानसिक-शारीरिक विकासातील क्रमश: बदल
(२) बालकांच्या विकासातील मूलभूत व सर्वसामान्य आकृतिबंध.
(३) विविध परिस्थितीत बालकाकडून घडू शकणाऱ्या वर्तनाची तत्त्वे. आणि त्यांवर आधारित पूर्वकथन.
(४) बालकांचा सुयोग्य विकास व समायोजन यांबाबत पालकांना मार्गदर्शन करण्याची तत्त्वे,
(५) बालकांच्या वैकासिक दर्जाचे मानसशास्त्रीय मापन.
(६) बालवर्तन व बालमनोविकासाचे सामान्यादर्श (नॉर्मस).
(७) अध्ययन, प्रेरण, परिपक्वन व समाजाभिमुखीकरण या प्रौढ मानसशास्त्रीय मौलिक प्रक्रियांचा बालमानसशास्त्रीय पाया (किशोर व प्रौढांच्या वर्तनाची मुलांच्या वर्तनाशी तुलना व साम्य).
बालमानसशास्त्रीय
अन्वेषणाचा हेतू त्यातील सामान्यादर्श ठरवणे
हा तर असतोच,
शिवाय ह्या शास्त्रातील नवीन
सिद्धांत व परिकल्पनांचे परीक्षण करणे
हाही असतो. ही
अन्वेषणात्मक तंत्रे व अभ्यासपद्धती खालीलप्रमाणे आहेत
:
(२) एकाच बालकाच्या विकासाच्या सर्व अवस्थांतील मानसिक प्रक्रियांचे निरीक्षण.
(३) चरित्र आणि व्यक्तीतिहास यांचा अभ्यास.
(४) खास प्रश्नावली. उदा., स्टॅनली हॉल व स्थानानुक्रमण श्रेणी (रेटिंग स्केल) व ज्युनिअर आयसेंक व्यक्तिमत्त्व सूची (इनवेंटरी).
(५) प्रमाणित मानसशास्त्रीय कसोट्या.
(६) बाल वर्तनाचे सतत निरीक्षण व त्यासाठी ध्वनिलेखन छायाचित्रण व चलत्चित्रण शिवाय एकदिशादर्शी काचेचा कक्ष या खास साधनांचा उपयोग.
(७) नियंत्रित परिस्थितीत मानसशास्त्रीय
प्रयोग. उदा., एकांडी जुळी मुले व नियंत्रित बालसमूह यांच्यावरील प्रयोग.
No comments:
Post a Comment