ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ॥धृ॥
भूमातेच्या चरणतला तुज धुतां । मी नित्य पाहिला होता ॥
मज वदलासी अन्य देशी चल जाउं । सृष्टिची विविधता पाहूं ॥
तइं जननीहृद् विरहशंकितही झाले । परि तुवां वचन तिज दिधले ॥
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठिं वाहीन । त्वरित या परत आणिन ॥
विश्वसलो या तव वचनीं । मी जगदनुभवयोगें बनुनी ॥ मी
तव अधिक शक्त उद्धरणीं । मी येइन त्वरे, कथुन सोडिले तिजला
सागरा प्राण तळमळला ॥ १ ॥
शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी ॥
भूविरह कसा सतत साहुं यापुढती । दशदिशा तमोमय होती ॥
गुणसुमनें मी वेचियली या भावें । की तिने सुगंधा घ्यावें ॥
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा ॥
ती आम्रवृक्षवत्सलता । रे नवकुसुमयुता त्या सुलता । रे ॥
तो बाल गुलाबहि आतां ॥ रे फुलबाग मला, हाय पारखा झाला । सागरा प्राण तळमळला ॥ २ ॥ |
|
No comments:
Post a Comment