आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Saturday 8 December 2012

Human rights

Human Rights Day Human Rights Day is celebrated annually across the world on 10 December. The date was chosen to honor the United Nations General Assembly 's adoption and proclamation, on 10 December 1948, of the Universal Declaration of Human Rights (UDHR), the first global enunciation of human rights and one of the first major achievements of the new United Nations . The formal establishment ofHuman Rights Day occurred at the 317th Plenary Meeting of the General Assembly on 4 December 1950, whenthe General Assembly declared resolution 423(V), inviting all member states and any other interested organizations to celebrate the day as they saw fit. [ 1 ] [ 2 ] The day is normally marked both by high-level political conferences and meetings and by cultural events and exhibitions dealing with human rights issues. In addition, it is traditionally on 10 December that thefive-yearly United Nations Prize in the Field of Human Rights and Nobel Peace Prize are awarded. Many governmental and nongovernmental organizations active in the human rights field also schedule special events to commemorate the day, as do many civil and social-cause organisations. The theme for 2006 was the struggle against poverty , taking it as a humanrights issue. Several statements were released on that occasion, including the one issued by 37 United Nations Special Procedures mandate holders “ Today, poverty prevails as the gravest human rights challenge in the world. Combating poverty, deprivation and exclusion is not a matter of charity, and it does not depend on how rich a country is. By tackling poverty as a matter of human rights obligation, the world will have a better chance of abolishing this scourge in our lifetime....Poverty eradication is an achievable goal. ” — UN High Commissioner for Human Rights Louise Arbour , 10 December 2006 The 60th anniversary of the UniversalDeclaration of Human Rights occurredon 10 December 2008, and the UN Secretary-General launched a year-long campaign leading up to this anniversary. Because the UDHR holds the world record as the most translated document (with more than 360 language versions available), organizations around the globe used the year to focus on helping people everywhere learn about their rights.Universal Declaration of Human Rights General Assembly res. 217A (III), 10 December 1948 Preamble Whereas recognition of the inherent dignity and of the equal and inalienable rights of all members of the human family is the foundation of freedom, justice and peace in the world, Whereas disregard and contempt for human rights have resulted in barbarous acts which have outraged the conscience of mankind, and the advent of a world in which human beings shall enjoy freedom of speech and belief and freedom from fear andwant has been proclaimed as the highest aspiration of the common people, Whereas it is essential, if man is not to be compelled to have recourse, as a last resort, to rebellion against tyranny and oppression, that human rights should be protected by the ruleof law, Whereas it is essential to promote the development of friendly relationsbetween nations, Whereas the peoples of the United Nations have in the Charter reaffirmed their faith in fundamental human rights, in the dignity and worth of the human person and in the equal rights of men and women and have determined to promote social progress and better standards of life in larger freedom, Whereas Member States have pledged themselves to achieve, in cooperation with the United Nations,the promotion of universal respect for and observance of human rights and fundamental freedoms, Whereas a common understanding ofthese rights and freedoms is of the greatest importance for the full realization of this pledge, Now, therefore, The General Assembly, Proclaims this Universal Declaration of Human Rights as a common standard of achievement for all peoples and all nations, to the end that every individual and every organof society, keeping this Declaration constantly in mind, shall strive by teaching and education to promote respect for these rights and freedomsand by progressive measures, national and international, to secure their universal and effective recognition and observance, both among the peoples of Member States themselves and among the peoples of territories under their jurisdiction. Article 1 All human beings are born free and equal in dignity and rights. They are endowed with reason and conscienceand should act towards one another in a spirit of brotherhood. Article 2 Everyone is entitled to all the rights and freedoms set forth in this Declaration, without distinction of any kind, such as race, colour, sex, language, religion, political or other opinion, national or social origin, property, birth or other status. Furthermore, no distinction shall be made on the basis of the political, jurisdictional or international status of the country or territory to which a person belongs, whether it be independent, trust, non-self-governing or under any other limitation of sovereignty. Article 3 Everyone has the right to life, liberty and security of person. Article 4 No one shall be held in slavery or servitude; slavery and the slave tradeshall be prohibited in all their forms. Article 5 No one shall be subjected to torture or to cruel, inhuman or degrading treatment or punishment. Article 6 Everyone has the right to recognitioneverywhere as a person before the law. Article 7 All are equal before the law and are entitled without any discrimination to equal protection of the law. All are entitled to equal protection against any discrimination in violation of thisDeclaration and against any incitement to such discrimination. Article 8 Everyone has the right to an effectiveremedy by the competent national tribunals for acts violating the fundamental rights granted him by the constitution or by law. Article 9 No one shall be subjected to arbitraryarrest, detention or exile. Article 10 Everyone is entitled in full equality to a fair and public hearing by an independent and impartial tribunal, in the determination of his rights andobligations and of any criminal charge against him. Article 11 1. Everyone charged with a penal offence has the right to be presumed innocent until proved guilty according to law in a public trial at which he has had all the guarantees necessary for his defence. 2. No one shall be held guilty of any penal offence on account of any act or omission which did not constitute a penal offence, under national or international law, at the time when it was committed. Nor shall a heavierpenalty be imposed than the one thatwas applicable at the time the penal offence was committed. Article 12 No one shall be subjected to arbitraryinterference with his privacy, family, home or correspondence, nor to attacks upon his honour and reputation. Everyone has the right to the protection of the law against such interference or attacks. Article 13 1. Everyone has the right to freedom of movement and residence within the borders of each State. 2. Everyone has the right to leave anycountry, including his own, and to return to his country. Article 14 1. Everyone has the right to seek and to enjoy in other countries asylum from persecution. 2. This right may not be invoked in the case of prosecutions genuinely arising from non-political crimes or from acts contrary to the purposes and principles of the United Nations. Article 15 1. Everyone has the right to a nationality. 2. No one shall be arbitrarily deprivedof his nationality nor denied the rightto change his nationality. Article 16 1. Men and women of full age, without any limitation due to race, nationality or religion, have the right to marry and to found a family. They are entitled to equal rights as to marriage, during marriage and at its dissolution. 2. Marriage shall be entered into only with the free and full consent of the intending spouses. 3. The family is the natural and fundamental group unit of society and is entitled to protection by society and the State. Article 17 1. Everyone has the right to own property alone as well as in association with others. 2. No one shall be arbitrarily deprivedof his property. Article 18 Everyone has the right to freedom of thought, conscience and religion; thisright includes freedom to change his religion or belief, and freedom, eitheralone or in community with others and in public or private, to manifest his religion or belief in teaching, practice, worship and observance. Article 19 Everyone has the right to freedom of opinion and expression; this right includes freedom to hold opinions without interference and to seek, receive and impart information and ideas through any media and regardless of frontiers. Article 20 1. Everyone has the right to freedom of peaceful assembly and association. 2. No one may be compelled to belong to an association. Article 21 1 . Everyone has the right to take part in the government of his country, directly or through freely chosen representatives. 2. Everyone has the right to equal access to public service in his country. 3. The will of the people shall be the basis of the authority of government;this will shall be expressed in periodic and genuine elections whichshall be by universal and equal suffrage and shall be held by secret vote or by equivalent free voting procedures. Article 22 Everyone, as a member of society, has the right to social security and is entitled to realization, through national effort and international co-operation and in accordance with the organization and resources of each State, of the economic, social and cultural rights indispensable for his dignity and the free development of his personality. Article 23 1. Everyone has the right to work, to free choice of employment, to just and favourable conditions of work and to protection against unemployment. 2. Everyone, without any discrimination, has the right to equal pay for equal work. 3. Everyone who works has the right to just and favourable remuneration ensuring for himself and his family anexistence worthy of human dignity, and supplemented, if necessary, by other means of social protection. 4. Everyone has the right to form andto join trade unions for the protection of his interests. Article 24 Everyone has the right to rest and leisure, including reasonable limitation of working hours and periodic holidays with pay. Article 25 1. Everyone has the right to a standard of living adequate for the health and well-being of himself and of his family, including food, clothing,housing and medical care and necessary social services, and the right to security in the event of unemployment, sickness, disability, widowhood, old age or other lack of livelihood in circumstances beyond his control. 2. Motherhood and childhood are entitled to special care and assistance. All children, whether bornin or out of wedlock, shall enjoy the same social protection. Article 26 1. Everyone has the right to education. Education shall be free, at least in the elementary and fundamental stages. Elementary education shall be compulsory. Technical and professional education shall be made generally available and higher education shall be equally accessible to all on the basis of merit. 2. Education shall be directed to the full development of the human personality and to the strengthening of respect for human rights and fundamental freedoms. It shall promote understanding, tolerance and friendship among all nations, racial or religious groups, and shall further the activities of the United Nations for the maintenance of peace. 3. Parents have a prior right to choose the kind of education that shall be given to their children. Article 27 1. Everyone has the right freely to participate in the cultural life of the community, to enjoy the arts and to share in scientific advancement and its benefits. 2. Everyone has the right to the protection of the moral and material interests resulting from any scientific, literary or artistic production of which he is the author. Article 28 Everyone is entitled to a social and international order in which the rights and freedoms set forth in this Declaration can be fully realized. Article 29 1. Everyone has duties to the community in which alone the free and full development of his personality is possible. 2. In the exercise of his rights and freedoms, everyone shall be subject only to such limitations as are determined by law solely for the purpose of securing due recognition and respect for the rights and freedoms of others and of meeting the just requirements of morality, public order and the general welfare in a democratic society. 3. These rights and freedoms may in no case be exercised contrary to the purposes and principles of the United Nations. Article 30 Nothing in this Declaration may be interpreted as implying for any State,group or person any right to engage in any activity or to perform any act aimed at the destruction of any of the rights and freedoms set forth herein.

Sunday 2 December 2012

Reign 1568–1597 Born May 9, 1540 Birthplace kolyari, Kumbhalgarh , Juni Kacheri, Pali Died January 19, 1597 (age 57) Predecessor Maharana Udai Singh II Offspring 3 sons and 2 daughters Royal House Sisodia , Suryavanshi Rajput Father Maharana Udai Singh II Religious beliefs Hindu,Rajput Maharana Pratap pronunciation ( help · info ) or Pratap Singh (May 9, 1540 – January 19, 1597) was a Hindu Rajput ruler of Mewar , a regionin north-western India in the present day state of Rajasthan . In popular Indian culture, Pratap is considered to exemplify the qualities like bravery and chivalry to which Rajputs aspire, especially in context of his opposition to the Mughal emperor Akbar . The struggle between Rajput confederacy led by Pratap Singh, and the Mughal Empire under Akbar, has often been characterised as a struggle between Hindus and the invading hordes of Muslims, much on the same lines as the struggle between Shivaji and Aurangzeb a little less than a century later. Maharana Pratap was a staunch patriot. Pratap is said to have lamented that "If there had been no Udai Singh between himself and Rana Sanga, he would not have let Turks master Hindustan." He saw Mughals as foreigners who had invaded India and that is why he refused to surrender. His own father Udai Singh had condemned the houseof Man Singh for their marriage with unclean foreigners and Pratap Singh himself said that he would call Akbar only a "Turk" and not an emperor. Also Pratap Singh's dogged resistance, even when he had to wander in the jungles of Aravallis andhis persistent refusal to surrender even after being reduced to starvation while pursuing Haldighati,do not point to a person who fought for power politics, but rather to a person with a sacred mission. His own vow giving up all comforts of palace life till he recaptured all his kingdom from Mughals and his lifelong observance of that vow also speak of his steadfast patriotism and determination rather than power politics. Similar kinds of observation can be pointed out to his repeated refusal to accept lucrative offers fromAkbar in shape of jagirs and suberdaris.

प्राणी जगत

                                       वाघ
 
 
वाघाचे नाव ऐकताच अंगावर काटा येतो नाही का? अतिशय बलवान परभक्षी असलेला वाघ हा मार्जार या सस्तन प्राण्यांच्या प्रवर्गातील सर्वात मोठा प्राणी आहे. वाघाची सरासरी लांबी साडेचार फूटापासून साडेनऊ फुटापर्यंत लांब असते आणि वजन २०० ते ६०० पौंड इतके असते. याचा रंग मु़ख्यतः नारंगी असून संपूर्ण शरीरावर काळ्या रंगाचे पट्टे असतात तसेच छाती, चेहरा व आतल्या बाजूस काहीसा पांढरा रंग दिसून येतो. आजतागायत वाघाच्या आठ उपजातींची नोंद करण्यात आली आहे. मात्र यांतील तीन जातींचे वाघ अवैध शिकारीमुळे साल १९५० पासून नजरेस पडलेलेच नाहीत. या बेपत्ता जातींमध्ये कॅस्पीयन, बाली व यावान वाघांचा समावेश आहे. उर्वरित पाच जातींची परिस्थीती सुद्धा यापेक्षा फार काही वेगळी नाही. या उर्वरीत जातींमध्ये सायबेरीयन, बंगाल, इंडो-चायनीज, दक्षिणी चीन व सुमात्रीयन वाघांचा समावेश आहे. एकेकाळी पश्चिमी-पूर्व तुर्कस्तानापर्यंत वाघ आढळत असे मात्र गेल्या काही काळात वाघाचे अस्तित्व हे ठरावीक आशियाई क्षेत्रापर्यंत मर्यादित राहीले आहे. चामड्यासाठी शोभेच्या वस्तूंसाठी तसेच हौसेखातर केली जाणारी शिकार, जंगलांचे कमी होत चाललेले प्रमाण, नैसर्गीक अन्नस्त्रोताचे कमी होणारे प्रमाण ही कारणे त्यामागे आहेत.
वाघ हा एकटा राहणारा प्राणी असून मुख्यतः रात्री शिकार करण्यासाठी बाहेर पडतो. त्याच्या प्रमुख भक्ष्यांमध्ये हरण तसेच इतर पशू, मगरी, वानरे, पक्षी, सरपटणारे प्राणी, मासे इत्यादींचा समावेश होतो. वाघ हा सडलेले मांस सुद्धा भक्षण करतो इतकेच नाही तर पचन नीट होण्यासाठी औषध म्हणून तो कधीकधी गवत खातानासुद्धा आढळला आहे.
सध्या वाघांच्या संख्येतली वाढती घट पहाता. अनेक राष्ट्रांनी 'सेव्ह टायगर्स' मोहीमा सुरु केलेल्या दिसून येतात. आपल्या भारतामध्येच अनेक वाघ्र्यप्रकल्प सुरु करुन वाघांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न चालू आहे. मात्र दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललेल्या या प्राण्याच्या संवर्धनाची तसेच संरक्षणाची जबाबदारी प्रत्येकानेच उचलायला हवी तरच हा देखणा आणि साहसाचे प्रतिक असलेला प्राणी वाचण्यास मदत होईल अन्यथा येणार्‍या पिढीस आपल्या भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ कसा होता? हे पुस्तकांतूनच वाचण्याची पाळी येईल.
टिप- भारताचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाची भारतातील संख्याच १४११ इतकी नगण्य आहे आणी दिवसेंदिवस त्यामध्ये प्रचंड प्रमाणात घट होत आहे.



भारतीय सारंग किंवा माळढोक पक्षी


सुमारे एक मिटर उंचीचा माळढोक पक्षी हा मोठा रुबाबदार पक्षी आहे. जवळ जवळ छोट्या शहामृगाच्या आकाराचा हा पक्षी वजनदार असतो. माळढोक नराचे वजन १० किलो तर मादीचे ५ किलो असते. बाजूने काळे असलेले त्याचे बदामी रंगाचे पंख, डोक्यावार असलेला काळा मुकूटासारखा तुरा, लांब पांढरी मान व तशाच रंगाचे शरिराच्या खालच्या बाजूचा भाग अशी त्याची शरीर रचना असते. मादी नराहून लहान असते व नर हा अधिक रुपवान असतो.
माळढोकला चांगले उडता येते मात्र उडण्यासाठी त्यास १५-२० फुट पळत जावे लागते व नंतर तो आकाशात झेप घेतो, पण तो खुप उंचावरुन उडत नाही. मादी एकावेळी एकच अंडे देते. महिन्याभरात अंड्यातून पिल्लू बाहेर पडते, त्याला उडता यायला पाच महिने लागतात. एका वर्षात त्याची संपुर्ण वाढ होते. मात्र मादी एका वेळी एकच अंडे देत असल्याने या पक्ष्यांची लोकसंख्या झपाट्याने वाढत नाही. घार, गरुड सारखे शिकारी पक्षी, मंगूस, घोरपड, साप हे प्राणी अंडी खातात तसेच गुरांच्या पायाखाली ही अंडी तुडवली जातात.
हा पक्षी दोन्ही प्रकारचा आहार घेतो. करवंद, बोर, तुरे तसेच मांसाहारामध्ये किटक, अळ्या, टोळ, पाली, उंदीर, लहान साप हे त्याचे प्रमुख अन्न आहे. माळढोक हा खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांचा मित्र आहे. तो थव्याने वास्तव्य करतो. माळढोकच्या जगात एकूण २२ उपजाती आहेत. यातील भारतात आढळणार्‍या तिन उपजाती म्हणजे मोठा माळढोक, तणमोर व बंगाली तणमोर या आहेत. हा सारंग कुळातला पक्षी आहे.
एकेकाळी बंगाल, आसाम व म्हैसुरचा दक्षिण भाग वगळता भरतात सर्वत्र ते आढळत मात्र आता ते राजस्थान, गुजरात व महाराष्ट्रातील अहमदनगर तसेच सोलापूर जिल्ह्याती रुक्ष व सौम्य भागात दिसून येतात.
माळढोकच्या राहण्याच्या ठिकाणाचा नाश, मांसासाठी केली गेलेली शिकार यामुळे ते आता दुर्मिळ झाले आहेत. काही वर्षापूर्वी भारत सरकारच्या वन्यप्राणी संघाने त्याचा दुर्मिळ पक्ष्यांच्या यादीत समावेश केला. हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गाला लागला मग १९७९ साली अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यात काही चौ.कि.मी. वनक्षेत्रात माळढोक पक्षी अभयारण्याची स्थापना करण्यात आली. आज येथे माळढोक सुरक्षीत आहेत.

                                             पेंग्वीन
                अंटार्टीक खंडात आढळणा-या पेंग्वीन पक्षांमधील सर्वात जास्त परिचीत अशी ही पेंग्वीन पक्षांची जमात आहे. ही जमात इतर पेंग्वीन पक्षांच्या तुलनेत आकाराने लहान असुन ते त्यांच्या एकत्रीत समुदयासाठी प्रसिध्द आहेत. या समुदयाची संख्या २०,००० पेक्षा जास्त असु शकते. समुद्रालगत असलेल्या खडकाळ प्रदेशात घरटे तयार करुन हे पक्षी जोडपी करुन राहतात. प्रसुतीकाळात मादा पेंग्वीन दोन हलक्या वजनाची अंडी देते आणि या नंतर सर्व जोडपी अंड्यांची सुरक्षा समुद्रातील मोठ्या पेंग्वीन्सना करण्यास देऊन अन्न मिळवण्यासाठी परत मार्गस्थ होतात. या पेंग्वीन्सचा रंग सामान्य पेंग्वीन पक्षांसारखाच असतो. पांढ-या रंगाचा पोटाकडील भाग व काळ्या रंगाचा पंख, डोके व पाठीकडील भाग असे यांचे बाह्य रुप असते. उंची सामान्यतः ४६ ते ६१ सेमी व वजन ४.५ ते ५ कि.ग्रॅ. इतके असते. आणि सरासरी नर व माद्यांमध्ये सारखीच असते. या जमातींची लोकसंख्या अत्यंत स्थिर तसेच सुरक्षीत आहे किंबहुना ती वाढत आहे. ताज्या अहवालानुसार यांची संख्या ३ कोटीच्या आसपास असावी. या पक्षांचा अन्नप्रवास समुद्रातील कोळंबी तसेच इतर मासे असल्याने जेथे मासे विपुल प्रमाणात असतात त्या ठिकाणी या पक्षांचा जास्त वावर असतो.                                 

शब्दरंग

                विद्यार्थी मित्रानो , आयुष्य, जीवन खूप सुंदर आहे . रोज नवनव्या गोष्टी, नवनवे अनुभव आपण अंगीकारत असतो . शिकत असतो . नव्याचा शोध घेत असतो . आजही मी तुम्हाला  शब्दांची गंमत सांगणार आहे . चला तर मग करूया का सुरुवात !!!!!!!!.



                                -:शब्दरंग :-


१) हंडे , कळश्या बनवायला हा धातू वापरतात - तांबे 

२)मारुतीचे , हनुमानाचे हे एक नाव - बजरंग 

३)पूर्वीचे मोठे घर - वाडा 

४)ढग नसलेले आकाश - निरभ्र 

५)बघण्याचा अवयव ,नयन , चक्षु  - डोळा 

६)पूर्वी या धातूची भांडी बनवत .  कधी कधी हे  उघडे पडते - पितळ 

७)पिता ,बाप किंवा मोठा थोरला - वडील 

८) एका पायावर उभे राहून खोटे ध्यान करणारा पक्षी - बगळा 

९)गडाचे दरवाजे बंद झाले म्हणून बाळासाठी रायगडावरून उडी मारणारी
गवळण - हिरकणी 

१०)वर्तुळाचा किंवा भाकरीचा पाव भाग - चतकोर 

११)बळी राजाकडे तीन पावले भूमी दान मागणारा छोटा अवतार - वामन 

१२)समान खरेदीसाठी आपण इथे जातो - दुकान 

१३)झुला , बागेतील घसरगुंडी सारखे खेळणे - झोपाळा 

१४)महाभारतातील पाच भाऊ - पांडव 

१५)हुशार नसलेला , बुद्दू - ढ 

१६)लंकाधिपती , दहा तोंडाचा -  रावण 

१७)कबुतरासारखा एक पक्षी -होला 

१८)पटईवर उलटी चालणारी - पाल 

१९)शिवण शिवताना हे घालावे लागतात - टाके 

२०)प्रत्येक भाषेत हे  असतात ,तरीही जपून वापरावेत - शब्द  

२१)पिकांचा पावसाळी हंगाम - खरीप 

२२)रामाच्या वानरसेनेतील एक - जांबुवंत 

२३) वांग्याची किंवा भोपळ्याची कोशिंबीर - भरीत 

२४)आयुष्यात जन्मापासून मृत्युपर्यंत संस्कारांची  संख्या - सोळा 

२५)कल्पवृक्ष मानलेल्या झाडाचे श्रीफळ - नारळ 

२६)पंढरपूरच्या वारकऱ्यांची विशिष्ट गोलाकार रचना -रिंगण 

२७)भारतातील गुजरात प्रांतातील सिंहाचे अभयारण्य - गीर 

२८)साडी , किंवा घट्ट नसलेले - पातळ 

२९)कलेचा आस्वाद घेणारे लोक - रसिक 

३०) लग्न कार्यात हि वाजवतात - वाजंत्री 


 

अभयारण्य

श्रीक्षेत्र भीमाशंकराच्या सह्याद्री भूमीत
कोकणात सरासरी २५० से.मी. पाऊस दरवर्षी पडतो. धरणे तुडुंब भरल्यावर व काही ठि़काणी धरणे नसल्याने महाराष्ट्राच्या एकूण जलसंपत्तीच्या ४६ टक्के पाणी नदीनाल्यातून समुद्राकडे जाते. ते पाणी अडविले गेले तर कोकणातील माणूस ख-या अर्थाने सुखी होईल. परंतु हे स्वप्न प्रत्यक्षात कधी अंमलात येणार आहे? या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत राहते. सह्याद्री पर्वताच्या विशिष्ट स्वाभाविक रचनेमुळे महाराष्ट्रातील नद्यांचे दोन प्रकार स्पष्ट दिसतात. सह्याद्रीवर उगम पावून अनेक नद्या कोकणपट्टी ओलांडून पश्चिमेस अरबी समुद्रास मिळतात. या नद्यांचे उगम सह्याद्री पर्वतावर साधारणपणे ५०० ते ७०० मीटर उंचीवर असून या नद्या पश्चिमेकडे सुमारे १०० ते १५० किलोमीटर प्रवास करुन अरबी समुद्रास मिळ्तात. याचा अर्थ उपयुक्त असे पाणी, खा-या पाण्यात मिसळून उन्हाळ्यात पाण्यासाठी दाहीदिशा अशी परिस्थिती रायगडकरांवर नेहमीच येते. रायगड जिल्ह्यातील अंबा, कुंडलिका, काळ, सावित्री, गांधारी, पाताळगंगा, व भोगावती या नद्यांचे उगमस्थान सह्याद्रीतच आहे. परंतु यातील बहुतेक नद्या आता ऊगमस्थानापासून ५० ते ६० कि.मी. अंतरावर कारखानदारीमुळे प्रदूषित होउन पुढे समुद्राला मिळ्त असल्याने ऊगमस्थानापासूनच ५० ते ६० किलोमीटर अंतराच्या अलिकडे पाणी आडवा, पाणी जिरवा ही मोहीम ख-या अर्थाने राबविली पाहिजे. मात्र त्या उपनद्यांचे उगमस्थान रायगड जिल्ह्यामधूनच आहे. अशा उपनद्यांवर मंजूर झालेले परंतु रखडलेल्या पाटबंधारे योजनांचा पाठपुरावा करण्याची आज गरज आहे. याऊलट सह्याद्री पर्वतावर उगम पावूनही एका विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे भीमाशंकरजवळ उगम पावून भीमा नदी कर्जतजवळ रायगडमध्ये न उतरता पुणे- सोलापूर या जिल्ह्यातून वाहणारी अशी ही एकमेव नदी असल्याने तिचा उपयोग पूर्व महाराष्ट्रातील जनतेला होत आहे. याच भीमा नदीला पुढे कुकडी, धोम, पवना, इंद्रावती, मुळा मुठा, गंगावती, वेळ्वंटी, नीरा, क-हा, सिना या नद्या मिळतात.
अलिकडेच भीमाशंकर येथे जाऊन आलो, भीमा खोर्‍यात फिरत असताना भीमा नदीवर डिंबे, कुकडी, चाकरमासाना मोठमोठी धरणे होत असताना पाहण्यात आली आणि परत एकदा आमच्या रायगडमधील अरबी समुद्राला मिळणा-या नद्यांची आठवण झाली. राजगुरु नगर, घोडेगाव या परिसरात एखाद्या नदीप्रमाणे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे वळवण्याचे काम सुरु असून येत्या दोन-तीन वर्षात हजारो हेक्टर शेतजमीन या कालव्यांच्या पाण्याखाली येऊन भीमा खो-याचे नंदनवन झालेले पहावयास मिळेल. आजही येथील शेतकरी वर्ग भाजीपाला व बागायतीत मग्न आहे. रायगडमधील आमच्या नद्यांची लांबी जास्तीत जास्त १५० किलोमीटर समुद्रापर्यंत असते. परंतु भीमा नदीचे कार्यक्षेत्र सुमारे ४५१ किलोमीटर असे आहे. इंद्रायणीच्या काठी देहू व आळंदी ही तुकाराम महाराज यांच्या वास्तव्यांनी पवित्र झालेली तीर्थक्षेत्रे सा-या महाराष्ट्राला परिचित आहेत. भीमेच्या कठावरील मोठे तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे आहे. तेथे अर्धवर्तुळाकार वाहणार्‍या भीमेला चंद्रभागा म्हणतात. म्हणजे सह्याद्रीवरील भीमाशंकरवरुन उगम पावणा-या भीमा नदीची लांबी ४५१ किलोमीटर असून पुढे ही नदी कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांच्या सीमेवर रायचूरजवळ कृष्णा नदीला मिळते. चंद्रभागेच्या विशाल वाळवंटात पंढरीला लाखो वारकरी आनंदाने नाचतात, भीमा-भागा गंगेच्या पवित्र पाण्यात आंघोळ करुन पावन होतात. ती भीमारुपी नदी, भागीरथी गंगेचं जुनं रुप आहे. त्यामुळे पुढे कर्नाटकमध्ये जाणा-या या नदीचा प्रवाह पाहिला की, महाराष्ट्राच्या या विठोबाचे आणि कर्नाटकचे संबंध लक्षात येतात.'कानडा राजा पंढरीचा' या ओळीत या भीमा नदीने ही दोन राज्य नैसर्गिकरीत्या जवळ आणली असली तरी व्यावहारिक जगात मात्र कर्नाटक,महाराष्ट्र सीमावाद माणसानेच कसा निर्माण केला आहे याचे प्रत्यंतर गेले कित्येक वर्षे आम्ही अनुभवत आहोत. भागीरथी, गंगा स्वर्गातून श्री शंकराच्या डोक्यावर उतरली आणि भीमरुपी गंगा भगवान शंकराच्या अंगातून घामाच्या रुपाने अवतरली. त्या भीमा नदीचे उगमस्थान बरा ज्योतीर्लिंगापैकी भीमाशंकर या नावाने प्रसिध्द आहे.
पावसाळ्यात तुरळक वाहतूक असणा-या मंचर ते भीमाशंकर हा रोड श्रीवणी सोमवार असल्याने रहदारीने फुलून गेला होता. मारुती व मोठ्या प्रमाणात जीपगाड्यांनी या खिंडीला घाटाचे स्वरुप आणले होते. अरुंद रस्ता व पावसामुळे रस्ते नादुरुस्त झाल्याने वाहतुकीची कोंडी होत होती. मात्र पुणे जिल्ह्याच्या बांधकाम खात्याने रस्त्याची अखंडता हीच देशाची अखंडता असे बोर्ड लिहून आपली कार्यक्षमता लपविली होती. एरवी पोलिस खात्याबद्दल लोकांची भावना तशी नापसंतीची असते, परंतु राजगुरुनगर व भीमाशंकरच्या पोलिसांची खरी सेवा लोकांना पाच-पाच किलोमीटर अंतरावर पहावयास मिळत होती. मुसळ्धार पावसात व गडद धुक्यात केवळ छ्त्रीचा आधार घेवून वळणा-वळणावर हे पोलिस ओल्या अंगाने वाहन चालकांना मार्गदर्शन करीत होते. लायसन्स दाखवून कगदपत्र दे हा नेहमीचा प्रकार येथे नेव्हता, खुद्द मंदिरातही भक्तांच्या सेवेत पोलीस सामील झाल्याने अनेकांनी येथे पोलिसांबद्दल चांगले उदगार काढले. अर्थात मंदिरात बसलेले पोलीस झट्पट दर्शन घ्या असे सांगून विजेच्या वेगाने भक्ताला बाहेरचा मार्ग दाखवत होते. त्याबद्दल एवढ्या दूरवरुन येवूनही दोन मिनीटे नामस्मरण करता आले नाही याचे दु:ख भक्तांना होत होते. परंतु दिवसभरात येणा-या सुमारे चार ते पाच लाख भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता पोलीसांच्या हातात तरी काय होते? बाहेर उभ्या असणा-या भाविकांना पावसात ताटकळत ठेवणेही काही बरोबर नव्हते त्यामुळे पोलीसांनाही दोष देण्यात अर्थ नव्हता.
शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत, बाळाजी विश्वनाथ यांचे हे स्थान अत्यंत आवडीचे होते. रघुनाथदादा पेशवे यांनी या क्ष्रेत्रावर एक फार मोठी विहीर बांधली होती, पुण्याचे चिमाजी पंताजी नाईक, भिडे, सावरकर यांनी या मंदिराचा १७३७ साली सभामंडप बांधला असा उल्लेख असला तरी त्यानंतरच्या काळात हे सभामंडप नादुरुस्त होऊन पडले असावे. कित्येक दिवस मंदिर एकाकी होते, अलिकडेच राजस्थानचे कारागीर आणूनसभामंडप पूर्वीच्याच पार्श्वभूमीवर बांधले आहे. १७७३ नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जिर्णोध्दार केला होता. हे मंदिर हेमाडपंथी असून त्यावर दशावताराच्या सुरेख मुर्ती कोरल्या आहेत, श्री शंकराच्या मंदिराच्या शेजारीच नंदिचे स्वतंत्र मंदिर आहे, तेथे पाच मण वजनाची घंटा आहे,च्यावर इ.स. १७२९ असा उल्लेख आहे. या घंटेच्या आवाजाने सारा परिसरच मंत्रमुग्ध होतो. मोक्षकुंड, ज्ञानकुंड, गुप्तभिमाशंकर, सर्वतीर्थ, पापनाशनी, आख्यातीर्थ, व्याघ्रपादतीर्थ, साक्षीविनायक, गोरक्षनाथांचा मठ, दैत्यसारनी, कमळजादेवीचे स्थान, कमळजा तळे, हनुमान तळे अशी पुष्कळ दर्शनीय स्थळे आजुबाजुला आहेत.
अलिबाग तालुक्यातील कनकेश्वरप्रमाणे येथे पाय-या आहेत, परंतु कनकेश्वराला डोंगर चढावयाला लागतो तर तेथे तो उतरायला लागतो. एस्.टी बस स्थानकापासून या दुहेरी पध्दतीच्या रुंद पाय-यांना सुरवात होते, त्यामुळे चढताना किंवा उतरताना फारसा त्रास होत नाही. रायगड जिल्ह्यातील खांडस हे गाव येथून फक्त ८ ते ९ किलोमीटर आहे. येथुन गणपतीघाट किंवा शिडीघाट या रस्त्याने फारच लवकर भीमाशंकरला येता येते, पण हा रस्ता ऊभा चढावयाचा असल्याने अवघड आहे, अनेक ठिकाणी लाकडी शिड्यांचा वापर करावा लागतो. त्यामुळे अनेक अपघात येथे झाले आहेत. या रस्त्याचा वापर सध्या अदिवासी किंवा जंगलखात्याशिवाय कोणच करीत नाही. हल्ली रायगडमधुन वाहनाने भीमाशंकरला येण्यासाठी लोणावळा, तळेगाव, चाकण, मंचर, राजगुरु मार्गे यावे लागते. सुमारे २२५ किलोमीटर फेरा घालुन परत रायगड जिल्ह्याच्या सरहद्दीवर असे यावे लागते. भीमाशंकर हे वाहन मार्गाने पुण्याच्या उत्तरेस ११९ किलोमीटर आणि नागोठण्यापासून २२५ किलोमीटर अंतरावर असले तरी भौगोलिक दृष्ट्या ते रायगडाच्या सरहद्दीवर असल्याने या भागात फिरताना कोकणात असल्यासारखा भास होतो. प्रचंड धुक्यात कुठे फिरता आले नसले तरी येथील नागफणी हा भाग फारच उग्र आणि भयंकर असा आहे. सुमारे तीन हजार मीटर उंचीवरुन येथून खाली कर्जत-माथेरानचा देखावा विमानातून पाहिल्यासारखा दिसतो, असे निर्मल गुरुजी यांनी आपल्या बारा ज्योतीर्लिंग या पुस्तकात नमुद केले आहे. तुटलेल्या या कोकण कड्यावरुन तो देखावा पाहण्यासाठी एकाने खाली पालथे पडुन दुस-याने त्याचे पाय ओढुन धरुन जय जय भीमाशंकर असा घोष येथील थंडगार वा-याच्या झोतावर केल्यावर एक वेगळीच अनुभुती येथे मिळ्ते. खरं म्हणजे स्वर्ग सुखाचा अनुभव येथेच मिळत होता म्हणून श्री शंकरांनी येथे वास्तव्य केले होते, असे आमच्या रांगेत असलेले भाविक बोलत आणि तेच खरे होते. आमची जीप भीमाशंकरकडे जात असताना आणि भीमाशंकरकडून येत असताना तेथील पोखरा घाटात आल्यावर निसर्गरम्य व मनोहर दृष्य अलंकारांनी नटलेला हा प्रदेश अबू पहाडाची आठवण करुन देत होता. सौंदर्यपूर्ण विविधतेचा ईश्वरी आणि नैसर्गिक साक्षातकार या कोकण माथ्यावरील परीसरातच पहावयास मिळाला, त्यामुळे भर पावसात पोखरीचा नागमोडी घाट चढत आणि उतरत असताना हिरव्यागार डोंगरावरुन मातृत्वाच्या ओढीने धरणीमातेकडे झेपविणारे ते पांढरे शुभ्र धबधबे मनाची प्रसन्नता वाढवित होते. भातांच्या हिरव्यागार खलाट्या व त्यापेक्षा थोडे उंच हिरवेगार मातीचे छोटे छोटे चौकोनी बांध आणि त्यावरुन वाहणारा पाण्याचा प्रवाह ईश्वरानेच या रांगोळीचा सडा मुक्त हस्ताने मानवाला अर्पण केला आहे अशी धुंद परिस्थिती येथे होती. कडेला डोंगरमाथ्यावर आणि हिरव्यागार झुडूपात वास्तव्य करणा-या त्या गावातील घरांची गावठी पध्दतीची ती लाल भडक आणि पिवळ्सर कौले एखाद्या पुष्पगुच्छाची आठवण करुन देत होती. सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांमध्ये जगण्यासाठी धडधपडत असलेला तो भीमाशंकर परिसरातील डोक्यावर घोंगडी घेतेलेला खेडुत तेथे असलेल्या हिंस्र प्राण्यांशी आणि नैसर्गिक आपत्तींशी सदैव सामना करावयास लागत असल्याने की काय, काटक दिसत होता. हवामानातील फरकामुळे दाट धुके व वार्‍याबरोबर फुलदाणीतील अत्तराप्रमाणे शिंपडुन पडणारा तो पाऊस भीमाशंकर परिसराची विशालता अधिकच वाढवत होता. रानआंबा, जांभुळ, उंबर, साग, ए॓न, हिरडा, आवळा, शिरीष, खैर, शिसव व वेताच्या त्या गर्द झाडीने गच्च भरलेला तो परिसर. भर मे महिन्यातही येथे सूर्याचे दर्शन होत नसेल असे तेथील वातावरणावरुन जाणवले, कारण पावसाळ्यातील दिवसात दुपारी एक वाजता देखील मोटारीचे हेडलाईट तीन ते चार फुटापलीकडे सरकत नव्हते. एवढ्या मध्यरात्रीच्या गच्च काळोखाप्रमाणे येथे अंधार होता.
हे जंगल राखीव व संरक्षित असल्याने शेकडो प्रकारच्या औषधी वनस्पती व डिंक, मध यासाठी भीमाशंकर प्रसिध्द आहे. येथील जंगलात अस्तीत्वास असलेली शेकरु, बिबळ्या, सांबर, चितळ, रानडुक्कर, ससे, कोल्हे, काळविट, मुंगुस, भेकर, सर्प हे प्राणी या जंगलाला तर परिचित आहेतच परंतु मोर, रानकोंबडे, सकात्री, कोकीळ, सूर्यपक्षी, घुबड, ससाणा, पिंगळा या पक्ष्यांच्या वेगवेगळ्या आवाजात रमणारा येथील शेतकरी गॅस, अपचन, डायबेटीस, हृदयविकार, रक्तदाब या आधुनिक काळातल्या श्रीमंत रोगापासून खूप खूप दूर आहे. थोड्यावेळासाठी या रोगाचे जे प्रवासी येथे आले होते ते परत शहराकडे आपल्या वाहनातून जाणार होते, शेवटी निसर्गाचे सान्निध्य व बिअरबारचे सान्निध्य यांच्यात तडजोड झाली तर चांगल्या तीर्थक्षेत्राचेही पर्यटन केंद्र होण्यास वेळ लागत नाही. परंतु येथे पर्यटन केंद्र असूनही ही परिस्थिती नव्हती, कारण हा परिसर १९७४ पासून दारुमुक्त आहे असा तेथील एक बोर्ड प्रवाशाला संदेश देत उभा होता.
 
                                                                                                                            संकलन - विवेक शेळके