आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Saturday, 23 February 2013

मत्स्य व्यवसाय


                           मत्स्य व्यवसाय 
माशांच्या उत्पादन भारताचा जगात ३ क्रमांक लागतो. १) चीन २) जपान ३) भारत
अंतर्गत मासेमारीत क्र. २ रा १) चीन २) भारत
जगात मासेमारीत अग्रेसर असणारा देश -१) चीन २) जपान
गोड्या पाण्यातील मासेमारीत अग्रेसर असणारा देश - चीन
जगातील सर्वात मोठे प्रसिध्द मासेमारी क्षेत्र – ग्रँड बँक (न्यू फाउंडलँड ),डॉगर बँक (उत्तर समुद्र) इ.
कोळंबीच्या उत्पादनात जगात अग्रेसर देश – भारत
जगात माशांच्या २१००० जाती आहेत. सर फ्रान्सिस डे या शास्त्रज्ञाने भारतीय माशांचा सचित्र कोष तयार केला. या ग्रंथानूसार भारतात १६०० जातीचे मासे सापडतात. त्यातील ६०० जाती महाराष्ट्रात असून ४५० खा-या पाण्यात व १५० गोड्या पाण्यात आढळतात.
भारताला द्विपकल्पीय स्थान लाभले असून भारताच्या समुद्र किना-याची लांबी ७५१६ कि.मी असून भारताची सागरी ह्द्द २० दशलक्ष चौ.कि.मी आहे . भारतीय नद्यांची लांबी २९०००कि.मी. आहे.

भारतातील ९ राज्यांना सागर किनारा लाभला असून सर्वाधिक समुद्र किनारा असणारे राज्य - १)गुजरात २)आ.प्रदेश
भारताचे २००७-०८ चे एकूण मत्स्योत्पादन ७१.२७ लाख टन होते. त्यास सागरी २९ लाख टन व गोड्या पाण्यातील ४७ लाख टन होते. २००८-०९ यावर्षी-७६लाख टन होते.
भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात म्त्स्योत्पादनाचा वाटा १% असून देशातील १४० लाख लोक या व्यवसायात गुंतले आहेत.
१८९८ मध्ये फेड्रिक निकोलसन यांच्या टिपनीनुसार मद्रास प्रांतात भारतातील पहिला मत्स्य संशोधन विभाग सुरु झाला.
१९१० मध्ये सर के. जी. गुप्ता यांच्या अहवालानुसार बंगाल प्रांतात व डब्ल्यू.एच. ल्यूकस यांच्या अहवालानुसार मुंबई प्रांतात मत्स्य व्यवसाय सुरू झाला.
खा-या पाण्यातील मासेमारीत अग्रेसर असणारे राज्य – १) गुजरात २) महाराष्ट्र ३) केरळ
गोड्या पाण्यातील मासेमारीत अग्रेसर असणारे राज्य – १) प.बंगाल
एकूण मत्स्योत्पादनात अग्रेसर असणारे भारतातील राज्य – १)प.बंगाल
महाराष्ट्रात २००७-०८ मध्ये ४.१ लाख टन सागरी मत्स्योत्पादन झाले, तर गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन १.३ लाख टन होते . या ५.४ लाख टन एकत्रित सागरी मत्स्योउत्पादनाचे एकत्रित स्थूल मुल्य २२६१ कोटी रू. होते . महाराष्ट्राच्या मासेमारीत गोड्या पाण्यातील मासेमारीचा २३% व सागरी मासेमारीचा ७७% वाटा आहे.
माशांची सर्वाधिक निर्यात करणारे राज्य – केरळ.
भारताचा माशांच्या निर्यातीत महाराष्ट्राचा क्रमांक -२रा. ( -१५ ते २५%)
भारतातून मासे व सागरसंप्पत्ती सर्वाधिक निर्यात केली जाणारा देश –जपान.
पिनीड कोळंबीच्या उत्पादनात अग्रेसर राज्य – केरळ.
भातशेतीतील मत्स्योत्पादन अग्रेसर राज्य – केरळ


जलचर प्राणी

जलचर प्राणी –

१) मासे - मासा हा जलचर प्राणी असून तो कल्ल्याद्वारे (गिल) श्वसन करतो. तर नाकामुळे त्याला गंधज्ञान होते. तो परांच्या सहाय्याने पोहू शकतो. शेपटीचा उपयोग दिशाबदलण्यासाठी होतो. खवल्यांमुळे क्षारयुक्त पाणी माशाच्या शरीरात प्रवेश करत नाही व शरीरातील पाणी बाहेर पडत नाही. माशांना डोळयामुळे संवेदना येते.


प्रकार



कास्थिमत्स्य अस्थिमत्स्य

गोलमुखी (परिपूर्ण तोंड असलेले)

जबडारहीत, उत्क्रांतीच्या टप्प्यातील

तळाचे आद्य क्रेनिएटस

माशांतील घटक टक प्रमाण
पाणी


प्रथिने

स्निग्ध पदार्थ

खनिज पदार्थ ७० ते ८०%


१८ ते २५%

०.१ ते २.२%

०.८ ते २%

माशांच्या चरबीत पॉल अनसॅच्यूरेटेड फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असल्यामूळे रक्त वाहिन्यांतील कोलेस्टेरॉल चे प्रमाण वाढत नाही.
मासे अ व ड जीवनसत्वाने समृद्ध असतात. तसेच माशांच्या शरीरापासून व यकृतापासून तेल काढतात.
यकृतापासून तेल काढले जाणारे मासे – मुशी, पाकर ,वाघळी,हैद इ.
माशांच्या शरीरापासून मिळ्णा-या तेलात असंपृप्त मेदाम्ल युक्त ग्लिसरॉल विपुल असते.

माशांच्या शरीरापासून तेल काढतात. त्याचा उपयोग साबण, रंग,व्हर्निश , कातडी कमावणे इ. साठी होतो. तेल काढले जाणारे प्रमुख मासे- हैद, तारळी (सार्डिन), हेरिंग, सामन, इ.
प्रथिने व स्निग्ध पदार्थ सर्वाधिक असणारे मासे – कॉड व शार्क .
सर्वाधिक प्रथिनांचे प्रमाण असणारा मासा – कॅटफिश .
मत्स्य प्रथिनात मानवाच्या वाढीस उपयुक्त लायसिन व मिथिओनिन ही अमिनो आम्ले जास्त असतात .
माणसानंतर बुध्दीमान व सामाजिक बांधिलकी असणारे – डॉल्फीन ,कासव
सर्वात वजनदार, सर्वाधिक दुध देणारा,समुद्री सस्तन प्राणी – देवमासा (व्हेल )
शेपटीवर विषारी नांगी असणारा मासा – शार्क .
अर्धानर व अर्धामादी असणारा मासा – आईस्टर
मासे सुकवून त्याची भूकटी बनवितात. ही मत्स्य कुटी (फि शमिल) कोंबड्यांना, डुकरांना खाद्य म्हणून देतात. उत्तम दर्जाच्या फि शमिलमध्ये ६०% प्रथिने तसेच तेल, कॅल्शिअम व फॉस्फरस असते. भारतात मुंबई, कोलकाता, कोची,जाफाराबाद येथे फिशमिलचे कारखाने आहेत.

माशांचे रोगः-
पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्यास माशांना होणारा रोग – पॉप आय(डोळे सूज )
जीवाणूमूळे माशास होणारे रोग – अल्सर ,ड्रॉप्सी, Tail & Fin.Rot, causitive oryon.
पोटात अनावश्यक द्रव्य साचल्याने माशास होणारा रोग- ड्रॉप्सी ( पोटफुगी )
मासे विषारी बनविणारे जीवाणू – साल्मोनेला.
सुक्ष्म जीवाणूमूळे माशांना होणारे रोग – सफेत डाग ( आयसीके )
माशांची वाहतूक करतांना त्यांना जखमा होवून कवकाचा संसर्ग होतो.
मासा मंदगतीने हालचाल करतो. यकृत व आतड्यास सुज येते . संपूर्ण शरीर चिकट स्त्रावाने भरून जाते. जखम झालेल्या ठीकाणी केसासारखे लहान लहान पांढरे कोष फुटतात हा रोग म्हणजे –पॅनासायटीक आजार
उन्हाळ्यात तलावात सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जास्त झाल्यास किंवा तलावातील पानवनस्पती सडल्यास होणारा रोग -गिल रॉट
बॅक्टेरियामुळे शरीरावर छिद्रे पडतात. शरीराचे आकारमान वाढून मांस गळून पडते. ही लक्षणे असणारा रोग – अल्सर

मासेमारी

A)सागरी मासेमारी B)खाडीच्या पाण्यातील मासेमारी

C)गोड्या पाण्यातील मत्स्यशेती D)भातशेतीतील मत्स्य संवर्धन

सागरी मासेमारी
आतंरराष्ट्रीय सागरी सिमा नियमाप्रमाणे किना-यापासून २००मैल पर्यतचे क्षेत्र संपूर्ण आर्थिक क्षेत्र मानले जाते.
किना-यापासून १२ सागरी मैल क्षेत्रावर केंद्राने राज्यांना मत्स्य उद्योगांबंधी कायदे करण्याचे अधिकार दिले आहे.
समुद्राच्या पाण्यात १०० फॅदम खोली पर्यंतच्या भूखंडमंचाच्या भागात प्लॅक्टन वनस्पती उगवते . ही वनस्पती माशांचे आवडते खाद्य असल्यामुळे मासेमारीसाठी हा भाग महत्वपुर्ण ठरतो. १००ते १००० फॅदमचा भाग बिनवनस्पतीचा तर त्याहून पुढचा भाग अंधारी क्षेत्र म्हणून ओळ्खतात.

समुद्रातील मासेमारीत किना-यावरील मासेमारीचा ७५%वाटा आहे .
भारतातील प्रमुख मासेमारी बंदरे – कोची, चेन्नई, विशाखापट्टनम , रायचौक ,पॅराद्विप इ.
महाराष्ट्रातील सागरी प्रादेशिक जलक्षेत्र १.३२ लाख चौ.कि.मी. क्षेत्र सागरी मासेमारीसाठी उपयुक्त आहे. यापैकी ३० ते ४० फॅदम खोलीपर्यंतच मासेमारी होते. महाराष्ट्राची वार्षिक सागरी मत्स्योत्पादन क्षमता ६.३ लाख टन अंदाजित करण्यात आली आहे . (राज्यसेवा पूर्व परीक्षाः ०६)


नौका व जाळ्यांचे प्रकार

नौका व जाळ्यांचे प्रकार

१) ट्रॉलर्स व ट्रालनेट – यांत्रिक नौकांना ट्रॉलर म्हणतात, तर त्यांच्या जाळ्यांना ट्रॉलनेट म्हणतात. याद्वारे समुद्राच्या तळाशी राहणारे कोळंबी, माकूल, शेवंड व मुशी सारखे मौल्यवान मासे पकडतात.

२) डोल जाळे- पिशवी प्रमाणे दिसणारे नरसाळयाच्या आकाराचे हे जाळे असते. ह्याचा वापर महाराष्ट्राच्या किनारी भागातील तळाचे बोंबिल, सरंगे, मांदेली, कोळंबी, मुशी सारखे मासे पकडण्यासाठी करतात. याच्या तोंडाचा व्यास२५ मी. व शेपटीचा व्यास ०.५ मी. असतो. महाराष्ट्रात हे जाळे मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये वापरतात.

३) रापन जाळे- उथळ पाण्यात राहणा-या बांगडा, हैद, पेडवा सारख्या माशांना पकडण्यासाठी हे जाळे वापरतात. यासाठी १०० ते १५० मच्छीमार लागतात. ह्याची लांबी ३००० मी. पर्यत असू शकते. हे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत वापरले जाते. हे कोकणात वापरले जाणारे सर्वात मोठे जाळे आहे.

४)पर्स सिन जाळे –हे अत्याधुनिक जाळे खोल पाण्यात थव्याने राहणारे बांगडे, तारळी, कुप्पा हे मासे पकडण्यासाठी वापरतात.

५)गिलनेट (कल्ली जाळे) – या लांबलचक पदड्यासारख्या जाळ्यात मासा कल्ल्याजवळ अडकतो. याव्दारे सारंगा,मुशी, शिराळा, सुरमई, घोळ, वाम, दाढा हे मासे पकडतात.

६)खांदे / गळ – यात माशाला अमिष दाखवितात.
नौकांचे प्रकार -१) पगार होडी- एकाच लाकडाचा ओंडका खोदून तयार करतात.

२) डोणी होडी – पगार होडी दोन्ही बाजूस लाकडी फळ्या जोडून तयार करतात.

३) मासूला नौका – फळ्या सुंभाने बांधून तयार करतात.

४) तराफा – लाकडाचे ओंडके बांधून तयार करतात.
भारतात नौकांच्या यांत्रिकीकरणास सुरुवात -१९६०
सागर पृष्ठीय मासा – बांगडा, टूना, सार्डीने ला (हाईद)
सागरतळीय मासा – कॅटफिश
व्यापारी दृष्टिकोनातून माशाच्या महत्वाच्या जाती –कॅटफिश, रेनबो,मधीर, मसेल इ.
श्वासोच्छावासासाठी पाण्याबाहेर येणारा मासा –व्हेल.

प्रमूख सागरी प्राणी

१) बांगडा (इंडीयन मरकेल ) – याचे शास्त्रीय नाव रास्ट्रेलियन काना गुर्ता असे आहे. प्लवंग व सुक्ष्म वनस्पती हे यांचे मुख्य अन्न आहे . हा महाराष्ट्राच्या किना-यावर रत्नागिरीपासून कन्याकुमारी पर्यत आढळतो. बांगडा माशाचे सर्वाधिक उत्पादन केरळ मध्ये होते. हा सामान्यतः रापन जाळ्याने पकडतात. ६०% बांगडा खारवला जातो.

२) कोळंबी – ही संधीपाद वर्गातील खेकडे, शेवंडे, झिंगे यापैकी एक प्राणी आहे. कोळंबी समुद्रात निमखा-या पाण्यात व गोड्या पाण्यात राहतात. कोळंबीच्या अंड्यातून बाहेर पडलेल्या पहिल्या स्थितीला नॉपलिया म्हणतात.
आकाराने मोठ्या, चविष्ट व सर्वाहारी कोळंबीस पीनीड कोळंबी (पिनियस इंडीकस) म्हणतात. पीनीड कोळंबीचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य – केरळ
आकाराने लहान असणा-या व त्यांचे कवच काढुन मांस काढणे कठीण असते. अशा कोळंबीस नॉनपिनीड कोळंबी असे म्हणतात. नॉनपिनीड कोळंबीचे ८०% उत्पादन करणारे राज्य – महाराष्ट्र
शास्त्रीय भाषेत कोळंबीच्या जाती –

१) पिनीयस २) गेटोपिनियस ३) पॅरा पिनीऑपशस

४)लिएंडर ५) ऑसेटीस ६) पॅलेइगान
कोळंबीच्या महाराष्ट्रात प्रमुख २७ जाती आहे . त्यापैकी महत्वाच्या जाती – चालू, टायनी, कापशी, सफेत कोळंबी इ.
महाराष्ट्रात कोळंबी पकडण्या साठी वापरले जाणारे जाळे – डोलजाळे व ट्रॉल जाळे.
भारताच्या मासे निर्यातीत कोळंबीचा वाटा – ५० % पेक्षा जास्त.
कोळंबी ताज्या स्वरूपात फारच कमी प्रमाणात खाल्ली जाते . वाळलेल्या कोळंबीचे सोडे म्हणतात.
कोळंबी संवर्धनाचा पहिला यशस्वी प्रयोग १९३४ मध्ये जपानमध्ये झाला. कोळंबीचे शास्त्रशुध्द पध्दतीने संवर्धन केल्यास ८ ते १० महिन्यात हेक्टरी २ टन उत्पादन मिळ्ते . (जनक – फुजिनागा)
महाराष्ट्रातील कोळंबी संवर्धनाचा पथदर्शक प्रकल्प – आसनगाव (ठाणे)
राज्यातील कोळंबी बीज उगवण केंद्र – बडा पोखरण ( ठाणे )
गोड्या पाण्यातील कोळंबी संवर्धनासाठी योग्य जात – जंबो कोळंबी( मॅक्रोबॅक्रीयम रोझेन बर्गी )
जंबो कोलंबीला देशावरील नाव- झिंगा
कोळंबीला परदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे जलद गोठवून किंवा हवाबंद डब्यात टिकवून परदेशात पाठवितात .

३) बोंबिल (बॉम्बे डक ) – याचे शास्रीय नाव हार्पोडॉन नेहेरियस असे आहे . भारतात बोंबिल उत्पादनाचा गुजरातचा (६३%) प्रथम क्रमांक लागतो , तर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक (३५%) लागतो . महाराष्ट्राच्या मत्स्योत्पादनात बोंबिलाचा वाटा १७ % आहे . तर भारताच्या मत्स्योत्पादनात बोंबिलचा ७ ते १०% वाटा आहे .

४) पॉम्फ्रेटस् – पापलेट, सरंगा , हलवा यांचा या गटात समावेश होतो . हे मासे चवदार असतात व शरीरात काटे कमी असतात . या माशांमध्ये पापलेट हा मासा सर्वोत्तम म्हणून गणला जातो. पापलेटचे सर्वाधिक म्हणजे ३३%उत्पादन महाराष्ट्रात होते. हा अतिशय महाग मासा आहे .

५) हैद - याच्या ९ जाती आहे हा समुद्राच्या वरच्या थरात आढळतो, तर रापन व फेक जाळ्यांच्या साहाय्याने पकडतात. याच्या शरीरापासून तेल काढतात .हे तेल ताग साबण व चर्मोद्योगासाठी तसेच बोटांना रंग देण्यासाठी वापरतात. हैदचे शास्रीय नाव सार्डीनेला आहे .

६) आयस्टर – पर्ल आयस्टरपासून मोती मिळतात. मोती प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीवर जमा करतात. कच्छ व मन्नारच्या आखातातही मोती मिळतात.

खाडीच्या पाण्यातील मासेमारी
महाराष्ट्रातील निमखा-या पाण्यातील मासेमारीसाठी उपयुक्त क्षेत्र-१८६००हेक्टर
खाडीच्या पाण्यातील प्रमुख मासे –हैद,जिताडा , रेणवी , थानउस , बोई , मुळे , कालवे इ.
खाजण जागा वाटपाचे धोरण शासनाने आमलात आणले -१९८५ पासून
निमखा-या पाण्यातील कोळंबी उत्पादनासाठी शासनाने मार्च २००३ अखेरपर्यत कोकणातील ४ जिल्हयात ६६ प्रस्ताव मंजूर केले व३४४.९६ हेक्टर जमिनीचे वाटप किले. त्या अंतर्गत सर्वाधिक वाटप झालेला जिल्हा . – ठाणे जिल्हा

१) झिंगे – जागतिक बाजारपेठेत झिंग्याना स्कॅपी म्हणतात . हे खाडीत असतात . हे प्राणी आपली पिल्ले खाडीत सोडतात . या पिल्लांची वाढ गोड्या पाण्यातच झपाट्याने होते. (मॅक्रोबॅक्रीयम रोझेनबर्गी )

२) मुळे – हे प्रामुख्याने महाराष्ट्रात सापडतो.याच्या शरीरावर दोन शिंपल्यांचे कवच असते . हे शिंपले महाराष्ट्रातील उदा – ३४ खाड्यांतून सापडतात.
निमखा-या पाण्यात मत्स्य शेतीसाठी उपयुक्त मासा- बोई

गोड्या पाण्यातील मत्स्य शेती
शेतकरी मत्स्यशेती तलाव , छोटे जलाशय किंवा शेतकरी शेततळ्यात करू शकतो.
महाराष्ट्रातील मत्स्यशेतीस उपयुक्त गोडे पाणी क्षेत्र -३२०० चौ. कि.मी.
महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसायासाठी नद्यांची लांबी ३२०० कि.मी.
मत्स्यशेतीसाठी जलद वाढणारे प्रमुख कार्प मासे – कटला, रोहू, मृगळ , चंदेरा ,गवत्या व सायप्रिनस .
भारतीय कार्पच्या जाती – कटला, रोहू , मृगळ इ.
महाराष्ट्रातील स्थानिक जाती – मरळ मागूर शिवडा , कटला ( गंगा नदी)
चितगाव भागात हलदा नदीतून अंडी गोळा करतात –सायप्रिनर्स कार्पची
शरीरावर बारीक खंदेरी खवले असणारा १९५९ मध्ये कटक येथे जपान मधून आणलेला कार्प मासा- चंदेरा (सिल्व्हर कार्प )
१९५९ मधे कटक येथे चीन ( हाँगकाँग) हून आणलेला मासा जो तलावातील प्रदुषक तसेच उपद्रवी पाण वनस्पतींचा फडशा पाडतो – गवत्या (ग्रासकार्प)
मुळचा आफ्रिकेतील असणारा गोडया,निमखा-या व खा-या पाण्यात राहू शकणारा काटक मासा जो घाण पाण्यात राह्तो व तळ्यातील उपद्रवी वनस्पती व घाणीचा नाश करतो. परंतू अमर्याद प्रजनन क्षमतेमुळे मत्स्वशेतीसाठी वापर न होणारा मासा – तिलापिया
मत्स्यशेतीस घातक असणारे मत्स्य भक्षक मासे – पत्थरचाटू, मरळ ,लेदरकार्प, शिवडा ,शिंगाळा इ.
शरीरावा मध्यभाग रूंद, फुगीर , खवले मोठे,मुख्य खाद्य प्लवंग, जलद वाढ, प्रेरीत प्रजननासाठी सोपा, चांगली किंमत मिळणारा गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी सर्वोत्तम जात – कटला.
पाण्याच्या मधल्या भागात राहून उपजिवीका करणारे मासे – रोहू व गवत्या इ.
भारतात सर्वत्र मत्स्य संवर्धनसाठी वापरला जाणारा, मत्स्यबीज केंद्रात पैदास केली जाणारा ,बंगाली लोकांचा आवडता मासा – रोहू
गोड्या पाण्यात वरच्या स्तरात राहाणारा मासा –कटला
सापाच्या डोक्याप्रमाणे चपट्या डोक्याचा लांबट,तोड व शेपटीकडे निमुळता मासा – मरळ
पाण्याच्या तळाशी राहून उपजिवीका करणारे मासे – मृगळ व सायप्रिनर्स इ.
हवेत श्वसन करू शकणारा मासा- मागूर ,शिंपी इ.
वाहत्या नदीतच प्रजनन करणारे मासे – कटला,रोहू, मृगळ. इ.
मासेमारीसाठी तळ्याचा आकार – जलक्षेते -०.२ हे. २ हेक्टर, खोली १.५ ते२ मी. लांबी रुंदी २:१ प्रमाणात असावी.
मत्स्य भक्षक व निकृष्ट मासे तसे पाणवनस्पतीचे निर्मुलन करणे.
सर्वोकृष्ट पाण्याचा आम्ल विम्ल निर्देशांक -६.५ते७.५

१) मिश्र संगोपन – यात कटला,रेहू, मृगळ यांचे एकत्र संगोपन करतात. या तीन जातीची अनुक्रमे ११२५, १५००व११२५ अशी एकूण३७५० बोटूकली सोडतात.

२) सघन मिश्र संगोपन – वरील तीन माशांबरोबर सायप्रिनस,गवत्या, चंदेरा यांचेही संगोपन करतात . चारा जातींचे संगोपन करतांना कटला१०००, रोहू १५००,मृगळ ६०० सायप्रिनस ९०० या प्रमाणात ४००० बोटूकली सोडतात. सहा जातींच्या संगोपनात सर्वाधिक उत्पादन – चंदेरा व गवत्या .

खाद्य - भूईमुग पेंड, तांदळाच्या कांड्या किंवा गव्हाचा कोंडा १:१प्रमाणात देतात.
उत्पादन – १०ते१२ महिन्यात माशांचे सरासरी वजन प्र्त्येकी १किलो होते. दरवर्षी हेक्ट्री ३००० किलो पेक्षा जास्त उत्पादन मिळ्ते.

प्रजननः-
बहूसंख्य माशांचा अंडी घालण्याचा हंगाम पावसाळा असतो. १ किलो वजनाची मादी १ते १.५ लाख अंडी घालते . त्यावर नर दूधाळ रेत फवारतो अंडी फलीत होतात. यातून १४ते १८ तासांनी पारदर्शक जीव बाहेर येतात. त्यांना पोटावरील स्पॉन नावाचा पिशवीतून अन्नाचा पुरवठा होतो.
माशांच्या प्रजननाची वेळ- पहाटे
माशांच्या बिजांच्या प्रमुख सात अवस्था आहेत.
फलित अंडी – मत्स्य जिरे- मत्स्यबीज- अर्ध बोटूकली.
अंडी घातल्यापासुन जीवबाहेर येण्यास लागणारा काळ -१४ ते ४८ तास.
८ मि. मी. पर्यंत वाढलेला मत्स्यजीव – मत्स्य जिरे.
२५ मि मी. पर्यत लांबीचे पिल्ले. मत्स्य बीज .
२५ ते १५० मि मी पर्यत वाढलेली पिल्ले – बोटूकली.
मत्स्यबीजे (बोटूकली) - मातीच्या किंवा ऍल्यूमिनियमच्या भांड्यात गढूळ पाण्यातून वाहतूक करतात.
कार्प माशांचे प्रेरीत प्रजनन घडविण्यासाठी शीर्ष ग्रंथी / पिट्यूटरी ग्रंथीच्या द्रवाचे इंजेक्शन देतात. परंतु याला पर्याय म्हणून ह्यूमन कारिऑनिक गोनेडोट्रापिन ही रसायनिक पुड किंवा आव्हाप्रिम हे नवे द्रवरुप रासायनिक वापरतात.
मत्स्यबीज केंद्रात प्रेरीत पैदासीसाठी बंगाली लोकांचा आवडता मासा – रोहू.
भारतातील गोड्या पाण्यातील मत्स्यबीज विक्री केंद्र – कोलकाता.
महाराष्ट्रातील ५०% केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय मत्स्यबीज केंद्र – अप्पर वर्धा . अप्पर पेनगंगा इ.
महाराष्ट्रात १९६७ पासून म्त्स्यबीज कार्यक्रम राबविला जात आहे.
महाराष्ट्रात मत्स्यबीज उत्पादन कार्यक्रमाखाली २००१ -०२ म्ध्ये ७० मत्स्यबीज उत्पादन / संगोपन केंद्र होती. यात २७.५ कोटी मत्स्यबाजाचे उत्पादन झाले.
मत्सबीज निर्मितीसाठी उपयोगात येणा-या आधुनिक पध्दती – १) मोगरा बांध (पं. बंगाल ) २) शुष्क बांध ३) बारामाही बांध

भातशेतीतील मत्स्य संवर्धन
भात शेतीत मासे वाढविणारे देश- चीन , जपान, कंबोडीया इ.
महाराष्ट्रातील भातशेतीत मत्स्यसंवर्धन करणारे जिल्हे – ठाणे, रायगड इ.
भात शेतीत मत्स्यसंवर्धनासाठी वापरला जाणारा प्रमुख मासा- जिताडा.
दक्षिण भारतात संवर्धनासाठी वापरली जाणारे प्रमुख माशाची जात – तांबिर .
भातशेताच्या तळात राहून गाळातून फिरल्यामूळे नैसर्गिकरित्या खुरपणी करणारा मासा – सायप्रिनस कार्प
भातशेतीतील १०ते१५ सेमी पाण्याचा वापर करुन मत्स्य संवर्धन करतात. शेवटच्या दिवसात मर्यादित पाण्यात मासे जगावे म्हणून शेताच्या चारी बाजूना ५०सेमी रुंद व३० सेमी खोल चर खोदतात .
भातशेतीसाठी मासे ३ते४ महिन्यात वाढणारे असावे लागतात. भात लावणीनंतर ४-५ दिवसांत हेक्टरी ५०००ते १०००० तेमत्स्य बोटूकली सोडतात . माशांची सह आठवड्यात वाढ होऊन हेद्ट्री १५०ते २०० किलो उत्पादन मिळ्ते .
भाताचे पीक काढल्यावर पडीत शेतात मत्स्य संवर्धनाची पध्दत असणारे राज्य – केरळ
ज्या भात शेतात मत्स्य संवर्धन करता येणे शक्य नसते अशा ठिकाणी २ सेमी लांबीची प्रती हेक्टरी ३०हजार ते ५०हजार पिल्ले सोडतात.त्यांची वाढ ५ ते ७ सेमी बोतूकली झाली की त्याचा वापर मत्स्यबीज म्हणून करतात.

मासे टिकविणे
मासे नाशवंत असतात. उन्हात सुकवणे, धुराने प्रक्रिया करणे, मीठ लावून टिकवणे, लोणचे तयार करणे , शीत प्रक्रियेद्वारे गोठविणे व हवाबंद डब्यात ठेवणे अशा सहा पध्दतीने टिकवितात .
उन्हात सुकविणे ही महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त व पारंपारीक पध्दत असून या पध्दतीने बोंबिल ,बांगडा,झिंगे ७ते ८ तास वाळविल्यास ५ ते ६ महिने टिकतात.
बांगडा, सुरमई, हैद व पापलेट सारखे मासे धुर देवून टिकवितात. धुरातील फिनॉलमुळे मासे सुकतात व त्यांना मोहक रंग येतो
मीठ लावून खारविण्याच्या पध्दतीत माशाचे डोके व अन्नमार्ग काढून शरीरावर वर चिरा पाडतात व त्यात१;५ ते १;८ या प्रमाणात मीठ भरतात. उदा- सुरमई , हैद ,तारळे व शार्क, बांगडा मासे खारविणे.
शीतकरण पध्दतीने मासे बर्फ १: १ प्रमाणात ठेवतात. तसेच मासे ऍल्यूमिनिअमच्या भांड्यात दाब देवून अमोनियाद्वारे -१० अंश सेल्सिअस तापमानावर थंड करतात. या पध्दतीने कोळंबी ६ महीने टिकते. मुंबई व रत्नागिरीला असे कारखाने आहेत.
मासे हवाबंद डब्यात भरणे ही खर्चिक पध्दत असून यात प्रामुख्याने कोळंबी तसेच हैद,तारळी,पेडवे,बांगडे आणि चिंगूळ हे मासे वापरले जातात.

मासेमारीशी संबंधीत विविध संस्था –
सागरी संशोधनासाठी १९०२ मध्ये कोपनहेगन येथे स्थापन झालेली संस्था- इंटरनॅशनल कौन्सिल फॉर एक्सप्लोरेशन ऑफ दि सी
भारतीय मत्स्यकीय सर्वेक्षण संस्थेची स्थापना – मुंबई (१९४६)

या संस्थेतर्फे पोलंडकडून मुरेना जहाज मिळवून प. किनारपट्टीवर ५५ते ३६०मी . खोली पर्यत सागर संपत्तीचे संशोधन करण्यास मदत झाली आहे.
केंद्रीय मत्स्यव्यव्साय संशोधन व प्रसार संस्था –मुंबई.
म्त्स्य उद्योगाच्या विकासासाठी राष्ट्रीय मत्स्य विकास बोर्डाचे मुख्यालय – हैद्राबाद
केंद्रीय मत्स्यव्यवसाय शिक्षण संस्था – वर्सोवा, मुंबई.
राष्ट्रीय मासेमारी अनुवांशिकी संशोधन संसाधन ब्युरो – लखनौ.
सागरी उत्पादन वनिर्यात विकास प्राधिकरण – कोची (केरळ )
माशांच्या निर्यातीकरता१९५३ मध्ये पहिले शीतगृह सुरु – कोची(केरळ)
केंद्रीय सागरी मत्स्यपालन व समुद्री इंजिनिअरींग प्रशिक्षण संस्था – कोची(केरळ)
केंद्रीय सागरी मत्स्यव्यवसाय संशोधन संस्था- कोची(केरळ)
देशांतर्गत विभागीय मासेमारी प्रशिक्षण व मुख्य मध्यवर्ती संशोधन संस्था- बराकपुर व आग्रा.
भारतातील मत्स्यव्यवसाय महाविद्यालये – बंगलोर , पंतनगर, रत्नागिरी
भारतातील पहिली मछ्चीमारी सहकारी संस्था१९१३ मध्ये रत्नागिरी जवळ स्थापन झाली – कली मछ्चीमारी सहकारी संस्था
मत्स्यव्यवसाय तंत्रज्ञान व्यवसाय संस्था- कोची.
सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर पोस्ट्ल इंजिनिअरींग फॉर फिश्रीज इन इंडिया-बंगलोर (१९६७)
थंड पाण्यातील माशांचे राष्ट्रीय संशोधन केंद्र- नैनिताल (उत्तराखंड)
राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था- गोवा

महाराष्ट्रातील मासेमारीची प्रगती
मछ्चीमारी नौकांच्या यांत्रिकीकरणाची योजना १९६७ पासून महाराष्ट्र सरकारने सहकारी क्षेत्रामार्फत राबविण्यास सुरूवात केली . २००८-०९ मध्ये राज्यात मछ्चीमारी नौका होत्या. राज्याच्या सागरी मिना-यावर मासळी उतरविण्यासाठी १८४ केंद्रे होती.
सागरी उत्पन्नावर प्रक्रिया करून त्याची निर्यात वाढविण्यासाठी महाराष्ट्राने १९७३ मध्ये स्थापन केलेली संस्था- महाराष्ट्रमत्स्य व्यवसाय विकास
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन १९८१ – ८२
कोकण कृषी विद्यापीठाची मत्स्य व्यतसाय शाळा विद्याशाखा–दापोली
कोकण कृषी विद्यापीठाअंर्तगत मत्स्य व्यतसाय महाविद्याल (पदवी)-रत्नागिरी
मत्स्य व्यवसायाचे पदव्युत्तर शिक्षण महाविद्यालय- अंधेरी (मुंबई).
गोड्या पाण्यातील मत्स्य संशोधन विभाग-पंजाबराव कृषी विद्यापीठ , अकोला.
महाराष्ट्रातील सर्वाधिक लाबीचा समुद्र मिनारा लाचलेला वसर्वार्धिक म्त्स्योत्पादन करणारा जिल्हा-रत्नागिरी
गोड्या पाण्यातील मासेमारीत अग्रेसर जिल्हा-गोंदिया.
महाराष्ट्रातील एकमेव मत्स्यालय- तारपोलवाला मत्स्यालय , मुंबई (१९५१)
महाराष्ट्रातील प्र्स्तावित मत्स्यालय –वर्सावा.
महाराष्ट्रात आधुनिक मासेमारी पशिक्षण दिले जाते –भंडारा, कुलाबा, परभणी, पुणे इ.
मासेमारीचा हंगाम सुरू होतो- १५ ऑगस्ट (नारळी पौर्णिमा )
मत्स्य व्यवसायाच्या विकासासाठी सर्व सोयी सुविधा युक्त मत्स्यबंदरे –मिरकवाडा (रत्नागोरी काम पुर्ण ७ वी योजना), ससून गोदी, भाउचा धक्का (मुंबई )
देशावर मासेमारे करणारे जमात –भोई
ठाणे जिल्ह्यातील मासेमारी करणारे जमात – महादेव कोळी
महाराष्ट्रात ९ मासेमारी शिक्षणसंस्था व४२ मत्स्यबीज केंद्र आहेत .

संकीर्ण
समुद्रतील प्राण्यांच्या उत्पादनाला संज्ञा – मेरीकल्चर .
व्यापारी वत्वावरील मत्स्यपालन – पिसीकल्चर / ऍक्वा कल्चर
मत्स्योत्पादन समुद्र प्राण्यांचे व्यापारी तत्वावर प्रचंड उत्पादन – निल क्रांती.
समुद्र सपाटीपासून उंचावरील मासेमारी- तापमान .
भारतातील सर्वात मोठे खारे पाणी मासळी विक्री केंद्र - मुंबई.
भारतातील सर्वाधिक मत्स्याहार करणारी राज्ये – केरळ व प.बंगाल.्



Saturday 23rd February 2013
फेब्रुवारी २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५४ वा किंवा लीप वर्षात ५४ वा दिवस असतो. ठळक घटना पंधरावे शतक
१४५५ - गटेनबर्ग बायबल प्रकाशित. पाश्चिमात्य देशांतील हे पहिले मुद्रित पुस्तक होय.
सतरावे शतक
१६६० - चार्ल्स अकरावा स्वीडनच्या राजेपदी.
एकोणिसावे शतक
१८३६ - टेक्सासच्या सान अँटोनियो गावाच्या किल्ल्याला (अलामो) मेक्सिकन सैन्याने वेढा घातला.
१८७० - अमेरिकन यादवी युद्ध - मिसिसिपी परत अमेरिकेत दाखल.
१८८७ - फ्रेंच रिव्हियेरात भूकंप. २,००० ठार.
१८९३ - रूडॉल्फ डिझेलने डिझेल ईंजिनचा पेटंट मिळवला.
विसावे शतक
१९०३ - क्युबाने आपला ग्वान्टानामो बे हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.
१९०४ - पनामाने १,००,००,००० अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.
१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशीस्ट पार्टीची स्थापना केली.
१९३४ - लिओपोल्ड तिसरा बेल्जियमच्या राजेपदी.
१९४० - दुसरे महायुद्ध - सोवियेत संघाने लासी बेट जिंकले.
१९४१ - डॉ.ग्लेन टी. सीबॉर्गने किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथमतः निर्मिती केली.
१९४५ - दुसरे महायुद्ध - ईवो जिमाची लढाई - काही अमेरिकन मरीन्स माउंट सुराबाचीवर पोचले व त्यांनी तेथे अमेरिकन झेंडा उभारला. हे करीत असतानाचे त्यांचेछायाचित्र जगप्रसिद्ध झाले.
१९४५ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जपानी सैन्यापासून मुक्त केले.
१९४५ - दुसरे महायुद्ध - पोलंडच्या पोझ्नान शहरात जर्मन सैन्याने शरणागती पत्करली.
१९४५ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सच्या विमानांनी जर्मनीतील फॉर्झैम शहरा बेचिराख केले.
१९४७ - आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था(ISO)ची स्थापना.
१९५५ - एडगर फौ फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
१९६६ - सिरीयात लश्करी उठाव.
१९९१ - पहिले अखाती युद्ध - दोस्त राष्ट्रांची सौदी अरेबियातून इराकवर खुश्की मार्गाने चाल.
१९९१ - थायलंडमध्ये लश्करी उठाव.
१९९७ - रशियाच्या अंतराळ स्थानक मिरमध्ये आग.
१९९९ - ऑस्ट्रियाच्या गाल्ट्युर गावावर हिमप्रपात. ३१ ठार.
जन्म
१४१७ - पोप पॉल दुसरा.
१६४६ - तोकुगावा त्सुनायोशी, जपानी शोगन.
१६८५ - जॉर्ज फ्रीडरिक हान्डेल, जर्मन संगीतकार.
१८४२ - जेम्स लिलिव्हाइट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१८७४ - कॉन्स्टेन्टिन पाट्स, एस्टोनियाचा राष्ट्राध्यक्ष.
१८६७ - जॅक बोर्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९०४ - हेन्री प्रॉम्नित्झ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९०६ - फ्रँक वॉर्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९०८ - विल्यम मॅकमेहोन, ऑस्ट्रेलियाचा २०वा पंतप्रधान.
१९२५ - इयान स्मिथ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९४० - पीटर फोंडा, अमेरिकन अभिनेता.
१९४१ - रॉबिन बायनो, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
१९४७ - जॉफ कोप, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९५४ - व्हिक्टर युश्चेन्को, युक्रेनचा राष्ट्राध्यक्ष.
१९६५ - स्टीव्ह एलवर्थी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९६८ - वॉरन हेग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९७३ - ब्रॅड यंग, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९७४ - हर्शल गिब्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
११०० - झ्हेझॉँग, चीनी सम्राट.
१४४७ - पोप युजेनियस चौथा.
१४६४ - झेंगटॉँग, चीनी सम्राट.
१७३० - पोप बेनेडिक्ट तेरावा.
१७६६ - स्तानिस्लॉ लेस्झिन्सकी, पोलंडचा राजा.
१८४८ - जॉन क्विन्सी ऍडम्स, अमेरिकेचा ६वा राष्ट्राध्यक्ष.
१८५५ - कार्ल फ्रीडरिक गॉस, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
१८७९ - आल्ब्रेख्ट ग्राफ फॉन रून, प्रशियाचा पंतप्रधान.
१९६५ - स्टॅन लॉरेल, अमेरिकन अभिनेता, लॉरेल व हार्डीचा अर्धा भाग.
१९६९ - सौद, सौदी अरेबियाचा राजा.
१९६९ - मधुबाला, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
१९९० - होजे नेपोलियन दुआर्ते, एल साल्वाडोरचा राष्ट्राध्यक्ष.
२००४ - विजय आनंद, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.
२००४ - सिकंदर बख्त, भारतीय राजकारणी, केरळचा राज्यपाल.
२००८ - यानेझ द्र्नोव्सेक, स्लोव्हेनियाचा पंतप्रधान.
  

Wednesday, 20 February 2013

List of Governors of Maharashtra

1 The Rt. Hon. Sir John Colville, PC, GCIE 1943 1948
2 Raja Sir Maharaj Singh, CIE 1948 1952
3 Sir Girija Shankar Bajpai, KCSI, KBE, CIE 1952 1954
4 Dr Harekrushna Mahatab 1955 1956
5 Sri Prakasa 1956 1962
6 Dr P. Subbarayan 17 April 1962 6 October 1962
7 Vijayalakshmi Pandit 28 November 1962 18 October 1964
8 Dr P V Cherian 14 November 1964 8 November 1969
9 Ali Yavar Jung 26 February 1970 11 December 1976
10 Sri Sadiq Ali 30 April 1977 3 November 1980
11 Air Chief Marshal O P Mehra 3 November 1980 5 March 1982
12 Air Chief Marshal I H Latif 6 March 1982 16 April 1985
13 Kona Prabhakara Rao 31 May 1985 2 April 1986
14 Dr. Shankar Dayal Sharma 3 April 1986 2 September 1987
15 Kasu Brahmananda Reddy 20 February 1988 18 January 1990
16 Dr. C Subramaniam 15 February 1990 9 January 1993
17 Dr. P.C. Alexander 12 January 1993 13 July 2002
18 Mohammed Fazal 10 October 2002 5 December 2004
19 S.M. Krishna 12 December 2004 5 March 2008
20 S.C. Jamir 9 March 2008 22 January 2010
21 Kateekal Sankaranarayanan 22 January 2010 Present