आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Sunday 25 November 2012

Article- Ideal teacher (part 1)

                                                                                                           
                                                                                                         


              शिक्षकही जन्मावा लागतो


                                                                                                           सौजन्य: ऋग्वेद मासिक, कोल्हापूर.


                        कलावंत जसा जन्मावा लागतो, तसा शिक्षकही जन्मावा लागतो; असे मानले तर चुकीचे ठरणार नाही. अथक साधना, दुर्दम्य इच्छाशक्ती, जिद्द आणि परिश्रम यांच्याद्वारे एखाद्या उपजत कलाप्रेमी मोठा कलावंत होऊ शकतो. पण त्याला अलौकिक, अद्वितीय, लोकोत्तर अथवा सर्वश्रेष्ठ अशी उपाधी कितपत लावता येईल हे सांगता येत नाही. वरती उल्लेख केलेल्या चार गोष्टी निष्ठेने आजीवन आचरणात आणणारा एखाद्या छोट्याश्या गल्लीतील गायक किंवा गायिका श्रीमती लता मंगेशकरांच्या स्थानापर्यंत कदापिही जाणार नाही. तीच गोष्ट उत्कृष्ट शिक्षकाबाबतीतही सांगता येईल. पोटाला भाकरी मिळावी म्हणून लाचार होऊन चाकरी करणा-या फाटलेल्या आणि विटलेल्या शिक्षकांची संख्या लाखात मोजावी एवढी सांगता येईल. जे अपघातानेच पाठ्यपुस्तकांना स्पर्श करतात. जे रतीबाच्या दुधाचा हिशेब लिहिण्यासाठी पेनचा वापर करतात. वर्गातल्या गणितापेक्षा कष्टाविना पैसा मिळवण्याचे गणितच ज्यांचा डोक्यात नाचत असते, अशा गंजून गेलेल्या शिक्षकांची संख्याच आपल्या समाजात खूप आहे. हे काही जन्माला आलेले शिक्षक नसतात, तर स्वत: त्या जन्माचा आणि अनेकांच्या जीवनाचा विस्फोट करणारे शिक्षक म्हणता येतील. आजची हे शैक्षणिक स्थितीगती पाहता शिक्षकही जन्मावा लागतो, हे विधान असत्य मानता येणार नाही.

व्यक्तीच्या सर्वांगीण अभ्युदयासाठी, विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी, राष्ट्राची चौफेर प्रगती साधण्यासाठी आणि भविष्याला आकार देणारी संस्कारसंपन्न कर्तव्यनिष्ठ पिढी तयार करण्यासाठी शिक्षणाशिवाय कोणत्याही चिरस्थाही असा दुसरा पर्याय नाही. यासाठी कायदा उपयोगी पडत नाही. कारण कायदा माणसावर सक्ती करुन त्याला सज्जन बनविण्याचा खटाटोप करीत असतो. जेव्हा समाजावर सक्ती होते; जेव्हा विकृती बलवत्तर होते. तेव्हा अपप्रवृत्ती बलिष्ट होते आणि बलिष्ट झालेली अपप्रवृत्ती कायद्यालाच मूठमाती देऊन मोकळी होते. म्हणून कायदा कुचकामी वाटतो. येथे धर्ममार्तंडाचा उपदेशही निरुपयोगी ठरतो. कारण आजचा धर्मही कर्मकांडांनी पोखरलेला आहे. नवससायासांनी माखलेला आहे आणि दांभिक आचारांनी -या धर्मसत्याला केव्हाच गिळून टाकलेलं आहे. एकेकाळी धर्माच्या सनातन मूल्यांच्या प्रकाशाने सामान्य माणसाचं जीवन अंशमात्र का होईना उजळून जात होतं. कारण तो प्रकाश देणारा आचार्य किंवा महर्षी त्या धर्मविचारांचे ऊर्जाकेंद्र होते. त्या प्रकाशाचे सजीव प्रतीक म्हणून वावरत होते. म्हणून त्यांच्या शब्दाला वजन होतं. त्यांच्या शब्दाला मंत्राप्रमाणे पावित्र्य आणि सामर्थ्य प्राप्त झालेलं होतं. आजचे महाराज आणि महर्षी म्हणजे भगवी वस्त्रे परिधान करुन वासनेची आणि धनलालसेची शिकार झालेली असतात नि तितकेच विलासप्रिय सुलतान वाटतात. त्यांच्या शब्दांतून व्यक्ती, समाज आणि देश यांचा सर्वांगीण आणि चिरंतन असा विकास होणं दुरापास्त वाटतं. कारण तेवढे आकाशव्यापी व्यक्तीमत्व आणि भविष्यभेदक दृष्टी आजच्या एखाद्या महाराजांजवळ असेल असं वाटत नाही. देशाचं नेतृत्व करणा-या राजकारणी नेत्यांच्या आणि विचारांचं सामर्थ्यही अनेकदा सर्वांगीण अभ्युदयाला उपयोगी पडू शकतं. हा अनुभव जगातल्या अनेक राष्ट्रांनी घेतलेला आहे. आपणही गांधी, नेहरु, शास्त्रीजी, टिळक, सावरकरही, यशवंतराव चव्हाण . रुपाने हा अनुभव घेतला आहे. धर्मग्रंथात निर्जीव होऊन पडलेल्या एकेका नीतीमूल्याचं प्रतीक म्हणून माणसं राजकारणात वावरली. चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व, तत्वधिष्ठित राजकारण, त्याला दिलेल्या नीतीमूल्यांची जोड, प्रखर देशनिष्ठा, स्वार्थनिरपेक्ष व्यवहार, समर्पित सेवाभाव आणि उपेक्षितांविषयी वाटणारा जातिवंत कळवळा यासांरख्या गुणवैशिष्ट्यांमुळे या थोर पुरुषांनी जात्याच अध:पतित असणा-या राजकारणाचा स्तर उंचावला म्हणूनस्वराज्य माजा जन्मसिध्द हक्क आहे’, ‘चले जावजय किसानजय जवानयांसारख्या घोषणा लोकांनी आपल्या काळजावर कोरल्या. ‘चले जावम्हणताच हजारो युवकांनी राजकारणाच्या यज्ञकुंडात स्वेच्छेने उड्या घेतल्या. त्यात ते होरपळून निघाले. आजच्या कोणत्या राजकारणींच्या ओठावर ही घोषणा शोभून दिसेल? रात्री घेतलेल्या दारुचा वास ज्याच्या तोंडाला दुपारपर्यंत येत असतो; असा एखादा दुराचारी, भ्रष्टाचारी नि दुर्गुणी नेताचले जावम्हणू लागला तर जनताच त्यालाचले जावम्हणते. सांगण्याचा मथितार्थ असा की, राजकिय नेत्याच्या आचार आणि विचारातूनही या समाजाचा सर्वस्पर्शी आणि शाश्वत विकास होणं शक्य नाही. तो होऊ शकतो शिक्षणामुळे ! आणि ज्ञाननिष्ठ, ध्येयनिष्ठ, तत्वनिष्ठ नि जननिष्ठ अशा आदर्श शिक्षकांमुळे
       सर्वांगीण अभ्युदयासाठी शिक्षण अत्यावश्यक का आहे याचाही विचार जाता जाता करता येईल. शिक्षण काय करते हेही या अनुषंगाने पाहिले की, त्याची गरज आणि त्यासाठी उत्कृष्ट शिक्षकाची अटळता आपल्या लक्षात येऊ शकेल. शास्त्राने प्रदेश जिंकता येतो, मनं जिंकता येत नाहीत. सत्तेने प्रशासन किंवा शासन साधता येतं, पण माणूसउभाकरता येत नाही किंवा माणूस जोडता येत नाही. पैशाने माणूस विकत घेता येतो, त्याची निष्ठा विकता घेता येत नाही; पण सहृदय अंत:करणातून जन्मलेल्या ज्ञानसंपन्न आणि संस्कारसंपन्न शब्दाच्या साध्या स्पर्शानेही माणूस जवळ येतो, जोडला जातो नि काळजामध्ये साठविलाही जातो. हे शब्द म्हणजेच विद्येची देवता असलेल्या सरस्वतीच्या मांडीवरील वीणेचा झंकार होय. हे शब्द म्हणजे विद्येचे अमृतपान करण्यासाठी वापरले जाणारे सुवर्णपात्र होय. म्हणून शिक्षण हे माणसाला अधिक उन्नत करते, अधिक निकोप बनवतं, अधिक समृध्द करतं. अधिक निरामय बनवतं. ते जीवनाची जाणीव अधिक समंजस करतं. माणसाच्या जगण्याला बळ पुरवतं, माणसाला पायापासून क्षितिजापर्यंत बघायला शिकवतं. एवढेच नव्हे तर ते माणसाच्या गुणांच्या, कौशल्याचा, कलेचा, जीवन दृष्टीचा विकास साधतं. शिक्षण माणसाच्या वासनेचं रुपांतर करतं. पराभवाचं पराक्रमात आणि तमाचं तेजात रुपांतर करीत असतं. कृतीचं सामर्थ्य, उक्तीचं तेज आणि समर्पणाची थोरवी आपणाला शिक्षणातून नीटपणे समजते. या सा-यांतून मग सामाजिक विषमता, सामाजिक श्रेष्ठकनिष्ठता, व्यक्तीच स्वातंत्र्य आणि समतेचा संदेश साध्य होत असतो. म्हणून शिक्षण हे साधन नव्हे, साध्य मानलं पाहिजे. समाजात असणा-या सा-या अवगुणांवरील एकमेव अंतिम उपाय म्हणजे संस्कारसंपन्न शिक्षण हाच आहे. शिक्षणाची महत्ता ओळखल्यामुळेच जपान, जर्मनी, स्वीडन सारखे देश शिक्षणावर सर्वाधिक खर्च करीत असतात. त्यांच्या दृष्टीने देशबांधणीसाठी आवश्यक असणारी ही पायाभूत गुंतवणूक आहे. आपल्याकडे मात्र हा विचार पूर्णांशाने रुजलेला नाही.
असा हा विस्कटलेला वर्तमान आणि अस्पष्ट वाटणारा भविष्यकाळ यांना आकार देण्यासाठी अत्यावश्यक असणारे शिक्षण यांचं अध्यापन करणारा शिक्षक कसा वाटावा याचा विचार करणं या ठिकाणी अप्रस्तुत ठरणार नाही. शिक्षणाचं सामर्थ्य, त्याचं सर्वस्पर्शत्व आणि त्याची अभ्युदय क्षमता ओळखणारा शिक्षक असेल तरच शिक्षणाची सफलता दृश्य स्वरुपात आपणाला जाणवेल, अन्यथा नाही. आज जीशिक्षकम्हणून अध्यापनाची कार्य करणारी मंडळी आहेत, ती या ऎतिहासिकमिशनला अपुरी पडणारी आहेत. अध्यापन ही समर्पित भावनेने करावयाची उपासना आहे. तो धंदा नसून आपला धर्म आहे, ते उपजीविकेचे साधन नाही तर देश उत्थानाचा ऎतिहासिक प्रयोग आहे. ही अक्षरओळख करुन देणारी शाळा नव्हे तर कर्तबगार भावी पिढी निर्माण करणारी प्रयोगशाळा आहे; अशी भूमिका घेऊन घड्याळावर नजर ठेवता आज काम करणारा साधक हवा. साधक वेगळा असतो आणि शिक्षक वेगळा असतो. साधक आपल्या आराध्य देवतेला भक्तिभावनेने आत्मा अर्पण करतो. साधक व्यावहारिक भावनेने नफातोट्याचा विचार करुन हातातील साधना पुरी करीत नसतो. साधक हा आत्म्यांचं उन्नयन करणारी श्रध्दा आराध्य देवतेच्या पायाशी ठेवत असतो. साधक जीवनाच्या अंतिम साध्यावर लक्ष ठेवून लौकिक सुखात फारसा गुरफटत नसतो. अशी ही भूमिका शिक्षकांनी घेतली तरच तो शिल्पकार ठरेल, समाज शिक्षक ठरेल, उमलत्या कळ्यांचं फुललेल्या फुलात रुपांतर करणारा देवदूत ठरेल. असा हा उत्कृष्ट शिक्षक जसं पाठ्यपुस्तक शिकवतो तसंच उघड्या जगाचं अनुभवसंपन्न पुस्तकही शिकवत असतो. उत्कृष्ट शिक्षक चार भिंतींमध्ये शिकवतो तसा तो भिंतींबाहेरही शिकवतो. तो सहवासातून शिकवतो, संवादांतून शिकवतो, आचरणातून शिकवतो, चारित्र्यातून शिकवतो. पाठ वाचायला शिकवत शिकवत तो निसर्ग वाचायला शिकवतो आणिमाणूसवाचायलाही शिकवतो. उत्कृष्ट शिक्षक शब्दांचा वापर करताही खूप काही शिकवत असतो. तो मुलांच्या पातळीवर येऊन मुलांना वरच्या पातळीवर घेऊन जातो. तो पंचेद्रियांना ज्ञानसन्मुख करीत अध्यापन करतो. जीवनाला समृध्द आणि श्रीमंत करणारे शाश्वत संस्कार अन् मूल्य यांचं बीजारोपण करतो. दुराचार आणि दुर्गुण, क्रौर्य, कामुकता, लालसा आणि लाचारी, शोषण आणि धनलोभ यांनी दूषित झालेल्या विषमय सामाजिक वातावरणापासून पंख फुटल्या पिलांना वाचवण्याचा तो निष्ठेने प्रयत्न करीत असतो.
 
 

No comments: