आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Friday, 12 August 2016

राष्ट्रध्वज फडकावण्याचे नियम

: *शासन निर्णय व परिपत्रक* 🔘

🇮🇳 *राष्ट्रध्वज फडकावण्याचे नियम*🇮🇳

*तुम्हाला तुमच्या घरांवर व दुकानांवर राष्ट्रध्वज वर्षभर फडकावावासा वाटतो. पण त्यासाठी त्याचा मानसन्मान पाळला गेला पाहिजे. त्याच्याविषयीच्या नितीनियमांची माहिती*...



*राष्ट्रध्वज उतरवणे*

देशातील महान व्यक्ती, राष्ट्राध्यक्ष यांचे निधन झाल्यास त्यांचा सन्मान राखण्यासाठी शोक पाळण्यात येतो. त्यावेळी राष्ट्रध्वजाला झुकविण्यात येते. याचा अर्थ ध्वज दंडाच्या मध्यभागी आणून फडकावण्याच्या स्थिती ठेवण्यात येते. राष्ट्रध्वज घेऊन संचलन किंवा मिरवणूकीने शोक व्यक्त केला जात असेल तर भाल्याच्या अग्रभागी काळ्या रंगाच्या दोन पट्टाय लावल्या जातील.
त्या पट्ट्या लटकलेल्या असतील. मात्र, असे प्रयोग केवळ शासनाच्या आदेशावरच होतील.

*खालील व्यक्तींचे निधन झाल्यास ध्वज उतरविण्याचे प्रभाव क्षेत्र*

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा पंतप्रधान- संपूर्ण भारतात
लोकसभा अध्यक्ष किंवा भारताचे सरन्यायाधीश- दिल्लीत
केंद्रिय मंत्रिमंडळ स्तरावरील मंत्री- केवळ दिल्ली व राज्यांच्या राजधानीत
केंद्र, राज्यमंत्री किंवा उपमंत्री - दिल्लीत
राज्यपाल, उपराज्यपाल, मुख्यमंत्री, संबधित किंवा संघशासित राज्याचा मुख्यमंत्री- संपूर्ण राज्य
कोणत्याही राज्याचा मंत्रिमंडळ स्तराचा मंत्री- संबंधित राज्याच्या राजधानीत
सूचना- दिल्ली म्हणजे दिल्ली महापालिका, नवी दिल्ली नगर पालिका व कॅन्टोन्मेंट बोर्ड या सर्व भाग.

*विशेष स्थिती*

राष्ट्रीय उत्सवावेळी अर्थात पंधरा ऑगस्ट, २६ जानेवारीला देशातील मोठ्या व्यक्तीचे निधन झाल्यास राष्ट्रीय शोक घोषित केला जातो. त्यावेळी ध्वज उतरविला पाहिजे.मात्र या दिवशी सर्वत्र ध्वजारोहण कार्यक्रम नेहमीप्रमाणे होतील. फक्त ज्या इमारतीत त्या व्यक्तीचे पार्थिव ठेवले आहे, तेथील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविलेला असेल. पार्थिव शरीर अंत्यसंस्कारासाठी बाहेर काढण्यात आल्यानंतर राष्ट्रध्वजाला पूर्ण उंच फडकावले पाहिजे.

*शहिदांवर राष्ट्रध्वज*

देशासाठी प्राणांचे बलिदान देणार्‍या जवानांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रध्वज त्यांच्यावर लपेटण्यात येतो. त्यावेळी केशरी पट्टी डोक्याच्या दिशेने आणि हिरवी पट्टी मांड्यांच्या दिशेने असली पाहिजे. पांढरी पट्टी डोक्यापासून पायापर्यंत आणि केशरी आणि हिरवी पट्टी डाव्या व उजव्या बाजूला अशी स्थिती अजिबात नको. आणखी एक महत्त्वाची बाब. शहीद वा मोठ्या व्यक्तिंच्या अंत्यसंस्कारावेळी राष्ट्रध्वज जाळायचा वा दफन करायचा नाही. मुखाग्नी देण्यापूर्वी किंवा दफन करण्यापूर्वी तो काढून घेतला पाहिजे.

*नष्ट कसा करायचा*

रंग उडालेला, फाटलेला राष्ट्रध्वज फडकावण्यास योग्य नसतो. असे करणे म्हणजे ध्वजाचा अपमान करणे आहे हे लक्षात ठेवा. राष्ट्रध्वजाची अशी स्थिती झाल्यास गुप्तपणे त्याला अग्नीच्या स्वाधीन केले पाहिजे. किंवा वजन किंवा रेतीत बांधून पवित्र नदी किंवा जलसमाधी दिली पाहिजे. पार्थिव शरीरावरून उतरवलेल्या ध्वजाच्या बाबतीतही असे केले पाहिजे.

*राष्ट्रध्वजाचा अपमान*

पाणी ओतणे, जमिनीवर पाडणे, फाडणे, जाळणे, त्यावर लिहिणे किंवा व्यावसायिक उद्देशाने वापर करणे हा राष्ट्रध्वजाचा अपमान समजला जातो. राष्ट्रध्वज झुकवणे हाही अपमान समजला जातो.
*शासन निर्णय व परिपत्रक*🔘

⚜ *```ध्वजसंहिता```* ⚜

‬ 🇮🇳🇮🇳 ध्वजसंहिता 26 जानेवारी 2002 ला नवीन ध्वजसंहिता अंमलात आली.

🇮🇳 ध्वजसंहितेत झालेले बदल-

1) डोक्यावर शिरस्त्राण (टोपी) असो अगर नसो सर्वांना सॅल्यूट करून मानवंदना देता येईल.

2) ध्वजाच्या घडीत फुलांच्या पाकळ्या ठेवल्या तरी चालतील.

3) कोणत्याही व्यक्तिला आपल्या संस्थांवर/ कार्यालयांवर ध्वजाचा मान राखून ध्वजारोहन करता येईल. (सूर्योदयानंतर ध्वजारोहन व सूर्यास्तापूर्वी ध्वजावतरण करावे.)

4) ध्वजापेक्षा जास्त उंचावर कोणतीही पताका लावू नये.

🇮🇳🇮🇳ध्वजप्रतिज्ञा 🇮🇳🇮🇳

 "मी राष्ट्रध्वजाशी आणि तो ज्याचे प्रतीक आहे त्या सार्वभौम,समाजसत्तावादी, धर्मनिरपेक्ष,लोकशाही प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करीत आहे."

🇮🇳🇮🇳ध्वजारोहन क्रम🇮🇳🇮🇳

1) ध्वजारोहन/ध्वज फडकवणे
2) राष्ट्रीय सलामी
3) राष्ट्रगीत
4) ध्वजप्रतिज्ञा
5) ध्वजगौरव गीत याप्रमाणे क्रम असावा.

 *****!!!!!*****‬: राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली

❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो.

राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे.

ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी नागरिकांना माहिती असते.

 संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी नागरिक कागदाचा झेंडा हातात घेऊन फडकवताना दिसतात.

मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर तेच झेंडे जमिनीवर इतरत्र फेकलेले दिसतात. ते टाळले पाहिजे. प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या झेंड्यांचा उपयोग करू नये.

ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले पाहिजे.

राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला पाहिजे की, तो सगळ्यांना दिसला पाहिजे.

शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा प्रथा आहे.

रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे.

प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे.

संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला गेला पाहिजे.

 ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविलाच पाहिजे.

ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी, बाल्कनी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा.

राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे.

 अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे.

कुठल्या पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे.

 ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा.

संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा.

जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये.

 कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये.

इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.

राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये.

केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये.

तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये.

ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे.

ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्या संदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे.

त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये.

ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही.
ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये.

कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही.

तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमाल अथवा नॅपकीनवर काढू नये.

राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही.

ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.

केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो.

राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत.

शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील.

जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल.

सरकारी अधिकार्‍यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे.

आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात.

🍁➖➖➖➰➖➖➖🍁
*शासन निर्णय व परिपत्रक* 🔘

सूत्रसंचालन कसे करावे ?

॥ सुत्रसंचालन ॥

सूत्रसंचालन म्हणजे काय व ते कसे करावे ? या संबंधी काही टिप्स :-
# कार्यक्रम पत्रिका:- 
उदा. व्याख्यान
आगतम् स्वागतम् सुस्वागतम्
1) मान्यवरांचे आगमन/स्थानग्रहण
2) सरस्वती पूजन/दीपप्रज्वलन/प्रतिमेस पुष्पहार
3) मान्यवरांचे स्वागत/शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ.
4) स्वागतगीत
5) प्रास्ताविक
6) पाहुण्यांचा परिचय
7) मनोगत- 1, 2, 3...इत्यादी
8) भाषण / व्याख्यान-1, 2,...इत्यादी.
9) अध्यक्षीय समारोप
10) आभार
11) प्रार्थना, राष्ट्रगीत इत्यादी
〰〰〰〰〰〰〰
सूत्रसंचालकाचे काही गुण :-
@ भाषाप्रभुत्व
@ नीटनेटकेपणा
@ संवेदनशिलता
@ सभाधीटपणा
@ हजरजबाबीपणा
@ सौजन्यशिलता
@ सुक्ष्मावलोकन क्षमता
@ आंगिक हुशारी
@ चाणाक्षपणा
@ इतरांबरोबर मिसळण्याची वृत्ती
@ भावनिक सक्षमता
〰〰〰〰〰〰

सूत्रसंचालनात आवश्यक गोष्टी :-
1) कार्यक्रम पत्रिका तयार करणे
2) कार्यक्रमाचे स्वरूप लक्षात घेणे
3) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण? याची माहिती घेणे
4) कार्यक्रमाचे स्थळ
5) कार्यक्रमाची वेळ 
6) श्रोता कोणत्या स्तरातील असेल याचा अंदाज बांधने
7) सूत्रसंचालनात कोणत्या काव्य ओळींचा उपयोग करायचा हे ठरवणे
8) आभार करणारा आहे की नाही हे पाहणे 
इत्यादी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुत्रसंचालन म्हणजे काय?
सुत्रसंचालनाची गरज...
सूत्रसंचलन हे भाग्यवंताचे काम...
सूत्रसंचलनाचे काही प्रकार...
& कवि सूत्रसंचालक
& शालेय महाविद्यालयीन कार्यक्रम
& औपचारिक कार्यक्रम
& शास्त्रीय संगीताची मैफिल
& गाण्यांचा कार्यक्रम
& राजकीय कार्यक्रम
& नैमित्तिक कार्यक्रम
& शासकीय कार्यक्रम
& सांस्कृतिक कार्यक्रम
& वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रम
इत्यादी..
@सूत्रसंचालकाचे काही गुण:-
1) हजरजबाबीपणा
2) वाचन व्यासंग
3) संग्रहन
4) वाक्पटुत्व
5) बहुश्रुतता
6) भाषाशैली
@सूत्रसंचालक होण्यासाठी पूर्वतयारी
* निरिक्षण
* वाचन
* वाचिक अभिनय
* सभाधिटपणा
* सूत्रसंचालक द्वय
* आपत्तीकालीन नियोजन
* सूत्रसंचालकाची देहबोली
* पेहरावावरही भर देण्याची गरज
* प्रत्यक्ष कार्यक्रमाची माहिती
* संहिता लेखन
* ध्वनीवर्धकाची जुळवनी
@ सूत्रसंचलनातील शिष्टाचार:-
# हे करू नका
# ते करा
@ संयोजकाशी समन्वय :-
@ संयोजनातील नियोजन
@ परिसंवाद-वादविवाद नियोजन
@ कार्यक्रमांना लागणार्या साहित्यावर एक नजर
@ माहिती तंत्रज्ञान युक्त डिजीटल सूत्रसंचालन
@ मुलाखतीचे संचालन
@ कार्यक्रम पत्रिका
@ मेहनतीच्या बळावरच सूत्रसंचालन यशस्वी होते
@ सूत्रसंचालन ही एक कला
@ सूत्रसंचालन हे एक शास्त्र आहे
@ सूत्रसंचालन -एक करिअर
@ निवेदकाची चलती
@ पाहुण्यांचा परिचय
@ सूत्रसंचालनासाठी उपयुक्त विचारवंतांची अवतरणे
@ वृत्तपत्रे आणि विचारवंतांच्या पुस्तकातून निवडलेले काही सुविचार
@ उपयुक्त संत अवतरणे
@ पंत अवतरणे
@ कवी आणि त्यांच्या काव्यपंक्ती
@ काही बहुचर्चीत कविता
@ आईच्या कविता
@ स्त्री जीवनविषयक ओव्या
@ उखाणे
@ इतर व अनेक प्रकारे माहिती गोळा करून प्रभावी सूत्रसंचालन करता येते.......

Thursday, 11 August 2016

मुख्यमंत्री आणि राज्यपाल 2016

*मुख्यमंत्री - राज्यपाल*
         .
*1) राज्य : अरुणाचल प्रदेश*
राजधानी : इटानगर
मुख्यमंत्री : पेमा खंडू  (रा.कॉ.)
राज्यपाल : ज्योतीप्रसाद राजखोवा
.
*2) राज्य : असम*
राजधानी : दिसपुर
मुख्यमंत्री : सर्वानंद सोनोवाल (भाजप)
राज्यपाल : पी.बी. आचार्य
.
*3) राज्य : आंध्रप्रदेश*
राजधानी : हैदराबाद (प्रस्तावित : अमरावती)
मुख्यमंत्री : एन. चंद्राबाबू नायडू (टीडीपी)
राज्यपाल : ई.एल. नरसिंहम  
.
*4) राज्य : बिहार*
राजधानी : पटना
मुख्यमंत्री: नितिश कुमार (जेडीयू)
राज्यपाल : रामनाथ कोविंद
.
*5) राज्य : छत्तीसगढ़*
राजधानी : नया रायपुर
मुख्यमंत्री : डॉ. रमण सिंग(भाजप)
राज्यपाल : बलराम दास टंडन
.
*6) राज्य : दिल्ली (कें.प्र.)*
राजधानी : दिल्ली
मुख्यमंत्री : अरविंद केजरीवाल(आप)
राज्यपाल : नजिब जंग
.
*7) राज्य : गोवा*
राजधानी : पणजी
मुख्यमंत्री : लक्ष्मीकांत पार्सेकर (भाजप)
राज्यपाल : मृदुला सिन्हा
.
*8) राज्य : गुजरात*
राजधानी : गांधीनगर
मुख्यमंत्री : आनंदी बेन पटेल (भाजप) 
राज्यपाल : ओ.पी. कोहली
.
*9) राज्य : हरियाणा*
राजधानी : चंडिगढ़
मुख्यमंत्री : मनोहरलाल खट्टर (भाजप)
राज्यपाल : कप्तानसिंग सोलंकी
.
*10) राज्य : हिमाचल प्रदेश*
राजधानी : शिमला
मुख्यमंत्री : वीरभद्रसिंग (रा. कॉ.)
राज्यपाल : आचार्य देवव्रत
.
*11) राज्य : जम्मु काश्मीर*
राजधानी : जम्मू, श्रीनगर  
मुख्यमंत्री: मेहबूबा मुफ्ती (पीडीपी)
राज्यपाल : एन.एन. व्होरा
.
*12) राज्य : झारखंड*
राजधानी : रांची
मुख्यमंत्री : रघुवर दास (भाजप) 
राज्यपाल : श्रीमती द्रोपदी मुर्मू
.
*13) राज्य : कर्नाटक*
राजधानी : बंगलुरू  
मुख्यमंत्री : सिद्धरम्मैया (रा. कॉ.)
राज्यपाल : वजुभाई वाला
.
*14) राज्य : केरल*
राजधानी : तिरूअनंतपुरम
मुख्यमंत्री : पीनाराई विजयन (माकप)
राज्यपाल : पी. सथशिवम
.
*15) राज्य : मध्य प्रदेश*
राजधानी : भोपाल
मुख्यमंत्री : शिवराजसिंह चौहान ( भाजप )
राज्यपाल : राम नरेश यादव 
.
*16) राज्य : महाराष्ट्र*
राजधानी : मुंबई
मुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस ( भाजप )
राज्यपाल : सी. विद्यासागर
.
*17) राज्य : मणिपुर*
राजधानी : इंफाल
मुख्यमंत्री : ओकराम इबोबी सिंग (रा. कॉ.)
राज्यपाल : व्ही. षण्मुखानाथन 
.
*18) राज्य : मेघालय*
राजधानी : शिलाँग
मुख्यमंत्री : मुकुल संगमा ( रा. कॉ.)
राज्यपाल : व्ही. षण्मुखनाथन
.
*19) राज्य : नागालैंड*
राजधानी : कोहिमा
मुख्यमंत्री : टी.आर. झेलियांग (एन.पी. एफ.)
राज्यपाल : पद्मनाथ आचार्य
.
*20) राज्य : मिजोरम*
राजधानी : ऐजॉल 
मुख्यमंत्री : पु. ललथनहवला (रा. कॉ.)
राज्यपाल : निर्भय शर्मा
.
*21) राज्य : ओडिशा*
राजधानी : भूवनेश्वर
मुख्यमंत्री : नवीन पटनाईक ( बीजेडी )
राज्यपाल : एस.सी.जमीर
.
*22) राज्य : पांडिचेरी (कें.प्र.)*
राजधानी : पांडिचेरी
मुख्यमंत्री : व्ही. नारायणसामी ( रा. कॉ.)
राज्यपाल : किरण बेदी 
.
*23) राज्य : पंजाब*
राजधानी : चंडीगढ़
मुख्यमंत्री : प्रकाश सिंग बादल (अकाली दल)
राज्यपाल : कप्तानसिंग सोलंकी
.
*24) राज्य : राजस्थान*
राजधानी : जयपूर
मुख्यमंत्री : वसुंधरा राजे शिंदे (भाजप)
राज्यपाल : कल्याण सिंग
.
*25) राज्य : सिक्किम*
राजधानी : गंगटोक
मुख्यमंत्री : पवनकुमार चामलिंग (एसडीएफ)
राज्यपाल : श्रीनिवास पाटिल
.
*26) राज्य : तमिलनाडू*
राजधानी : चेन्नई
मुख्यमंत्री : जे. जयललिता (एआयएडीएमके)
राज्यपाल : के. रोसैय्या
.
*27) राज्य : तेलगांना*
राजधानी : हैदराबाद 
मुख्यमंत्री : चंद्रशेखर राव (टीआरएस)
राज्यपाल : इ. एस. एल. नरसिंहन 
.
*28) राज्य : त्रिपुरा*
राजधानी : अगरतला
मुख्यमंत्री : माणिक सरकार (माकप)
राज्यपाल : तथागत रॉय
.
*29) राज्य : उत्तरप्रदेश*
राजधानी : लखनऊ
मुख्यमंत्री : अखिलेश यादव (सपा)
राज्यपाल : राम नाईक
.
*30) राज्य : उत्तराखंड*
राजधानी : देहरादून
मुख्यमंत्री : हरिष रावत ( रा. कॉ.)
राज्यपाल : कृष्णकांत पॉल
.
*31) राज्य : पश्चिम बंगाल*
राजधानी : कोलकता
मुख्यमंत्री : ममता बॅनर्जी (टीएमसी)
राज्यपाल : केसरीनाथ त्रिपाठी

Tuesday, 9 August 2016

वजाबाकी ट्रिक

वजाबाकी करण्याची एक ट्रिक : 

अनेकवेळा दुकानात / भाजी,फळे ,तिकिट  घेताना  १०० , १००० ची नोट दिल्यावर किती पैसे परत मिळायला हवेत याचे गणित करायला ही ट्रिक आपल्यालाही उपयुक्त .

🔶 10, 100,1000, 10000 अशा संख्येतून कोणतीही संख्या कशी वजा करायची 🔶

उदा: आपल्याला 1000- 674 वजा करायचे? 
यासाठी आपणाला पहिले दोन अंक 9 मधून वजा करून घ्यायचे व शेवटचा अंक 10 मधून वजा करून घ्यायचा.

म्हणजेच 9-6 =3
            9-7 = 2
          10- 4= 6
तुमचं उत्तर तयार= 326

आपण आणखी एक उदाहरण पाहू.

10000 - 4328=?

सुरुवातीला
9-4=5
9-3=6
9-2=7
10-8=2

तुमचं उत्तर तयार आहे- 5672

उदा:3)100000-66758
सुरुवातीला
9-6=3
9-6=3
9-7=2
9-5=4
10-8=2

*स्पर्धा परीक्षेत जलद उत्तर काढण्यासाठी ही ट्रिक उपयोगी पडेल* यात शंका नाही.

मनोरंजनातून गणित हा उद्देश तसेच गणित विषयक गोडी लावण्यासाठी अशा प्रकारच्या tricks चा अध्यापनात वापर होणे आवश्यक.

अशाप्रकारे मुले संख्यांची जलद गतीने वजाबाकी करू शकतील.