आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Saturday 24 November 2012

maharashtratil jilhe- aurangabad

 
मराठवाडयाचं मुख्य केंद्र असलेलं औरंगाबाद हे प्राचीन व ऐतिहासिक दृष्टया महत्वाचे शहर आहे. मुर्तजा निझामशहा(दुसरा) याचा वजीर मलिक अंबर याने इ.स. १६१० मध्ये या शहराची निर्मिती केली. त्यावेळी या शहराचे नाव होतं 'खडकी' नतंर ते बदलुन फतेहखानने फत्तेपुर असे ठेवले. इ.स.१६३३ मध्ये शेवटचा मोगल बादशहा औरंगजेब याने हे शहर आपली राजधानी करून त्याला औरंगाबाद असे नाव दिलेे. तसेच संभाजी महाराज यांच्या नावाने म्हणजेच संभाजीनगर म्हणूनाही हे शहर ओळखले जाते.

प्रेक्षणिय स्थळे :

बीबी का मकबरा : औरंगाबादमधलं हे प्रमुख आकर्षन आहे. औरंगजेबची पत्नी रबिया दुरानी र्ऊफ दिलेरज्मबनो हीच्या कबरीवर उभारलेला 'बीबी का मकबरा' ही ताजमहलची हुबेहूब नक्कल आहे. म्हनुनच त्याला छोटा ताजमहाल असेही म्हणतात.
पवनचक्की : मकबर्‍यापासून जवळच शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व महसुद्र दरवाज्या नजिक ही पवनचक्की आहे. रशियातील गजदुबान शहरात राहणार्‍या बाबा शाह मुसाफीर याने इ.स. १७४४ मध्ये ही पवनचक्की बांधली.
गुहा : मकबर्‍याच्या मागील बाजुस डोंगरामध्ये बौध्द धर्माच्या अतिप्राचिन अशा बारा गुहा आहेत. या गुहा इ.स.६०० ते ८०० च्या दरम्यानच्या आहेत.
चैत्य व विहार : चैत्य भवनात पुजा व्हायची तर विहारात बुध्द भिक्षु राहत. पहिली गुहा अर्धीच आहे. तिथे भिंतीवर गौतमबुध्द व यक्षाच्या प्रतिमा आहेत. दुसर्‍या गुहेत बुध्दाची प्रसिध्द 'अभयमुद्रा' असलेली प्रतिमा मध्यभागी आहे.
खंडोबाचे मंदिर : औरंगाबादच्या दक्षिणेला असलेल्या खंडोबा सातारा या गावी शंकराचं अतिप्राचिन मंदिर आहे. त्यास लोक खंडोबाचे मंदिर असे म्हणतात. इ.स. १७११ मध्ये अहील्याबाई होळकर यांनी हे मंदिर बांधुन घेतले.
प्राणिसंग्राहलय : औरंगबादच्या मुख्य बसस्थानकापासून जवळच सिध्दार्थ उद्यान असुन त्यात प्राणि संग्रहालय असुन सर्पालय व मत्सालय हे त्याचे मुख्य आकर्षण आहे.
दौलताबद्रचा देवगिरी किल्ला :
औरंगाबदेच्या पश्चिमेला सुमारे १६ कि.मी. वर असलेले दौलताबाद एकेकाळी हिंदुस्थानची राजधानी होती. इथले मुख्य आकर्षण म्हणजे देवगिरी किल्ला. त्रिकोणी आकाराचा हा किल्ला भीलम या पहिल्या यादव राजाने बांधला. मोहम्मद तुघलक दिल्लीच्या गादीवर आल्यानंतर त्याने देवगिरी हिंदुस्थानाची राजधानी देवगिरी केली.
खुल्दाबाद: औरंगबादच्या अवघ्या १० कि.मी. अंतरावर असलेल्या खुल्दाबाद इथे शहेनशहा औरंगजेबची कबर आहे.औरंगजेबच्या शेवटच्या इच्छेनुसार ख्वाजा जैनुद्दीन शैराजी यांच्या मकबर्‍याच्या आवारात ही कबर बांधण्यात आली.

No comments: