आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Saturday 24 November 2012

sagar sampatti

 
आपल्या महाराष्ट्र्र राज्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. समुद्रापासून आपल्याला अनेक उपयुक्त वस्तू मिळतात. मासे, मीठ, खनिज तेल व नैसर्गिक वायू, रेती, शंख-शिपले ही सर्व सागरसंपत्ती  म्हणून ओळखली जाते.
महाराष्ट्र्राला बराच लांब असा सागरकिनारा लाभला आहे. किनार्‍याची लांबी सुमारे ७०० किमी. आहे. या किनार्‍याचा उपयोग बंदरे, मासेमारी करणे यांसाठी होतो.

मासेमारी :

महाराष्ट्र्र राज्याच्या किनार्‍याजवळ मासेमारी व्यवसाय चालतो. सहकारी संस्थांमार्फत मासेमारीस उत्तेजन दिले जाते. यांत्रिक होडयांच्या (ट्रॉलर) मदतीने खोल समुद्रात सामेसारी केली जाते. मासे नाशवंत असल्याने विक्रीसाठी लगेच पाठवावे लागतात. त्यासाठी मासे हवाबंद डब्यात साठवतात किंवा शीतगृहात गोठवून ठेवतात. शीतगृहात मासे साठवण्याची सोय किनार्‍यालगत अनेक ठिकाणी आहे. खराब माशांचे खत करतात.

नैसर्गिक वायू व खनिज तेल :

सागरतळाखाली आढळणारा नैसर्गिक वायू व खनिज तेल ही महत्वाची संपत्ती  आहे. मुंबईजवळील समुद्रात 'मुंबई हाय' व 'वसई हाय' ही तेलक्षेत्रे आहेत. येथील वायू उरण बंदराजवळ साठवला जातो. मुंबई हायमधून तेल काढण्यासाठी समुद्रात उभारण्यात आलेल्या यंत्राला 'सागर सम्राट' असे नाव दिले आहे.

मीठ :

सागरापासून आपणा सर्वाना मिळणारी संपज्ञत्ती  म्हणजे मीठ होय. किनारपट्टीच्या सखल भागात भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी आत येते. आत आलेले पाणी अडवून ठेवतात. सूर्याच्या उष्णतेने त्या पाण्याची वाफ होते व मीठ तळाशी साठते. ते मीठ खोर्‍याने ओढून ढीग तयार करतात. नंतर विक्रीसाठी पाठवतात. जेथे मीठ तयार करतात त्या जागेस मिठागर म्हणतात.
ठाणे जिल्हयात वसई, भाईंदर, डहाणू, वाणगाव या भागांत अनेक मिठागरे आहेत.

इतर सागरसंपत्ती :-

सागर किनार्‍यावर विशिष्ट प्रकारची रेती सापडते. तिचा उपयोग घरबांधणीस व कारखान्यात करतात. किनारपट्टीवर शंख - शिंपले  सापडतात. हे शंख -शिंपले  हस्तकलेच्या विविध वस्तू बनवण्यासाठी वापरतात.

4 comments:

Unknown said...

Bad

Unknown said...

Ky bad kiti changal sangitl ahe

Unknown said...

सागर संपत्तीची व्याख्या कोठे आहे? Please reply

Anonymous said...

😊😊😊😊