आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Wednesday 27 July 2016

कढीपत्ता - एक औषधी

🍀 कढीपत्ता 🍀

भारतीय वनांमध्ये आणि भारतीय स्वयंपाक घरातले एक महाऔषध
:::::::::::::::::::🐚🐋🌾
कढीपत्ता हा भारतीय आहारातला एक अविभाज्य घटक असून ते एक सुंदर आणि साधे औषध आहे ...पोह्यातला किंवा उपम्यातला कढीपत्ता वेचून बाहेर काढणारे लोक पाहिले त्यांच्या अज्ञानाची भयंकर कीव येते ....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
कढीपत्त्याचे झाड बर्यापैकी मोठे आणि भारतीय सदाहरित वनांमध्ये सहज सापडते .. जंगलातला कढीपत्ता जास्त गडद रंगाचा आणि घमघमीत सुगंध असणारा असतो ...त्याला बर्याचदा बिया लागलेल्या सापडतात या बिया गोळा करून अंगणात लावल्या कि फार चांगल्या पद्धतीने रुजतात ....आणि झाड मोठे झाले कि त्याच्या बिया आजूबाजूला पडून नित्यनेमाने कंटाळा येईल इतकी खोलवर मुळे असलेली झाडे उगवतात .....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
कढीपत्त्याचे आहार आणि औषध अशा अनुषंगाने उपयोग पाहूया :🐚🐋🌾
१) कढीपत्ता आपण आहारात एक विशिष्ट सुंगंधी चव यावी यासाठी वापरतो ... प्रत्यक्षात कढीपत्त्या मध्ये असलेले तेल हे जिभेवरच्या चवीची संवेदना वाढवते ... त्यामुळे जेवण रुचकर लागते ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
२) जुलाब लागले असता कढीपत्त्याच्या ताज्या पानांचा रस एक अर्धा कप पिला कि पोटातल्या वेदना आणि जुलाबाचे वेग वेगाने नियंत्रणात येतात ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
३) कढीपत्ता पचनास चांगली मदत करतो ज्यांना अजीरणाचा सारखा त्रास होतो , जेवल्यावर अस्वस्थ वाटते , पोटात ग्यास पकडतो ....त्यांनी जेवल्यावर कढीपत्त्याची दहा पाने चटणी करून सैंधव मीठ मिसळून खावीत ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
४) कढीपत्ता हा तारुण्य टिकवून ठेवणारा आहे .... नियमित कढीपत्ता खाणारे लोक लवकर म्हातारे होत नाहीत ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
५) मधुमेही रुग्णांनी कढी पत्त्याची दहा बारा कच्ची पाने दिवसातून तीनदा चावून खावीत याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहायला फार मदत होते ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
७) कोलेस्टेरॉल वाढले असेल कढीपत्त्याची अनशापोटी वीस पाने चावून खावीत ....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
८) कढीपत्त्याची पाने वाळवून चूर्ण करून ती खोबरेल तेलात मिसळून लावावीत ...केस पांढरे होत नाहीत ...शिवाय केसांची गळती कमी होऊन केस लांब वाढायला मदत होते ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
९) कर्करोगाने पिडीत रुग्ण केमो आणि रेडियो थेरपी घेत असताना त्यांच्या शरीरातील सर्वसामान्य पेशींवर सुद्धा फार घातक परीणाम होऊन शरीराचे भयंकर नुकसान होते .... अशा रुग्णांना दिवसातून तीन वेळा कढीपत्त्याची दहा पाने खडीसाखर सोबत चावून खायला लावावीत ... रुग्णाला बराच आराम मिळतो
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१०) सर्दी खोकल्या सारखे आजार सारखे होत असतील तर अशा लोकांनी सकाळी अनशापोटी कढीपत्त्याची पंधरा पाने चावून खावीत ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
११) यकृताच्या आजारात कढीपत्ता म्हणजे अमृत आहे ... कोणत्याही प्रकारच्या काविळीत कढीपत्ता चावून खाणे म्हणजे अगदी साधा घरगुती उपाय आहे ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१२) अंगावर सारखे करट उठून त्रास होत असेल तर कढीपत्त्याची पोटातून कच्ची पाने चावून खाल्ल्यास आणि बाहेरून पानांची चटणी करून लावल्यास खूप आराम मिळतो ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१३) पित्त वाढून सकाळी पित्ताची उलटी होत असेल तर मिरी, आले आणि सैंधव मिसळून कढीपत्त्याची पाने कुटून एकत्र करून खावे याने पित्त वाढत नाही आणि उलटी आणि मळमळ होत नाही ....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१४) कढीपत्ता नियमित सेवन केला तर डोळ्यांचे विकार कमी होतात ....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
कढीपत्त्याबद्दल लिहावे तितके कमीच आहे ... असा हा बहुगुणी आणि आरोग्यसंपन्न कढीपत्ता आहारात नियमित ठेवा ... कच्चा चावून खा .... आरोग्य प्राप्ती होईलच यात शंका नाही.

तोंडी वजाबाकी


.
*तोंडी वजाबाकीची साधी पद्धत*
.
*आज आपण वजाबाकी करण्याची एक ट्रिक शिकणार आहोत.*
 
*चला तर मग जाणून घेऊया याविषयी सविस्तर:*

अनेकवेळा दुकानात / भाजी,फळे, तिकिट घेताना  १००,  १००० ची नोट दिल्यावर किती पैसे परत मिळायला हवेत याचे गणित करायला ही ट्रिक आपल्यालाही उपयुक्त .

*10, 100,1000, 10000 अशा संख्येतून कोणतीही संख्या कशी वजा करायची*
.
*उदा:*  आपल्याला 1000- 674 वजा करायचे?
यासाठी आपणाला पहिले दोन अंक 9 मधून वजा करून घ्यायचे व शेवटचा अंक 10 मधून वजा करून घ्यायचा.

म्हणजेच 9-6 =3
            9-7 = 2
          10- 4= 6
*तुमचं उत्तर तयार= 326*
.
.
*आपण आणखी एक उदाहरण पाहू.*

10000 - 4328=?

सुरुवातीला
9-4=5
9-3=6
9-2=7
10-8=2

*तुमचं उत्तर तयार आहे- 5672*

*उदा: 3)* 100000-66758
सुरुवातीला
9-6=3
9-6=3
9-7=2
9-5=4
10-8=2

*स्पर्धा परीक्षेत जलद उत्तर काढण्यासाठी ही ट्रिक उपयोगी पडेल* यात शंका नाही.

मनोरंजनातून गणित हा उद्देश तसेच गणित विषयक गोडी लावण्यासाठी अशा प्रकारच्या tricks चा अध्यापनात वापर होणे आवश्यक.

अशाप्रकारे मुले संख्यांची जलद गतीने वजाबाकी करू शकतील.
संकलन- श्री . विवेक शेळके

Tuesday 26 July 2016

Whatsapp-थोडं आत डोकावून पाहतांना



*व्हॉट्‌सऍप वापरताय हे माहीत आहे का?*
 whatsapp, technology
व्हॉट्‌सऍप हा आपल्या सर्वांच्याच आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. हल्ली फॅमिली आणि फ्रेंडसपेक्षाही व्हॉट्‌सऍप अनेकांच्या प्रायोरिटीवर असते. व्हॉट्‌सऍपशिवाय दिवस ("अ डे विदाउट व्हॉट्‌सऍप‘) अशा काही संकल्पनेचा आपण विचारही करू शकत नाही. फेसबुक लोकप्रियतेच्या बाबतीत एक नंबरवर असले तरी व्हॉट्‌सऍपची झिंग आता लोकांवर चांगलीच चढत आहे म्हणूनच काही महिन्यांपूर्वी फेसबुकने व्हॉट्‌सऍप खरेदी केले. याच व्हॉट्‌सऍपच्या काही रंजक गोष्टी आज आम्ही तुमच्यापुढे उलगडणार आहोत. ज्या ऐकून तुम्हीही चाट पडाल आणि व्हॉट्‌सऍपचे "जबरा‘ फॅन व्हाल.

🍥 *पाच जणांची टीम आणि 100 कोटी डाउनलोड*
व्हॉट्‌सऍप अँड्राइड प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापर्यंत हे ऍप 100 कोटी वेळा डाउनलोड करण्यात आले. व्हॉट्‌सऍपचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जान कुआम यांनी ट्‌विटरवरून दिलेल्या माहितीनुसार एवढा मोठा डोलारा उभा राहताना अँड्राइड व्हर्जनवर काम करण्यासाठी फक्त पाच जणांचा चमू कार्यरत होता.

🍥 *"त्यांना‘ फेसबुक, ट्‌विटरने नाकारले होते*
व्हॉट्‌सऍप प्रत्यक्षात आणणारे जान कुआम आणि ब्रायन ऍक्‍टन या दोघांनाही फेसबुक आणि ट्‌विटरने मुलाखतीतच नाकारले होते. यानंतर त्यांनी पूर्ण वेळ व्हॉट्‌सऍपवर काम करण्यास सुरवात केली आणि व्हॉट्‌सऍपने बाळसे धरले. विचार करा जर हे दोघेही त्या मुलाखतीत पास झाले असते तर आज जग किती वेगळे असते.

🍥 *इमेज आणि व्हिडिओची साईज* कमी करण्यासाठीही वापर
यासाठी बाजारात अनेक फोटो इडिटिंग ऍप्स असली तरी व्हॉट्‌सऍपद्वारेही छायाचित्रे आणि व्हिडिओजची साईज कमी करणे शक्‍य आहे, फक्त तुम्हाला क्वालिटीशी तडजोड करावी लागेल. यासाठी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना इमेज आणि व्हिडिओ सेंड करा. यानंतर तुमच्या फोनमधील व्हॉट्‌सऍप मीडिया फोल्डरमध्ये जावा, आयओएस सिस्टिम यूजर्सना कॅमेरा रोल फोल्डरमध्ये जावे लागेल. या फोल्डर्समध्ये तुम्हाला तुम्ही पाठविलेल्या इमेजेस आणि व्हिडिओज कॉम्प्रेसड फॉरमॅटमध्ये मिळतील. तुमच्याकडील ओरिजनल फाइल्स डिलिट करून तुम्ही या कमी साईजच्या इमेजेस पुन्हा मित्रांना पाठवू शकता. यामुळे तुमचा डेटा सेव्ह होईल.

🍥 *असा असतो व्हॉट्‌सऍपचा आयडी*
व्हॉट्‌सऍप ही सेवा ओपन मेसेजिंग स्टॅंडर्ड एक्‍सएमपीपी या कस्टमाईज्ड व्हर्जनवर चालते. ही सेवा सर्वांत आधी "जॅबर‘ या ऍप्लिकेशनच्या सहकार्याने बनविण्यात आल्याने व्हॉट्‌सऍप आयडी हा "जॅबर‘ने बनविलेल्या आयडी प्रोटोकॉलनुसार म्हणजेच <[phone number]@s.whatsapp.net> या फॉरमॅटमध्येच असतो.

🍥 *व्हॉट्‌सऍप ट्रिक*
या मेसेजिंग सर्व्हिसचा वेब प्रोटोकॉलही आहे, याद्वारे बहुतांश संकेतस्थळे व्हॉट्‌सऍप शेअर फिचर तयार करतात. "whatsapp://send?text=HELLO" ही लिंक तुम्ही तुमच्या ब्राऊजरमध्ये टाकल्यानंतर आपोआप व्हॉट्‌सऍपची विंडो ओपन होते, यानंतर तुम्हाला ज्याला संदेश पाठवायचा आहे त्याचे कॉन्टॅक्‍ट सिलेक्‍ट करण्याचा ऑप्शन व्हॉट्‌सऍपकडून दिला जातो. तुम्ही "HELLO" ऐवजी तुम्हाला यूजर्सला पाठवायचा संदेशही इथे टाकू शकता.

🍥 *मेसेज वाचल्याचे डिटेल्स पाहा*
व्हॉट्‌सऍपच्या नवीन अपडेट्‌समुळे समोरच्याने तुमचा मेसेज वाचलाय हे तुम्हाला "ब्ल्यू टिक‘ वरून कळते; पण त्याने नेमका किती वाजता मेसेज वाचला हेदेखील तुम्ही पाहू शकता. यासाठी मेसेज सिलेक्‍ट करा, डिटेल्स ऑप्शनमध्ये जा इथे तुम्हाला मेसेज सेंड झाल्याच्या आणि रीड झाल्याच्या अशा दोन्ही वेळा दिसतील.

🍥 *कस्टम नॉटिफिकेशन्स*
मेसेजचा टोन वाजल्यानंतर तो कुणाचा असेल ही उत्सुकता तुम्हाला स्वस्त बसू देत नाही. एखादा महत्त्वाचा मेसेज येणार असतो आणि एखाद्या फालतू ग्रुपवरील मेसेजच्या टोनमुळेही तुम्ही अस्वस्थ होत असाल तर तुमच्यासाठी हे फीचर फारच महत्त्वाचे आहे. कस्टम नॉटिफिकेशनद्वारे तुम्ही प्रत्येक ग्रुपचा मेसेज टोन तसेच एखाद्या विशेष व्यक्तीसाठी विशेष मेसेज टोन ठेवू शकता. हा पर्याय तुम्हाला कॉन्टॅक्‍ट डिटेल्समध्ये गेल्यानंतर पाहता येऊ शकतो.

🍥 *बोल्ड, इटालिक आणि स्ट्राइक थ्रू*
व्हॉट्‌सऍपवरील टेक्‍स्टमध्ये महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करण्यासाठी बोल्ड, इटालिक आणि स्ट्राइक थ्रू हे ऑप्शनही यंदाच्या मार्च महिन्यापासून देण्यात आले आहेत. बोल्ड टेक्‍स्टसाठी टेक्‍स्टपूर्वी * (स्टार) इटालिकसाठी _ (अंडरस्कोअर) तर स्ट्राइक थ्रूसाठी ~ (टाइलडस) टाकल्यानंतर या सेवाही तुम्ही अनुभवू शकता.

🍥  *व्हॉट्‌सऍप वेब सुरक्षित*
तुम्ही पीसीवर व्हॉट्‌सऍप वापरत असाल तर तुम्हाला मोबाईल कनेक्‍ट करावा लागतो; परंतु ही प्रक्रिया . या प्रक्रियेमुळे तुमचे मेसेज वेबवर जतन केले जात नाहीत, तुमच्या मोबाईलमध्ये मेसेज सेंड झाल्यानंतर तो वेब ऍप्लिकेशनवरून डिलिट होतो, त्यामुळे तुमचे मेसेज अत्यंत सुरक्षित राहतात. तुम्हाला मेसेज जतन करायचे असल्यास तुम्ही गुगल ड्राइव्ह किंवा आयक्‍लाउडचा वापरही करू शकता.

🎖 *256 बिट एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन*
ओपन व्हिसपर सिस्टिम्सने विकसित केलेल्या या सिस्टिमचा वापर यापूर्वीही अनेक मेसेजिंग ऍपनी केला आहे. या सिस्टिममुळे व्हॉट्‌सऍपवरून पाठविलेले मेसेज सुरक्षित राहतात ते कोणत्याही हॅकर्सना किंवा सरकारलाही ते वाचता येत नाहीत. यामुळे तुमचे खासगी जीवन सुरक्षित राहते; परंतु याच सिस्टिममुळे सध्या व्हॉट्‌सऍप वादात सापडले असून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या प्रणालीचा वापर करत असल्याने या प्रणालीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.

संकलन- श्री . विवेक शेळके