आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Saturday, 22 February 2014

३१ ते १३० पैकी कोणत्याही संख्येचा वर्ग तोंडी काढा!!

१ ते ३० या संख्यांचे वर्ग अनुक्रमे: १,४,९,१६,२५,३६,४९,६४,१००,१२१,१४४,१६९,१९६,२२५,२५६,२८९,३२४,३६१,४००,४४१,४८४,५२९,५७६,६२५,६७६,७२९,७८४,८४१ आणि ९००.
१. जर संख्या ७० ते १०० दरम्यान असेल तर:
समजा ९६ चा वर्ग आपल्याला काढायचा आहे. १०० आणि ९६ मध्ये फरक आहे ४ चा. तेव्हा ९६ मधून तेवढेच (४) वजा करा. उत्तर आले: ९२ आणि त्यापुढे त्या फरकाच्या (४) वर्गातील एकम आणि दशमस्थानचे आकडे लिहा. इथे ४ चा वर्ग १६ आहे तेव्हा ९६ चा वर्ग झाला: ९२।१६ किंवा ९२१६.
समजा ९३ चा वर्ग काढायचा आहे. १००-९३=७. तेव्हा ९३ मधून ७ वजा करावेत. उत्तर आले ८६ आणि त्यापुढे त्या फरकाच्या वर्गातील एकम आणि दशम स्थानचे आकडे (७ चा वर्ग=४९) लिहावे. तेव्हा ९३ चा वर्ग झाला: ८६।४९.
त्याच पध्दतीने: ९१ चा वर्ग झाला: (९१-९=८२ आणि ९ चा वर्ग=८१) ८२।८१ किंवा ८२८१.
समजा ८७ चा वर्ग काढायचा आहे. १००-८७=१३. तेव्हा ८७ मधून १३ वजा करावेत. उत्तर आले ७४. आणि त्यापुढे त्या फरकाच्या वर्गातील एकम आणि दशम स्थानचे आकडे लिहावेत. इथे १३ चा वर्ग: १६९. तेव्हा १६९ पैकी एकम आणि दशम स्थानचे आकडे म्हणजे ६९ लिहावेत आणि १६९ मधील शतमस्थानचा १ हातचा म्हणून डावीकडील भागात मिळवावा. तेव्हा ८७ चा वर्ग झाला: ७४।१६९ किंवा ७५।६९ किंवा ७५६९.
त्याच पध्दतीने ८२ चा वर्ग येईल: (८२-१८=६४ आणि १८ चा वर्ग: ३२४) ६४।३२४ किंवा (६४+३)।२४ किंवा ६७२४.
तसेच ७३ चा वर्ग येईल: (७३-२७=४६ आणि २७ चा वर: ७२९) ४६।७२९ किंवा (४६+७)।२९ किंवा ५३२९.
आता इथे नक्की काय चालू आहे? १०० पेक्षा लहान असलेली कोणतीही संख्या आपण (१००-क्ष) या स्वरूपात लिहू शकतो. या संख्येचा वर्ग: (१००-क्ष)*(१००-क्ष)= १०,०००-२००*क्ष+क्ष चा वर्ग = १००(१००-२*क्ष)+(क्ष चा वर्ग). म्हणजेच १०० मधून २ क्ष वजा करा आणि त्याला १०० ने गुणा. हा झाला पहिला भाग. (९६ चा वर्ग: ९२।१६ मधील ९२). दिलेली संख्या आहे १००-क्ष. त्यातून आणखी क्ष वजा केल्यास आपल्याला १००-२*क्ष मिळेल. आणि वर्गाचा दुसरा भाग (९२।१६ मधील १६) म्हणजेच "क्ष" चा (इथे ४ चा) वर्ग.
याच संकल्पनेचा विस्तार १०० ते १३० दरम्यानच्या संख्यांचे वर्ग काढायलाही करता येईल.१०० पेक्षा मोठी संख्या आपण (१००+क्ष) या स्वरूपात लिहू शकतो. या संख्येचा वर्ग: (१००+क्ष)*(१००+क्ष)=१०,०००+२००*क्ष+क्ष चा वर्ग. म्हणजेच १०० मध्ये २ क्ष मिळवावेत आणि त्याला १०० ने गुणावे. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग म्हणजे पूर्वीप्रमाणेच "क्ष" या संख्येच्या वर्गातील एकम आणि शतम स्थानचे अंक. आपल्याला दिलेली संख्या १००+क्ष आहे. त्यात आणखी एक क्ष मिळविल्यास आपल्याला १००+२*क्ष मिळेल.
समजा १०८ चा वर्ग काढायचा आहे. इथे क्ष=८. तेव्हा १०८ मध्ये आणखी एक क्ष=८ मिळवावेत.म्हणजे पहिला भाग झाला: १०८+८=११६. आणि दुसरा भाग झाला क्ष चा वर्ग= ८ चा वर्ग=६४. तेव्हा १०८ चा वर्ग= ११६।६४ किंवा ११६६४.
तसेच ११२ चा वर्ग: (क्ष=१२, ११२+१२=१२४ आणि १२ चा वर्ग: १४४) १२४।१४४ किंवा (१२४+१)।४४= १२५४४.
१२३ चा वर्ग: (क्ष=२३, १२३+२३=१४६ आणि २३ चा वर्ग: ५२९) १४६।५२९ किंवा (१४६+५)।२९=१५१२९
१२९ चा वर्ग: (क्ष=२९, १२९+२९=१५८ आणि २९ चा वर्ग: ८४१) १५८।८४१ किंवा (१५८+८)।४१=१६६४१
२. दिलेली संख्या ३० ते ५० दरम्यान असेल तर:
म्हणजेच दिलेली संख्या=५०-क्ष. त्या संख्येचा वर्ग: २५००-१००*क्ष+क्ष चा वर्ग = १००*(२५-क्ष)+क्ष चा वर्ग. म्हणजेच दिलेली संख्या ५० पेक्षा जितकी लहान असेल तितकेच २५ मधून वजा करावेत. हा झाला पहिला भाग. आणि दुसरा भाग म्हणजे (नेहमीप्रमाणे) क्ष च्या वर्गातील एकम आणि दशम स्थानच्या संख्या.
समजा ४७ चा वर्ग काढायचा आहे. दिलेली संख्या ५० पेक्षा ३ ने लहान आहे.तेव्हा २५ मधून ३ वजा करावेत. म्हणजे पहिला भाग झाला २५-३=२२. आणि दुसरा भाग झाला ३ चा वर्ग. इथे आपल्याला ३ च्या वर्गातील एकम आणि दशम स्थानच्या संख्या हव्या आहेत. तेव्हा ३ चा वर्ग म्हणून नुसते ९ न घेता दुसऱ्या भागात ०९ लिहावे. म्हणजेच ४७ चा वर्ग: २२।०९ = २२०९.
समजा ३८ चा वर्ग काढायचा आहे.दिलेली संख्या ५० पेक्षा १२ ने लहान आहे.तेव्हा २५ मधून १२ वजा करावेत. म्हणजे पहिला भाग झाला २५-१२=१३. आणि दुसरा भाग झाला १२ चा वर्ग (१४४). म्हणजेच ३८ चा वर्ग: १३।१४४ = (१३+१)।४४= १४४४.
समजा ३२ चा वर्ग काढायचा आहे.दिलेली संख्या ५० पेक्षा १८ ने लहान आहे.तेव्हा २५ मधून १८ वजा करावेत. म्हणजे पहिला भाग झाला २५-१८=७. आणि दुसरा भाग झाला १८ चा वर्ग (३२४). म्हणजेच ३२ चा वर्ग: ७।३२४ = (७+३)।२४= १०२४.
३. दिलेली संख्या ५० ते ७० दरम्यान असेल तर
म्हणजेच दिलेली संख्या=५०+क्ष. त्या संख्येचा वर्ग: २५००+१००*क्ष+क्ष चा वर्ग = १००*(२५+क्ष)+क्ष चा वर्ग. म्हणजेच दिलेली संख्या ५० पेक्षा जितकी मोठी असेल तितकेच २५ मिळवावेत. हा झाला पहिला भाग. आणि दुसरा भाग म्हणजे (नेहमीप्रमाणे) क्ष च्या वर्गातील एकम आणि दशम स्थानच्या संख्या.
समजा ५३ चा वर्ग काढायचा आहे. दिलेली संख्या ५० पेक्षा ३ ने मोठी आहे. तेव्हा २५ मध्ये ३ मिळवावेत आणि हा झाला पहिला भाग (२५+३=२८). आणि दुसरा भाग म्हणजे ३ च्या वर्गातील एकम आणि दशम स्थानच्या संख्या= ०९. तेव्हा ५३ चा वर्ग झाला: २८।०९ किंवा २८०९.
समजा ६१ चा वर्ग काढायचा आहे. दिलेली संख्या ५० पेक्षा ११ ने मोठी आहे. तेव्हा २५ मध्ये ११ मिळवावेत आणि हा झाला पहिला भाग (२५+११=३६). आणि दुसरा भाग म्हणजे ११ च्या वर्गातील (१२१) एकम आणि दशम स्थानच्या संख्या= २१ आणि १ हातचा. तेव्हा ६१ चा वर्ग झाला: ३६।१२१ किंवा (३६+१)।२१ किंवा ३७२१.

Friday, 21 February 2014

मुळ संख्या

मुळ संख्या

1 ते 100 दरम्यान च्या एकुण मुळ संख्या 25
1 ते 10 = 2, 3, 5, 7
11 ते 20 = 11, 13, 17, 19
21 ते 30 = 23, 29
31 ते 40 = 31, 37
41 ते 50 = 41, 43, 47
51 ते 60 = 53, 59
61 ते 70 = 61, 67
71 ते 80 = 71, 73, 79
81 ते 90 = 83, 89
91 ते 100 = 97

Thursday, 20 February 2014

PLEDGE

        " India is my country.All indians are my brothers and sisters.
   I love my country and I am proud of its rich and varied heritage. I shall always strive to be worthy of it.
   I shall give my parents ,teacher and all elders respect ,and treat everyone with courtesy.
   To my country and my people . I pledge my devotion.
    In their well-being and prosperity alone lies my happiness.

Tuesday, 18 February 2014

मराठी म्हणी

  1. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.
  1. असतील चाळ तर फिटतील काळ.
  2. असतील मुली तर पेटतील चुली.
  3. असतील शिते तर जमतील भूते.
  4. असुन नसुन सारखा.
  5. असून अडचण नसून खोळांबा.
  6. असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.
  7. असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा.
  8. असेल दाम तर हो‌ईल काम.
  9. असेल हरी तर दे‌ईल खाटल्यावरी.
  10. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.
  11. आंधळा विचारतो बहिऱ्याला, वाट जाते हिवाऱ्याला?
  12. आंधळा सांगतो तंबोरा ऐंकतो.
  13. आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली.
  14. आंधळीपेक्षा तिरळी बरी.
  15. आ‌ई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही.
  16. आ‌ई म्हणते लेक झाले, भा‌ऊ म्हणतात वैंरी झाले.
  17. आ‌ईचा काळ, बायकोचा मवाळ.
  18. आ‌ईची माया अन पोर जा‌ईला वाया.
  19. आ‌ऊचा का‌ऊ तो म्हणे मावसभा‌ऊ.
  20. आखाड्याच्या मेळावात पहेलवानाची किंमत.
  21. आखुड शिंगी आणि बहुदुधी.
  22. आग रामेश्वरी अऩ बंब सोमेश्वरी.
  23. आग लागल्यावर विहीर खणणे.
  24. आगीशिवाय धूर दिसत नाही.
  25. आचार भ्रष्टी, सदा कष्टी.
  26. आज अंबारी, उद्या झोळी धरी.
  27. आजा मेला नातू झाला, घरची माणसे बरोबर.
  28. आठ हात लाकुड, न‌ऊ हात धलपी.
  29. आड जिभेने खाल्ले, पडजिभेने बोंब मारली.
  30. आडजीभ खा‌ई अऩ पडजीभ बोंबलत जा‌ई.
  31. आडात नाही तर पोऱ्ह्यात कोठून?
  32. आत्याबा‌ईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो.
  33. आधणातले रडतात, सुपातले हसतात.
  34. आधिच कामाचा कंटाळा त्यात माहेरचा सांगावा.
  35. आधी करा मग भरा.
  36. आधी करावे मग सांगावे.
  37. आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण.
  38. आधी गुंतू नये, मग कुंथु नये.
  39. आधी जाते अक्कल मग सुचते शहाणपण.
  40. आधी नमस्कार मग चमत्कार.
  41. आधी पोटोबा, मग विठोबा.
  42. आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे.
  43. आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जा‌ईना, त्याचा येळकोट राहीना.
  44. आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास.
  45. आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळ.
  46. आधीच नव्हती हौस त्यात पडला पा‌ऊस.
  47. आधीच मर्कट त्यातून मद्य प्याले, त्याची क्रिडा काय विचारता?
  48. आपण आपल्याच सावलीला भितो.

अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌ऊन पळ.

  1.  अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌ऊन पळ.
  2. अंगापेक्षा बोंगा जास्ती.
  3. अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज.
  4. अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.
  5. अंगावरचे लेणे, जन्मभर देणे.
  6. अंथरूण पाहून पाय पसरावेत.
  7. अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.
  8. अंधळ्याचा हात बुडकुल्यात.
  9. अंधारात केले पण उजेडात आले.
  10. अंधेर नगरी चौपट राजा.
  11. अकिती आणि सणाची निचिती.
  12. अक्कल खाती जमा.
  13. अक्कल ना बक्कल, गावभर नक्कल.
  14. अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे.
  15. अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा.
  16. अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.
  17. अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.
  18. अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.
  19. अघळ पघळ अन घाल गोंधळ.
  20. अघळ पघळ वेशीला ओघळ.
  21. अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय.
  22. अडला हरी गाढवाचे पाय धरी.
  23. अडली गाय खाते काय.
  24. अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
  25. अडाण्याची मोळी, भलत्यासच मिळी.
  26. अड्क्याची भवानी सपिकेचा शेंदूर.
  27. अढीच्या दिढी सावकाराची सढी.
  28. अती केला अनं मसनात गेला.
  29. अती झालं अऩ हसू आलं.
  30. अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे.
  31. अती तिथं माती.
  32. अती परीचयात आवज्ञा.
  33. अती राग भिक माग.
  34. अती शहाणा त्याचा बैंल रिकामा.
  35. अत्युची पदि थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा.
  36. अनुभवल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गिळत नाही.
  37. अपयश हे मरणाहून वोखटे.
  38. अपापाचा माल गपापा.
  39. अपुऱ्या घड्याला डबडब फार.
  40. अप्पा मारी गप्पा.
  41. अर्धा वैद्या मरणास खाद्य.
  42. अर्धी कोंबडी कापून खायला, अर्धी अंडी घालायला.
  43. अर्ध्या गावाची नाही खबर आणि वाटणीला बरोबर.
  44. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.
  45. अल्प बुध्दी, बहु गर्वी.
  46. अल्प मनुष्य कोपे, लहान भांडे लवकर तापे.
  47. अळवाची खाज़ अळवाला ठा‌ऊक.
  48. अळी मिळी गुपचिळी.
  49. अवघड ठिकाणी दुखणे आणि जाव‌ई डॉक्टर.
  50. अव्हाधसा पोर, घर राखण्यात थोर.

” काळी बेंद्री एकाची, सुंदर बायको लोकांची”



” नाचता ये‌इना अंगण वाकडं, स्वयंपाक येईना ओली लाकडं”  


“पादऱ्याला  पावट्याचा आधार ” 

 
” कौतुकाची वरात, अन हागायला परात”


” काळी बेंद्री  एकाची, सुंदर बायको लोकांची”


” लाडका लेक मंदिरी हागे, ढुंगण धुवायला महादेव मागे” 


“घरची म्हणते देवा देवा, बाहेरचीला चोळी शिवा”

म्हशीने रांधलं आणि हेल्याने खाल्लं.

  1. म्हशीने रांधलं आणि हेल्याने खाल्लं. 
  2. म्हसोबाला नव्हती बायको अऩ सटवीला नव्हता नवरा.
  3. म्हातारीला मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो.
  4. या अक्षराने सुरुवात होणारी एकही म्हण आमच्या संग्रही नाही. आपल्याला जर अश्या प्रकारच्या म्हणी माहीतअसतील तर आम्हाला जरूर कळवा.
  5. याची देहा, याची डोळा.
  6. याला द्या त्याला द्या मग सरकाराला काम द्या?
  7. येडं पेरलयं अन उगवलयं खुळं.
  8. येथे पाहिजे जातीचे, येळ्या गबाळ्याचे काम नोहे.
  9. येरे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या.
  10. रंग गोरापान आणि घरात गु घान.
  11. रंग जाणे रंगारी, धुनक जाणे पिंजारी!
  12. रंग झाला फिका आणि देईना कुणी मुका.
  13. रंगाने गोरी पण हजार गुण चोरी.
  14. राईचा पर्वत.
  15. राजा उदार झाला अऩ हाती भोपळा दिला.
  16. राजा तशी प्रजा.
  17. राजा बोले अऩ दल चाले.
  18. राजाला दिवाळी काय ठाऊक?
  19. रात्र थोडी अऩ सोंग फार.
  20. रिकामा नावी कुडाला तुंबे लावी. (रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी.)
  21. रुखवत आलं, रुखवत आलं उघडा खिडकी, पाहिलं तर फाटकीच फडकी.
  22. रुखवत आले, रुखवत आले दणाणली आळी, पहातात तो अर्धीच पोळी.
  23. रोज घालतयं शिव्या अन एकादशीला गातयं ओव्या.
  24. रोज मरे त्याला कोण रडे.
  25. लंकेत सोन्याच्या विटा.
  26. लकडी शिवाय मकडी वळत नाही.
  27. लग्न बघावे करून अऩ घर पहावे बांधून.
  28. लढाईमे बढाई आणि खजिनेमे गवऱ्या.
  29. लबाडाचे आमंत्रण जेवल्याबिगर खोटे.
  30. लवकर उठे, लवकर निजे त्यास आरोग्य, संपत्ती लाभे.
  31. लहान तोंडी मोठा घास.
  32. लांड्यामागे पुंडा.
  33. लाखाचे बारा हजार.
  34. लाखाशिवाय बात नाही अन वडापाव शिवाय काही खात नाही.
  35. लाथ मारेन तिथे पाणी काढीन.
  36. लेक द्यावी श्रीमंताघरी सून करावी गरीबाकडली.
  37. लेक नाही तोवर लेवून घ्यावे सून नाही तोवर खाऊन घ्यावे.
  38. लेकी बोले सुने लागे.
  39. लेकीच लेकरं उडती पाखरं, लेकाची लेकरं चिकट भोकरं.
  40. लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण.
  41. लोकाचे लेणे ले ग लुचरे, मागायला आली दे ग कुत्रे.
  42. वड्याचे तेल वांग्यावर.
  43. वर झगझग आत भगभग.
  44. वर मुकुट आणि खाली नागडं.
  45. वराती मागून घोडे.
  46. वरुन दिसे सोज्वळ आत सावळा गोंधळ.
  47. वरून कीर्तन आतून तमाशा.
  48. वळचळीचे पाणी आड्याला कसे चढेल.
  49. वळले तर सूत नाही तर वडावरचे भूत. (असेल तर सूत नाही तर वडावरचे भूत).
  50. वळवाचा पाऊस.
  51. वळू ऊठला पण संशय फिटला.
  52. वाघ पडला बावी, केल्डं गांड दावी.
  53. वाचेल तो वाचेल.
  54. वाजे पाउल आपले म्हणे मागून कोण आले.
  55. वाटाण्याच्या अक्षता.
  56. वासरात लंगडी गाय शहाणी.
  57. वाहता झरा अन फुलता मळा असला तरचं ठीक.
  58. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर.
  59. विचारांची तूट तेथे भाषणाला उत.
  60. विषाची परीक्षा.
  61. विहीणाचा पापड वाकडा.
  62. वेळना वखत आऩ गाढव चाललय भुकत.
  63. वेळेला केळं अऩ वनवासाला सिताफळं.
  64. वेश असे बावळा परी अंतरी नाना कळा.
  65. वैरी गेला अन जागा पैस झाला.
  66. शब्दांचा सुकाळ तेथे बुध्दीचा दुष्काळ.
  67. शहाणं होईना अन सांगता येईना.
  68. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये.
  69. शहाण्याला शब्दाचा मार.
  70. शिजे पर्यंत दम धरवतो, निवे पर्यंत धरवत नाही.
  71. शितावरून भाताची परीक्षा.
  72. शिर सलामत तर पगड़ी पचास.
  73. शिराळ शेती दाट.
  74. शिळ्या कढीला ऊत.
  75. शुभ बोल नाऱ्या तर म्हणे मांडवाला आग लागली.
  76. शेरास सव्वाशेर.
  77. शेळी जाते जिवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड कशी?
  78. शोधा म्हणजे सापडेल.
  79. 'श्री' आला की 'ग' सुध्दा येतो.
  80. श्रीमंता घरच्या कुत्र्याला पण 'आहो हाडा' म्हणावे लागते.
  81. संन्यासाच्या लग्नाला शेंडीपासून (सुरुवात) तयारी.
  82. सख्ख्या सासूला दिली लाथ, चुलत सासूचा कापला कान, तिथे मामे-सासू मागते मान.
  83. सगळं मुसळ केरात.
  84. सतरा कारभारी ऐक नाही दरबारी.
  85. सतरा पुरभय्ये अऩ अठरा चुली.
  86. अंधारात केले पण उजेडात आले.
  87. अंधेर नगरी चौपट राजा.
  88. अकिती आणि सणाची निचिती.
  89. अक्कल खाती जमा.
  90. अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे.
  91. अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा.
  92. अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.
  93. अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.
  94. अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.
  95. अघळ पघळ अन घाल गोंधळ.
  96. अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय.
  97. अडला हरी गाढवाचे पाय धरी.
  98. अडली गाय खाते काय.
  99. अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
  100. अडाण्याची मोळी, भलत्यासच मिळी.
  101. अड्क्याची भवानी सपिकेचा शेंदूर.
  102. अढीच्या दिढी सावकाराची सढी.
  103. अती केला अनं मसनात गेला.
  104. अती झालं अऩ हसू आलं.
  105. अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे.
  106. अती तिथं माती.
  107. अती परीचयात आवज्ञा.
  108. अती राग भीक माग.
  109. अती शहाणा त्याचा बैंल रिकामा.
  110. अत्युची पदि थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा.
  111. अनुभवल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गिळत नाही.
  112. अपयश हे मरणाहून वोखटे.
  113. अपापाचा माल गपापा.
  114. अपुऱ्या घड्याला डबडब फार.
  115. अप्पा मारी गप्पा.
  116. अर्धी कोंबडी कापून खायला, अर्धी अंडी घालायला.
  117. अर्ध्या गावाची नाही खबर आणि वाटणीला बरोबर.
  118. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.
  119. अल्प बुध्दी, बहु गर्वी.
  120. अल्प मनुष्य कोपे, लहान भांडे लवकर तापे.
  121. अळवाची खाज़ अळवाला ठाऊक.
  122. अळी मिळी गुपचिळी.
  123. अवघड ठिकाणी दुखणे आणि जावई डॉक्टर.
  124. अव्हाधसा पोर, घर राखण्यात थोर.
  125. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.
  126. असतील चाळ तर फिटतील काळ.
  127. असतील मुली तर पेटतील चुली.
  128. असतील शिते तर जमतील भूते.
  129. असून अडचण नसून खोळांबा.
  130. असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.
  131. असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा.
  132. असेल दाम तर होईल काम.
  133. असेल हरी तर देईल खाटल्यावरी.
  134. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.
  135. आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली.
  136. आंधळीपेक्षा तिरळी बरी.
  137. आई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही.
  138. आई म्हणते लेक झाले, भाऊ म्हणतात वैंरी झाले.
  139. आईचा काळ, बायकोचा मवाळ.
  140. आईची माया अन पोर जाईला वाया.
  141. आऊचा काऊ तो म्हणे मावसभाऊ.
  142. आखाड्याच्या मेळावात पहेलवानाची किंमत.
  143. आग रामेश्वरी अऩ बंब सोमेश्वरी.
  144. आग लागल्यावर विहीर खणणे.
  145. आगीशिवाय धूर दिसत नाही.
  146. आचार भ्रष्टी, सदा कष्टी.
  147. आज अंबारी, उद्या झोळी धरी.
  148. आजा मेला, नातू झाला.
  149. आठ हात लाकुड, नऊ हात धलपी.
  150. आड जिभेने खाल्ले, पडजिभेने बोंब मारली.
  151. आडजीभ खाई अऩ पडजीभ बोंबलत जाई.
  152. आडात नाही तर पोऱ्ह्यात कोठून?
  153. आत्याबाईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो.
  154. आधणातले रडतात, सुपातले हसतात.
  155. आधी करा मग भरा.
  156. आधी करावे मग सांगावे.
  157. आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण.
  158. आधी गुंतू नये, मग कुंथु नये.
  159. आधी जाते अक्कल मग सुचते शहाणपण.
  160. आधी नमस्कार मग चमत्कार.
  161. आधी पोटोबा, मग विठोबा.
  162. आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना.
  163. आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास.
  164. आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळ.
  165. आधीच नव्हती हौस त्यात पडला पाऊस.
  166. आधीच मर्कट त्यातून मद्य प्याले, त्याची क्रिडा काय विचारता?
  167. आपण आपल्याच सावलीला भितो.
  168. आपण आरे म्हटले की कारे आलेच.
  169. आपण करु तो चमत्कार, दुसऱ्याचा तो बलात्कार.
  170. आपण शेण खायचं नि दुसऱ्याचं तोंड हुंगायच.
  171. आपण सुखी तर जग सुखी.
  172. आपलंच घर, हागुन भर.
  173. आपला आळी, कुत्रा बाळी.
  174. आपला तो बाळ्या, दुसऱ्याचा तो कार्ट्या.
  175. आपला हात, जग्गन्नाथ.
  176. आपलाच बोल, आपलाच ढोल.
  177. आपली ठेवायची झाकून अऩ दुसऱ्याची पहायची वाकून.
  178. आपली पाठ आपल्याला दिसत नाही.
  179. आपलीच मोरी अनं अंघोळीची चोरी.
  180. आपले ठेवायचे झाकून अन दुसऱ्याचे पहायचे वाकून.
  181. आपले ते प्रेम, दुसऱ्याचे ते लफडे.
  182. आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन.
  183. आपले नाही धड नाही शेजाऱ्याचा कढ.
  184. आपलेच दांत अऩ आपलेच ओठ.
  185. आपल्या कानी सात बाळ्या.
  186. आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते.
  187. आपल्या ताटातले गाढव दिसत नाही पण दुसऱ्याच्या ताटातली माशी दिसते.
  188. आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड.
  189. आभाळ फाटल्यावर ढिगळ कुठे कुठे लावणार?
  190. आय नाय त्याला काय नाय.
  191. आयजीच्या जीवावर बायजी उदार, सासूच्या जीवावर जावई उदार.
  192. आयत्या बिळात नागोबा.
  193. आराम हराम आहे.
  194. आरोग्य हीच धनसंपत्ती.
  195. आलथा पसा, पालथा पसा, माकडा तुझा संसार कसा?
  196. आला भेटीला धरला वेठीला.
  197. आली अंगावर, घेतली शिंगावर.
  198. आली चाळीशी, करा एकादशी.
  199. आली सर तर गंगेत भर.
  200. आलीया भोगासी असावे सादर.
  201. आले मी नांदायला, मडके नाही रांधायला.
  202. आळश्या उळला अऩ शिंकरा शिंकला.
  203. आळश्याला त्रिभुवनाचे ज्ञान.
  204. आळश्याला दुप्पट काम.
  205. आळी ना वळी सोनाराची आळी.
  206. आळ्श्याला गंगा दूर.
  207. आवडतीचा शेंबुड गोड आणि नावडतीचे मीठ आळणी.
  208. आवडीने केला वर त्याला दिवसा खोकला रात्री ज्वर.
  209. आवळा देवून भोपळा काढणे. (आवळा देवून कोहळा काढणे.)
  210. आवसबाई तुझ्याकडे पुतनबाई माझ्याकडे
  211. आशा सुटेना अन देव भेटेना.
  212. आसू ना मासू, कुत्र्याची सासू.
  213. इकडून तिकडून सगळे सारखे.
  214. इकडे आड़ तिकडे विहीर.
  215. इच्छा तसे फळ.
  216. इच्छिलेले जर घडले असते तर भिक्षुकांते राजे होते.
  217. इजा बिजा तीजा.
  218. ईडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो.
  219. ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो.
  220. उंट पाण्यात बुडालाय नि शेळी म्हणतीय मी येऊ काय?
  221. उंटावरचा शहाणा.
  222. उंदराला मांजराची साक्ष.
  223. उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी.
  224. उघड्याकडे नागडा गेला अनं रात्रभर हिवाने मेला.
  225. उचलली जीभ लावली टाळ्याला.
  226. उठता लाथ, बसता बुक्की.
  227. उडत्या पक्षाची पिसे मोजणे.
  228. उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक.
  229. उतावळा नवरा घुडग्याला बाशिंग.
  230. उत्तम शेती, माध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी.
  231. उथळ पाण्याला खळखळाट फार.
  232. उद्योगाचे घरी रिध्दी सिध्दी पाणी भरी.
  233. उधार तेल खवट.
  234. उधार पाधार वाण्याचा आधार.
  235. उधारीचे पोते, सव्वा हात रिते.
  236. उन पाण्याचे घर जळत नसते.
  237. उपट सुळ, घे खांद्यावर.
  238. उभारले राजवाडे तेथे आले नकवडे.
  239. उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे.
  240. उसना पसारा देवाचा आसरा.
  241. उसळात घातलं तर मुसळात सापडत नाही.
  242. उसाच्या पोटी कापूस.
  243. ऊस गोड लागला म्हणून मुळासगट खावू नये.
  244. ऊस झाला डोंगा परी रस नाही डोंगा.
  245. एक कोल्हा सतरा ठिकाणी प्याला.
  246. एक गांव बारा भानगडी.
  247. एक गोरी आणि हजार खोड्या चोरी.
  248. एक घाव दोन तुकडे.
  249. एक तीळ सात जणांनी वाटून खावा.
  250. एक ना धड बाराभर चिंद्या.
‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ ‌‌‌‌‌ ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌

आपला तो "पीसी" दुसर्‍याचं ते "मशीन"



सायबर म्हणी
१) रिकाम्या मॉनिटरला स्क्रीनसेव्हर फार !!!!!
२) आपलाच किबोर्ड नि आपलाच माऊस !!!!!
३) सेलेरॉन गेले पेंटीयम आले !!!!!
४) विंडोज दाखव नाहीतर इंस्टॉलेशन कर !!!!!
५) उचलला पॉईंटर अन् लावला आयकॉनला !!!!!
६) मॉनिटर आणि सी.पी.यू. यांच्यात चार बोटांचे अंतर असते !!!!!
७) माऊसला मॉनिटर साक्ष !!!!!
८) फोर-एट-सिक्सच्या कळपात सेलेरॉन शहाणा !!!!!
९) लॅपटॉपचे बिर्‍हाड पाठीवर !!!!!
१०) आपला तो "पीसी" दुसर्‍याचं ते "मशीन" !!!!!
११) व्हायरसच्या मनात एंटीव्हायरस !!!!!
१२) स्त्रीचं वय,पुरुषाचा पगार अन् कॉम्प्युटरचा स्पीड विचारू नयेत !!!!!
१३) बडा सी.पी.यू. पोकळ डेटा !!!!!
१४) अडला कॉम्प्युटर यु.पी.एस चे पाय धरी !!!!!
१५) मनी वसे ते मॉनिटरवर दिसे !!!!!
१६) नावडतीचा पी.सी.स्लो !!!!!
१७) हार्डडिस्क सलामत तो सॉफ्टवेअर पन्नास !!!!!
१८) चार दिवस हार्डडिस्कचे चार दिवस सी.डी.चे !!!!!
१९) (नेट्वर्किंगमध्ये) सेलेरॉनशेजारी पेंटीयम बांधला, स्पीड नाही पण व्हायरस वाढला !!!!!
२०) सीडींचा बाजार, व्हायरसांचा सुकाळ !!!!!
२१) वरून पेंटीयम आतून फोर-एट-सिक्स !!!!!
२२) हार्डडिस्कमध्ये नाही ते फ्लॉपीत कोठून येणार !!!!!
२३) घरोघरी मायक्रोसॉफ्टच्याच विंडो !!!!!
२४) सॉफ्टवेअर नको पण व्हायरस आवर !!!!!
२५) हा मदरबोर्ड नि हा प्रोसेसर !!!!!
२६) मंदाळ डॉट-मॅट्रिक्सला खडखडाट फार !!!!!
२७) यथा ऑपरेटर तथा कॉम्प्युटर !!!!!

आपलीच मोरी अनं अंघोळीची चोरी





आपलीच मोरी अनं अंघोळीची चोरी.

आपले ठेवायचे झाकून अन दुसऱ्याचे पहायचे वाकून.

आपले ते प्रेम, दुसऱ्याचे ते लफडे.

आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन.

आपले नाही धड नाही शेजाऱ्याचा कढ.

आपले सांभाळावे अन दुसऱ्याला यश द्यावे.

आपलेच दांत अऩ आपलेच ओठ.

आपल्या कानी सात बाळ्या.

आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते.

आपल्या ताटातले गाढव दिसत नाही पण दुसऱ्याच्या ताटातली माशी दिसते.

आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड.

आली अंगावर, घेतली शिंगावर.




आभाळ फाटल्यावर ढिगळ कुठे कुठे लावणार?

आय नाय त्याला काय नाय.

आयजीच्या जीवावर बायजी उदार, सासूच्या जीवावर जाव‌ई उदार.

आयत्या बिळात नागोबा.

आराम हराम आहे.

आरोग्य हीच धनसंपत्ती.

आलथा पसा पालथा पसा माकडा तुझा संसार कसा?

आला भेटीला धरला वेठीला.

आली अंगावर, घेतली शिंगावर.

आली चाळीशी, करा एकादशी.

आली सर तर गंगेत भर.

आलीया भोगासी असावे सादर.

आले मी नांदायला, मडके नाही रांधायला.

आळश्या उळला अऩ शिंकरा शिंकला.

आळश्याला त्रिभुवनाचे ज्ञान.

आळश्याला दुप्पट काम.

आपण सुखी तर जग सुखी.





आधीच नव्हती हौस त्यात पडला पा‌ऊस.

आधीच मर्कट त्यातून मद्य प्याले, त्याची क्रिडा काय विचारता?

आपण आपल्याच सावलीला भितो.

आपण आरे म्हटले की कारे आलेच.

आपण करु तो चमत्कार, दुसऱ्याचा तो बलात्कार.

आपण शेण खायचं नि दुसऱ्याचं तोंड हुंगायच.

आपण सुखी तर जग सुखी.

आपलंच घर, हागुन भर.

आपला आळी, कुत्रा बाळी.

आपला तो बाळ्या, दुसऱ्याचा तो कार्ट्या.

आपला हात, जग्गन्नाथ.

आपलाच बोल, आपलाच ढोल.

आपली ठेवायची झाकून अऩ दुसऱ्याची पहायची वाकून.

आपली पाठ आपल्याला दिसत नाही.

आधी करावे मग सांगावे.




आत्याबा‌ईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो.

आधणातले रडतात, सुपातले हसतात.

आधिच कामाचा कंटाळा त्यात माहेरचा सांगावा.

आधी करा मग भरा.

आधी करावे मग सांगावे.

आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण.

आधी गुंतू नये, मग कुंथु नये.

आधी जाते अक्कल मग सुचते शहाणपण.

आधी नमस्कार मग चमत्कार.

आधी पोटोबा, मग विठोबा.

आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे.

आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जा‌ईना, त्याचा येळकोट राहीना.

आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास.

आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळ.


असेल दाम तर हो‌ईल काम.

असेल हरी तर दे‌ईल खाटल्यावरी.

आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.

आंधळा विचारतो बहिऱ्याला, वाट जाते हिवाऱ्याला?

आंधळा सांगतो तंबोरा ऐंकतो.

आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली.

आंधळीपेक्षा तिरळी बरी.

आ‌ई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही.

आ‌ई म्हणते लेक झाले, भा‌ऊ म्हणतात वैंरी झाले.

आ‌ईचा काळ, बायकोचा मवाळ.

आ‌ईची माया अन पोर जा‌ईला वाया.

आ‌ऊचा का‌ऊ तो म्हणे मावसभा‌ऊ.

आखाड्याच्या मेळावात पहेलवानाची किंमत.

आखुड शिंगी आणि बहुदुधी.

आग रामेश्वरी अऩ बंब सोमेश्वरी.

आग लागल्यावर विहीर खणणे.

आगीशिवाय धूर दिसत नाही.

आचार भ्रष्टी, सदा कष्टी.

आज अंबारी, उद्या झोळी धरी.

आजा मेला नातू झाला, घरची माणसे बरोबर.

आठ हात लाकुड, न‌ऊ हात धलपी.

आड जिभेने खाल्ले, पडजिभेने बोंब मारली.

आडजीभ खा‌ई अऩ पडजीभ बोंबलत जा‌ई.

आडात नाही तर पोऱ्ह्यात कोठून?





अळवाची खाज़ अळवाला ठा‌ऊक.

अळी मिळी गुपचिळी.

अवघड ठिकाणी दुखणे आणि जाव‌ई डॉक्टर.

अव्हाधसा पोर, घर राखण्यात थोर.

असं कधी घडे अन सासुला जाव‌ई रडे.

असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.

असतील चाळ तर फिटतील काळ.

असतील मुली तर पेटतील चुली.

असतील शिते तर जमतील भूते.

असुन नसुन सारखा.

असून अडचण नसून खोळांबा.

असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.

असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा.

अती शहाणा





अती शहाणा त्याचा बैंल रिकामा.

अत्युची पदि थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा.

अनुभवल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गिळत नाही.

अपयश हे मरणाहून वोखटे.

अपापाचा माल गपापा.

अपुऱ्या घड्याला डबडब फार.

अप्पा मारी गप्पा.

अर्धा वैद्या मरणास खाद्य.

अर्धी कोंबडी कापून खायला, अर्धी अंडी घालायला.

अर्ध्या गावाची नाही खबर आणि वाटणीला बरोबर.

अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.

अल्प बुध्दी, बहु गर्वी.

अल्प मनुष्य कोपे, लहान भांडे लवकर तापे.

अडाण्याचा गेला गाड़ा


अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.

अडाण्याची मोळी, भलत्यासच मिळी.

अड्क्याची भवानी सपिकेचा शेंदूर.

अढीच्या दिढी सावकाराची सढी.

अती केला अनं मसनात गेला.

अती झालं अऩ हसू आलं.

अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे.

अती तिथं माती.

अती परीचयात आवज्ञा.

अती राग भिक माग.

अक्कल नाही काडीची






अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा.

अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.

अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.

अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.

अघळ पघळ अन घाल गोंधळ.

अघळ पघळ वेशीला ओघळ.

अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय.

अडला हरी गाढवाचे पाय धरी.

अडली गाय खाते काय.

मराठी म्हणी संग्रह-१


  • अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌ऊन पळ.



  • अंगापेक्षा बोंगा जास्ती.
  • अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज.
  • अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.
  • अंगावरचे लेणे, जन्मभर देणे.
  • अंथरूण पाहून पाय पसरावेत.
  • अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.
  • अंधळ्याचा हात बुडकुल्यात.
  • अंधारात केले पण उजेडात आले.
  • अंधेर नगरी चौपट राजा.
  • अकिती आणि सणाची निचिती.
  • अक्कल खाती जमा.
  • अक्कल ना बक्कल, गावभर नक्कल.
  • अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे.
  • अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा.
  • अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.
  • अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.
  • अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.
  • अघळ पघळ अन घाल गोंधळ.
  • अघळ पघळ वेशीला ओघळ.
  • मराठी म्हणी संग्रह-२


  • अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय.
  • अडला हरी गाढवाचे पाय धरी.
  • अडली गाय खाते काय.
  • अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
  • अडाण्याची मोळी, भलत्यासच मिळी.
  • अड्क्याची भवानी सपिकेचा शेंदूर.
  • अढीच्या दिढी सावकाराची सढी.
  • अती केला अनं मसनात गेला.
  • अती झालं अऩ हसू आलं.
  • अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे.
  • अती तिथं माती.
  • अती परीचयात आवज्ञा.
  • अती राग भिक माग.
  • अती शहाणा त्याचा बैंल रिकामा.
  • अत्युची पदि थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा.
  • अनुभवल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गिळत नाही.
  • अपयश हे मरणाहून वोखटे.
  • अपापाचा माल गपापा.
  • अपुऱ्या घड्याला डबडब फार.
  • अप्पा मारी गप्पा.
  • मराठी म्हणी संग्रह-३




  • अर्धा वैद्या मरणास खाद्य.
  • अर्धी कोंबडी कापून खायला, अर्धी अंडी घालायला.
  • अर्ध्या गावाची नाही खबर आणि वाटणीला बरोबर.
  • अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.
  • अल्प बुध्दी, बहु गर्वी.
  • अल्प मनुष्य कोपे, लहान भांडे लवकर तापे.
  • अळवाची खाज़ अळवाला ठा‌ऊक.
  • अळी मिळी गुपचिळी.
  • अवघड ठिकाणी दुखणे आणि जाव‌ई डॉक्टर.
  • अव्हाधसा पोर, घर राखण्यात थोर.
  • असं कधी घडे अन सासुला जाव‌ई रडे.
  • असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.
  • असतील चाळ तर फिटतील काळ.
  • असतील मुली तर पेटतील चुली.
  • असतील शिते तर जमतील भूते.
  • असुन नसुन सारखा.
  • असून अडचण नसून खोळांबा.
  • असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.
  • असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा.
  • असेल दाम तर हो‌ईल काम.



  • असेल हरी तर दे‌ईल खाटल्यावरी.
  • आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.
  • आंधळा विचारतो बहिऱ्याला, वाट जाते हिवाऱ्याला?
  • आंधळा सांगतो तंबोरा ऐंकतो.
  • आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली.
  • आंधळीपेक्षा तिरळी बरी.
  • आ‌ई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही.
  • आ‌ई म्हणते लेक झाले, भा‌ऊ म्हणतात वैंरी झाले.
  • आ‌ईचा काळ, बायकोचा मवाळ.
  • आ‌ईची माया अन पोर जा‌ईला वाया.
  • आ‌ऊचा का‌ऊ तो म्हणे मावसभा‌ऊ.
  • आखाड्याच्या मेळावात पहेलवानाची किंमत.
  • आखुड शिंगी आणि बहुदुधी.
  • आग रामेश्वरी अऩ बंब सोमेश्वरी.
  • आग लागल्यावर विहीर खणणे.
  • आगीशिवाय धूर दिसत नाही.
  • आचार भ्रष्टी, सदा कष्टी.
  • आज अंबारी, उद्या झोळी धरी.
  • आजा मेला नातू झाला, घरची माणसे बरोबर.
  • आठ हात लाकुड, न‌ऊ हात धलपी.
  • मराठी म्हणी संग्रह-५


  • आड जिभेने खाल्ले, पडजिभेने बोंब मारली.
  • आडजीभ खा‌ई अऩ पडजीभ बोंबलत जा‌ई.
  • आडात नाही तर पोऱ्ह्यात कोठून?
  • आत्याबा‌ईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो.
  • आधणातले रडतात, सुपातले हसतात.
  • आधिच कामाचा कंटाळा त्यात माहेरचा सांगावा.
  • आधी करा मग भरा.
  • आधी करावे मग सांगावे.
  • आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण.
  • आधी गुंतू नये, मग कुंथु नये.
  • आधी जाते अक्कल मग सुचते शहाणपण.
  • आधी नमस्कार मग चमत्कार.
  • आधी पोटोबा, मग विठोबा.
  • आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे.
  • आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जा‌ईना, त्याचा येळकोट राहीना.
  • आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास.
  • आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळ.
  • आधीच नव्हती हौस त्यात पडला पा‌ऊस.
  • आधीच मर्कट त्यातून मद्य प्याले, त्याची क्रिडा काय विचारता?
  • आपण आपल्याच सावलीला भितो.
  • Monday, 17 February 2014

    राजा छत्रपती राजाराम

                                                 ।।पराक्रमी राजा छत्रपती राजाराम।।


    छत्रपती राजाराम यांचा जन्म २ मार्च १६७० रोजी छत्रपती शिवरायांच्या द्वितीय पत्नी सोयराबाई यांच्या पोटी झाला.राजारामचे लग्न सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी जानकीबाईंशी १५ मार्च १६८० रोजी झाले होते.


    जानकीबाईच्या नंतर राजाराम यांचे लग्न सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या ताराबाई व कोल्हापूरच्या कागलकर घाटगे यांची कन्या राजसबाई यांच्याशी झाले.याशिवाय राजाराम यांना अंबिकाबाई ही आणखी एक पत्नी होती.छत्रपती संभाजीराजेंना मोघलांनी पकडल्यामुळे रायगडावर १२ फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम यांचे मंचकारोहन झाले.


    याच सुमारास २५ मार्च १६८९ रोजी मोघलांनी रायगडांस वेढा घातला.याप्रसंगी महाराणी येसुबाई यांनी राजाराम यांना रायगडावरून निसटून जाण्याचा सल्ला दिला.जानकीबाई रायगडावर महाराणी येसुबाई व बाळ शाहू सोबत राहिल्या तर ताराबाई, राजसबाई, अंबिकाबाई या पत्नी व प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ आदि सेनानीसह राजाराम यांनी रायगड सोडून जिंजीकडे प्रस्थान केले.वाटेत विशाळगडावर ताराबाई,राजसबाई आदिना पाठीमागे ठेवून ते जिंजीला पोहचले.
    महाराष्ट्रात राजारामांनी आपल्या गैरहजेरीत धनाजी जाधव,संताजी घोरपडे, परशराम त्रिंबक, शंकराजी नारायण यांच्याकडे सुत्रे सोपविली होती.धनाजी जाधव, संताजी घोरपडे यांनी आपल्या गनिमी काव्यांनी व वेगवान हालचालींने मोघलांना वेठीस आणले होते.तर तिकडे जिंजीला राजाराम यांचा मोघलांशी संघर्ष चालू होता.मोघलांना एकाच वेळी दोन ठिकाणी लढावे लागत होते.


    सन १६९० साली मोघल सरदार जुल्फिकारखानाने जिंजीला वेढा दिला.हा वेढा सात वर्ष चालला होता.वेढा घातलेल्या मोघलांच्या सैन्यावर हल्ले करून धनाजी जाधव,संताजी घोरपडे यांनी त्यांना वेठीस आणले होते.अखेरीस १६९७ साली जिंजी मोघलांच्या ताब्यात पडला पण तत्पुर्वी राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परतले होते.


    महाराष्ट्रात आल्यानंतर राजाराम यांनी १६९८ साली धनाजी जाधव,परसोजी भोसले आणि खंडेराव दाभाडे यांना घेऊन खानदेशची मोहिम आखली.या मोहिमेतच त्यांची तब्येत बिघडली.मोहिमेतून त्यांना सिंहगड किल्लावर नेण्यात आले तेथेच त्यांचे निधन झाले.छत्रपती राजाराम पराक्रमी,मुत्सद्दी होते.चांगल्या माणसांची त्यांना पारख होती.राजाराम यांना ताराबाईपासून शिवाजी तर राजसबाई पासून संभाजी हे दोन पुत्र झाले होते.