महाराष्ट्र्राचे वेगळेपण आहे ते मुख्यत: त्याच्या मराठी भाषेमुळे अखिल महाराष्ट्र्र प्रदेशात मराठी हीच लोकव्यवहाराची भाषा आहे. लोकांच्या बोलीभाषा विभागपरत्वे काहीशा भिन्न असल्या उदा. वर्हाडी, अहिराणी इ. तरी त्या मराठीच्याच उपभाषा म्हणून आहेत. मराठी ग्रांथीक व पांढरपेशा मराठी समाजाची भाषा हा एक मराठी भाषेचा दुसरा स्तर आहे. या ग्रामीण स्तरात अवांतर प्रादेशिक अनेक फरक आहेत. महाराष्ट्र्रीय समाज म्हणजे मराठी भाषा बोलणारे ज्या सलग प्रदेशात बहुसख्य आणि शतकानुशतके आहेत तो समाज. महाराष्ट्र्र प्रदेशात स्थायिक झालेले सर्व लोक, मग ते कोणत्याही भाषेचे, धर्माचे, वंशाचे व प्रांताचे असले, तरी ते 'महाराष्ट्र्रीय समाजा' चेच घटक होत.
भारतीय समाज, संस्कृती व लोकजीवनाच्या प्रमुख धारेतच महाराष्ट्र्र समाज, संस्कृती व लोकजीवनाची धारा समाविष्ट झाली आहे. तथापी तीत काही वेगळेपण वा वैशिष्टयेही आहेत.
No comments:
Post a Comment