आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Saturday, 24 November 2012

Maharashtratil parjanyaman

 

महाराष्ट्र्राला पाऊस अरबी समुद्रावरून येणार्‍या नैऋत्य मोसमी वार्‍यापासून मिळतो. जून ते सप्टेंबर या कालखंडात प्रामुख्याने हा पाऊस पडतो. कोकण भागात व घाट प्रदेशावर हा पाऊस मोठया प्रमाणावर पडतो. किनार्‍यापासून पूर्वेकडे अंतर्गत भागात जावे तसतसे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. सह्याद्री रांगेला लागून पूर्वेकडे असलेला प्रदेश 'पर्जन्यछायेचा प्रदेश' म्हणून ओळखला जातो. मध्य महाराष्ट्र्रापासून पूर्वेकडे बंगालच्या उपसागरावरून किनारा ओलांडून अंतर्गत भागात येणारा आवर्त पाउस पडतो. या पावसाचे प्रमाण पूर्वेकडे वाढत जाते. राज्यातील पावसाचे प्रमाण सोबतच्या नकाशात दाखवले आहे.
कोकणात दरवर्षी २५०० ते ३५०० मि.मी. पाऊस पडतो. मात्र महाबळेश्वरच्या पूर्वेला केवळ १५ कि.मी. अंतरावर असणार्‍या पाचगणी या ठिकाणी १८६५ मि.मी. इतका कमी पाऊस पडतो. याच्याही पूर्वेला फलटण या ठिकाणी ५०० मि.मी. हूनही कमी पाऊस पडतो. म्हणूनच या भागाला पर्जन्यछायेचा प्रदेश असे म्हणतात. याउलट घाटाच्या पायथ्याशी कोकणातील बाजूस पश्चिमेकडे पावसाचे प्रमाण वाढलेले आढळते. घाटमाथ्यावरील आंबोली या दक्षिण कोकणातील ठिकाणी ७२०० मि.मी. पाऊस पडतो. जुलै व ऑगस्ट हे जास्तीत जास्त पावसाचे महिने आहेत. एका दिवसातील जास्तीत जास्त पर्जन्यमान ५५० मि.मी. इतके झाल्याची नोंद १० सप्टेंबर १९३० ला मुंबईत झाली आहे.

No comments: