आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Saturday, 24 November 2012

maharashtratil jilhe- amaravati

 
बाबएककसंख्या
अमरावती जिल्हा

इतिहास:

१८५३ च्या कराराद्वारे हैदराबादच्या निजामाने अमरावती जिल्ह्यासहित सर्व बेरार (वर्‍हाड किंवा विदर्भ) ईस्ट इंडिया कंपनीकडे सुपुर्द केला. कंपनीने वर्‍हाड प्रांताचे दोन जिल्ह्यांमध्ये विभाजन केले.
  1. दक्षिण वर्‍हाड - त्याचे मुख्यालय हिंगोली येथे होते.
  2. पूर्व वर्‍हाड - उत्तर वर्‍हाडाचे रुपांतर पूर्व वर्‍हाडात करण्यात आले. त्याचे मुख्यालय अकोला येथे होते.
१८६४ मध्ये अमरावती मधून यवतमाळ जिल्हा वेगळा करण्यात आला. १९०३ मध्ये निजामाने वर्‍हाड ब्रिटिश भारत सरकारकडे कायमस्वरूपी सुपुर्द केला.(ईस्ट इंडिया कंपनीला तो काही कालावधीसाठीच देण्यात आला होता.) १९०३ मध्ये वर्‍हाड मध्यप्रांताला जोडण्यात आला. आणि मध्यप्रांत व बेरार असा मोठा प्रांत निर्माण करण्यात आला. तत्कालीन व्हाईसराय र्लॉड कर्झन याने वर्‍हाड मुंबई प्रांतास जोडण्यास नकार दिला. मराठी भाषिकांमध्ये प्रांतिक फूट पाडणे हा त्याचा हेतू होता. १९५६ मधील राज्य पुर्नरचनेदरम्यान अमरावती जिल्ह्यासहित विदर्भातील सर्व जिल्हे तत्कालीन द्वैभाषिक मुंबई राज्यास जोडण्यात आले. १९६० मध्ये महाराष्ट्र्र व गुजरात वेगळा झाल्यावर अमरावती जिल्हा महाराष्ट्र्रातील एक जिल्हा बनला. अमरावती जिल्हा दख्खनच्या पठारावर पूर्णपणे स्थानबद्ध आहे.
प्राचीन इतिहासात अमरावती शहराचा उल्लेख महाभारतात आढळतो. महाभारत काळात श्रीकृष्णाने कौडिण्यपूर या ठिकाणाहून रुक्मिणीचे हरण केले होते. श्रीकृष्णाने हरण करताना अमरावतीच्या एकवीरा देवीच्या तळाखालून ते कौडिण्यपूरपर्यंत भुयार खणले होते असं सांगतात.
अमरावती जिल्हा हा महाराष्ट्र्रातील उत्तरेकडील जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ३.९८ टक्के क्षेत्र या जिल्हाने व्यापलेले आहे. अमरावती जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ आहे. विदर्भातील महत्वाचा, शैक्षणिक दृष्ट्या प्रगतिशील जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. सामाजिक क्षेत्रामध्ये या जिल्ह्याचं नाव खूपच अग्रेसर आहे. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गुलाबराव महाराज, डॉ. शिवाजीराव पटवर्धन, डॉ. पंजाबराव देशमुख इत्यादी महत्वाच्या व्यक्ती या जिल्ह्यात होऊन गेल्या आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. अमरावती जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेले चांदूरबाजार तहसिलातील माधान हे गाव श्री गुलाबराव महाराजांची कर्मभूमी आहे. १९४६ साली डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी अमरावतीजवळ तपोवन येथे जगदंबा कुष्ठधामाची स्थापना केली. अमरावती येथील अंबादेवीचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख यांनी मंदिर प्रवेश चळवळ सुरू केली. १९३२ साली त्यांनी अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय व शिवाजी शिक्षण समितीची स्थापना केली. शिवाजी शिक्षण समिती आज विदर्भातील अग्रणी शिक्षण संस्था आहे. १८९७ चे राष्ट्रीय कॉंग्रेसचे अधिवेशन अमरावती येथे भरले होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष सी. शंकरन नायर हे होते.
अमरावती जिल्ह्याला अकोला, यवतमाळ, वर्धा , अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांच्या सीमा लागल्या आहेत. अमरावती जिल्ह्याची सर्वात जास्त सीमा मध्यप्रदेश या राज्याला लागली आहे. अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वत हा मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र्राचा सीमावर्ती प्रदेश आहे. या जिल्ह्यातील वरुड आणि मोर्शी हे तालुके संत्रयांसाठी प्रसिद्ध आहेत. भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेली शिवाजी शिक्षण संस्था विदर्भातील अग्रगण्य संस्था आहे. स्वातंत्रयाच्या आंदोलनात सहभागी होणारे दादासाहेब खापर्डे , वीर वामनराव जोशी याच जिल्ह्यातील होते.
अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजना बाजार हे गाव गुरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे.याच गावी हिंद सेवक संघाची शाखा होती.
भौगोलिक माहिती
स्थान
उत्तर अक्षांशअंश२०.३२ ते २१.४६
पुर्व रेखांशअंश७६.३७ ते ७८.२७
सरासरी पाऊसमिलीमीटर१५७०
क्षेत्रफळचौ. कि.मी.१२२१२
प्रशासकीय माहिती
ग्रामिण
तालुकेसंख्या१४
पंचायत समित्यासंख्या१४
ग्रामपंचायतीसंख्या८४०
खेडेसंख्या१९९६
शहरी
महानगर पालिकासंख्या
नगरपालिकासंख्या१०
लष्करी छावणीसंख्या-
शहरेसंख्या११
लोकसंख्या
ग्रामिणहजारात१७०६
शहरीहजारात८९९
एकुणहजारात२६०६
पुरूषहजारात१३४४
स्त्रीयाहजारात१२६२
स्त्रीयांचे प्रमाणदर हजार पुरूषांमागे९४०
लोकसंख्येची घनतालोकसंख्या दर चौरस कि.मी.२१३
साक्षरता
एकुणटक्केवारी८२.९६
पुरूषटक्केवारी८९.२८
स्त्रीयाटक्केवारी७६.२१
शेती
शेत जमीनहेक्टर (हजारात)१२२१
जंगलाखालील जमीनहेक्टर (हजारात)३१८
एकुण जमीनीशी जंगलाची टक्केवारीटक्केवारी२६.०४
एकुण ओलिताखालील जमीनहेक्टर (हजारात)७०
आरोग्य
प्राथमिक आरोग्य केंद्रेसंख्या६३
शैक्षणिक माहिती
प्राथमिक शाळासंख्या१८८०
आय्.टी.आय्.संख्या१७
आदिवाशी आश्रम शाळासंख्या४१
वाहतुक
रस्तेकि.मी.९२३८
राष्ट्रीय महामार्गकि.मी.७६
राज्य मार्गकि.मी.१६१८
इतर
स्वस्त धान्य दुकानेसंख्या१९४१
खनिजे उत्पादने ---
औद्योगिक उत्पादने तेल गाळणे, हस्तकला, यंत्रमाग, कापड हातमाग
औद्योगिक वसाहती अमरावती, अंजनगाव, वरूड, अचलपूर, दर्यापूर, मोरशी
नद्या पूर्णा, तापी, वर्धा, शहानूर, पेढी, विदर्भा, चंद्रभागा, गाडगा
कृषी उत्पादने भात, गहू, ज्वारी, बाजरी, कापूस, वाटाणा, ऊस, तूरडाळ, मिरची, भूईमूग, तीळ, जवस, सरकी, एरंडी, संत्री, मोसंबी
कृषी बाजारपेठा अमरावती, चांदूर, धामणगाव, दर्यापूर, अचलपूर
हमरस्ते धुळे-कलकत्ता (६)
लोहमार्ग लांबी (किमी) मुंबई-भुसावळ हावरा (ब्रॉडगेज) बडनेरा-अमरावती (ब्रॉडगेज) मुर्तीजापूर- अचलपूर
उद्याने व अभयारण्ये मेळघाट, गुगामल
महत्त्वाचे किल्ले ---
पर्यटनस्थळे
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे प्रमुख पर्यटनस्थळ आहे.अमरावती शहरापासून ९० किमी अंतरावर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ३६हजार फूट उंचीवर सातपुड्याच्या कुशीत आहे. चिखलदयाच्या परिसरात आठ प्रेक्षणीय स्थळे असून गाविलगडचा किल्ला , किचकदरा, आणि विराटराजाचा महाल इत्यादी मुख्य आकर्षणाची ठिकाणे आहेत. वैराट हे येथील सर्वात उंच ठिकाण आहे.
सालबर्डी हे पर्यटनस्थळ मोर्शीपासून ८ किमी अंतरावर आहे. येथे महादेवाचे जागृत ठिकाण आहे. येथील गरमपाण्याचे झरे एक प्रमुख आकर्षण आहे. संत मारुतीमहाराजांची समाधी आणि महानुभाव पंथाचे प्रसिद्ध मंदिर ही येथील काही ठळक आकर्षण आहेत.
विदर्भाची प्राचीन राजधानी म्हणून कुंडीनपूर हे प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. महानुभाव पंथीयांचे हे सर्वात प्रमुख तिर्थस्थळ आहे. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते.
अचलपुर तालुक्यातील बहीरम हे देवस्थान खूप प्रसिद्ध आहे. सातपुड्याच्या कुशीतील हे ठिकाण महाराष्ट्र्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवर आहे. येथे बहीरम (भैरव) या देवाची पुजा केली जाते. येथे दरवर्षी महिनाभर जत्रा चालते. येथील मातीच्या हंडीत शिजवलेले मटण खास चवीचे म्हणून खवैय्यांत प्रसिद्ध आहे.
अमरावती जिल्ह्यातील महत्वाचे पीक कापूस हे आहे. पूर्णा, तापी व वर्धा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत. वर्धा नदीवर सिंबोराजवळ जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आहे. शहानुर नदीवर शहानुर प्रकल्प आहे. अमरावती शहरात वडाळी तलाव व छत्री तलावातून पाणी पुरवठा होतो.
अमरावती येथे रासायनिक खताचा कारखाना आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये रेगूर ही काळी मृदा मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील हवामान उष्ण व कोरडे आहे. १९४२ च्या चळवळीत या जिल्ह्याचे महत्वाचे योगदान आहे. ब्रिटिशांच्या दडपशाहीने जिल्हा हादरून गेला असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजिरीवर थाप मारून जिल्ह्यातील तरुणांना राष्ट्रीय आंदोलनास प्रेरित केले.
चिखलदरा या ठिकाणाचे उल्लेख महाभारतात आढळतात. याच ठिकाणी भीमाने कीचकाचा वध करून त्याला दरीत फेकून दिले. त्यामुळे त्याला 'किचकदरा' असे नाव पडले, त्यावरूनच पुढे ते चिखलदरा झाले. महाराष्ट्र्रातील एकमेव कॉफी उत्पादक प्रदेश म्हणून चिखलदरा ओळखला जातो. आताशा येथे मध व स्ट्रबेरी चे सुद्धा उत्पादन मोठ्याप्रमाणात घेतल्या जात आहे. मेळघाट हा जंगलव्याप्त परिसर अभयारण्य म्हणून घोषित केल्या गेला आहे. १९७२ ला घोषित केल्यागेलेल्या देशातील १५ व्याघ्रप्रकल्पांतील हा एक. येथे १०० हून अधिक वाघ आहेत. वाघांव्यतिरिक्त हा प्रदेश चित्ते, अस्वल, सांबर, रानडुक्कर, जंगलीकुत्रे , मोर आदींसाठी प्रसिद्ध आहे.
चिखलदया जवळची काही आकर्षण केंद्रे:
  1. मेळघाट व्याघ्रप्रकल्प , कोलखास आणि सीमाडोह हे निसर्गरम्य स्थळे.
  2. गाविलगड किल्ला.
  3. नर्नाळा किल्ला.
  4. पंडित नेहरू बॉटनिकल गार्डन
  5. ट्रायबल म्युझीयम
अलीकडच्या काळात चिखलदरा हे ठिकाण पॅराग्लाईडींगसाठी हळूहळू उदयास येत आहे. भारतात पॅराग्लाईडींग मोजक्याच ठिकाणी होतं. महाराष्ट्र्रातील हे तिसरे ठिकाण आहे.
शिक्षण
जिल्ह्यात तीन अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत.
  1. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती.
  2. द्य.ष्.द्व.श्. अभियांत्रिकी महाविद्यालय , अमरावती
  3. सीपना अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती.
वैद्यकीय महाविद्यालये
  1. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती.
  2. विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय, अमरावती.
  3. द्य.ष्.द्व.श्. दंतशल्यचिकित्सा महाविद्यालय, अमरावती.
  4. श्री वल्लभ तखतमल होमीओपेथी महाविद्यालय, अमरावती.
  5. पंडित जवाहरलाल नेहरू मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ होमियोपेथीक मेडिकल सायन्सेस, अमरावती.
प्रशासकीय विभाग

जिल्ह्याचे विभाजन १४ तालुके आणि ६ उपविभागांमध्ये करण्यात आले आहे. त्यांचे विभाग पुढीलप्रमाणे आहेत.

  1. अमरावती - अमरावती, भातकुली, नांदगाव(खंडेश्वर).
  2. दर्यापुर - दर्यापूर, अंजनगाव.
  3. अचलपूर -अचलपूर, चांदूर बाजार.
  4. मोर्शी - मोर्शी, वरुड.
  5. धारणी - धारणी, चिखलदरा.
  6. चांदूर(रेल्वे) - चांदूर(रेल्वे),धामनगाव तिवसा.
जिल्ह्यातील तालुके
  • चांदुर बाजार,
  • चांदुर रेल्वे ,
  • चिकलदरा,
  • अचलपूर,
  • अंजनगाव सुर्जी,
  • अमरावती तालुका,
  • तिवसा,
  • धामणगांव रेल्वे,
  • धारणी,
  • दर्यापूर,
  • नांदगाव खंडेश्वर,
  • भातकुली,
  • मोर्शी
  • वरुड

No comments: