आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Saturday, 24 November 2012

Media


 
समाजामध्ये संर्पक साधनांना अनन्यसाधारण महत्व आहे. धंदा, व्यापार विकास, प्रशासकीय सेवांचा विस्तार या सर्वांसाठी कार्यक्षम संर्पकयंत्रणा आवश्यक आहे. गेल्या सुमारे पन्नास वर्षामध्ये संर्पक यंत्रणेमध्ये नवनवीन माध्यमे उपलब्ध झाली. त्यामुळे आर्थिक व्यवहार, प्रशासकीय सेवा, शिक्षण, करमणुक या क्षेत्रामंध्ये क्रांती झाली, तर्‍हेतर्‍हेची माहिती द्रुतगतीने मिळविणे, ती माहिती साठवून तिचे वर्गीकरण करणे, त्या माहितीवर प्रक्रिया करणे, ती योग्य ठिकाणी ताबडतोब पोहोचवणे आता शक्य होते. त्यामुळे लोक जवळ येण्यास मदत झाली आहे. देशाचे संरक्षण, कायदा, सुव्यवस्था, शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योगधंदे अशा सर्व बाबतीमधील प्रगतीचे टप्पे केवळ संर्पक माध्यमांच्या विकासामुळे गाठले गेले आहेत.
संर्पक व्यवस्थेत व्यक्तींशी संर्पक साधणार्‍या कोणत्याही माध्यमाचा समावेश होऊ शकतो. तसेच माहिती-ज्ञान- धोरण-सिध्दांत- तज्ञ्ल्त्;व यांच्या प्रचारांचा अंतर्भाव होऊ शकतो. सरकारी पातळीवर वापरली जाणारी आणि जनसामान्यांमध्ये रूजून गेलेली अशी मुख्य प्रसार साधने: चित्रपट, आकाशवाणी, दुरदर्शन व वृत्तपत्रे. प्रमुख संर्पक साधने दूरवाणी, टपाल, तार, टेलेक्स. वरीलपैकी वृत्तपत्रे आणि मुदि्रत वाङ्मय ही खाजगी मालकीची असून इतर बहुतेक प्रचारमाध्यमे केंद्र सरकारमार्फ़त कार्यांन्वित केली जातात. करमणुकीसाठी चित्रपटांचा प्रसार खाजगी क्षेत्रामार्फ़त होतो. परंतु महाराष्ट्र्र शासनमर्ाफत वृज्ञ्ल्त्;ा आणि विचारांच्या प्रसारासाठी चित्रपट माध्यमांचा प्रभावीपणे उपयोग केला जातो. कीर्तनाचा उपयोग कुटुंबकल्याण, आरोग्य, शिक्षणाचे महत्व यांच्या प्रसारासाठी यशस्वीपणे साधला गेला आहे. अशा साधनांमधून माहितीचा प्रसार, लोकशिक्षण व करमणूक अशी तीनाही उद्दीष्टे साध्य होतात.

टपालसेवा :

महाराष्ट्र्रामध्ये उद्योगधंदे, व्यापार, साक्षरता यांचा प्रसार इतर राज्यांच्या तुलनेने पुष्कळ समाधानकारक असल्यामुळे वरील सर्व माध्यमांचा लाभ राज्यास बर्‍यापैकी झालेला आहे. देशामध्ये टपाल कचेर्‍यांची संख्या आज १,५३,४२३ आहे. त्यातील ८९ टक्के पोस्ट कचेर्‍या ग्रामिण भागात आहेत. महाराष्ट्र्रात आज १२,४२३ टपाल कचेर्‍या आहेत. यांपैकी सुमारे ८९ टक्के ग्रामिण भागात आहेत. एक टपाल कचेरी राज्यात सरासरी सुमारे ६,००० व्यक्तींना टपालसेवा पुरवते. संपूर्ण देशात हे प्रमाण ५,८२७ आहे. राज्यात सरासरी २५.७७ चौ.कि.मी. मागे एक टपाल कचेरी आहे तर भारतात हे प्रमाण सुमारे २२ चौ.कि.मी. मागे टपाल कचेरी असे आहे. राज्यातील सर्व खेडयापर्यंत टपालसेवा पोचली आहे. टपाल साहित्याची विक्री, बचत बॅंक, द्रुत टपाल-सेवा, फॅक्स सेवा रात्रीची टपालसेवा, आयुर्विमा, बचत प्रमाणपत्रांचे व्यवहार, युनिट ट्रस्टचे व्यवहार, आयकर, पासर्पोट, आवेदनपत्रे, वाहन कर भरणे आशा सेवा टपाल कचेर्‍यांमार्फ़त मिळतात. ८ ठिकाणी रात्रीची टपालसेवा आहे. टपालसेवा हाताळण्याचे मुंबई हे देशात मोठे केंद्र आहे. पोस्टाच्या तिकीटांचा संच करणार्‍या छंदास उत्तेजन देणारी सेवाही राज्यात ऊपलब्ध आहे. अशी ३ केंद्रे राज्यात आहेत. जलद टपालसेवा (स्पीड पोस्ट) देशात ७३ ठिकाणी सुरू असून राज्यात पुणे, मुंबई, ठाणे, नागपुर, औरंगाबाद, कोल्हापुर अशा अनेक ठिकाणी ही सेवा आहे. थोडा जादा आकार घेतला जाऊन देशातील निवडक शहरांमध्ये २४ तासात रजिस्ट्रड पत्रे पोचविण्याची ही योजना आहे. टपालाची वेगाने हाताळणी होण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा मुंबईत बसविण्यात येत आहे. तेथे कॉम्प्युटर व मायक्रोप्रोसेसर बसवला जात आहे. जलद टपाल सेवेच्या सर्व शहरांमध्ये यावर्षीपासून जलद मनिर्ऑडर सेवा देणे सुरू झाले. टपाल खात्यात उल्लेखनीय काम करणार्‍या कर्मचार्‍यांना टपालसेवा पुरस्कार व मेघदूत पुरस्कार दिलेे जातात.

तारसेवा :

भारतातील सर्वात मोठी तारकचेरी मुंबईत असून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय सेवा या केंद्रामार्फ़त पुरवल्या जातात. आज भारतात ६९,९८६ तारकचेर्‍या आहेत. पैकी महाराष्ट्र्रात २,४५२ आहेत. आठव्या योजनाकाळात राज्यात २०० नवी तार ऑफिस सुरू करण्याचा प्रस्ताव असून ६५० तारघरांचे नव्या इलेक्ट्रॉनिक पध्दतीने आधुनिकीकरण करण्यात येत आहे.

टेलेक्स :

टेलेक्सची सोय देशात १९६३ मध्ये सुरू झाली. १९६९ मध्ये देवनगरीमध्ये टेलेक्स संर्पक सुरू झाला. महाराष्ट्र्रामध्ये मुंबई, पुणे, नागपुर, नाशिक, कोल्हापुर, अमरावती, औरंगाबाद, अमळनेर येथे टेलेक्सची व्यवस्था आहे. मुंबई येथे इलेक्ट्रॉनिक टेलेक्स एक्स्चेंजची सोय यावर्षी झाली. फॅक्स, व्हिडीओ टेक्स अशा सेवा गेल्या वर्षी सुरू झाल्या.

दूरध्वनी :

दूरवाणी (टेलिफोन) च्या बाबतीत महाराष्ट्र्र संपूर्ण देशात आघाडीवर आहे. १९९८ च्या सुरूवातीस भारतात दूरवाणीची सुमारे ९० लाख कनेक्शन दिली होती. त्यांपैकी ३९ लाख महाराष्ट्र्रात होती. (त्यात मुंबईचा वाटा फार मोठा आहे). स्वयंचलित दूरवाणी केंद्र, आंतरराष्ट्रीय दूरवाणी संर्पक, थेट अंतर्गत व आंतरराष्ट्रीय ट्रंककॉल सेवा, (जगातील अनेक शहरांशी आता डायल फिरवून थेट बोलता येते). जहाजांवरून जमिनीवर मिळणारा दूरवाणी संर्पक
किनार्‍यापासून ७५० कि.मी. पर्यंतच्या जहाजांना किनार्‍याशी दूरवाणी सदृश संर्पक साधता येतो मागणीनुसार ट्रंक सेवा अशा सर्व सेवा महाराष्ट्र्रातही उपलब्ध असून मुंबई हे त्याचे मुख्य केंद्र आहे. मुंबई शहराचा राज्यातील ११९ शहरांशी व देशातील १३८० शहरांशी दूरवाणीसंर्पक साधण्यात आला आहे. जगातील २१० देशातील अनेक शहरांशी मुंबईचा थेट संर्पक आहे. मुंबई व नवी दिल्ली या महानगरांसाठी एप्रिल १९८६ मध्ये महानगर टेलिफोन निगमाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे अधिक वित्त सहाय्य हया प्रकल्पासाठी गोळा करता आले. एकटया मुंबई शहरात एकोणीस लाखाहून अधिक दूरध्वनी असून १९९५ नंतर मागेल त्याला तात्काळ दूरध्वनी देणे सुरू झाले आहे. राज्यात उत्पन्नात होणारी वाढ, बॅंक, विमा, धंदा, व्यापार, प्रशासन अशा सेवांचा विस्तार यांमुळे दूरवाणीची मागणी पुढे कित्येक पटींनी वाढेल, अधिक कनेक्शन्स् देऊन दूरवाणीची वाढ होईल. टपाल व तारखात्यामार्फ़त चालवले जाणारे दूरसंर्पक यंत्रसामग्रीचे चार कारखाने सध्या देशात असून त्यातील एक मुंबईला आहे.

आंतरराष्ट्रीय संर्पक :

आंतरराष्ट्रीय संर्पकसेवा हा देशाच्या आणि राज्याच्या संर्पक यंत्रणेतील एक महत्वाचा भाग आहे. या सेवेचेही प्रमुख केंद्र मुंबई येथे आहे. कामासाठी विदेश संचार निगम लि. ची स्थापना एप्रिल १९८६ मध्ये करण्यात आली. बाहेरील देशांशी तार, दूरवाणी, टेलेक्स, रेडिओ, फोटो, आंतरराष्ट्रीय दूरदर्शन, रेडिओ कार्यक्रमांची देवाण-घेवाण या सेवा उपग्रहांमार्फ़त दिल्या जातात. त्यासाठी देशात दोन ठिकाणी-डेहराडून (उ.प्र. येथे, स्थापना १९७६) व महाराष्ट्र्रात आर्वी येथील (ता. जुन्नर, जि, पुणे, स्थापना १९७१) येथे केंद्रे उभारण्यात आली आहेत. आर्वी येथील कृत्रिम उपग्रह केंद्र जगातील सर्वात मोठे असून त्यामुळे देशांतर्गत परदेशी बोटी, विमाने यामधील संदेशवहन सुलभ होते. हिंदी महासागरावर भूस्थिर केल्या गेलेल्या इंटरसॅट या उपग्रकामार्फ़त १५० देशांशी सध्या संर्पक साधला जातो. विविध तर्‍हेचा आंतरराष्ट्रीय सेवांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी केंद्र सरकारच्या दळणवळण मंत्रालयामार्फ़त देशात २१ सूत्रसंचालन केंद्र उभारली आहेत. राज्यात मुंबई व नागपुर येथे ती केंद्र आहेत. बिनतारी संदेशाची देवाण घेवाण करणार्‍या परवानाधारक अधिकृत केंद्रावर निरीक्षण करण्यासाठी देशात दहा ठिकाणी उपकेंद्रे उभी करण्यात आली आहेत. राज्यात मुंबई व नागपुर येथे ही केंद्रे आहेत. जानेवारी २००० पर्यंत राज्यात सुमारे १,३२,५०५ इंटरनेट कनेक्शन्स दिली गेली होती.

आकाशवाणी :

करमणुकीचे कार्यक्रम, वृत्तप्रसार, आरोग्य-कुटुंब-कल्याण आदींचा प्रसार शेतकर्‍यांना मार्गदर्शन, हवामान, बाजारभाव यांची दैनंदिनी माहिती यांच्याप्रसारासाठी आकाशवाणी हे माध्यम प्रभावी आहे. ही सेवा उपलब्ध करून देणे केंद्र सरकारच्या माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असले तरी घटक राज्यांमधील केंद्रांना कार्यक्रमाच्या निवडीस काही प्रमाणात स्वातंत्र्य देण्यात आले आहे. प्रादेशिक भाषामधील कार्यक्रमांवर भर देऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. स्वातंत्र्यापूर्वी १९२७ मध्ये प्रथम मुंबई येथे रेडिओ केंद्र सुरू झाले. १९४७ मध्ये भारतात फक्त ६ रेडिओ केंद्रे होती.
आज भारतात १९७ रेडिओ केद्रें आहेत. महाराष्ट्र्रात त्यापैकी १३ केंद्रे आहेत. औरंगाबाद, मुंबई, जळगाव, नागपुर, परभणी, पुणे, रत्नागिरी, सांगली, कोल्हापुर, सातारा, नाशिक, अहमदनगर व सोलापुर. राज्यात नांदेड, बीड, मालवण, धुळे, चंद्रपुर, उस्मानाबाद, अकोला, यवतमाळ येथे स्वतंत्र आकाशवाणी केंद्रे होत आहेत. मुंबई केद्रांची सेवा लघुलहरीवरूनाही प्रक्षेपित होते. आकाशवाणीवरील प्रक्षेपणाचा सुमारे ३८ टक्के वेळ संगीतासाठी असतो. तसेच उपशास्त्रीय, सुगम-सिने लोकसंगीत, वाद्यवृंद जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यास आकाशवाणीचे माध्यम कारणीभूत ठरले आहे. याशिवाय नभोनाटये, वृत्तनिवेदन, चालू घडामोडींवरील चर्चा, संथगतीतील बातम्या, संसद समालोचन, विज्ञानचर्चा, पुस्तक परिक्षणे, कामगार, लहान मुले, विद्यार्थी, युवक, महिला, सैनिक, ग्रामिण जनता व शेतकरी वर्ग यासाठी विशेष कार्यक्रम आकाशवाणीवर असतात. देशातील लोकांसाठी २३ भाषा व ३५ आदिवासी उपभाषा यांमधून वृत्तनिवेदन केले जाते. विविध भारतीचे करमणूक कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होऊन राज्यात पुणे व नागपुर येथून पुन:क्षेपित होतात. १ नोव्हेंबर १९६७ रोजी मुंबई केंद्रावर व्यापार विभाग प्रथमच सुरू झाला. आज त्यावर जाहिराती आणि प्रायोजित कार्यक्रम सादर केले जातात.

दूरदर्शन :

मुंबईमध्ये २ ऑक्टोबर १९७२ रोजी दूरदर्शन केंद्र सुरू झाले. सध्या राज्यामध्ये मुंबई, नागपुर येथून कार्यक्रमाचे प्रसारण व पुणे, सोलापुर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, कोल्हापुर, सातारा, अमरावती येथून कार्यक्रमाचे पुन:क्षेपण होते. मुंबई केद्रावर दुसरी वाहिनी मे १९८५ मध्ये सुरू झाली. पुणे येथून कार्यक्रमाचे प्रक्षेपण सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या राज्यात ५ उच्च शक्ती दूरदर्शन प्रक्षेपक केंद्रे व ४० लघुशक्ती प्रक्षेपक केंद्रे आहेत.
राज्यातील शहरी व ग्रामिण अशा दोन्ही लोकसंख्येला दूरदर्शनचा फायदा मिळतो. दूरदर्शन हे जाहिरातीचे कार्यक्रम, युवादर्शन, कामगार विश्व, संगीत, चर्चा, प्रात्यक्षिके, वृज्ञ्ल्त्;ा, सिनेमा, नाटक, मुलाखती, खेळाचे सामने अशा तर्‍हेने दृश्य व श्राव्य माध्यमांव्दारे लोकांपर्यंत पोहोचते. नभोवाणी व दूरदर्शन यांचा समाजावर परिणाम निश्चितपणे होत असतो. समाजशिक्षण, प्रौढांसाठी कार्यक्रम, नागरिकांची कर्तव्ये, सामाजिक सुरक्षितता, सार्वजनिक आरोग्य, संगणक शिक्षण, प्रदूषण, योगशिक्षण, विज्ञानकला व छंद, कुटुंबकल्याण, वृत्तसेवा, बधिरांसाठी वृत्तसेवा, गुंतवणुकीसाठी सल्ला अशा विविध विषयांतून या माध्यमाने लोकसंर्पक साधला आहे. शालेय दूरवाणी व विद्यापीठ अनुदान आयोगासाठी केलेल्या शैक्षणिक कार्यक्रमांचाही राज्यातील जनतेस लाभ मिळतो. दिल्लीमध्ये १९५९ साली कार्यक्रमाव्दारे लोकशिक्षणाचे काम दूरदर्शनने प्रभावीपणे केल्याची नोंद अनेक जाणकारांनी दिली आहे. क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस, हॉकीचे सामने, क्रिडास्पर्धा यांचा आस्वाद, दृश्य व श्रवण माध्यमातून घेणे ही आधुनिक युगातील विशेष उपलब्धी आहे. शिक्षणप्रसार, करमणुकीची गरज व वाढते राहणीमान यामुळे दुरदर्शन या माध्यमाच्या अत्यंत जलद प्रसार होईल व पुढील काही वर्षे नभोवाणी व दुरदर्शनच्या वापरातील महाराष्ट्र्राची आघाडी कायम राहील.
१९४७ पासून राज्यात सामूहिक दूरचित्रवाणी योजना वर्गणी तत्वावर अंमलात आली आहे. याव्दारे सार्वजनिक संस्था, शाळा, रूग्णालये, ग्रामपंचायती, ग्रंथालये इत्यादी ठिकाणी दूरदर्शन संच शासनातर्फे बसवले जातात. त्यासाठी बसवण्याची व परिरक्षणाची फी आकारली जाते. १९९२ पर्यंत असे १०१९० संच राज्यातील विविध भागात बसवले होते. त्यापैकी १७०० आदिवासी भागात होते.

दैनिके व नियतकालिके :

नियतकालिकांच्या प्रसाराच्या बाबतीत देशात उत्तरप्रदेशाचा क्रम पहिला दिल्लीचा दुसरा व महाराष्ट्र्राचा क्रम तिसरा लागतो. १९९९ मध्ये देशात ४३,८२८ नियतकालिके (दैनिके, साप्ताहिके, व्दिसाप्ताहिके धरून) प्रसिध्द होत होती; पैकी महाराष्ट्र्रात ३६१४ होती. त्यापैकी ३२५ दैनिके होती. १९९९ मधील देशातील दैनिक व नियतकालिकांपैकी २०४६ (४.७%) मराठीत होती. महाराष्ट्र्रात मराठीबरोबर बहुतेक सर्व राष्ट्रीय भाषामध्ये, उपभाषामध्ये व अनेक विदेशी भाषामध्ये नियतकालिके प्रसिध्द होत असतात. वृत्तपत्रांचा प्रसार हा साक्षरतेवर अवलंबून असतो. मराठीतील वृत्तपत्राचा रोज एकुण खप १७ लाख असला तरी हिंदी, इंग्रजी वृत्तपत्रांचा खप मराठीपेक्षा जास्त आहे.
राज्यातील प्रमुख मराठी दैनिके: महाराष्ट्र्र टाइम्स-लोकसज्ञ्ल्त्;ाा-नवशक्ती (मुंबई), सकाळ-केसरी-लोकसज्ञ्ल्त्;ाा लोकमत- (पुणे) लोकमत- (नागपुर), ऐक्य (सातारा), प्रजावाणी (नांदेड), गावकरी (नाशिक), पुढारी (कोल्हापुर), संचार (कोल्हापुर), संचार (सोलापुर), अंजिठा- मराठवाडा, लोकमत (औरंगाबाद), सागर (चिपळूण) इ.
प्रमुख इंग्रजी दैनिक : टाईम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, फ्री प्रेस जर्नल, इंडिपेन्डन्ट (मुंबई), नागपुर टाईम्स (नागपुर), महाराष्ट्र्र हेरॉल्ड (पुणे), लोकमत टाइम्स (औरंगाबाद). मुंबईतील गुजराती भाषेतील बॉंबे समाचार हे देशातील सर्वात जूने चालू दैनिक आहे. (स्थापना १८२२)
नियतकालिकांच्या वाढीस आणि प्रसारात वृत्तपत्र कागदाच्या टंचाईमुळे आणि छपाईच्या साधनांच्या महागाईमुळे अडथळे येतात. त्यांची झळ विशेषत: प्रादेशिक भाषामधील वृत्तपत्रांना पोहोचते. सरकारी आणि खाजगी कागद गिरण्यांमार्फत वृत्तपत्र कागदाच्या उत्पादनाचे मोठे प्रयत्न आजपर्यंत झाले. तरी देखील १९९८ मध्ये एकुण मागणीपैकी सुमारे ७०- पुरवठा आयात करून भागवावा लागतो. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, युनायटेड न्यूज ऑफ इंडिया या वृत्तसंस्था इंग्रजीमध्ये वृत्तवितरण करतात. समाचार भारती, हिंदुस्थान समाचार या मराठी आणि इतर प्रादेशिक भाषामध्ये वृत्तवितरण करतात. सरकारने 'हमारा देश' या नावाने मोठया पाक्षिया भिज्ञ्ल्त्;िापत्रकाचे प्रसारण १९७० मध्ये सुरू केले. ते मराठीसह १२ भाषामध्ये प्रसारित होते व ग्रंथालय, टपाल कचेर्‍या, बॅंका, रेल्वे स्थानके व सार्वजनिक ठिकाणी ठळकपणे लावले जाते. त्यामध्ये प्रमुख घटना, विकास कार्यक्रमात गाठलेले टप्पे, क्रीडा, शेती, उद्योगधंदे अशा क्षेत्रांमध्ये मिळविलेले विशेष नैपुण्य सोप्या भाषेत आणि मोठया अक्षरात सचित्र प्रस्तुत केले जाते. सामान्य नागरिक, प्रौढ साक्षर विद्यार्थी अशा लोकांपर्यंत संर्पकसाधण्याचा हा प्रभावी मार्ग बनला आहे.
वृत्तपत्रांच्या माध्यमातून सरकारी धोरणाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी केंद्रे सरकारने वृत्तपत्र विभागाची स्थापना केली. ती सेवा राज्यातही उपलब्ध आहे. सरकारी क्षेत्रातील उपक्रम, राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या प्रचारयंत्रणेत सुसूत्रता राखवण्याचे काम या विभागातर्फे केले जाते. तसेच वृत्तपत्रात येणार्‍या बातम्यांचा व मतांचा परामर्श सरकारपर्यंत पोहोचविण्याची कामगिरीही या विभागावर आहे. बातम्या छायाचित्रे, निवेदन, वृत्तसारांश ही सर्व साधने मराठी- इंग्रजी अशा भाषामंध्ये राज्यात सर्वत्र उपलब्ध होतात.

चित्रपट :

देशातील चित्रपट व्यवसाय मुंबई, कलकज्ञ्ल्त्;ाा व मद्रास येथे एकवटला आहे. १९९८ साली ६९३ पूर्ण वेळ करमणूक चित्रपट प्रकाशित झाले. त्यापैकी ६४% मद्रास येथून होते तर २८% मुंबईत होते. यावर्षी हिंदीत १५७ तर मराठीत २१ चित्रपट प्रकाशित झाले. मुंबई हे मराठी व हिंदी चित्रपट निर्मितीचे प्रमुख केंद्र आहे. एकेकाळी देशातील सुमारे ८०% चित्रपटांची निर्मिती महाराष्ट्र्रात होत असे. आता ते प्रमाण इतके कमी आले आहे. मराठी चित्रपट निर्मिती पुणे, कोल्हापुर येथेही होत आहे. राज्यात या व्यवसायात कोटयावधी रूपयांची उलाढाल होते. कार्टून, वार्तापट, अनुबोधपट यांयासहाय्याने या माध्यमाचा उपयोग करून घेतात. सर्व भारतीय भाषामध्ये प्रकाशित होणारे हे चित्रपट मुख्य चित्रपटाआधी दाखवणे कायद्याने बंधनकारक आहे. व्हिडिओव्दारा होणार्‍या चित्रपट चोरीला आळा घालण्यासाठी व ग्रामिण भागातील सर्वसामान्य माणसाला चित्रपट पहाणे शक्य व्हावे म्हणून किमान ३००० वस्तीच्या गावांमध्ये १६ मि.मी. चित्रपट गृहे सुरू करण्याची शासनाची योजना असल्याचे सांस्कृतिक कार्य राज्यमंत्र्यांनी ऑगस्ट १९८६ मध्ये जाहिर केले. राज्यातील करमणूक करात ५०% ने कपात करण्याचा निर्णय शासनाने १९९४ मध्ये जाहिर केला. मराठी चित्रपटांना प्रोत्साहन मिळावे म्हणून करमणूक कर परत करण्याची योजना चालू आहे. मराठी चित्रपट वर्षातून चार आठवडे दाखवणे राज्यातील प्रत्येक चित्रपटगृहास बंधनकारक आहे.
राज्यात पुणे नॅशनल फिल्म अकाईव्हची कचेरी आहे. तेथे अनेक भाषामधील चित्रपट, वार्तापट, चित्रपटविषयक पुस्तके, नियतकालिके, पत्रके, गीतपुस्तके, ध्वनिमुद्रीका, ध्वनिफीती, सूक्ष्मचित्रपट, पुस्तकाचित्रे, छायाचित्रे, जाहिराती यांचा संग्रह जतन वर्ग घेतले जातात. प्रदर्शन भरवली जातात. तसेच चित्रपट सप्ताह साजरे केले जातात.
पुणे येथे फिल्म व टेलिव्हिजन इन्स्ट्टियूट आहे. तेथे अभिनय संकलन, छायाछित्रण, ध्वनिमुद्रण यांचे पदविका शिक्षण दिले जाते.

No comments: