अकोला :-
जिल्ह्याचे मुख्य ठिकाण हे शहर मोर्णा नदीच्या दोन्ही तीरांवर वसले आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे मुख्य ठिकाण म्हणूनही अकोला प्रसिध्द आहे. येथील राजराजेश्र्वर मंदिर, सतीमाता मंदिर व जैन मंदिर प्रसिध्द आहेत. येथे संत तुकाराम कर्करोग उपचार रूग्णालय उभे राहिजे आहे. या शहरात सुती कापडाच्या गिरण्या आहेत. येथे दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र असून विमानासाठी एक धावपट्टीही आहे. हे मुंबई-कोलकता लोहमार्गावरील जक्शन आहे. सुती कापडाच्या व्यापाराचे हे एक केंद्र आहे.
बाळापूर :-
बाळापूर तालुक्याचे हे मुख्य ठिकाण मन व म्हैस या नद्यांच्या संगमावर वसले आहे. बाळापूर देवीच्या मंदिरामुळे शहरास हे नाव पडले आहे. येथील हातमागावर तयार होणार्या सतरंज्या प्रसिध्द आहेत. येथील मिर्झाराजे जयसिंगाची छत्री व किल्ला प्रेक्षणीय आहे. येथील किल्ला औरंगजेबचा मुलगा आझममशहा याने बांधला आहे, असे म्हटले जाते.
नरनाळा :-
अकोट तालुक्यात गाविलगडच्या डोंगररांगांत नरनाळा हा प्राचीन किल्ला वसला आहे. दाट वनश्रीने वेढलेला सुमारे २२ चौरस कि. मी. क्षेत्रफळाचा व सत्तावीस दरवाज्यांचा हा किल्ला पर्यटकांचे आकर्षण आहे. येथील अभयाण्य प्रसिध्द आहे.
मूर्तीजापुर :-
मूर्तीजापुर तालुक्याचे ठिकाण. हे मुंबर्इ् कोलकता लोहमार्गावरील महत्वाचे जंक्शन आहे. येथे संत गाडगे महाराजांचा आश्रम आहे.
हिरवखेड :-
हे स्थळ तेल्हारा तालुक्यात असून ते आंब्यासाठी प्रसिध्द आहे. येथे जिनिंग व प्रेसिंग कारखाना आहे.
अकोट :-
अकोट तालुक्याचे मुख्य ठिकाण येथे तयार होणार्या सतरंज्या व गोणी प्रसिध्द आहे.
पातूर :-
अकोला जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुक्याचे ठिकाण हे साग व चंदनी लाकडासाठी प्रसिध्द आहे. येथे जाजमे व रजया रंगविल्या जातात. येथे सिधाजीबुवांची यात्रा भरते.
याशिवाय बार्शी -टाकळी ( तालुक्याचे ठिकाण हेमाडपंती मंदिर ), पारस ( बाळापूर तालुक्यात औष्णिक विद्युतनिर्म्ािती केंद्र),ही जिल्ह्यातील महत्वाची अन्य स्थळे होत.
हवामान :-
जिल्ह्यातील हवामन सामान्यपणे उष्ण आहे. समुद्रकिनार्यापासून लांब अंतरावर असल्याने व खंडांतर्गत स्थान लाभल्याने जिल्ह्याचे हवामान अत्यंत विषम आहे. उन्हाळा अतिशय दाहक असेन हिवाळा कडाक्याच्या थंडीचा असतो. में महिन्यात तापमान अनेकदा ५० से ची मर्यादा गाठते, तर हिवाळयात ते पुष्कळदा ८ से पर्यत खाली येते नैऋत्य मोसमी वार्यांपासून मिळणार्या पावसाचा काही काळ वगळता वर्षभर हवा कोरडी असते. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालखंडात नैऋत्य मोसमी वार्यांपासून सरासरी ७५ ते १०० से. मी. पाऊस पडतो. जिल्ह्यातील पावसाचे वितरण असमान आहे. सर्वसाधारणत: पावसाचे प्रमाण जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात कमी आहे. बाळापूर,अकोला व मुर्तिजापूर तालुक्यांत तुलनात्मकदृष्टया पाऊस कमी पडतो.
नद्या :-
पूर्णा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी होय. हिचा उगम मध्य प्रदेश राज्यात बेतूल जिल्ह्यात सातपुडयाच्या पर्वतरांगांमध्ये होतो. अमरावती जिल्ह्यातून ती अकोला जिल्ह्यामध्ये मुर्तिजापूर तालुक्यात प्रवेशते जिल्हयातील तिचा प्रवास काहीसा पूर्वेकडून पश्चिमेकडे असा होतो. तिचा हा प्रवास मेर्तिजापूरम, अकोला व बाळापूर तालुक्यांच्या उत्तरेकडील सीमावर्ती भागातून, तर अकोट व तेल्हारा या तालुक्यांच्या दक्षिणेकडील सीमावती भागातून होतो. शहानूर, पठार व आस आदी नद्या तिला उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत येऊन मिळतात. कष्टेपूर्णा, मोर्णा, मन व उमा या तिच्या दक्षिण काठावरील उपनद्या होत. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात अज्ंिाठयाच्या डोंगररांगांत उगम पावून मूर्तीजापुर तालुक्यात लाईतजवळ पूर्णेस मिळणारी काटेपूर्णा ही पूर्णेची मोठी उपनदी होय. काटेपूर्णा नदीचा जिल्ह्यातील प्रवास दक्षिणेकडून उत्तरेकडे असा होतो. मूर्तीजापुर तालुक्यातच सांगवी या गावाजवळ पूर्णा व उमा नद्यांचा आहे. निर्गुणा ही मन नदीची उपनदी जिल्ह्यातून वाहते. म्हैस नदी बुलढाणा जिल्ह्यातून या जिल्ह्यात वाहत येते. मन व म्हैस या नद्यांचा संगम बाळापूर जवळ झाला आहे.
No comments:
Post a Comment