अज्ञात
सलतंय मनात माझ्या
काहीतरी अज्ञात
उलगडत नाही कोडं
गुरफटत चाललोय त्यात
हुरहूर आहे मनात
अन एक अनामिक भीती
होईल सर्व मनासारखं
मनाला समजावू मी किती
सर्व आहे जवळी
पण माझं नाही कोणी
नकोस होतंय जगण
या एकांताच्या क्षणी
दाटून येई कंठ माझा
फुटू पाहतो उर
मला जायचे आहे
या नश्वारांपासून दूर
मला जायचे आहे
या नश्वारांपासून दूर .
-विवेक शेळके
मायाजाल
हि दुनिया है मायाजाल
हर कोई यहा फसतो रे
सब झुठ है ये रिश्ते -नाते
हर कोई अकेला असतो रे .
ना है कोणाला फिकर इथे
ना है कोई समझनेवाला
हर कोई है मस्ती मे
ना है कोई दिलवाला
हर कोई झगडतो जगण्यासाठी
हर कोई कंबर कसतो रे
जिसके पास है दौलत पैसा
वोही सिकंदर असतो रे
-विवेक शेळके
दहशतवाद
दहशतवाद लावतोय
आपल्या संस्कृतीला सुरुंग
ठार मारा अफजल कसाबला
कशाला बाटवताय तुरुंग
माणुसकीला काळिमा फासणार
कृत्य केल त्यांनी
कसाब मागतोय खायला आता
चिकन आणि बिर्याणी
अशा या नराधमाना
फुकट कशासाठी पोसायचं
द्या आम आदमी च्या हाती
नाहीतर फासावर तरी लटकवायाच
दहशतवादा विरुद्ध लढण्यासाठी
चला एक होऊ सारे
शेजारी म्हणून कशासाठी ठेवायचे
हे अस्तनीतले निखारे .
-विवेक शेळके
मानवधर्म
तोडून टाकू बंध हे
बंध जाती धर्माचे
एकच सत्य ठसवू मनी
आपण एकाच मातीचे
कुणी नाही उच्च इथे
नाही कुणी नीच
कर्माने ठरावे लहान मोठे
खरी वर्गवारी हीच
मानवता हि एकच जात
मानू आपण खरी
अमर राहील मानवधर्म
चंद्र सूर्यापरी .
-विवेक शेळके
-विवेक शेळके
मानवधर्म
तोडून टाकू बंध हे
बंध जाती धर्माचे
एकच सत्य ठसवू मनी
आपण एकाच मातीचे
कुणी नाही उच्च इथे
नाही कुणी नीच
कर्माने ठरावे लहान मोठे
खरी वर्गवारी हीच
मानवता हि एकच जात
मानू आपण खरी
अमर राहील मानवधर्म
चंद्र सूर्यापरी .
-विवेक शेळके
No comments:
Post a Comment