आजच्या काळाची खरी गरज म्हणजेच प्रभावी आणि उपयुक्त असे शिक्षण . सक्षम भारत घडवण्या साठी सक्षम शिक्षणाची आवश्यकता आहे . सक्षम विचारातूनच अधिक बळशाली भारत उदयास येईल . शिक्षणाचा पाया घरामधुनच घातला जातो अस म्हणतात मग या प्रभावी शिक्षणाची सुरुवात सुद्धा घरापासूनच व्हायला हवी . मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अस म्हटल जात त्याच वेळेस त्या मुलाची गरज ओळखून त्या प्रकारचे संस्कार त्याच्यावर व्हायला हवेत . लहान वयामध्येच चांगल काय आणि वाईट काय याची जाणीव करून देणे तितकेच क्रमप्राप्त आहे .आजच्या काळातील पालकांचा असा समाज झाला आहे विशेषता ग्रामीण भागातील पालक , 'जे काही शिक्षण घ्यायचं असेल ते फक्त शाळे मधेच घरी विद्यार्थी ऐकत नाहीत'. पण मी म्हणतो जर तो विद्यार्थी आपला स्वताचा मुलगा व मुलगी आहे तर मग आपल म्हणन त्याला पटवून देणे हे आपल कर्तव्य आहे. या साठी ते शिक्षकाची मदत घेऊ शकतात . त्यांच्या मदतीने घरी अभ्यास करणे सुद्धा आवश्यक आहे हे त्याला पटवून द्या .
मी असेही काही पालक पाहिलेत कि जे आपल्या मुलाला अगदी तळ हाताच्या फोडा प्रमाणे जपतात आणि त्याला एकांगी बनवतात . त्याचं प्रेम रास्त आहे पण ज्या काळजी पोटी ते त्याला एवढ जपतात ती काळजीच त्या विद्यार्थ्याला मारक ठरते . तो विद्यार्थी स्पर्धे मधून बाहेर फेकला जातो. सरकारने सांगितलय विद्यार्थ्याला शारीरिक शिक्षा करायची नाही , पण मी म्हणतो या धोरणा मुळे विद्या र्थ्याच्या मनातील भीती नाहीशी होऊन ते वाम मार्गाला लागण्याची च शक्यता जास्त आहे. एक गोष्ट इथे नमूद करू इच्छितो कि मी फक्त आपल मत मांडत आहे . विरोध करणं हा या लेखा मागचा उद्देश नाही.
सर्वांग सुंदर शिक्षणाने माणूस घडला जातो तसेच घडवला जातो . नव्या विचारांची आचारांची मुळे खोलवर रुजवण्याच काम शिक्षणातून होत असत. आणि म्हणूनच लहान वयातच मुलावर योग्य संस्कार करण्याच काम पालकांनी कराव .सर्व शिक्षण हे शाळेतच मिळत हा पालकांचा गैरसमज दूर होण गरजेचं आहे . जीवन जगण्यासाठी लागणार ज्ञान पालकांनी मुलांना रोजच्या व्यहारातून देण आवश्यक आहे .
माझ्या शाळेतील बरेचशे पालक तक्रार करत असतात की माझा मुलगा व मुलगी घरी अभ्यासच करत नाही . आमच ऐकत नाहीत , आम्हाला घरी अभ्यास घ्यायला जमत नाही अश्या सर्व पालकांना माझं एकाच सांगण आहे की तुम्हाला मुलांसाठी वेगळा वेळ देण्याची गरज नाही . आपण कामात असताना त्यानाही अभ्यासासाठी जवळ घेऊन बसा . अश्या बऱ्याच गोष्टी आहेत कि जा द्वारे काही संकल्पना त्यांना समजावून सांगता येतील .जसे शेंगदाणे देऊन त्यांची बेरीज वजाबाकी करता येईल . चपाती च्या आधारे पाव , अर्धा , पावून , एक या गणिती संकल्पना समजावता येतील .

No comments:
Post a Comment