आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Friday 2 May 2014

सुविचार संग्रह -१

१. आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी       राहतात.

२ .सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

३.मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.

४.आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते

५.छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.

६.प्रार्थना म्हणजे मनाचं स्नान.

७.आपण जे पेरतो तेच उगवतं.

८.जग प्रेमाने जिंकता येतं, शत्रुत्वाने नाही.

९.फळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.

१०.यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.

११.उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.

१२.प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे

१३.शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.

१४ .ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

१५.प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फक्त परमेश्वरावरच ठेवा.

१६.यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती - आत्मविश्वास.

१७.आधी विचार करा, मग कृती करा.

१८.प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !

१९. आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका.

२०.चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !

२१.फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !

२२.एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.

२३.माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.

२४.अतिथी देवो भव ॥

२५.सत्याने मिळतं तेच टिकतं.

२६.अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा.

२७.जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.

२८.दु:ख कवटाळत बसू नका, ते विसरा आणि सदैव हसत रहा.

२९.परमेश्वराच्या आशिर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.

३०.आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.

३१.हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे, मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !

३२.निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.

३३.स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.

३४.खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते, सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.

३५.प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.

३६.उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.

३७.खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.

३८.चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.

३९.तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.

४०.वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !

४१.नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.

४२.जो गुरुला वंदन करत नाही, त्याला आभाळाची उंची लाभत नाही.

४३.तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.

४४.गर्वाचं घर नेहमीच खाली असतं

४५.शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.

४६.झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.

४७.मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.

४८.माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी.

४९.आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.

५०.क्रांती हळूहळू घडते, एका क्षणात नाही.


No comments: