आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Monday, 17 February 2014

महाराष्ट्राची नृत्यकला


                 महाराष्ट्राला समृद्ध आणि सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. ही संस्कृती व परंपरांची भूमी आहे त्याचप्रमाणे सामाजिक करमणुकीसाठी महाराष्ट्रात सणांना फार महत्त्व आहे. असे धार्मिक सण वा अन्य ठिकाणी सादर केल्या जाणार्या लोकनृत्यातून महाराष्ट्राची सांस्कृतिक श्रीमंती प्रतीत आहे.
नृत्यकला - मानवी भावभावना प्रकट करण्याचे नृत्य हे एक प्रभावी माध्यम आहे. लोकनृत्यातून त्या-त्या समाजाची संस्कृती, राहणीमान, विचारसरणी प्रकट होते. महाराष्ट्रातील नृत्यांचे विविध प्रकार पुढील प्रमाणे:
लावणी नृत्य: पारंपारिक नृत्य व गायनाचा लवाणिनृत्य हा संगम आहे. लावणी नृत्य 'ढोलकी' या वद्याच्या ठोकयांच्या सहायाने सादर केले जाते. लावणी नृत्य मुख्यत: स्त्रिया सादर करतात. हे नृत्य सादर करताना पारंपारिक प्रकारचे कपडे वापरले जातात. 'लावणी' हा शब्द 'लावण्य' या शब्दापासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ सौंदर्य असा आहे. सुरुवातीस लावणीतून सामाजिक, धार्मिक, राजकीय विषय मांडले जात. १८ व्या आणि १९ व्या शतकामध्ये मराठ्यांच्या युद्धवेळी लावणी, सैनिकांसाठी मनोरंजनाचे साधन म्हणून वापरली गेली
पोवाडा: महाराष्ट्रातील इतिहासाची जाणीव सर्वांना करुण देण्याचे प्रभावी साधन म्हणजे पोवाडा होय. पोवाडा हा मुख्यत: गायनाचा प्रकार आहे. पोवाडयातून डफाच्या तालावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शुरपणाचे किस्से सांगितले जातात
कोळी नृत्य: कोळी नृत्य हा महाराष्ट्राचा वैशिष्ठ्यपूर्ण असा लोकनृत्याचा प्रकार आहे. 'कोळी' म्हणजे मासेमारी करणार्या समाजाचे नृत्य म्हणून या पप्रकारास कोळी नृत्य असे म्हटले जाते. हा समाज त्यांची वेगळी-आगळी ओळख व रंगतदार नृत्यांसाठी प्रसिद्ध आहे. या नृत्यांमध्ये प्रामुख्याने मासेमारांच्या दैनंदिन जीवनातील प्रसंगांचा समावेश असतो. कोळी नृत्य स्त्रिया व पुरुष दोघा-दोघांच्या समूहाने करतात. हे नृत्य करताना रंगीत पोशाख वापरले जातात
धनगरी गाजा: सोलापुर जिल्ह्यातील धनगर समाजातील लोक हा नृत्यप्रकार सादर करतात. धनगर मेंढया बकरे पाळून आपला चरितार्थ चलावतात. त्यांची गाणी ही आजूबाजूच्या झाडांपासून प्रेऱणा घेऊन तयार होतात. ही गाणी 'ओवी' च्या स्वरुपात असतात.त्यांतून धनगरांचे दैवत 'बिरबा'च्या जन्माच्या कथा सांगितल्या जातात. बिरुबाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गाजा सादर केला जातो. यावेळी धोतर, अंगरखा, फेटा आणि एक रंगीत रुमाल असा पेहराव करतात. ढोल वाजवणार्यांच्या भोवती तालावर पावले टाकत हे नृत्य केले जाते
तमाशा: महाराष्ट्रातील सर्वत लोकप्रिय लोकनृत्याचा प्रकार म्हणजे तमाशा होय. 'तमाशा' हा पारशी शब्द असून त्याचा अर्थ आनंद किंवा करमणुकीचे मिश्रण आहे. तमाशाचा उदय १६ व्या शतकात झाला असे मानन्यात येते. लावणी ही तमाशाच्या केंद्रस्थानी असते. ढोलकी, तूणतुणे, मंजीरा, डफ, लेझिम, संवादिनी आणि घुंगरू ही वाद्ये तमाशात वापरली जातात
वाघ्या मुरळी: खंडोबा या देवाच्या आदरापित्यार्थ वाघ्या-मुरळीचे नृत्य सादर केले जाते. वाघ्या म्हणजे पुरुष तर मुरळी ही स्त्री असते. खंडोबाच्या कुत्र्यांचे प्रतीक म्हणून ही पात्रे वापरली जातात. कोणत्याही धार्मिक उत्सवात वाघ्या मुरळीचे नृत्य सादर करण्यात येते
दिंडी: दिंडी हा महाराष्ट्रातील धार्मिक लोकनृत्याचा प्रकार आहे. अषाढ़ी व कार्तिकी एकादशीला दिंडी काढली जाते. यात तालवादकांच्या सभोवती तालावर पावले टाकून मार्गक्रमणा केली जाते
काला: श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रसंग काल्याचा माध्यमातून सादर केले जातात। यामध्ये मातीचे मडके वापरले जाते. हे मडके म्हणजे सर्जनशक्तीचे प्रतीक आहे. ठोके व तालावर हा नृत्यप्रकार सादर केला जातो

No comments: