आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Tuesday 11 February 2014

लाभकारी लिंबू

लाभकारी लिंबू 

            लिंबू हे निसर्गाने मनुष्याला दिलेल्या अनुपम 
देणग्यांपैकी एक आहे . लिंबा मध्ये असलेल्या औषधीगुणांचा लाभ पुढील प्रकारे घेता येईल . 
  • दोन लिंबांचा रस सकाळी शौचा नंतर 250 मिली पाण्या बरोबर पिण्याने मलावरोधाची तक्रार दूर होते .
  • मीठ , ओवा ,जिरे आणि साखर दोन ग्रॅम बारीक वाटून त्यात थोडा लिंबाचा रस मिसळून खाण्याने पोटदुखी मध्ये तात्काळ फायदा होतो.
  • थोडीशी लवंग वाटून त्यात लिंबाचा रस मिसळून दातांना लावण्याने दातदुखी बरी होते .यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा मिसळल्यास  दातांना  अधिक फायदा होतो .
  • एक लिंबू कापून घ्यावे , त्यावर चार ग्रॅम कात टाकून , लिंबावर शिडकारून  रात्री छतावर ठेवावे .सकाळी दोन्ही फोडी चोखाव्यात, याने रक्ती मुळव्याधी मध्ये फायदा होतो .ही प्रक्रिया पाच दिवस नियमित करावी .मुळव्याध बरी होते .
  • एका लिंबाचा रस 250 मिली पाण्यात मिसळून रिकाम्या पोटी प्यावे . असे जवळजवळ दोन महिने नियमित पिण्याने लठ्ठ्पणा कमी होतो .
  • लिंबाच्या रसाचे दोन थेंब कानामध्ये टाकल्याने डोकेदुखी दूर होते . 

No comments: