आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Thursday, 13 February 2014

प्रकल्प व उपक्रम

विद्यार्थ्यांना करता येतील असे सहज सोपे प्रकल्प आणि उपक्रम ..........


१. प्राण्यांची चित्रे मिळवा . पाळीव प्राणी व जंगली प्राणी यांची चित्रे वेगवेगळी करा . ती चिकट वहीत चिकटवा .

२ .निसर्ग वर्णन पर पाच कविता म्हणून घ्याव्या . विद्यार्थ्यांना माहित असलेल्या कविता वर्गात म्हणायला       सांगाव्या.

३ .टाकाऊ वस्तूंपासून वेगवेगळ्या आकारांच्या पणत्या तयार करा व वर्गात प्रदर्शन भरावा .

४.पक्ष्यांची चित्रे जमवा .वर्गात प्रदर्शन भरवा .

५.विविध प्रकारच्या पक्ष्यांचे निरीक्षण करा वर्गात माहिती सांगा  .

६. पावशा पक्षाचे चित्र आणि माहिती मिळवा व लिहा .

७ . कुंडीत बी लावा व त्याचे निरीक्षण करा .

८ .संतांची चित्रे मिळवा व चिकट वहीत चिकटवा . चित्राखाली नावे लिहा .

९ .तुमचे आईवडील तुमच्यासाठी काय काय करतात ते सांगा .

१०. घरच्यांच्या परवानगीने विविध बिलांचा संग्रह करा . तो वर्गात दाखवा .

११ .पावसाळ्यातील दृश्यांची चित्रे जमवा . ती वर्गात सर्वाना दाखवा .चित्रांचे वर्णन करा .

१२ .पावसाच्या गाण्यांचा संग्रह करा . गाणी तालासुरात ,साभिनय म्हणून दाखवा .

१३. प्राणी ,पक्षी ,झाडे ,फुले,फळे यांच्या नावांपासून तयार होण्याऱ्या गावांची नावे लिहा.
       जसे - म्हैस -म्हैसगाव , बोर - बोरगाव .

१४ .तुम्हाला माहित असलेल्या वेगवेगळ्या वाद्यांची यादी करा व चित्रे जमवा .

१५. पवनचक्कीचे चित्र काढा व रंगवा .

१६.कागदाचे भिरभिरे तयार करा .

१७.फुलांची नावे सांगा.

  • खूप पाकळ्या असणारी 
  • पाच पाकळ्या असणारी 
  • वास येणारी 
  • पांढऱ्या रंगाची .
१८ .तुमच्या परिसरात कोणकोणत्या प्रकारची फुले आहेत ? त्यांची नावे व विशेष सांगा .

१९.कविता वाचून कल्पनेने या कवितेचे चित्र काढा .

२० .सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करा .त्यांचे जन्मगाव नायगाव (ता.खंडाला , जि.सातारा ) येथील            स्मारकाविषयी  माहिती मिळवा .

२१ .तुमच्या आईला, आजीला तिच्या काळातील शाळा , शिक्षण यांविषयी माहिती विचारा , चर्चा करा व वर्गात       सांगा . 

२२. या वर्षाची दिनदर्शिका पाहून कोणत्याही एका महिन्यातील दिनविशेषांची यादी तयार करा .
   
२३ . तुमचा वाढदिवस कोणत्या महिन्यात येतो ,त्याचे नाव लिहून त्या महिन्यात कोणकोणते  सन -उत्सव            साजरे केले जातात ते लिहा .

२४. तुमच्या परिसरातील शेतकऱ्यांशी गप्पा मारा. त्यांना शेतातील कामांविषयी , पिकांविषयी माहिती                 विचारा.

२५ .शेतीच्या अवजारांची चित्रे मिळवा किवा काढा .वहीत चिकटवा .त्यांचे उपयोग लिहा .

२६. विविध धान्यांचा संग्रह करा.

२७.तुमच्या परिसरात वाचल्या जाणाऱ्या वर्तमानपत्रांची नावे माहित करून घ्या.व लिहा .

२८. तुमच्या शाळेत 'प्रजासत्ताक दिन' कसा  साजरा केला याविषयी माहिती सांगा .

२९. तुमच्या परिसरात घडलेली एखादी घटना वर्गात सांगा .

३०. वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बोध् कथांची कात्रणे काढून त्यांचा संग्रह करा .

३१.वर्तमानपत्रांतील शालेय उपक्रमांविषयीच्या बातम्यांची कात्रणे जमवा . ती चिकट वहीत चिकटवा .

३२.वर्गातील मुलामुलींना वेगवेगळ्या फुलांच्या नावांच्या पाट्या हातात धरायला द्याव्या .एका मुलाला                  फुलपाखरू बनवावे . तो पंखांसारखी हालचाल करत वेगवेगळ्या फुलांजवळ जाईल .शिक्षकांनी                        त्याचवेळी प्रश्न विचारावा -फुलपाखरू आता कोणत्या फुलाजवळ आहे?  

३३.तुम्ही सर्व फुलपाखरे झाला आहात, अशी कल्पना करून हालचाली करा.एकमेकांशी गप्पा मारा .

३४. तुमच्या परिसरातील फुलांचे रंग ,आकार पहा . फुलांवर बसलेली फुलपाखरे दुरून पहा .

३५. पावसाळ्यात येणारी रानफुले पहा व त्यांची चित्रे काढा .

३६.'देशभक्तीपर गीते' वर्गात साभिनय सादर करा .

३७. विविध प्रसंगांसाठी भेटकार्डे तयार करा . त्यांचे वर्गात प्रदर्शन भरवा .

३८. तुमच्या कुटुंबातील सर्वांच्या वाढदिवसाच्या तारखा वहीत लिहा . तुम्ही तुमच्या घरात वाढदिवस कसे             साजरे करता ते सांगा .

३९ .तुमच्या शाळेत घडणाऱ्या महत्वाच्या घटना , मित्रमैत्रिणींचे वाढदिवस यांची नोंद दिनदर्शिकेत पाहून               दिनांक ,महिना या पद्धतीने नोंदवहीत करा .
      उदा. सरिताचा वाढदिवस -दिनांक-१७-,महिना-जून .

४०.शाळेचा परिसर गटागटाने स्वच्छ करा .

४१.आपल्या परिसरात स्वच्छता ठेवणाऱ्या व्यवस्थेची माहिती मिळवा. वर्गात सांगा .

४२. परिसर स्वच्छ करणाऱ्या व्यक्तीला भेटा .तिच्याशी बोला .मिळालेली माहिती वर्गात सांगा .

४३.तुमच्या शाळेतील संगणक कक्षाला भेट द्या .संगणक पहा.शिक्षकांकडून त्यांची माहिती मिळवा .संगणक       वापरून पहा .

४४. संगणकाची प्रतिकृती बनवा .कळफलकावर सराव करा .

४५.'कोणास ठाऊक कसा ,शाळेत गेला ससा' यासारखी गीते वर्गात म्हणा .

४६. पक्ष्यांच्या चित्रांचा संग्रह करून चिकटवहीत चिकटवा . त्यांची नावे लिहा .

४७. बिरबल ,तेनालीराम यांच्या चातुर्यकथा मिळवून वाचा

४८. खालीलपैकी तुम्हाला आवडणारे चित्र काढा .व रंगवा .

  • एक मुलगी चंद्रावरच्या घरात राहते .
  • इंद्रधनुष्याच्या झोपल्यावर बसून एक मुलगा झोका घेतो .
  • तुमच्या वर्गातल्या चारजणांना पंख फुटले आणि ते उडू लागले . 
४९. तुमच्या परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण स्थळांना भेटी द्या . त्यांची माहिती वर्गात सांगा .

५० .तुमच्या परिसरातील औषधी वनस्पतींची माहिती मिळवा .ती वर्गात, घरी सांगा.

५१. तुमच्या परिसरात विविध प्रसंगी गायल्या जाणाऱ्या गाण्यांचा संग्रह करा .

५२. तुम्ही शाळेच्या परिसरात झाडांची काळजी कशी घ्याल ,ते सांगा .




No comments: