आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Tuesday 11 February 2014

असे वाढवावे वजन

                            असे वाढवावे वजन 


वजन वाढविण्यासाठी घरच्या  घरी काही उपायांची योजना करता येईल .

  • सुक्या अंजिराचे तुकडे, पाण्यात भिजवून साल काढून सुकवलेले बदाम , बेदाणे ,गोडंबी ,खडीसाखर , वेलची ,केशर हे सर्व गायीच्या तुपात आठ दिवस भिजत घालावे व रोज सकाळी घेत जावे .यामुळे धातूवृद्धी होते .शरीर धातू पुष्ट होतात . शक्ती भरून येण्यास मदत मिळते .
  • गर्भवती स्त्रीचे गरोदर पणात 10 ते 12 किलो वजन वाढणे अपेक्षित असते . काही कारणाने वजन वाढत नसल्यास अश्व गंधाच्या मुळ्यांचा काढा साखरेबरोबर देण्याचा उपयोग होतो .
  • उडदाच्या डाळीचे पीठ , गव्हाचे पीठ , तांदळाचे पीठ समभाग घेऊन भाजून घ्यावे .यात साजूक तूप ,खडीसाखर व थोडे पिंपळीचे चूर्ण टाकून लाडू करावेत .रोज एक लाडू खाऊन वरून दुध प्यायल्यास वजन वाढण्यास मदत मिळते .
  • कोहळा हासुद्धा पुष्टीकर व तरीही पचायला हलका असतो .त्यामुळे  कोहलेपाक किवा पेठा नियमित खाल्ल्याने कमी  वजन वाढण्यास मदत होते .  

No comments: