आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Friday, 21 December 2012

रिठा उपयुक्त बहुउद्देशीय वृक्ष

                रिठा उपयुक्त बहुउद्देशीय वृक्ष


रिठ्यापासून डिंक, औषधी, इमारती लाकूड, तेल इत्यादी घटक मिळतात. दिसण्यास सुंदर असलेला हा वृक्ष आता दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहे. या झाडाचे उपयोग पाहता रिठ्याच्या लागवडीकडे लक्ष द्यावे.

दक्षिण भारतात रिठा या झाडाची फळे साबणाऐवजी वापरतात, म्हणून इंग्रजीत या प्रजातीस "सोप नट ट्री ऑफ साऊथ इंडिया' या नावाने ओळखले जाते. दिसण्यास देखणा असलेला हा वृक्ष वनस्पती विश्‍वात "सॅपन्डस्‌ इमॅरजीनॅटस' या नावाने ओळखला जातो. ही प्रजाती मुख्यत्वे करून दक्षिण भारतात आढळते. मध्य प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक इत्यादी ठिकाणी या प्रजातीची मुद्दामहून लागवड केलेली आहे.
"सॅपन्डस्‌ मुकोरॉशी' ही प्रजाती हिमालयापासून आसामपर्यंत आढळते. हा वृक्ष 20 ते 30 फुटांपर्यंत वाढतो. पाने संयुक्त, दोन-तीन पर्णदले असलेली असतात. फुले पांढरट, चार ते पाच पाकळ्या असलेली असतात. फळे पिकल्यानंतर पिवळसर हिरवी होतात. फळांमध्ये दोन-तीन कप्पे आणि त्यात एक काळ्या रंगाची, गुळगुळीत, वाटाण्याच्या आकाराची कठीण बी असते. या वनस्पतीला फुले ऑक्‍टोबर - डिसेंबर या कालावधीत येतात.

रोपेनिर्मिती आणि लागवड :
जानेवारीपासून या वनस्पतीची परिपक्व फळे मिळण्यास सुरवात होते. निरोगी झाडांची फळे गोळा करून बियांवरील आवरण काढून घ्यावे. साधारणतः एका किलोमध्ये 77 ते 84 बिया असतात. बियाणे स्वच्छ करून सावलीत चांगले सुकवावे. गोणपाटात किंवा कापडी पिशवीत दोन वर्षांपर्यंत बियाणे टिकते. रोपेनिर्मितीसाठी बीजप्रक्रिया करणे गरजेचे असते. बियाणे उकळत्या पाण्यात पाच मिनिटे टाकून त्यानंतर 24 तास कोमट पाण्यात ठेवावे. 50 ते 80 टक्के बियाणे उगवते. बियाणे उगवण्यासाठी 21 ते 90 दिवस लागतात. बियाणे पिशवीत पेरण्यापूर्वी पिशवीत माती, वाळू, शेणखत 2ः1ः1 या प्रमाणात मिसळून भरावे. रोपे चार महिन्यांत एक ते दोन फुटांची होतात. या वनस्पतीची लागवड हलक्‍या, मध्यम, भारी निचऱ्याच्या जमिनीत करता येते. लागवड 7 स 7 मीटर अंतराने 2 2 2 फूट आकाराचे खड्डे घेऊन केली जाते. लागवडीनंतर झाडाजवळील परिसर तणमुक्त ठेवणे आवश्‍यक असते. गरजेनुसार खते, पाणी यांचे व्यवस्थापन करावे. लागवडीनंतर चार ते पाच वर्षांत झाडास फळे येण्यास सुरवात होते.

No comments: