आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Monday, 17 February 2014

महाराष्ट्राची नृत्यकला


                 महाराष्ट्राला समृद्ध आणि सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. ही संस्कृती व परंपरांची भूमी आहे त्याचप्रमाणे सामाजिक करमणुकीसाठी महाराष्ट्रात सणांना फार महत्त्व आहे. असे धार्मिक सण वा अन्य ठिकाणी सादर केल्या जाणार्या लोकनृत्यातून महाराष्ट्राची सांस्कृतिक श्रीमंती प्रतीत आहे.
नृत्यकला - मानवी भावभावना प्रकट करण्याचे नृत्य हे एक प्रभावी माध्यम आहे. लोकनृत्यातून त्या-त्या समाजाची संस्कृती, राहणीमान, विचारसरणी प्रकट होते. महाराष्ट्रातील नृत्यांचे विविध प्रकार पुढील प्रमाणे:
लावणी नृत्य: पारंपारिक नृत्य व गायनाचा लवाणिनृत्य हा संगम आहे. लावणी नृत्य 'ढोलकी' या वद्याच्या ठोकयांच्या सहायाने सादर केले जाते. लावणी नृत्य मुख्यत: स्त्रिया सादर करतात. हे नृत्य सादर करताना पारंपारिक प्रकारचे कपडे वापरले जातात. 'लावणी' हा शब्द 'लावण्य' या शब्दापासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ सौंदर्य असा आहे. सुरुवातीस लावणीतून सामाजिक, धार्मिक, राजकीय विषय मांडले जात. १८ व्या आणि १९ व्या शतकामध्ये मराठ्यांच्या युद्धवेळी लावणी, सैनिकांसाठी मनोरंजनाचे साधन म्हणून वापरली गेली
पोवाडा: महाराष्ट्रातील इतिहासाची जाणीव सर्वांना करुण देण्याचे प्रभावी साधन म्हणजे पोवाडा होय. पोवाडा हा मुख्यत: गायनाचा प्रकार आहे. पोवाडयातून डफाच्या तालावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शुरपणाचे किस्से सांगितले जातात
कोळी नृत्य: कोळी नृत्य हा महाराष्ट्राचा वैशिष्ठ्यपूर्ण असा लोकनृत्याचा प्रकार आहे. 'कोळी' म्हणजे मासेमारी करणार्या समाजाचे नृत्य म्हणून या पप्रकारास कोळी नृत्य असे म्हटले जाते. हा समाज त्यांची वेगळी-आगळी ओळख व रंगतदार नृत्यांसाठी प्रसिद्ध आहे. या नृत्यांमध्ये प्रामुख्याने मासेमारांच्या दैनंदिन जीवनातील प्रसंगांचा समावेश असतो. कोळी नृत्य स्त्रिया व पुरुष दोघा-दोघांच्या समूहाने करतात. हे नृत्य करताना रंगीत पोशाख वापरले जातात
धनगरी गाजा: सोलापुर जिल्ह्यातील धनगर समाजातील लोक हा नृत्यप्रकार सादर करतात. धनगर मेंढया बकरे पाळून आपला चरितार्थ चलावतात. त्यांची गाणी ही आजूबाजूच्या झाडांपासून प्रेऱणा घेऊन तयार होतात. ही गाणी 'ओवी' च्या स्वरुपात असतात.त्यांतून धनगरांचे दैवत 'बिरबा'च्या जन्माच्या कथा सांगितल्या जातात. बिरुबाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गाजा सादर केला जातो. यावेळी धोतर, अंगरखा, फेटा आणि एक रंगीत रुमाल असा पेहराव करतात. ढोल वाजवणार्यांच्या भोवती तालावर पावले टाकत हे नृत्य केले जाते
तमाशा: महाराष्ट्रातील सर्वत लोकप्रिय लोकनृत्याचा प्रकार म्हणजे तमाशा होय. 'तमाशा' हा पारशी शब्द असून त्याचा अर्थ आनंद किंवा करमणुकीचे मिश्रण आहे. तमाशाचा उदय १६ व्या शतकात झाला असे मानन्यात येते. लावणी ही तमाशाच्या केंद्रस्थानी असते. ढोलकी, तूणतुणे, मंजीरा, डफ, लेझिम, संवादिनी आणि घुंगरू ही वाद्ये तमाशात वापरली जातात
वाघ्या मुरळी: खंडोबा या देवाच्या आदरापित्यार्थ वाघ्या-मुरळीचे नृत्य सादर केले जाते. वाघ्या म्हणजे पुरुष तर मुरळी ही स्त्री असते. खंडोबाच्या कुत्र्यांचे प्रतीक म्हणून ही पात्रे वापरली जातात. कोणत्याही धार्मिक उत्सवात वाघ्या मुरळीचे नृत्य सादर करण्यात येते
दिंडी: दिंडी हा महाराष्ट्रातील धार्मिक लोकनृत्याचा प्रकार आहे. अषाढ़ी व कार्तिकी एकादशीला दिंडी काढली जाते. यात तालवादकांच्या सभोवती तालावर पावले टाकून मार्गक्रमणा केली जाते
काला: श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रसंग काल्याचा माध्यमातून सादर केले जातात। यामध्ये मातीचे मडके वापरले जाते. हे मडके म्हणजे सर्जनशक्तीचे प्रतीक आहे. ठोके व तालावर हा नृत्यप्रकार सादर केला जातो

शिव महिमा ( छत्रपती शिवाजी महाराज )


निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु ।
 अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥

 परोपकाराचिये राशी । उदंड घडती जयासी ।
 तयाचे गुणमहत्त्वासी । तुळणा कैची ॥

 यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
 नीतिवंत पुण्यवंत । जाणता राजा ॥

 आचारशीळ विचारशीळ । दानशीळ धर्मशीळ ।
 सर्वज्ञपणे सुशीळ । सकळां ठायी ॥

 नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।
 पुरंदर आणि शक्ती । पृष्ठभागीं ॥

 धीर उदार गंभीर । शूर क्रियेसि तत्पर ।
 सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥

 तीर्थेक्षेत्रे मोडिली । ब्राह्मणस्थाने भ्रष्ट जाली ।
 सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ॥

 देव-धर्म-गोब्राह्मण । करावया संरक्षण ।
 हृदयस्थ जाला नारायण । प्रेरणा केली ॥

 उदंड पंडित पुराणिक । कवीश्वर याज्ञिक वैदिक ।
 धूर्त तार्किक सभानायक । तुमच्या ठायी ॥

 या भूमंडळाचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
 महाराष्ट्रधर्म राहिला काही । तुम्हां कारणे ॥

 आणिकही धर्मकृत्ये चालती । आश्रित होऊन कित्येक राहती ।
 धन्य धन्य तुमची कीर्ती । विश्वीं विस्तारिली ॥

 कित्येक दुष्ट संहारिले । कित्येकांसी धाक सुटले ।
 कित्येकांस आश्रय जाले । शिवकल्याण राजा ॥

 तुमचे देशी वास्तव्य केले । परंतु वर्तमान नाही घेतले ।
 ऋणानुबंधे विस्मरण जाले । काय नेणो ॥

 सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती । सांगणे काय तुम्हाप्रती ।
 धर्मसंस्थापनेची कीर्ती । सांभाळिली पाहिजे ॥

 उदंड राजकारण तटले । तेणे चित्त विभागले ।
 प्रसंग नसता लिहिले । क्षमा केली पाहिजे ॥

अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र

प्रिय गुरुजी,

सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात,
नसतात सगळीच सत्यनिष्ठ,
हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी.
मात्र त्याला हे देखील शिकवा,
जगात प्रत्येक बदमाशागणिक
असतो एक साधूचरित , पुरुषोत्तमही
स्वार्थी राजकारणी असतात जगात,
तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही.
असतात टपलेले वैरी , तसे जपणारे मित्रही,
मला माहित आहे !
सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत.........
तरीही जमलं तर त्यांच्या मनावर ठसवा,
घाम गाळून कमावलेला एकच छदाम,
आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे.
हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा
आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला ,
तुमच्यात शक्ती असती तर .........
त्याला द्वेष मत्सरापासून दूर रहायला शिकवा
आणि शिकवा त्याला आपला हर्ष संयमाने व्यक्त करायला.
गुंडांना भीत जावू नको म्हणावं,
त्यांना नमविणे सर्वात सोपं असतं.
जमेल तेवढं दाखवित चला त्याला ,
ग्रंथ भांडाराच अदभूत वैभव.
मात्र त्याबरोबरच ,
मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा,
सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला ,
पाहू दे त्याला , पक्षांची अस्मान भरारी ............
सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर ..........
आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं......
शाळेत त्याला हा धडा मिळू दे ,
फसवून मिळालेल्या यशापेक्षा ,
सरळ आलेल अपयश श्रेयस्कर आहे .
आपल्या कल्पना, आपले विचार ,
यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्याने ,
बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी ,
त्याला सांगा ................
भल्याशी भलायीन वागावं,
आणि टग्यांना अद्दल घडवावी .
माझ्या मुलाला हे पटवता आल तर पहा .........
जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगर्दीत,
सामील न होण्याची ताकद त्यान कमवायला हवी ,
पुढे हेही सांगा त्याला ,
ऐकावं जनाच अगदी सर्वांच ...........
पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून ,
आणि फोलपट टाकून निव्वळ सत्व तेवढं स्वीकाराव.
जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा,
हसत रहावं उरातल दुख्ख दाबून ,
आणि म्हणावं त्याला
आसवांची लाज वाटू देऊ नको.
त्याला शिकवा .........
तुच्छतावाद्याना तुच्छ मानायला ,
अन चाटुगिरीपासून सावध रहायला .
त्याला हे पुरेपूर समजवा की ,
करावी कमाल कमाई त्याने, ताकद आणि अक्कल विकून,
पण कधीही विक्रय करू नये, हृदयाचा आणि आत्म्याचा.
धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर,
कानाडोळा करायला शिकवा त्याला.
आणि ठसवा त्याच्या मनावर,
जे सत्य आणि न्याय वाटते,
त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.
त्याला ममतेन वागवा,
पण, लाडावून ठेवू नका.
आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय
लोखंडाच कणखर पोलाद होत नसतं,
त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य,
अन धरला पाहिजे धीर त्याने,
जर गाजवायच असेल शौर्य .
आणखीही एक सांगत रहा त्याला ..........
आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर,
तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर,
माफ करा गुरुजी,
मी फार बोललो आहे _
खूप काही मागतो आहे.........
पण पहा........
जमेल तेवढ अवश्य कराच,
माझा मुलगा, भलताच गोड छोकरा आहे हो तो.

अब्राहम लिंकन

Thursday, 13 February 2014

प्रकल्प व उपक्रम

विद्यार्थ्यांना करता येतील असे सहज सोपे प्रकल्प आणि उपक्रम ..........


१. प्राण्यांची चित्रे मिळवा . पाळीव प्राणी व जंगली प्राणी यांची चित्रे वेगवेगळी करा . ती चिकट वहीत चिकटवा .

२ .निसर्ग वर्णन पर पाच कविता म्हणून घ्याव्या . विद्यार्थ्यांना माहित असलेल्या कविता वर्गात म्हणायला       सांगाव्या.

३ .टाकाऊ वस्तूंपासून वेगवेगळ्या आकारांच्या पणत्या तयार करा व वर्गात प्रदर्शन भरावा .

४.पक्ष्यांची चित्रे जमवा .वर्गात प्रदर्शन भरवा .

५.विविध प्रकारच्या पक्ष्यांचे निरीक्षण करा वर्गात माहिती सांगा  .

६. पावशा पक्षाचे चित्र आणि माहिती मिळवा व लिहा .

७ . कुंडीत बी लावा व त्याचे निरीक्षण करा .

८ .संतांची चित्रे मिळवा व चिकट वहीत चिकटवा . चित्राखाली नावे लिहा .

९ .तुमचे आईवडील तुमच्यासाठी काय काय करतात ते सांगा .

१०. घरच्यांच्या परवानगीने विविध बिलांचा संग्रह करा . तो वर्गात दाखवा .

११ .पावसाळ्यातील दृश्यांची चित्रे जमवा . ती वर्गात सर्वाना दाखवा .चित्रांचे वर्णन करा .

१२ .पावसाच्या गाण्यांचा संग्रह करा . गाणी तालासुरात ,साभिनय म्हणून दाखवा .

१३. प्राणी ,पक्षी ,झाडे ,फुले,फळे यांच्या नावांपासून तयार होण्याऱ्या गावांची नावे लिहा.
       जसे - म्हैस -म्हैसगाव , बोर - बोरगाव .

१४ .तुम्हाला माहित असलेल्या वेगवेगळ्या वाद्यांची यादी करा व चित्रे जमवा .

१५. पवनचक्कीचे चित्र काढा व रंगवा .

१६.कागदाचे भिरभिरे तयार करा .

१७.फुलांची नावे सांगा.

  • खूप पाकळ्या असणारी 
  • पाच पाकळ्या असणारी 
  • वास येणारी 
  • पांढऱ्या रंगाची .
१८ .तुमच्या परिसरात कोणकोणत्या प्रकारची फुले आहेत ? त्यांची नावे व विशेष सांगा .

१९.कविता वाचून कल्पनेने या कवितेचे चित्र काढा .

२० .सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करा .त्यांचे जन्मगाव नायगाव (ता.खंडाला , जि.सातारा ) येथील            स्मारकाविषयी  माहिती मिळवा .

२१ .तुमच्या आईला, आजीला तिच्या काळातील शाळा , शिक्षण यांविषयी माहिती विचारा , चर्चा करा व वर्गात       सांगा . 

२२. या वर्षाची दिनदर्शिका पाहून कोणत्याही एका महिन्यातील दिनविशेषांची यादी तयार करा .
   
२३ . तुमचा वाढदिवस कोणत्या महिन्यात येतो ,त्याचे नाव लिहून त्या महिन्यात कोणकोणते  सन -उत्सव            साजरे केले जातात ते लिहा .

२४. तुमच्या परिसरातील शेतकऱ्यांशी गप्पा मारा. त्यांना शेतातील कामांविषयी , पिकांविषयी माहिती                 विचारा.

२५ .शेतीच्या अवजारांची चित्रे मिळवा किवा काढा .वहीत चिकटवा .त्यांचे उपयोग लिहा .

२६. विविध धान्यांचा संग्रह करा.

२७.तुमच्या परिसरात वाचल्या जाणाऱ्या वर्तमानपत्रांची नावे माहित करून घ्या.व लिहा .

२८. तुमच्या शाळेत 'प्रजासत्ताक दिन' कसा  साजरा केला याविषयी माहिती सांगा .

२९. तुमच्या परिसरात घडलेली एखादी घटना वर्गात सांगा .

३०. वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बोध् कथांची कात्रणे काढून त्यांचा संग्रह करा .

३१.वर्तमानपत्रांतील शालेय उपक्रमांविषयीच्या बातम्यांची कात्रणे जमवा . ती चिकट वहीत चिकटवा .

३२.वर्गातील मुलामुलींना वेगवेगळ्या फुलांच्या नावांच्या पाट्या हातात धरायला द्याव्या .एका मुलाला                  फुलपाखरू बनवावे . तो पंखांसारखी हालचाल करत वेगवेगळ्या फुलांजवळ जाईल .शिक्षकांनी                        त्याचवेळी प्रश्न विचारावा -फुलपाखरू आता कोणत्या फुलाजवळ आहे?  

३३.तुम्ही सर्व फुलपाखरे झाला आहात, अशी कल्पना करून हालचाली करा.एकमेकांशी गप्पा मारा .

३४. तुमच्या परिसरातील फुलांचे रंग ,आकार पहा . फुलांवर बसलेली फुलपाखरे दुरून पहा .

३५. पावसाळ्यात येणारी रानफुले पहा व त्यांची चित्रे काढा .

३६.'देशभक्तीपर गीते' वर्गात साभिनय सादर करा .

३७. विविध प्रसंगांसाठी भेटकार्डे तयार करा . त्यांचे वर्गात प्रदर्शन भरवा .

३८. तुमच्या कुटुंबातील सर्वांच्या वाढदिवसाच्या तारखा वहीत लिहा . तुम्ही तुमच्या घरात वाढदिवस कसे             साजरे करता ते सांगा .

३९ .तुमच्या शाळेत घडणाऱ्या महत्वाच्या घटना , मित्रमैत्रिणींचे वाढदिवस यांची नोंद दिनदर्शिकेत पाहून               दिनांक ,महिना या पद्धतीने नोंदवहीत करा .
      उदा. सरिताचा वाढदिवस -दिनांक-१७-,महिना-जून .

४०.शाळेचा परिसर गटागटाने स्वच्छ करा .

४१.आपल्या परिसरात स्वच्छता ठेवणाऱ्या व्यवस्थेची माहिती मिळवा. वर्गात सांगा .

४२. परिसर स्वच्छ करणाऱ्या व्यक्तीला भेटा .तिच्याशी बोला .मिळालेली माहिती वर्गात सांगा .

४३.तुमच्या शाळेतील संगणक कक्षाला भेट द्या .संगणक पहा.शिक्षकांकडून त्यांची माहिती मिळवा .संगणक       वापरून पहा .

४४. संगणकाची प्रतिकृती बनवा .कळफलकावर सराव करा .

४५.'कोणास ठाऊक कसा ,शाळेत गेला ससा' यासारखी गीते वर्गात म्हणा .

४६. पक्ष्यांच्या चित्रांचा संग्रह करून चिकटवहीत चिकटवा . त्यांची नावे लिहा .

४७. बिरबल ,तेनालीराम यांच्या चातुर्यकथा मिळवून वाचा

४८. खालीलपैकी तुम्हाला आवडणारे चित्र काढा .व रंगवा .

  • एक मुलगी चंद्रावरच्या घरात राहते .
  • इंद्रधनुष्याच्या झोपल्यावर बसून एक मुलगा झोका घेतो .
  • तुमच्या वर्गातल्या चारजणांना पंख फुटले आणि ते उडू लागले . 
४९. तुमच्या परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण स्थळांना भेटी द्या . त्यांची माहिती वर्गात सांगा .

५० .तुमच्या परिसरातील औषधी वनस्पतींची माहिती मिळवा .ती वर्गात, घरी सांगा.

५१. तुमच्या परिसरात विविध प्रसंगी गायल्या जाणाऱ्या गाण्यांचा संग्रह करा .

५२. तुम्ही शाळेच्या परिसरात झाडांची काळजी कशी घ्याल ,ते सांगा .




Wednesday, 12 February 2014

इंद्रधनुष्य

                                                                इंद्रधनुष्य

           इंद्रधनुष्य म्हणजे पृथ्वीच्या वातावरणातील बाष्पकणांवर / दवबिंदूंवर पडलेल्या सूर्यप्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन होऊन प्रकाशाचा वर्णपट दिसण्याची वातावरणीय, प्रकाशीय घटना आहे. हा वर्णपट धनुष्याकृतीप्रमाणे दिसतो. या वर्णपटात बाहेरील कडेस तांबडा व आतील कडेस जांभळा रंग दिसतो.

क्वचित प्रसंगी मुख्य इंद्रधनुष्याबाहेर पसरलेले, फिक्या रंगांतील व मुख्य इंद्रधनुष्याच्या वर्णपटाच्या उलट्या क्रमाने रंग दाखवणारे (जांभळा बाहेरील कडेस व तांबडा आतील कडेस असणारे) दुय्यम इंद्रधनुष्यही दिसते.

                                    पाहणाऱ्याच्या पाठीशी सूर्य क्षितिजापासून फार उंच नसेल, तर सकाळी पश्चिमेस व संध्याकाळी पूर्वेस पाऊस पडत असताना, आकाशात जे विविधरंगी वर्तुळखंड दिसते त्यास इंद्रधनुष्य म्हणतात. सूर्याकडे पाठ करून तोंडाने पाण्याचा फवारा उडविला असता, तसेच धबधब्याच्या ठिकाणी उडणाऱ्या तुषारांमुळेही इंद्रधनुष्य दिसते. चंद्रप्रकाशामुळेही इंद्रधनुष्याचा आविष्कार दिसून शकतो.



इंद्रधनुष्ये अनेक प्रकारची असतात. ही सूर्य व निरीक्षकाचा डोळा यांना जोडणाऱ्या रेषेवर मध्यबिंदू (या बिंदूस 'प्रतिसौर बिंदू' म्हणतात) असणाऱ्या सममध्य वर्तुळांच्या खंडांच्या रूपात दिसतात. बहुतेक वेळा एकच इंद्रधनुष्य दिसते. या इंद्रधनुष्याच्या तांबड्या रंगाच्या वर्तुळाची कोनीय त्रिज्या (वर्तुळाचा मध्य व निरीक्षकाचा डोळा यांना जोडणारी रेषा आणि निरीक्षकाचा डोळा व वर्तुळाच्या परिघावरील कोणताही बिंदू यांना जोडणारी रेषा यांमधील कोन) सु. ४२० असून यात तांबडा रंग बाहेरच्या बाजूस व आतील बाजूस क्रमाने नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, गडद निळा व जांभळा हे रंग दिसतात. याला 'प्राथमिक इंद्रधनुष्य' म्हणतात. काही वेळा या इंद्रधनुष्याच्या वरच्या बाजूंस दुसरे इंद्रधनुष्य दिसते, परंतु हे प्राथमिक इंद्रधनुष्यापेक्षा फिकट असून दुसरे इंद्रधनुष्य दिसते, परंतु हे प्राथमिक इंद्रधनुष्यापेक्षा फिकट असून यात रंगांचा क्रम उलटा, म्हणजे बाहेरच्या बाजूस जांभळा व आतल्या बाजूस तांबडा असा असतो. याच्या बाहेरच्या वर्तुळाची कोनीय त्रिज्या सु. ५४० असते. याला 'दुय्यम इंद्रधनुष्य' म्हणतात. प्राथमिक इंद्रधनुष्याच्या आतील व दुय्यम इंद्रधनुष्याच्या बाहेरच्या कडांजवळपासचे आकाश इतर भागापेक्षा पुष्कळच उजळ दिसते व दोन इंद्रधनुष्यांमधील आकाश काळसर दिसते. कोनीय द्दष्ट्या सूर्य जेवढा क्षितिजावर असतो, तेवढाच क्षितिजाखाली इंद्रधनुष्याच्या मध्यबिंदू असतो. त्यामुळे सर्वसामान्यपणे इंद्रधनुष्य पूर्ण अर्धवर्तुळरूपात न दिसता कमी दिसते. कित्येक वेळा समुद्रावर पाऊस पडत असताना समुद्राच्या पृष्ठावरून परावर्तित झालेल्या सूर्यप्रकाशाने इंद्रधनुष्य तयार होते. या इंद्रधनुष्याचा मध्यबिंदू क्षितिजाच्या वर असतो. एरवी इंद्रधनुष्य अर्धवर्तुळापेक्षा लहान दिसत असले, तरी उंच टेकडीवर उभे राहून जवळपास पडणाऱ्या पावसाकडे पाहिले असता पूर्ण वर्तुळाकार इंद्रधनुष्यही दिसू शकते.



क्वचित प्रसंगी प्राथमिक इंद्रधनुष्याच्या आतील बाजूस (व दुय्यम इंद्रधनुष्याच्या बाहेरील बाजूस) एक किंवा दोन फिकट इंद्रधनुष्ये दिसतात. त्यांना 'अधिसंख्या इंद्रधनुष्ये' (नेहमीच्या संख्येपेक्षा जास्त आढळणारी इंद्रधनुष्ये) म्हणतात. ही इंद्रधनुष्ये तयार होणे सर्वस्वी पाण्याच्या थेंबांच्या आकारावर अवलंबून असल्यामुळे तेजस्विता, आकार इत्यादींबाबतीत त्यांच्यात खूप फरक आढळतो. ही इंद्रधनुष्ये प्राथमिक इंद्रधनुष्याच्या लगतच तयार होत असल्यामुळे, त्यांचे प्राथमिक इंद्रधनुष्यातील अध्यारोपण होऊन (एकावर दुसरे पडून) प्राथमिक इंद्रधनुष्यातील कोणत्याही एखाद्या रंगाचा पट्टा रुंद होतो किंवा नाहीसा होतो. यामुळे तेजस्विता, रंगाची शुद्धता, त्यांची रुंदी इत्यादींबाबतीत प्राथमिक इंद्रधनुष्यात मोठे फरक निर्माण होतात.



प्राथमिक व दुय्यम इंद्रधनुष्यांसंबंधी अचूक स्पष्टीकरण प्रथमतः डॉमीनीस व देकार्त यांनी केले. सूर्यप्रकाश पारदर्शक पदार्थात शिरला असता, सूर्यप्रकाशातील घटक रंगांची प्रणमनशीलता (हवेपेक्षा भिन्न माध्यमात निरनिराळ्या दिशांनी जाण्याची क्षमता) भिन्नभिन्न असल्यामुळे, त्याची सप्तरंगात विभागणी होते, हे न्यूटन यांनी सिद्ध केल्यावर इंद्रधनुष्यातीन रंगांसंबंधीची कारणमीमांसा देता आली.



पाण्याच्या थेंबावर प्रकाशकिरण पडला म्हणजे तो आत शिरतेवेळी त्याचे प्रणमन (किरणाचे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात दिशा बदलून जाणे) होते. थेंबात गेलेला प्रकाशकिरण आत परावर्तित होतो [→ प्रकाशकी] व बाहेर पडतेवेळी त्याचे पुन्हा एकदा प्रणमन होते. या प्रणमन व

आ. १. पाण्याच्या थेंबातील परावर्तन : (अ) एक अंतर्गत परावर्तन, अ१ - देकार्त किरण; (आ) दोन अंतर्गत परावर्तने.

 परावर्तन क्रियांनी प्रकाशकिरणांचे आपाती दिशेपासून फार मोठ्या कोनातून अपगमन (हवेतून मूळ किरण वेगळ्या माध्यमातून बाहेर पडताना होणारा दिशाबदल) होऊन त्याची मार्गक्रमणाची दिशा जवळजवळ उलट होते (आ. १). अपगमन कोन हा आपाती कोन, एकूण होणारी अंतर्गत परावर्तने व थेंबातील पाण्याचा प्रणमनांक (प्रणमनक्रियेच्या व्याख्येनुसार येणारे गुणोत्तर) यांच्यावर अवलंबून असतो. आपाती कोनाच्या एका विशिष्ट मूल्यास अपगमन कोन लघुतम असतो. या आपाती कोनापेक्षा मोठा किंवा लहान कोन करून पडणारे सर्व प्रकाशकिरण लघुतम अपगमन कोनापेक्षा मोठ्या कोनातून वळतात. म्हणजे हे सर्व किरण लघुतम अपगमनाच्या एकाच बाजूस वळतात [असले दोन किरण आ. १ (अ) मध्ये तुटक रेषेने दाखविले आहेत]. प्रकाशकिरणाचे पाण्याच्या थेंबात एकदाच परावर्तन झाले असता तांबड्या रंगाचा अल्पतम अपगमन कोन सु. १३८० असतो. म्हणजे थेंबातून आलेला प्रकाशकिरण निरीक्षकाचा डोळा व सूर्य यांना जोडणाऱ्या रेषेशी सु. ४२० चा कोन करतो. लघुतम अपगमन किरणाच्या (याला 'देकार्त किरण' म्हणतात) एकाच बाजूस इतर सर्व किरण वळत असल्यामुळे देकार्त किरणाजवळ प्रकाशकिरणांची खूप गर्दी होते व त्या दिशेत निरीक्षकाला प्रकाशतीव्रता महत्तम दिसते.



निरीक्षकाचा डोळा शिरोबिंदू मानून, निरनिराळ्या थेंबांतून येणाऱ्या सर्व देकार्त किरणांचे ४२० व ४०० अर्ध-उदग्र कोन (शंकूच्या तिरकस

आ. २. प्राथमिक व दुय्यम इंद्रधनुष्यातील रंगांचा क्रम : (१) प्राथमिक जांभळा, (२) प्राथमिक तांबडा, (३) दुय्यम तांबडा, (४) दुय्यम जांभळा, (५) इंद्रधनुष्याचा अक्ष.

 बाजूंनी शिरोबिंदूपाशी केलेल्या कोनाच्या निम्मा कोन) असणारे एकात एक असे शंकू तयार होतात. निरी क्षकाला दिसणारे इंद्रधनुष्य म्हणजे या शंकूंच्या लंबछेदाचा वर्तूळ-परीघ होय. सूर्याची कोनीय उंची ४२० किंवा त्याहून अधिक असल्यास इंद्रधनुष्य दिसणार नाही. या विवेचनावरून प्राथमिक इंद्रधनुष्य कसे तयार होते हे ध्यानात येईल. याप्रमाणे दुय्यम इंद्रधनुष्यही तयार होते; फक्त या दुय्यम इंद्रधनुष्याच्या बाबतीत एकाऐवजी दोन अंतर्गत परावर्तने होत असल्यामुळे रंगांचा क्रम उलटा झालेला असतो. या इंद्रधनुष्याच्या बाहेरील किनारीची कोनीय त्रिज्या सु. ५४० असते. या दोन इंद्रधनुष्यांच्या मधल्या अवकाशात प्रकाशकिरण येण्यासाठी त्यांचे अपगमन देकार्त किरणापेक्षा कमी असावयास हवे, पण ते तसे होत नाही. या कारणामुळे प्राथमिक व दुय्यम इंद्रधनुष्यांमधल्या अवकाशात किरण येत नाहीत व तो भाग काळसर दिसतो. थेंबात प्रकाशकिरणांचे तीन किंवा चार वेळा परावर्तन होऊनही इंद्रधनुष्ये तयार होतात. परंतु जास्त परावर्तनांनी प्रकाशतीव्रता कमी झाल्यामुळे व ही इंद्रधनुष्ये सूर्याच्या पुष्कळच जवळ (सु. ५०० वर) असल्यामुळे, प्रखर सूर्यप्रकाशात ती पहाणे जवळजवळ अशक्यच होते. सूर्य पावसाने झाकला गेला म्हणजे ती सूर्याच्या दिशेतच पाहता येतात. आ. २ मध्ये प्राथमिक व दुय्यम इंद्रधनुष्यांच्या तांबड्या व जांभळ्या रंगाचे कोन दाखविलेले आहेत.



पाण्याच्या थेंबावर प्रकाशकिरण पडले असता त्यांचे विवर्तनही (पदार्थाच्या कडेवरून जाताना प्रकाशाच्या दिशेमध्ये होणारा बदल) होते. थेंबांचा आकार जसजसा लहान होत जाईल तसतसा विवर्तन प्रभाव महत्त्वाचा होतो. थेंबावर पडणाऱ्या किरणसमूहाचा थेंबातील मार्ग कमी जास्त होतो व त्यांचे व्यतिकरण (दोन किंवा अधिक प्रकाशतरंग मालिका एकमेकांवर येऊन पडल्यामुळे घडून येणारा आविष्कार) होऊन वेगवेगळ्या दिशेत महत्तम व अल्पतम प्रकाशतीव्रतेचा आकृतिबंध तयार होतो. या तीव्रतेचे प्राथमिक इंद्रधनुष्यावर अध्यारोपण होऊन त्यातील वैयक्तिक रंगाची तेजस्विता व रुंदी यांमध्ये फार फरक पडतो. थेंबांचा आकार ठराविक मर्यादेपेक्षा लहान झाला म्हणजे अधिसंख्या इंद्रधनुष्ये तयार होतात. थेंबांचा व्यास ०.१ मिमी. पेक्षा कमी झाला म्हणजे व्यतिकरण आकृतिबंधातील प्रकाशतीव्रता महत्तम होऊन प्राथमिक इंद्रधनुष्य विवर्ण होते. अशा तऱ्हेचे शुभ्र इंद्रधनुष्य विरल धुक्यातून सूर्यप्रकाशात दिसते. त्याला 'धवल धनुष्य' म्हणतात.



अधूनमधून इंद्रधनुष्यांचे काही दुर्मिळ प्रकार दृष्टीस पडतात. त्यांपैकी काहींचे स्पष्टीकरण अद्याप देता आलेले नाही. खऱ्या व अधिसंख्या या दोन्ही प्रकारच्या इंद्रधनुष्यांची संपूर्ण उपपत्ती मांडण्यात आली असून त्या उपपत्तीप्रमाणे प्राथमिक इंद्रधनुष्याची त्रिज्या लघुतम अपगमनावरून मिळणाऱ्या त्रिज्येपेक्षा थोडी कमी व दुय्यम इंद्रधनुष्याची त्रिज्या थोडी जास्त असावयास पाहिजे असे आढळले आहे.                                  इंद्रवज्र

          संपूर्ण गोलाकार इंद्रधनुष्याला इंद्रवज्र असे म्हणतात. इंद्रवज्र क्वचित आणि फक्त काही भौगोलिक ठिकाणीच दिसते. प्रत्येक इंद्रधनुष्य हा पूर्ण गोल "इंद्रवज्रच" असतो. पण क्षितिजामुळे आपल्याला तो अर्धगोल दिसतो. पावसाचे थेंब कसे , कुठल्या दिशेने, त्यातले अंतर आणि किती वेगात पडत आहेत यावर इंद्रधनुष्याचे पूर्ण गोलाकार दिसणे अवलंबून असते. इंद्रवज्राचे वैशिष्ट्य असे, की जो हे दृश्य पाहतो; तो स्वत:लाच त्यात पाहतो. पाहणा-याचे डोके बरोबर मध्यभागी दिसते