आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Wednesday 5 September 2012

माझा शाळेतील शिक्षक दिन

  माझ्या शाळेतील शिक्षक दिन 
        ज्यांच्या कार्याची महती सर्वांना नतमस्तक करते अशा डॉ .सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस 
म्हणजेच आजचा शिक्षक दिन .                                                                                                                               ज्यांनी आपल्या कार्याने शिक्षणाचे आणि ओघाने शिक्षकांचे महत्व समाजाला पटवून दिले  अशा आदर्श 
शिक्षकास माझे कोटी कोटी प्रणाम !! . 


         सकाळी घरातून निघालो तेव्हाच मनातील आनंद ओसंडून वहात होता . आज आपला हक्काचा दिवस हि 
एकच गोष्ट मनाला सुखाऊन जात होती . आपण केलेल्या वर्ष भरातील कामाची पावती मिळण्याचा हा दिवस आणि माझ्या शाळेतील माझे विद्यार्थी तो कसा साजरा करतात याचीच उत्सुकता जास्त होती . शाळेच्या पटांगणात पाऊल टाकतानाच दोन तीन विद्यार्थ्यांनी पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि मी भारावून गेलो . इतकी प्रेम करतात हि मुलं आपल्यावर , इतका जीव लावतात .जे पटांगणात साचलेल्या पाण्याची, स्वताचे कपडे खराब होतील याची जराही पर्वा न करता साष्टांग नमस्कार करायचा प्रयत्न करतात . मी त्यांना अडवलं म्हणून नाहीतर या मुलांनी कशाचीही तमा न बाळगता साष्टांग नमस्कार घातलाच असता .
          परिपाठाच्या तासिकेला शिक्षकदिनाचा कार्यक्रम ठेवला होता .विद्यार्थ्यांनी सुंदर शब्दात शिक्षका
 विषयी असलेला आदर व्यक्त केला . त्यांच्या प्रत्येक शब्दातून आम्हाला आमच्या  शिकवण्याच सार्थक झाल्यासारखं वाटत होत .आम्ही आमच्या शिक्षकान कडून हे चांगल शिकलो अस जेव्हा ते म्हणाले तेव्हा माझ्या डोळ्यात फक्त पाणी यायचं बाकी राहील होत .
 आम्हीही विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी पाठांची योजना केली होती .जेणेकरून आजचे विद्यार्थी उद्याचे शिक्षक बनतील आणि म्हणूनच शिकवण्याचा अनुभव आम्ही त्यांच्या शिदोरीत टाकला .विद्यार्थीही अगदी उत्साहाने त्यात सहभागी झाले . प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा शिकवण्याचा आनंद आम्हाला उद्याच्या दिवसाची सुरुवात नव्या उमेदीने करण्याची प्रेरणा देत होता .
         

1 comment:

Dhananjay Aditya said...

https://www.facebook.com/shikshakdin/
Let us celebrate 3 January (Birth Anniversary of Krantijyoti Savitribai Phule) as a Teachers' Day.