अमेरिकन अंतराळ संशोधन केंद्र अर्थात नासाचे सर्वात अनुभवी आणि जुने आंतराळ यान डिस्कव्हरी पृथ्वीवर सुखरूप परतले आहे. डिस्कव्हरी यानाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून सोमवारी पृथ्वीच्या दिशेने उड्डाण केले होते.डिस्कव्हरी यानाने ३६५ दिवस अंतराळात काढले आहेत. त्याच प्रमाणे डिस्कव्हरीने १३ वेळा अंतराळ स्थानकाचाही प्रवास केला आहे.
अमेरिकेच्या अंतराळ मोहिमेचा कणा राहिलेले नासाचे डिस्कव्हरी हे अंतराळ यान सेवेतून निवृत्त होत आहे. डिस्कव्हरीने आतापर्यंत पृथ्वीच्या पाच हजार ६०० प्रदक्षिणा घातल्या आहेत. तर १८० जणांना अंतराळात पोहोचविले आहे.
डिस्कव्हरीने आपल्या अखेरच्या मोहीमेत एक मानवी रोबो,एक क्लोजेट मॉड्यूलला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहचवले.

No comments:
Post a Comment