विद्यार्थी मित्रानो , आयुष्य, जीवन खूप सुंदर आहे . रोज नवनव्या गोष्टी, नवनवे अनुभव आपण अंगीकारत असतो . शिकत असतो . नव्याचा शोध घेत असतो . आजही मी तुम्हाला शब्दांची गंमत सांगणार आहे . चला तर मग करूया का सुरुवात !!!!!!!!.
-:शब्दरंग :-
१) हंडे , कळश्या बनवायला हा धातू वापरतात - तांबे
२)मारुतीचे , हनुमानाचे हे एक नाव - बजरंग
३)पूर्वीचे मोठे घर - वाडा
४)ढग नसलेले आकाश - निरभ्र
५)बघण्याचा अवयव ,नयन , चक्षु - डोळा
६)पूर्वी या धातूची भांडी बनवत . कधी कधी हे उघडे पडते - पितळ
७)पिता ,बाप किंवा मोठा थोरला - वडील
८) एका पायावर उभे राहून खोटे ध्यान करणारा पक्षी - बगळा
९)गडाचे दरवाजे बंद झाले म्हणून बाळासाठी रायगडावरून उडी मारणारी
गवळण - हिरकणी
१०)वर्तुळाचा किंवा भाकरीचा पाव भाग - चतकोर
११)बळी राजाकडे तीन पावले भूमी दान मागणारा छोटा अवतार - वामन
१२)समान खरेदीसाठी आपण इथे जातो - दुकान
१३)झुला , बागेतील घसरगुंडी सारखे खेळणे - झोपाळा
१४)महाभारतातील पाच भाऊ - पांडव
१५)हुशार नसलेला , बुद्दू - ढ
१६)लंकाधिपती , दहा तोंडाचा - रावण
१७)कबुतरासारखा एक पक्षी -होला
१८)पटईवर उलटी चालणारी - पाल
१९)शिवण शिवताना हे घालावे लागतात - टाके
२०)प्रत्येक भाषेत हे असतात ,तरीही जपून वापरावेत - शब्द
२१)पिकांचा पावसाळी हंगाम - खरीप
२२)रामाच्या वानरसेनेतील एक - जांबुवंत
२३) वांग्याची किंवा भोपळ्याची कोशिंबीर - भरीत
२४)आयुष्यात जन्मापासून मृत्युपर्यंत संस्कारांची संख्या - सोळा
२५)कल्पवृक्ष मानलेल्या झाडाचे श्रीफळ - नारळ
२६)पंढरपूरच्या वारकऱ्यांची विशिष्ट गोलाकार रचना -रिंगण
२७)भारतातील गुजरात प्रांतातील सिंहाचे अभयारण्य - गीर
२८)साडी , किंवा घट्ट नसलेले - पातळ
२९)कलेचा आस्वाद घेणारे लोक - रसिक
३०) लग्न कार्यात हि वाजवतात - वाजंत्री

No comments:
Post a Comment