आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Saturday, 20 July 2013

“गुरुपोर्णिमा”--


               आषाढी पोर्णिमा
    नुकत्याच सुरु झालेल्या पावसामुळे मने हिरवी असताना जी आषाढाची पोर्णिमा येते ती असतेगुरुपोर्णिमा”. गुरु पौर्णिमेचा काळ ठरवायचा तर महाभारतापर्यंत मागे जावे लागते. या दिवशी व्यास पूजा करायची प्रथा आहे.”महर्षी व्यासहे आद्य गुरु मानले जातात.महर्षी व्यास हे शंकराचार्याच्या रुपाने पुन्हा अवतीर्ण झाले अशी भाविकांची श्रद्धा आहे. सर्व ज्ञानाचा उगम व्यासापासून अशी धारणा आहे. व्यापक दृष्टीने पहिले तर व्यास हि व्यक्ती नव्हे तर शक्ती आहे. हि शक्ती गुरुपोर्निमेच्या मध्यरात्री फिरून कृपेचा अभिषेक करते अशी धारणा आहे. प्रत्येक गुरूच्या अंगी व्यासाचा अंश असतो असे मानून गृपोर्निमेच्या दिवशी गुरूला वंदन केले जाते. ज्ञानेश्वरांनी वर्णिलेला गुरूचा महिमा बोलका आहे... “सद् गुरुसारखा असता पाठीराखा....!इतरांचा लेखा कोण करी...!!”
काही नाती रक्ताची असतात. पण काही रक्तापेक्षाही  घटट असतात. त्यातलं एक मैत्रीच, दुसर गुरु-शिष्याच. आयुष्यात मित्र असेल तर सोन्याला सुगंध जणू... पण मित्र आयुष्याला अर्थ देईलच असे नाही. ते काम गुरुच. गुरु नेमक करतो तरी काय? तर गुरु दृष्टांत देतो. उत्कर्षाची वाट दाखवतो. आयुष्याला अर्थ देतो. संगीताच्या घराण्यात भास्कर बुवा वखले, भीमसेन जोशी यांनी गुरुकडे पडतील ती कामे केली. मुस्लीम गुरुकडे हिंदू शिष्य गुरुकुल पद्धतीने वाढले. शिष्योत्ताम्माना योग्य पातळीवर येण्यापूर्वी जे कराव लागल त्यालारेगिंगम्हणून कसं चालेल? तोच तर जीवनानुभव असतो आणि तो गुरु कडे मिळतो. कुठलीच विद्या स्वस्तात मिळत नाही. त्याच परंपरेत एकलव्य सारख्या धनुर्धाराला आपला अंगठा द्यावा लागला, तर विष्णूचा अवतार असलेल्या श्रीरामाला आपल्या गुरूच्या रक्षणासाठी युद्ध करावे लागले.
गुरुपोर्णिमा हा कोणता सण नाही जो साजरा करण्यासाठी गुरूला हार, फुले, फळ, पैसे किवा कपडे दिले जातात. तर ह्या पवित्र दिवशी खऱ्या मनाने गुरूलासाम, दाम, दीक्षा, उपरती, श्रद्धा, समाधान, विवेक, वैराग्य, मनःशांती, खरेपणा, उदारपणा, पवित्रपणा, चारित्र्य, चांगले वागणे आणि आत्मसमर्पण ह्यासारखी १५ प्रकारची फुले श्रद्धेने अर्पण केली जातात. गुरूला आपल्या संस्कृती मध्ये देवाचे स्थान दिले गेले आहे. ज्या आद्य शक्तीची ह्या दिवशी पूजा होते ते महर्षी व्यास म्हणजे महाभारताचे कवी, ज्यांनी खुद्द विद्यापती गणेशालाच लेखनिक बनवलं. “व्यासोचछीष्टमं जगत सर्वं !”असा ज्यांचा गौरव होतो त्या महान गुरूला, त्या आद्य शक्तीला माझा कोटी-कोटी प्रणाम !!!!!

आषाढातील शुक्ल पक्ष पोर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. प्राचीन काळात विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत असताना भावपूर्ण श्रद्धेने गुरूपूजा करून गुरूदक्षिणा देत असत.

चारही वेदांवर पहिल्यांदा भाष्य करणाऱ्या व्यास ऋषिंची आजच्या दिवशी पूजा केली जाते. व्यासांनीच लोकांना वेदाचे ज्ञान दिले. ते आपले आद्यगुरू आहेत. त्यामुळे गुरू पौर्णिमेला व्यास पोर्णिमा असेही म्हटले जाते. म्हणूनच या दिवशी आपण आपल्या गुरूला व्यासांचा अंश मानून त्यांची पूजा केली पाहिजे.

गुरूपौर्णिमा व्रत कसे कराल?
1. सकाळी घर साफ करा. स्नान करून सर्व कामे आटोपून घ्या.
2. एखाद्या पवित्र ठिकाणी बसून अभ्यास करा. सफेद वस्त्र अंथरून त्यावर पूर्वात्तर (पूर्व-पश्चिम) किंवा दक्षिणोत्तर (दक्षिण-उत्तर) गंधाने बारा-बारा रेघा ओढून व्यासपीठ तयार करा.
3. त्यापूर्वी 'गुरूपरंपरासिद्धयर्थ व्यासपुजा करिष्ये' मंत्र जपा.
4. नंतर दहाही दिशांना अक्षता टाका.
5. आता ब्रम्हा, व्यास, शुकदेव, गोविंद स्वामी आणि शकराचार्यांच्या नावाने मंत्र पूजा करा.
6. नंतर आपले गुरू किंवा त्यांच्या प्रतिमेची पूजा करून त्यांना दक्षिणा द्या.

गुरूपौर्णिमेच्या दिवशी काय करावे?
1. यादिवशी केवळ गुरूच (शिक्षकच) नाही, तर आई-वडिल, मोठ्या भाऊ-बहिणींची पूजा करण्याची प्रथा आहे.
2. यादिवशी वस्त्र, फळ, फुले हार अर्पण करून गुरूंचा आशीर्वाद मिळवला पाहिजे. कारण गुरूचा आशीर्वाद विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी आणि ज्ञानवर्धक असतो.
3. व्यासांनी रचलेल्या ग्रंथाचा अभ्यास-मनन करून त्यांच्या उपदेशांचे आचरण केले पाहिजे.
4. हा सण म्हणजे अंधश्रद्धा नसून गुरूप्रती दाखविलेला विश्वास, आदर आहे.
संबंधित माहिती
मॉडेल ते संत- असाही एक प्रवास
सदगुरू धुंडामहाराज देगलुरकर
त्रिपदीचे अध्वर्यु- नानामहाराज तराणेकर
गुरुतत्वविवेचनम्
गुरुवर अष्टक


गुरु सिद्धांत आयुष्यात महत्वपूर्ण आहे. पहिला गुरु हा दक्षिणामूर्ती आहे. अनंताचे अवतार कुशाग्रतेने विणले गेले की परिमित आणि अनंतासोबत अस्तित्वात राहतात. गुरु तत्व हे सर्व मनुष्यात आहे. ती बुद्धिमत्ता प्रत्येकात लागू आणि जागृत करायला हवी.

 हे तत्व जेव्हा जागृत होते, आयुष्यातील कष्ट दूर होते. हे कष्टाचे औषध आहे, सर्व विद्येचे धन आहे.

 गुरवे सर्व लोकानाम- दिव्य चेतना हा पूर्ण जगाच्या जगतातली प्रमुख प्रकाश आहे.
 बिशाजे भव रोगीणाम - हे औषध आहे समाजातील रोग्यांसाठी, आयुष्यासाठी, दु:खीतांसाठी. हे सगळे कष्ट दूर करतो.
 निधाय सर्व विद्यानाम श्री दक्षिनामुर्तये नमः   - मी या चेतनेला शरण जातो जे माझ्या हृद्यात आहे.

 गुरु शब्दाचा अर्थ आज विशेषज्ञ म्हणून केला जातो - जसे व्यवसाय प्रबंधात विशेषज्ञ. गुरु म्हणजे असाधारण, मोठे. अर्थातच, विशेषज्ञ हा त्याचा एक भाग झाला. या सगळ्यात पूर्णता आहे. गूढता आहे. आपल्या चेतनेत, बुद्धिमत्ता तेव्हाच आयुष्यात येते जेव्हा गुरु तत्व आयुष्यात असते.जेव्हा आपल्या आयुषयात काहीच इच्छा आकांश नसतात, तेव्हा गुरु तत्व आयुष्यात येते. तुम्ही कधी कुणासाठी काही करण्याची इच्चा केली आहे त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा करता? मग तुम्ही गुरु होण्याची भूमिका पार पाडली.आई ही पहिली गुरु आहे. मग आपले शिक्षक येतात - विना शिक्षक  आणि इतर अनेक. सदगुरु सत्याचे ज्ञान,अंतिम वास्तविकता, अध्यात्मिक ज्ञान देतो.
 गुरुपोर्णिमेला प्रत्येकाने चिंतन करावे, " मी कुठे होतो हे ज्ञान मिळण्यापूर्वी? मी आता कुठे आहे?" तुम्ही जेव्हा विपरीत बघता तुम्ही या ज्ञानाशिवाय कुठे होतात, तर आभार व्यक्त होतो.
 या पोर्णिमेला व्यास पोर्णिमा देखील म्हटले जाते. व्यासांनी ही ज्ञानाची विद्या वेदात श्रेणी बद्ध केली आहे, उपनिषद, उपवेद, २७ स्मृती, २७ उपस्मृती - एक मोठ्ठी ज्ञानाची विद्या जीवनाच्या प्रत्येक बाबींशी संबंधित आहेत आयुर्वेद ते वास्तुशास्त्र ते चिकित्सा ते औषध.ही पोर्णिमा त्यांच्या नावावर आहे.

 हा दिवस आपण त्या सगळ्यांसाठी लक्षात ठेवतो ज्यानी मानव जातीच्या भल्यासाठी काम केले आहे . आपण लक्षात ठेवतो त्यांनी काय केले.
 तुम्ही किती नशीबवान आहात तुमच्या आत अनंत अनुभव आहेत. या विशिष्ट साच्यात शरीर आणि मन जडलेला आहे. शरीर आणि मन सीमित आहेत पण भावनेची अभिव्यक्ती अनंत आहे.
 साधकासाठी, नवीन वर्ष म्हणजे गुरुपोर्णिमा आहे. जेव्हा बाकीच्या जगासाठी ही अर्धी वाट असते, आम्ही अध्यात्मिक मार्गावर पूर्ण वर्ष साजरा करतो. आपल्या जीवनात दिव्य अभिव्यक्तीच, दिशेचं एक वर्ष आहे. एक वर्ष एकरूपतेची भावना आणि जगाला गुरूच्या चक्षूने बघणे. गुरू हा मार्गदर्शन करणारा आहे. मला ते करू द्या जे एका गुरुने, एका भल्या माणसाने या परिस्थितीत केले असते. बुद्धिमान व्यक्ती कधी प्रतिक्रिया देणार नाही. ते उत्तर देतील. तुम्ही शिकाल जेव्हा स्वतःला  त्या जागी ठेवाल (गुरु किंवा बुद्धिमान व्यक्ती) पुन्हा पुन्हा अनंत धेय्याचे प्रयत्न, विशाल बुद्धिमत्ता, पूर्ण दया आणि आनंद.

 कुणालाच माहित नाही ही प्रथा कधी सुरु झाली. करोडो वर्षांपूर्वी, या पृथ्वीवर, किती सारे संत आणि ऋषी होऊन गेले आणि किती तरी पुढे भविष्यात होतील. आपण त्या सगळ्यांचे ज्ञानाच्या योगदानासाठी  भूतकाळात, वर्तमानात, आणि भविष्यात आभार मानतो. बुद्धीमत्तेशिवाय हे जगणे नाही, फक्त आहेच. आयुष्याची सुरुवात बुद्धिमत्तेने होते.

 या गुरुपोर्णिमेला तुम्हाला जे आशीर्वाद मिळाले त्याबद्दल विचार करा आणि आभार व्यक्त करा. सगळे गाऊ या आणि आंतरिक आनंदात डुबून जाऊया.


GURU is Shiva without his three eyes!
Vishnu without his four arms! Brahma without his four head!
He is Param-Shiva himself in Human Form!!!




                                    ---vivek shelke                  

Friday, 19 July 2013

जागतिक समन्वित वेळ

                                                    जागतिक समन्वित वेळ


जागतिक समन्वित वेळ (इंग्लिश: Coordinated Universal Time) किंवा यूटीसी हे आंतरराष्ट्रीय परमाण्विक वेळेवर आधारलेले वेळ मोजण्याचे एक प्रमाण आहे. ह्या प्रमाणाद्वारे आजच्या घडीला जगातील सर्व स्थानांवरील प्रमाणवेळ ठरवली जाते. पूर्वी याच कामासाठी ग्रीनविच सरासरी वेळ (GMT) वापरली जाई.. ग्रीनविच सरासरी वेळ ही लंडनमधील ग्रीनिच ह्या स्थळाची स्थानिक वेळ आहे. ही यूटीसीशी मिळतीजुळती आहे. जगातील सर्व आंतरराष्ट्रीय कालविभाग आता यूटीसीच्या संदर्भात मोजले जातात.


जीएम् टीऐवजी यूटीसी का आले?

लंडनमधील बिग बेन हे घड्याळ अत्यंत अचूक चालते. जवळच असलेल्या ग्रीनविच या वेधशाळेत सूर्य, तारे आदींच्या निरीक्षणातून पृथ्वीवरील घड्याळ्याची अचूक वेळ काढली जाई, आणि तिच्याप्रमाणे वेधशाळेतील क्रोनॉमीटर्स आणि अन्य घड्याळे जुळवून ठेवली जात. बिग बेन घड्याळ तीच वेळ दाखवते आहे की नाही याची दिवसातून अनेकदा तपासणी होत असे. ही सर्व घड्याळे यांत्रिक मशिनरीवर चालत. मशिनरीत काही बिघाड झाला तर पुढेमागे अचूक वेळ ठरविण्यास अडथळा होऊ शकला असता. त्यामुळे अचूक वेळ ठरविण्यास यंत्रांशिवाय दुसरे काही वापरणे गरजेचे होते.

पुढे असे लक्षात आले की, ’क्वार्ट्‌झ’ नावाच्या स्फटिकातली स्पंदने अत्यंत नियमित असतात. हा दगड नैसर्गिकरीत्या उत्पन्न झाला असल्याने लाखो वर्षांत त्याच्या स्पंदन वारंवरितेत सूक्ष्मातिसूक्ष्म बदलही होण्याची शक्यता नाही. या ’क्वार्ट्‌झ’च्या गुणाचा उपयोग करून हवी तितकी अचूक घड्याळे बनवली गेली. अशा अचूक घड्याळ्याने दाखविलेल्या अचूक वेळेला परमाण्विक वेळ म्हणतात. जी.एम्‌टीशी ही वेळ जुळवली की ती जागतिक वेळ होते. आणि पृथ्वीच्या भ्रमणकाळाबरोबर तिचा समन्वय साधला की ती जागतिक समन्वित वेळ होते. जागतिक वेळेत दर सहा महिन्यांनी एखाद्या सेकंदाची दुरुस्ती करून ती पृथ्वीच्या भ्रमणकाळाशी समन्वित केली जाते.

उदा. भारतीय प्रमाण वेळ यूटीसीच्या संदर्भात +५:३० आहे. याचा अर्थ जेव्हा भारतात दुपारचे ५:३० वाजतात, तेव्हा ग्रीनिचला दुपारचे बारा वाजलेले असतात.

पृथ्वीचे वातावरण

                                                                  पृथ्वीचे वातावरण 

                   वातावरणातील वायूंमुळे निळ्या रंगाच्या प्रकाशलहरींचे विकिरण होते; यामुळे अवकाशातून पृथ्वीला निळ्या रंगाचे तेज असल्याचा भास होतो.

पृथ्वीचे वातावरण हा पृथ्वीच्या पृष्ठभागालगत तिच्या गुरुत्वाकर्षणामुळे लपेटून असलेला वायूंचा थर आहे. यात नायट्रोजन (७८.०८ %), ऑक्सिजन २१ % ०.९३ टक्के आरगॉन ०.०४ %कार्बन डायऑक्साईड, आर्द्रता इत्यादी घटकांचा समावेश आहे. पृथ्वीच्या वातावरणातील वायूंच्या या मिश्रणास हवा असे म्हणतात.

महाराष्ट्राविषयी सामान्य ज्ञान


                          महाराष्ट्राविषयी सामान्य ज्ञान



* महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.
* महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
* महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी  - नागपूर.
* महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३५.
* महाराष्ट्राने भारताचा . टक्के भाग व्यापलेला आहे.
* महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
* महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
* महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
* विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
* महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
* महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.
* महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
* महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
* महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
* महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
* महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
* महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.
* महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.
* महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.
* भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
* भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
* महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.
* भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
* महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.
* पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.
* गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
* प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात
घेतले जाते.
* गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.
* जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
* औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
* पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
* महाराष्ट्रातील नायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.
* कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.
* कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.
* विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.
* विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.
* महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.
* विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.
* संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.
* संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.
* राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.
* संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.
* ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.
* यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.
* पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.
* कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.
* आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.
* मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात.
* यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.
* महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.
* नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.
* महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.
* शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.
* महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.
* शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.
* ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
* तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.
* भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
* रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.
* स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूर जि. नाशिक.
* कवी केशवसुतांचे स्मारक भालगुंड रत्नागिरी जिल्ह्यात आहे.
* राष्ट्रीय महामार्ग क्रमांक राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे.
* बॉम्बे हाय तेल उत्खननासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईपासून २४० कि.मी. अंतरावर आहे.
* महाराष्ट्रात चुनखडीचे साठे यवतमाळ जिल्ह्यात आढळतात.
* महाराष्ट्रातील उत्तर सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे.
* वाघांसाठी प्रसिद्ध असलेले मेळघाट अभयारण्य सातपुडा पर्वतात आहे.
* नाशिक जिल्ह्यातील गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे.
* सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात.
* महाराष्ट्राचे मँचेस्टर असे इचलकरंजी शहरास म्हणतात.
* कालिदासाने मेघदूत काव्य रामटेक येथे लिहिले.
* कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, जि. नागपूर येथे आहे.
* भारतातील तिसरे महाराष्ट्रातील पहिले पशू मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे आहे.
* सुप्रसिद्ध अजिंक्यतारा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. हा किल्ला शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज याने बांधला.
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे (रायगड) येथे आहे.
* फिल्म अॅड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट पुणे येथे आहे.
* महाराष्ट्रातील बालकामगारविरोधी मोहिमेसाठी ब्रॅड अॅम्बेसिडर म्हणून शासनाने शाहरूख खानची निवड केली.
* माहितीच्या अधिकाऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र हे राज्य मिलेनियर ठरले आहे, मराठवाडय़ातील औरंगाबाद येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन होणार आहे.
* थेट परकीय गुंतवणुकीत राज्याचा गुजरातनंतर दुसरा क्रमांक लागतो.
* रोजगार निर्मितीमध्ये महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे.
* भारतातील परकीय गुंतवणुकीस महाराष्ट्राचा हिस्सा २४ टक्के आहे. (मार्च २००९)
* महाराष्ट्रावर २००२-०३ मध्ये ८२ हजार ५४९ कोटी रुपयांचे कर्ज, २००६-०७ मध्ये लाख ३४ हजार ४९३ कोटींवर गेले तर २००७-०८ मध्ये लाख ४४ हजार ३२५ कोटींच्या आसपास कर्ज होते