महाराष्ट्राविषयी
सामान्य ज्ञान
* महाराष्ट्रातील
सर्वात उंच पर्वत
शिखर- कळसुबाई (१६४६
मी.) ता. अकोले,
जि. अहमदनगर.
* महाराष्ट्राला
७२० कि.मी.
लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
* महाराष्ट्राची
राजधानी - मुंबई * उपराजधानी - नागपूर.
* महाराष्ट्रातील
जिल्ह्यांची संख्या - ३५.
* महाराष्ट्राने
भारताचा ९.७
टक्के भाग व्यापलेला
आहे.
* महाराष्ट्राच्या
वायव्य भागात गुजरात राज्य
व दादरा-नगर
हवेलीच्या सीमारेषा आहे.
* महाराष्ट्रास
लागून मध्य प्रदेश
राज्याची सीमा सर्वात
लांब आहे.
* महाराष्ट्रात
कोकण प्रदेश उत्तरेकडे
डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे
तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील
तलाव मालगुजारी नावाने
ओळखले जातात.
* विदर्भातील
गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने
तलाव आहे.
* महाराष्ट्रात
मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी
जिल्ह्यात चालते.
* महाराष्ट्रातील
तलावांचा जिल्हा गोंदिया आहे,
तर शहर ठाणे
आहे.
* महाराष्ट्राचे
पठार बेसॉल्ट या
खडकाने बनलेले आहे.
* महाराष्ट्रातील
पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून
ओळखतात.
* महाराष्ट्रातील
मुंबई जिल्हा आकाराने
लहान पण लोकसंख्येने
मोठा आहे
* महाराष्ट्रातील
रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे
प्रमाण अधिक आहे.
* महाराष्ट्रात
गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता
सर्वात कमी आहे.
* महाराष्ट्रातील
१०० टक्के साक्षर
जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.
* महाराष्ट्रात
संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम
जिल्हा- वर्धा.
* महाराष्ट्रातील
पहिला सहकारी साखर
कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.
* भारतात सर्वात जास्त कापड
गिरण्या महाराष्ट्रात आहे.
* भारतात सर्वात जास्त विद्युत
निर्मिती महाराष्ट्रात होते.
* महाराष्ट्रात
चलनी नोटांचा कारखाना
नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्रातील
सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा
अहमदनगर.
* भारतातील
पहिले पक्षी अभयारण्य
कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
* महाराष्ट्रातील
सर्वाधिक पाऊस आंबोली
(सिंधुदुर्ग) येथे पडतो.
* पंढरपूर शहर भीमा
नदीकाठी आहे. महाराष्ट्राची
काशी म्हणतात.
* गोदावरी नदीला दक्षिण भारताची
गंगा म्हणतात.
* प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे
पीक मोठय़ा प्रमाणात
घेतले जाते.
* गरम पाण्याचे झरे ठाणे
जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.
* जगप्रसिद्ध
लोणार सरोवर बुलढाणा
जिल्ह्यात आहे.
* औरंगाबाद
शहर बावन्न दरवाजांचे
शहर म्हणून ओळखले
जाते.
* पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर
बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
* महाराष्ट्रातील
नायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.
* कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती
केली जाते म्हणून
महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे
म्हणतात.
* कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी
सागर म्हणतात.
* विदर्भातील
नंदनवन असे चिखलदरा
थंड हवेच्या ठिकाणाला
म्हणतात.
* विदर्भातील
कॅलिफोर्नियाचा असे वरुड
व चांदूरबाजार तालुक्याला
म्हणतात. कारण तेथे
जास्तीत जास्त संत्रा पिकविला
जातो.
* महाराष्ट्रातील
कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती
येथे आहे.
* विदर्भातील
प्रसिद्ध आनंद सागर
शेगाव येथे आहे.
* संत गजानन महाराजांची समाधी
शेगाव जि. बुलढाणा
येथे आहे.
* संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती
येथे आहे.
* राष्ट्रसंत
तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी,
जि. अमरावती येथे
आहे.
* संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे
आहे.
* ब्रह्मदेशाच्या
थिबा राजाचा राजवाडा
रत्नागिरी येथे आहे.
* यशवंतराव
चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक
येथे आहे.
* महाराष्ट्र
आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक
येथे आहे.
* महाराष्ट्र
राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा
देवळाली, जि. नाशिक.
* पुणे ही पेशव्यांची
राजधानी आहे.
* कोल्हापूर
येथे देशातील गुळाची
बाजारपेठ आहे.
* आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत
फडके यांचा जन्म
शिरढोण, जि. रायगड
येथे झाला.
* मुंबई शहराला भारताचे पॅरिस
असे म्हणतात.
* यशवंतराव
चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम
असे म्हणतात.
* महाराष्ट्र
पोलीस अॅकॅडमी नाशिक
येथे आहे.
* नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला
येथे आहे.
* महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम
व विनोबा भावेंचा
पवनार आश्रम वर्धा
जिल्ह्यात आहे.
* शिखांची दक्षिण काशी म्हणून
नांदेड शहर प्रसिद्धी
आहे.
* महाराष्ट्रात
नाशिक येथे कुंभमेळा
भरतो.
* शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी
येथे आहे.
* ज्ञानेश्वरांनी
नेवासे या ठिकाणी
ज्ञानेश्वरी लिहिली.
* तारापूर हे भारतातील
पहिले अणुशक्ती केंद्र
आहे.
* भारतातील
पहिला पेट्रो रसायन
प्रकल्प तुर्भे या ठिकाणी
आहे.
* महाराष्ट्रातील
सर्वात जास्त महानगरपालिका असलेला
जिल्हा ठाणे.
* रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे
जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात-
कोलाम या आदिवासी
जमाती प्रामुख्याने आढळतात.
* स्वातंत्र्यवीर
सावरकरांचे जन्मस्थान भगूर जि.
नाशिक.
* कवी केशवसुतांचे स्मारक भालगुंड
रत्नागिरी जिल्ह्यात आहे.
* राष्ट्रीय
महामार्ग क्रमांक ६ राज्यातील
सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे.
* बॉम्बे हाय तेल
उत्खननासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईपासून
२४० कि.मी.
अंतरावर आहे.
* महाराष्ट्रात
चुनखडीचे साठे यवतमाळ
जिल्ह्यात आढळतात.
* महाराष्ट्रातील
उत्तर सीमेला सातपुडा
पर्वतांची रांग आहे.
* वाघांसाठी
प्रसिद्ध असलेले मेळघाट अभयारण्य
सातपुडा पर्वतात आहे.
* नाशिक जिल्ह्यातील गंगापूर हे
महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण
आहे.
* सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार
म्हणतात.
* महाराष्ट्राचे
मँचेस्टर असे इचलकरंजी
शहरास म्हणतात.
* कालिदासाने
मेघदूत काव्य रामटेक येथे
लिहिले.
* कवी कुलगुरू कालिदास संस्कृत
विद्यापीठ रामटेक, जि. नागपूर
येथे आहे.
* भारतातील
तिसरे व महाराष्ट्रातील
पहिले पशू व
मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर
येथे आहे.
* सुप्रसिद्ध
अजिंक्यतारा किल्ला सातारा जिल्ह्यात
आहे. हा किल्ला
शिलाहार वंशातील राजा दुसरा
भोज याने बांधला.
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान
विद्यापीठ लोणेरे (रायगड) येथे
आहे.
* फिल्म अॅड टेलिव्हिजन
इन्स्टिटय़ूट पुणे येथे
आहे.
* महाराष्ट्रातील
बालकामगारविरोधी मोहिमेसाठी ब्रॅड अॅम्बेसिडर
म्हणून शासनाने शाहरूख खानची
निवड केली.
* माहितीच्या
अधिकाऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात
महाराष्ट्र हे राज्य
मिलेनियर ठरले आहे,
मराठवाडय़ातील औरंगाबाद येथे राष्ट्रीय
विधी विद्यापीठ स्थापन
होणार आहे.
* थेट परकीय गुंतवणुकीत राज्याचा
गुजरातनंतर दुसरा क्रमांक लागतो.
* रोजगार निर्मितीमध्ये महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक
आहे.
* भारतातील
परकीय गुंतवणुकीस महाराष्ट्राचा
हिस्सा २४ टक्के
आहे. (मार्च २००९)
* महाराष्ट्रावर
२००२-०३ मध्ये
८२ हजार ५४९
कोटी रुपयांचे कर्ज,
२००६-०७ मध्ये
१ लाख ३४
हजार ४९३ कोटींवर
गेले तर २००७-०८ मध्ये
१ लाख ४४
हजार ३२५ कोटींच्या
आसपास कर्ज होते
No comments:
Post a Comment