आपणा सर्वांचे स्वागत आहे
आपणा सर्वांचे स्वागत आहे
Wednesday, 4 April 2018
Thursday, 15 February 2018
1 to 10 Numbers
1 - One 6 -
Six
2 - Two 7-Seven
3 - Three 8 -
Eight
4 - Four 9 - Nine
5 - Five 10 - Ten
Wednesday, 27 September 2017
Opposite Words विरुद्धार्थी शब्द
*Anthonyms (अॅटोनीम्स*/
*Opposite Words (विरूध्दार्थी शब्द)
(1) *Big मोठा × Small छोटा*
(2) *Black काळा × White पांढरा*
(3) *Far दूर × Near जवळ*
(4) *Fast जलद × Slow हळू*
(5) *Give देणे × Take घेणे*
(6) *Hard टणक × Soft मऊ*
(7) *Joy आनंद × Sorrow दुःख*
(8) *Oral तोंडी × Written लेखी*
(9) *Old जुना × New नवा*
(10) *Open उघडणे × Close बंद करणे*.
(11) *Rich श्रीमंत × Poor गरीब*
(12) *Sweet गोड × Bitter कडू*
(13) *Short आखूड × Long लांब*
(14) *Cold थंड × Hot उष्ण*
(15) *Up वर × Down खाली*
(16) *Teach शिकवणे × Learn शिकणे*.
(17) *Wet ओला × Dry कोरडा* .
(18) *Loose सैल × Tight घट्ट*.
(19) *Boy मुलगा × Girl मुलगी* .
(20) *Cry रडणे × Laugh हसणे*.
(21) *Back मागे × Front पुढे* .
(22) *Buy खरेदी × Sell विक्री* .
(23) *Clean स्वच्छ × Dirty घाणेरडा* .
(24) *Day दिवस × Night रात्र*.
(25) *Fat लठ्ठ × Thin सडपातळ*.
(26) *First पहिला × Last शेवटचा*
(27) *High उंच × Low ठेंगू*
(29) *In आत × Out बाहेर*
(30) *King राजा × Queen राणी*
(31) *Left डावा × Right उजवा*
(32) *Male पुरूष × Female स्त्री*.
(33) *Man पुरूष × Woman स्त्री*
(34) *No नाही × Yes होय*.
(35) *Plus अधिक × Minus वजा*.
(36) *Pull ओढणे × Push ढकलणे*.
(37) *Rise उगवणे × Set मावळणे*.
(38) *True बरोबर × False चूक*.
(39) *Here येथे × There तेथे*.
(40) *End शेवट × Start सुरुवात*.
संकलक :- विवेक शेळके (तंत्रस्नेही शिक्षक)
शारदा विद्यामंदिर प्राथमिक अनगांव
फक्त नावे सांगा ( उपक्रम )
*उपक्रम*
*फक्त नावे सांगा*
(१)परांची हालचाल करून पाण्यात
पोहणारे प्राणी -- *मासे*
(२)जमिनीवर चालणारे आणि हवेत
उडणारे प्राणी -- *पक्षी, झुरळ*.
(३)पायांशिवाय सरपटत जाणारे प्राणी.
-- *साप, गांडूळ*.
(४)लहान पायांनी सरपटत चालणारे
प्राणी --- *सरडा, पाल, कासव*.
(५)चार पायांनी टुणटुण उड्या मारत
चालणारे प्राणी. -- *ससा, बेडूक*.
(६) चार पायांनी जमिनीवर चालणारे
अथवा धावणारे प्राणी -- *कुत्रा, बैल, मांजर *.
(७)आकाराने सर्वांत मोठा पक्षी -- *शहामृग*.
(८)वेगाने धावणारा पक्षी -- *शहामृग*.
(९)शिंगे असणारे प्राणी -- *हरिण, गाय,गेंडा , सांबर *.
(१०)आठ पायांचा किडा -- *कोळी*.
(११)मातीचे कण रचून वारूळ बनवणारे
प्राणी -- *मुंग्या*.
(१२)घरटी न बांधणारे पक्षी -- *कोकिळ*,
*कोंबडी*.
(१३)अन्न जिभेने पकडणारा आणि न
चावता गिळणारा प्राणी -- *सरडा*.
(१४)लोकर मुख्यतः या प्राण्यांच्या अंगावरील
केसांपासून बनवली जाते. -- *मेंढी*.
(१५) रवंथ करणारे प्राणी -- *गाय, म्हैस , बैल*.
संकलक :- विवेक शेळके (तंत्रस्नेही शिक्षक )
शारदा विद्यामंदिर प्राथमिक अनगांव
http://vivekshelke-smarteducation.blogspot.in
गुणाकार - पट दुप्पट तिप्पट
*गुणाकार - पट (दुप्पट/तिप्पट/चौपट)*
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
-------------------------------------
*● दुप्पट करणे -*
कोणत्याही संख्येची दुप्पट करणे म्हणजे
त्या संख्येला 2 ने गुणणे होय.
उदा. 4 ची दुप्पट म्हणजे 4 × 2 = 8
6 ची दुप्पट म्हणजे 6 × 2 = 12
3 ची दुप्पट म्हणजे 3 × 2 = 6
10 ची दुप्पट म्हणजे 10 × 2 = 20
5 ची दुप्पट म्हणजे 5 × 2 = 10
12 ची दुप्पट म्हणजे 12 × 2 = 24
-----------------------------------------------
*● तिप्पट करणे -*
तिप्पट करणे म्हणजे दिलेल्या संख्येला
3 ने गुणणे होय.
उदा. 4 ची तिप्पट म्हणजे 4 × 3 =12
6 ची तिप्पट म्हणजे 6 × 3 = 18
3 ची तिप्पट म्हणजे 3 × 3 = 9
10 ची तिप्पट म्हणजे 10 × 3 = 30
5 ची तिप्पट म्हणजे 5 × 3 = 15
8 ची तिप्पट म्हणजे 8 × 3 = 24
-------------------------------------------------
http://vivekshelke-smarteducation.blogspot.in
----------------------------------------------
*● चौपट करणे -*
चौपट करणे म्हणजे दिलेल्या संख्येला
4 ने गुणणे होय.
उदा. 4 ची चौपट म्हणजे 4 × 4 = 16
6 ची चौपट म्हणजे 6 × 4 = 24
3 ची चौपट म्हणजे 3 × 4 = 12
10 ची चौपट म्हणजे 10 × 4 = 40
5 ची चौपट म्हणजे 5 × 4= 20
7 ची चौपट म्हणजे 7 × 4 = 28
-------------------------------------------------
संकलक :- * विवेक शेळके *(तंत्रस्नेही शिक्षक)
शारदा विद्यामंदिर प्राथमिक अनगांव
गमतीदार शब्द साखळी
*गंमतीदार शब्द साखळी ( शब्दरूपे )*
लेखन :- विवेक शेळके
(१) धनवान बलवान गुणवान रूपवान सामर्थ्यवान
(२) गावभर रात्रभर दिवसभर जन्मभर क्षणभर
(३) गावकरी वारकरी कामकरी पहारेकरी भिक्षेकरी
(४) झाडावर घरावर दारावर टेकडीवर माळावर
(५) धारदार डौलदार साथीदार दुकानदार घरदार
(६) घरासाठी गावासाठी समाजासाठी देशासाठी
(७) घरापासून शाळेपासून झाडापासून बागेपासून
(८) बसल्यामुळे खाल्ल्यामुळे लिहिल्यामुळे
(९) चित्रकार कलाकार शिल्पकार संगीतकार
(१०) गडगडाट कडकडाट फडफडाट
(११) रक्तदान जीवदान नेत्रदान अन्नदान
(१२) लालसर काळसर पिवळसर निळसर
(१३) बसतात हसतात रडतात सांगतात.
(१४) चवदार दमदार इमानदार जमीनदार
(१५) खणखणीत झणझणीत टणटणीत सणसणीत
(१६) बसायला खायला बोलायला पळायला.
(१७) भोजनालय वाचनालय संग्रहालय हिमालय.
(१८) धीटपणा चपळपणा सावधपणा प्रेमळपणा.
(१९) कलावंत यशवंत पुण्यवंत जयवंत गुणवंत
(२०) बसायचे उठायचे जायचे हसायचे खेळायचे
(२१) आमदार खासदार नामदार कामदार घरदार
(२२) कौरव गौरव सौरव
----------------------------------------------------
Wednesday, 22 March 2017
Monday, 20 March 2017
Saturday, 11 March 2017
Wednesday, 8 March 2017
Tuesday, 7 March 2017
Friday, 3 March 2017
Wednesday, 1 March 2017
Friday, 17 February 2017
Saturday, 11 February 2017
उपसर्ग घटित शब्द
विषय :- मराठी(भाषा)
🔹 उपसर्गघटित शब्द 🔹
● शब्दांच्या आधी जोडलेल्या अक्षराला किंवा
अक्षरांना ' उपसर्ग ' म्हणतात.
उदा. अ + बोल = अबोल.
'बोल ' या शब्दाच्या आधी 'अ' हे एक अक्षर
जोडले आहे; म्हणून अबोल हा नवीन शब्द
तयार झाला. ( ' अ 'म्हणजे नाही. ' अबोल '
म्हणजे न बोलणारा. )
● शब्दांच्या आधी उपसर्ग लावून तयार
झालेल्या नवीन शब्दांना उपसर्गघटित
म्हणतात.
■'अ ' उपसर्ग असलेले शब्द :--
अखंड अमान्य
अचल अमूल्य
अनाथ अयोग्य
अपचन अविचार
अपक्ष अविवाहित
अप्रगत अविश्वास
अप्रिय अशक्य
अपूर्ण अशांत
अभय अशुद्ध
अमर अशुभ
अमंगल असत्य
अहिंसा अज्ञान
■ ' आ ' उपसर्ग असलेले शब्द :--
आकार आभास
आकृती आमरण
आचार आवार
आजन्म आश्रम
आजीव आगामी
आनंद आरक्षण
■ ' प्र ' उपसर्ग असलेले शब्द :--
प्रकार प्रदेश
प्रखर प्रपंच
प्रगत प्रभाग
प्रगती प्रभाव
प्रघात प्रमुख
प्रचंड प्रयोग
प्रचार प्रवास
प्रताप प्रवाह
प्रदर्शन प्रवेश
प्रदान प्रशांत
प्रदीप प्रसंग
■ ' वि ' उपसर्ग असलेले शब्द :--
विक्रम विपक्ष
विकार विभाग
विकास वियोग
विकृती विराग
विजय विराट
विदेश विरोध
विधवा विलास
विनम्र विवाद
विनोद विज्ञान
■ ' सु ' उपसर्ग असलेले शब्द :--
सुकन्या सुमन
सुकर सुबोध
सुकर्म सुरेख
सुकाळ सुवर्ण
सुगंध सुवार्ता
सुजन सुवास
सुजाण सुविचार
सुधीर सुशीला
■ ' नि ' उपसर्ग असलेले शब्द :--
निकट निखळ
निकस निचरा
निकामी निढळ
निकाल नितळ
निकोप निनावी
निराशा निरोगी
Wednesday, 11 January 2017
Tuesday, 10 January 2017
Tuesday, 3 January 2017
Monday, 2 January 2017
Subscribe to:
Posts (Atom)