.
*तोंडी वजाबाकीची साधी पद्धत*
.
*आज आपण वजाबाकी करण्याची एक ट्रिक शिकणार आहोत.*
*चला तर मग जाणून घेऊया याविषयी सविस्तर:*
अनेकवेळा दुकानात / भाजी,फळे, तिकिट घेताना १००, १००० ची नोट दिल्यावर किती पैसे परत मिळायला हवेत याचे गणित करायला ही ट्रिक आपल्यालाही उपयुक्त .
*10, 100,1000, 10000 अशा संख्येतून कोणतीही संख्या कशी वजा करायची*
.
*उदा:* आपल्याला 1000- 674 वजा करायचे?
यासाठी आपणाला पहिले दोन अंक 9 मधून वजा करून घ्यायचे व शेवटचा अंक 10 मधून वजा करून घ्यायचा.
म्हणजेच 9-6 =3
9-7 = 2
10- 4= 6
*तुमचं उत्तर तयार= 326*
.
.
*आपण आणखी एक उदाहरण पाहू.*
10000 - 4328=?
सुरुवातीला
9-4=5
9-3=6
9-2=7
10-8=2
*तुमचं उत्तर तयार आहे- 5672*
*उदा: 3)* 100000-66758
सुरुवातीला
9-6=3
9-6=3
9-7=2
9-5=4
10-8=2
*स्पर्धा परीक्षेत जलद उत्तर काढण्यासाठी ही ट्रिक उपयोगी पडेल* यात शंका नाही.
मनोरंजनातून गणित हा उद्देश तसेच गणित विषयक गोडी लावण्यासाठी अशा प्रकारच्या tricks चा अध्यापनात वापर होणे आवश्यक.
अशाप्रकारे मुले संख्यांची जलद गतीने वजाबाकी करू शकतील.
संकलन- श्री . विवेक शेळके
No comments:
Post a Comment