आपणा सर्वांचे स्वागत आहे
आपणा सर्वांचे स्वागत आहे
Friday, 30 December 2016
Saturday, 17 December 2016
पालक आणि मुले
*1 पालकांनी पाल्याशी कसे वागावे ?*
१. पाल्यावर अधिकार गाजवू नये; तर त्याच्याशी मैत्री करावी.
२. प्रत्येक कृती करण्यास प्रेमाने सांगावे.
३. सांगतांना आपली कृती तपासावी.
४. मुलांकडून खूप अपेक्षा असतात. त्या टाळाव्यात म्हणजे मुलांनाही आणिआपल्यालाही ताण येणार नाही.
५. मुलांना पैशांपेक्षा प्रेम महत्त्वाचे आहे. हे तत्त्व नेहेमी लक्षात घ्यावे.
६. पाल्यासाठी स्वतःचा जास्तीतजास्त वेळ द्यावा.
७. मुलांच्या सर्व समस्या शांतपणे ऐकून घ्याव्यात.
८. स्वतःची चूक झाली असल्यास ती मुलांसमोर मान्य करावी.
९. प्रत्येकाची प्रकृती ही निरनिराळी असल्याने पालकांनी आपल्या मुलाची तुलना कधीहीदुसर्या मुलाबरोबर करू नये.
१०. मुलांसमोर त्यांच्याविषयी नकारात्मक बोलू नये. (‘तुला कळत नाही, तुला येतनाही, तुला जमणार नाही, तू कधी शांत होणार ?, याने मला खूप डोक्याला ताप दिलाआहे’, अशी नकारात्मक भाषा वापरल्याने मुलांच्या बालमनावर परिणाम होऊनत्यांच्याशी जवळीक साधता येत नाही.)
११. घरात नवीन आलेल्यांसमोर (पाहुण्यांसमोर) मुलांचे दोष सांगितले जातात. तेथे तेसांगण्याऐवजी मुलांनाच ते प्रेमाने सांगावे.
१२. आपला पाल्य काय करत नाही, हे सांगण्यापेक्षा तो काय चांगले करतो, ते इतरांनासांगावे; मात्र त्याचे अवास्तव कौतुक करू नये.
१३. मुलांकडूनही शिकण्याचा स्थितीत रहाणे.
१४. पालकांनी स्वतः देवभक्ती केली, तसेच स्वतःचे आचरण मुलांसमोर आदर्शठेवल्यास तीही त्याचे अनुकरण करतील.
१५. ‘मुलांचा पालनकर्ता मी नसून भगवंत आहे’, याची जाणीव ठेवावी. (त्यामुळे ताणयेत नाही.)
वरील पद्धतींचे आचरण केल्यास निश्चितच एक चांगली पिढी आपण राष्ट्राच्याउभारणीसाठी घडवू शकतो.
*2.मुलांना चांगल्या सवयी लागण्यासाठी त्यांच्यावर करावयाचे घरगुती मानसोपचार*
पालक, मुलांच्या समस्या
‘जग ही एक रंगभूमी आहे’, या शेक्सपियरच्या प्रसिद्ध वाक्याच्या संदर्भात एक मानसशास्त्रज्ञ म्हणतो, ‘‘घर ही एक प्राथमिक रंगभूमी आहे. तिथे कुठली भूमिका कशी करायची, ते मुले शिकतात.’’ घरातील वातावरण आणि माणसे, विशेषतः मुलाचे आई-वडीलच त्याचे मानसिक आरोग्य घडवण्यास मुख्यतः कारणीभूत असतात. एक मानसोपचार तज्ञ म्हणतात, ‘‘मुलांच्या समस्या, म्हणजेच समस्यायुक्त आई-वडील !’’ अशा वेळी मुलाच्या आई-वडिलांनाच मानसोपचाराची अधिक आवश्यकता असते. आई-वडील आणि घरातील इतर मोठी मंडळी यांची चुकीची विचारसरणी अन् वागणूक, तसेच चुकीच्या भावना यांचा परिणाम मुलाच्या मनावर कळत-नकळत सतत होत असतो. मुलावर मानसोपचार करायची पाळी येऊ नये; म्हणून प्रतिबंधक उपाय या दृष्टीने आई-वडिलांचे व्यक्तीमत्त्व चांगले असणे महत्त्वाचे असते. मुलांशी नेहमी वागतांना, तसेच मुलांच्या घरगुती मानसोपचाराच्या दृष्टीने काही नियम पाळणे आवश्यक असते.
मुलांना प्रेम आणि आधार यांची आवश्यकता असणे
मुलाच्या मनात ‘आई-वडिलांचे आपल्यावर पुष्कळ प्रेम आहे, त्यांना आपण हवे आहोत आणि त्यांचा आपल्याला आधार आहे’, अशा प्रकारच्या भावना निर्माण होतील, असे वर्तन आई-वडिलांनी ठेवले पाहिजे, उदा. अधून मधून त्याला जवळ घेणे, त्याला एकटे ठेवून फार वेळ घराबाहेर न रहाणे इत्यादी गोष्टी केल्या पाहिजेत. एकापेक्षा अधिक मुले असल्यास ‘डावे-उजवे’ असे मुळीच करू नये. दोन मुलांत ३ वर्षांपेक्षा अल्प अंतर असेल, तर मोठ्या मुलाकडे थोडेसे अधिक लक्ष द्यावे.
आई-वडिलांनी मुलांसमोर भांडल्यास त्यांना निराधार वाटणे
आई-वडिलांनी मुलांसमोर भांडू नये. लहान मुलांना ‘घरातील तंत्र बिघडले आहे’, याची लगेचच जाणीव होते आणि त्यांच्या मनात ‘आई-वडिलांचा आपल्याला आधार मिळेल कि नाही’, अशी शंका निर्माण होते.
पालकांनो, मुलांना शिस्त लावण्यासह वेळीप्रसंगी शिक्षाही करणे आवश्यक !
मुलांना प्रेमासह शिस्तही लावली पाहिजे; पण शिस्तीचा विपर्यास होऊ देऊ नये. विपर्यास झाला की, समस्या निर्माण झाल्याच, असे समजा.
चुकीची जाणीव होण्यासाठी तात्काळ शिक्षा करणे आवश्यक : मुलांच्या हातून चुकीच्या कृती घडत असतांना त्यांना त्याची जाणीव तात्काळ करून देऊन शिक्षाही करायला हवी. त्या वेळी आईने ‘थांब, संध्याकाळी बाबा घरी आल्यावर त्यांना तुझे नाव सांगते’, असे म्हणून उपयोगी नाही. बाबा घरी आल्यावर त्यांनी विलंबाने दिलेल्या शिक्षेमुळे ‘चूक म्हणजे शिक्षा’, असे समीकरण त्याच्या मनात निर्माण होत नाही आणि ते मूल तीच चूक पुनःपुन्हा करत रहाते.
शिक्षेमध्ये सातत्यही असावे : एखाद्या वेळी चुकीसंदर्भात शिक्षा करणे, तर दुसर्या वेळी चुकीकडे दुर्लक्ष करणे, असे करू नये.
शिक्षेमध्ये मतभेद नकोत : शिक्षेचे स्वरूप आणि ती द्यावी कि नाही, याविषयी आई-वडील अन् घरातील इतर मोठी मंडळी यांच्यामध्ये मतभेद असले, तरी एकजण शिक्षा करत असतांना इतरांनी मध्ये पडू नये. जे मतभेद असतील, ते मुलांच्या अपरोक्ष चर्चा करून सोडवावेत, अन्यथा हे मतभेद ऐकून योग्य आणि अयोग्य काय, याचा मुलांच्या मनात गोंधळ उडतो.
*3 अभ्यासाचे महत्त्व मुलांच्या मनावर कसे ठसवावे ?*
मुलांना नेहमी शास्त्रज्ञ, उद्योगपती, कुशाग्र बुद्धीमत्तेच्या प्रसिद्ध व्यक्तीच्या निवडक गोष्टी सांगाव्यात व त्याप्रमाणे या मोठ्या पदावर पोहोचण्यास त्या व्यक्तींना काय श्रम करावे लागले, किती अभ्यास करावा लागला, याची माहिती मुलांच्या मनावर परिणामकारकरीत्या रुजेल, असे पहावे. कठोर परिश्रमास पर्याय नाही याबद्दल त्यांच्या मनात संदेह राहू नये.
मुलाच्या मनावर हे बिंबवा की, स्वकर्माची फळे त्याला भोगायची असतात. आता अभ्यास केल्यास त्यालाच त्याचा पुढे सर्वांगीण फायदा होईल. कठोर, प्रामाणिक परिश्रम करणाऱ्यांच्या पाठीशी देव सदैव उभा रहातो, हे मुलांच्या मनावर बिंबवले पाहिजे.
अभ्यास सोपा करून सांगण्यासाठी वेगवेगळया साधनांची मदत घ्या !
जेवढे मूल वयाने लहान तेवढे निरनिराळया गोष्टी किंवा योग्य ती उदाहरणे देऊन विषय सोपा करून अभ्यासाविषयी आवड निर्माण करणे महत्त्वाचे असते. १० ते १२ वर्षे वयाच्या मुलांमध्ये अमूर्त कल्पनेचा विकास झालेला नसतो व त्यामुळे बीजगणितातील `क्ष’ म्हणजे नेमके काय याचे त्यांना आकलन होत नाही.
२ – ४ गोट्या, पेन्सिली किंवा लाकडी ठोकळयांचा उपयोग करणे महत्त्वाचे असते. मधून-मधून मुलाला विषयाचे आकलन होत आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. गणित, विज्ञान यांसारख्या विषयांचा पाया पक्का करणे पालकांना जमत नसेल, तर त्यासाठी अनुभवी शिक्षकाची मदत घेणे योग्य होय.
जर मूल नापास झाले असेल, तर त्याला वरच्या वर्गात ढकलण्याचा प्रयत्न करू नका. कारण जर त्याच्या अभ्यासाचा पायाच जर मुळात कच्चा राहिला असेल, तर वरच्या वर्गाच्या वाढलेल्या अभ्यासात तो आणखीनच मागे पडेल. जर मूल नापास झाले असेल, तर त्याला रागावू नका. वारंवार रागावल्याने मुलाचे अभ्यासातील लक्ष आणखीनच कमी होऊन तो अभ्यास करणे सोडून देईल. त्याला सहानुभूतीने वागवून त्याच्या नापास होण्याची कारणमीमांसा करून त्यात सुधारणा करू शकतो.
घरातील वातावरण अभ्यास करण्यास पुरक ठेवा !
चांगला अभ्यास होण्यासाठी घरातील वातावरण खेळीमेळीचे, विश्वासपूर्ण, शांत व अभ्यास करण्यास उत्तेजक असले पाहिजे. प्राचीन काळी मुलांना विद्या संपादन करण्यासाठी आश्रमांत पाठवले जात असे व असे आश्रम गावापासून दूर एकांतात, शांत, प्रसन्न वातावरणात असत. आताच्या बदललेल्या शिक्षणपद्धतीमुळे पालकांवरील जबाबदारी जास्तच वाढली आहे. म्हणून पालकांनी घरातील वातावरण शांत, खेळीमेळीचे व अभ्यासास उत्तेजन मिळेल अशा प्रकारचे ठेवण्यासाठी जागरूक असले पाहिजे.
मूल अभ्यास करत असतांना रेडिओ किंवा दूरदर्शन लावू नये. मुलांसमोर आई-वडिलांनी एकमेकांशी भांडण करू नये. तसेच हातातले काम सोडून अथवा स्वयंपाक करता करता रस्त्याने जाणारी लग्नाची वरात पहाण्यासाठी धावू नये, कारण तुमच्या पाठोपाठ तुमचे मूलही अभ्यास अर्धवट सोडून तुमच्याप्रमाणेच लग्नाची वरात पहाण्यासाठी धावेल. जर तुम्हाला स्वत:ला वरात पहाण्याचा मोह टाळता येत नसेल, तर तुमच्या मुलाने तोच मोह टाळून अभ्यास करीत बसावे, ही अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. थोडक्यात म्हणजे मुलाचा अभ्यास चांगला व्हावा, असे वाटत असेल, तर घरातले वातावरण आश्रमासारखेच व्हायला हवे.
मध्येच केव्हातरी मुलाला त्याच्या अभ्यासाविषयी विचारण्यापेक्षा दररोज थोडा वेळ त्याला शिकवावे. जर तुमचा मुलगा महाविद्यालयात जात असेल व त्याचे विषय तुम्हाला शिकवता येत नसतील, तर निदान रात्री मुलगा अभ्यास करीत असतांना मुलाबरोबर काहीतरी उपयोगी असे, उदा. गीता, ज्ञानेश्वरी, संतांची चरित्रे यांसारखे वाचन करावे व त्याची स्वत: टिपणे काढावीत. तुमच्या मुलाला किंवा मुलीला सोबत मिळेल व आई-वडीलही अभ्यास करीत आहेत, याची जाणीव त्याला होईल. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, की मुले ही अनुकरणप्रिय असतात.
एखादा परिच्छेद वाचून मग एक-दोन ओळीत त्यातील महत्त्वाचे मुद्दे लिहिण्याची सवय मुलांना लावावी व नंतर संपूर्ण धडाच संक्षिप्त करून मुख्य मुद्यांची मांडणी करावी. साधारणत: एखाद्या विषयावर मन एकाग्र करून अभ्यास सतत ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ करणे अवघड असते. त्यामुळे मुलाला थोडा वेळ मध्ये विश्रांती घेऊ द्यावी किंवा विषय बदलण्यास सांगावे.
केवळ जास्त तास अभ्यास करणे हा खरा अभ्यास नव्हे. एकाग्रतेने ३ ते ४ तास वाचन-मनन केले, तर तो खरा अभ्यास होय. काही वेळा मुलांना आवडणाऱ्या देवाचे चित्र त्याच्या अभ्यासाच्या टेबलावर ठेवल्याने मुलांत आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होते. मन एकाग्र करण्यास ध्यान धारणेचाही पुष्कळ उपयोग होतो.
Wednesday, 14 December 2016
वारे
*मुलाना online दाखवा जगभरात वारे कसे वाहतात*
कुठल्याही browser मध्ये type
search झाल्यावर पृथ्वीवरील भारतातील चेन्नई परीसर zoom करा...
*वरदा* ह्या वादळाचे तुफाणी दृश्य पहा...
सोबतच जगभरात वारे कसे वाहतात.हे हि आपण पाहु शकतो..जगातील प्रत्येक ठिकाणचा वारे वाहण्याचा वेग वेगळा आहे...
*चेन्नई* ला सध्या जोरात वार्याचा तडाखा बसत आहे..
link
http://earth.nullschool.net
Tuesday, 13 December 2016
माझा स्वप्नातील शाळा
असावी सुंदर अशी एक शाळा
ओढ लागे जिची प्रत्येक बाळा
असावा असा एक गुरु
ज्ञानदानाचा असे तो कल्पतरू
मनुष्याला माणूस म्हणून जगायला शिकवते ती संस्था म्हणजे शाळा. शाळा आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे . आपण शिकतो ती शाळा किंवा शिकलो ती शाळा आठवत नाही अस कुणी म्हणणार नाही. आपली शाळा प्रयेकाला आठवत असते . शाळेत केलेल्या गमती जमती , अन छान अंगणात , माळरानावर, किंवा दिव्याजवळ बसून केलेला अभ्यास सर्वाना आठवत असेल. माझ्या लहानपणी जि.प. च्या शाळेत शिकत असतानाच्या अनेक गोष्टींची आज आठवण येते . पहिलीच्या वर्गात बसताना डोळ्यातून गंगा जमुना वाहत असायच्या ते आजही चांगल आठवतंय . माझा पहिलीच्या वर्गात बसायला न जाता मी रोज माझ्या ताईच्या वर्गात बसायचो . अन मग माझा वर्गशिक्षिका सौ.लुबिना म्याडम मला उचलून माझा वर्गात नेत. त्यावेळी जर त्यांनी मला माझा वर्गाची ओढ लावली नसती तर कदाचित आज शाळेविषयी इतकी आपुलकी मला वाटली नसती. मी आज जे काही आहे त्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि म्हणूनच आज २५ वर्षानंतरही त्यांना मी विसरलो नाही.
आज काळ बदलतोय , शाळाही बदलत आहेत. पूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या शाळा आणि आजच्या खाजगी शाळा ... खूप तफावत निर्माण झालीय. मला २५ वर्षानंतरही आठवणाऱ्या माझा वर्गशिक्षिका आजच्या विद्यार्थ्यांना पाच वर्षातच विसरायला होतात. कदाचित आजच जीवनमान गतीने चालू आहे हे कारण असेलही ,
पण ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवलं ज्यांनी आपल्याला चांगल्या वाईटाची ओळख करून दिली त्यांना आपण कसकाय विसरू शकतो हे मोठ कोडं आहे.
असो मला फक्त इतकच म्हणायचं आहे , आपल्याला सन्मार्ग दाखवणाऱ्या शाळेला व शाळेतील शिक्षकांना कधीच विसरू नका .
Wednesday, 7 December 2016
गणितीय सूत्रे
गणित : महत्त्वाची सूत्रे
मूळ संख्या- फक्त त्याच संख्येने किंवा १ नेपूर्ण भाग जाणारी संख्या,
सम संख्या - २ ने पूर्ण भाग जाणारी संख्या,
विषम संख्या - २ ने भाग न जाणारी संख्या,
जोडमूळ संख्या- ज्या दोन मूळ संख्यांत केवळ२ चा फरक असतो,
संयुक्त संख्या - मूळसंख्या नसलेल्या नैसर्गिकसंख्या.
संख्यांचे प्राथमिक क्रियाविषयक नियम
A)समसंख्या + समसंख्या= समसंख्या.
B)समसंख्या - समसंख्या= समसंख्या.
C)विषमसंख्या - विषमसंख्या = समसंख्या.
D)विषमसंख्या + विषमसंख्या= समसंख्या
E)समसंख्या × समसंख्या = समसंख्या.
F)समसंख्या × विषम संख्या = समसंख्या.
G)विषमसंख्या × विषमसंख्या= विषमसंख्या.
एक अंकी एकूण संख्या ९ आहेत तर दोन अंकी ९०,तीन अंकी ९०० आणि चार अंकी एकूण संख्या ९००० आहेत.
० ते १०० पर्यंतच्या संख्यांत-
।) २ पासून ९ पर्यंतचेअंक प्रत्येकी २० वेळा येतात.
।।) १ हा अंक २१ वेळा येतो.
।।।) ० हा अंक ११ वेळा येतो.
१ ते १०० पर्यंतच्या संख्यांत-
।) २ पासून ९ पर्यंतचे अंक असलेल्या एकूणसंख्या प्रत्येकी १९ येतात.
।।) दोन अंकी संख्यात १ ते ९ या अंकांच्याप्रत्येकी १८ संख्या असतात.
दोन अंकांमधून एकूण २ संख्या,तीन अंकांमधून एकूण ६ संख्या,चार अंकांमधून एकूण २४ संख्या व पाच अंकांमधून एकूण १२० संख्या तयार होतात.
विभाज्यतेच्या कसोटय़ा
A)२ ने नि:शेष भाग जाणारी संख्या -संख्येच्या एककस्थानी ०, २, ४, ६, ८ यापैकीकोणताही अंक असल्यास.
B)३ ची कसोटी-संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला ३ ने नि:शेषभाग जात असल्यास.
C)४ ची कसोटी-संख्येच्या शेवटच्या २ अंकांनी तयार होणाऱ्यासंख्येला ४ ने नि:शेष भाग जात असल्यासअथवा संख्येच्या शेवटी कमीतकमी दोन शून्यअसल्यास.
D)५ ची कसोटी-संख्येच्या एकक स्थानचा अंक जर ० किंवा ५असल्यास.
E)६ ची कसोटी-ज्या संख्येला २ व ३ या अंकांनी नि:शेष भागजातो त्या संख्यांना ६ ने नि:शेष भाग जातोचकिंवा ज्या सम संख्येच्या अंकांच्या बेरजेला ३ने भाग जातो त्या संख्येला ६ ने निश्चित भाग जातो.
F)७ ची कसोटी-संख्येतील शेवटच्या ३ अंकांनी तयारहोणाऱ्या संख्येतून डावीकडील उरलेल्याअंकांनी तयार झालेली संख्या वजा करूनआलेल्या संख्येस ७ ने नि:शेष भाग गेल्यास त्यासंख्येला ७ ने नि:शेष भाग जातो.
G)८ ची कसोटी-संख्येतील शेवटच्या तीन अंकांनीतयार होणाऱ्या संख्येला ८ ने निशेषभाग जातअसल्यास किंवा संख्येत शेवटी कमीतकमी ३शून्य असल्यास त्या संख्येला ८ ने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या शतकस्थानी २ हा अंकअसतो व जिच्या अखेरच्या दोन अंकी संख्येला ८ने भाग जातो त्या संख्येला ८ ने भाग जातो.
H)९ ची कसोटी-संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला९ ने निशेषभाग जातो.
I)११ ची कसोटी-ज्या संख्येच्या विषम स्थानच्याया समस्थानच्या अंकांची बेरीज अथवा ११च्यापटीत असल्यास त्या संख्येला ११ ने निशेष भागजातो. एक सोडून १ अंकांची बेरीज समान असते किंवा फरक ० किंवा ११ च्या पटीत असतो.
J)१२ ची कसोटी-ज्या संख्येला ३ व ४या अंकांनी निशेष भाग जातो त्या संख्येला १२ ने भाग जातो.
K)१५ ची कसोटी-ज्या संख्येला ३ व ५ अंकानी निशेष भाग जातोत्या संख्येला १५ ने भाग जातो.
L)३६ ची कसोटी-ज्या संख्येला ९ व ४ ने निशेष भाग जातो त्या संख्येला ३६ ने भाग जातो.
M)७२ ची कसोटी-ज्या संख्येला ९ व ८ ने निशेषभाग जातो त्या संख्येला ७२ ने भाग जातो.
लसावि - लघुत्तम सामाईक विभाज्य संख्या:
दिलेल्या संख्यांनी ज्या लहानात लहानसंख्येला पूर्ण भाग जातो ती संख्या
मसावि - महत्तम सामाईक विभाजक संख्या:
दिलेल्या संख्यांना ज्या मोठय़ात मोठय़ा संख्येने(विभाजकाने) भाग जातो ती संख्या
प्रमाण भागिदारी
A)नफ्यांचे गुणोत्तर= भांडवलांचे गुणोत्तर ×मुदतीचे गुणोत्तर,
B)भांडवलांचे गुणोत्तर= नफ्यांचे गुणोत्तर+मुदतीचे गुणोत्तर,
C)मुदतीचे गुणोत्तर = नफ्यांचे गुणोत्तर ÷ भांडवलाचे गुणोत्तर.
गाडीचा वेग-वेळ-अंतर
A) खांब ओलांडण्यास गाडीला लागणारा वेळ =गाडीची लांबी ÷ ताशी वेग × १८/५
B) पूल ओलांडताना गाडीला लागणारा वेळ =गाडीची लांबी + पुलाची लांबी ÷ताशी वेग × १८/५
C) गाडीचा ताशी वेग=कापावयाचे एकूण अंतर ÷ लागणारा वेळ ×१८/५
D) गाडीची लांबी=ताशी वेग × खांब ओलांडताना लागणारावेळ × ५/१८
E) गाडीची लांबी + पुलाची लांबी = ताशी वेग× पूल ओलांडताना लागणारा वेळ + ५/१८
F) गाडीचा ताशी वेग व लागणारा वेळ काढताना १८/५ ने गुणा व अंतर काढताना ५/१८ ने गुणा
G) पाण्याच्या प्रवाहाचा ताशी वेग=नावेचा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग - प्रवाहाच्याविरुद्ध दिशेने ताशी वेग ÷ २
सरासरी
A) X संख्यांची सरासरी= दिलेल्या संख्येची बेरीजभागिले X
B) क्रमश:संख्याची सरासरी ही मधली संख्या असते.
C) X संख्यामान दिल्यावर ठराविक संख्यांची सरासरी =(पहिली संख्या+शेवटची संख्या) ÷ X
D) X या क्रमश: संख्याची बेरीज =(पहिली संख्या + शेवटची संख्या) ×X÷ २
सरळव्याज
A)सरळव्याज=मुद्दल × व्याजदर × मुदत ÷१००
B)मुद्दल=सरळव्याज × १०० ÷ व्याजदर × मुदत
C)व्याजदर =सरळव्याज × १०० ÷ मुद्दल × मुदत
D)मुदत वर्षे=सरळव्याज×१००÷ मुद्दल×व्याजदर=>
नफा-तोटा
A)नफा =विक्री- खरेदी,
B)विक्री = खरेदी + नफा,
C)खरेदी = विक्री+ तोटा,
D)तोटा = खरेदी - विक्री
E)शेकडा नफा=प्रत्यक्ष नफा × १००÷ खरेदी
F)शेकडा तोटा = प्रत्यक्ष तोटा × १०० ÷खरेदी
G)विक्रीची किंमत = खरेदीची किंमत×(१००+शेकडा नफा) ÷१००
H)खरेदीची किंमत =(विक्रीची किंमत ×१००)÷(१००+ शेकडा नफा)
Saturday, 26 November 2016
भारताचे संविधान
🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷 *🌹भारताचे संविधान*🌹
🌿 *आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:*
*सामाजिक, आर्थिक, व राजनैतिक न्याय:*
*विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य: दर्जाची व संधीची समानता:*
*निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता:*
*प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन*
*आमच्या संविधान सभेस आज*
*दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करीत आहोत*🌿
*भारतीय राज्यघटनेची वैशिष्टे :-*
*(१) लिखित घटना*
भारताची राज्यघटना लिखित स्वरुपाची आहे. राज्यकारभाराबाबतचे नियम, कोणाचे काय अधिकार व कर्तव्य याबाबतची माहिती राज्यघटनेत देण्यात आली आहे. घटना लिखित असली तरी काही अलिखित परंपरा पाळल्या जातात. उदा. एकच व्यक्ती तीन वेळा भारताचा राष्ट्रपती होऊ शकत नाही.
*(२) जगातील सर्वात मोठी विस्तृत राज्यघटना*
भारतीय राज्यघटना व्यापक व विस्तारित स्वरुपाची आहे. घटनेमध्ये ३९५ कलमे, ९ परिशिष्टे आहेत, केंद्र व प्रांत यांचे स्वरूप व अधिकार, न्यायव्यवस्थेचे अधिकार, निवडणूक आयोगाचे अधिकार, याची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. यामुळे भारतीय राज्यघटना जगातील इतर देशांच्या तुलनेत विस्तृत स्वरूपाची आहे.
*(३) लोकांचे सार्वभौमत्व*
घटनेनुसार जनता सार्वभैाम आहे. जनतेच्या हाती खरी सत्ता आहे. कारण जनता आपल्या प्रतिनिधीमार्फत राज्यकारभार चालविते. राष्ट्रप्रमुखाची (राष्ट्रपती) निवड जनता आपल्या प्रतिनिधीकरवी करते. निवडणुकीच्या माध्यमातुन जनता आपणास आवश्यक असा बदल घडवून आणू शकते. २६ जानेवारी १९५० पासून घटनेनुसार देशाचा राज्यकारभार सुरु झाला म्हणून २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो.
*(४) संसदीय लोकशाही*
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांनी लोकशाही शासनपध्दतीची मागणी केली होती. संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. लोकसभा व राज्यसभेची निर्मिती करण्यात आली. लोकसभेतील सदस्य पक्ष आपले मंत्रिमंडळ (कार्यकारीमंडळ) बनवतो. कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार आहे. लोकसभा, राज्यसभा व राष्ट्रपती मिळून भारतीय संसद निर्माण झाल्याचे दिसून येते.
*(५) संघराज्यात्मक स्वरूप*
भारतीय घटनेने संघराज्यात्मक शासनपध्दतीचा स्वीकार केला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात सत्तेचे विभाजन करण्यात आले. आहे. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांना आपआपले अधिकार देण्यात आले आहेत. मात्र आणीबाणीच्या वेळी भारतीय संघराज्याचे स्वरूप एकात्म झाल्याचे दिसून येते.
*(६) मूलभूत हक्क*
भारतीय राज्यघटनेत व्यक्तीच्या मूलभूत अधिकारावर भर देण्यात आला आहे. कलम १२ ते ३५ मध्ये मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्य समता शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क, धार्मिक स्वातंत्र्य संपत्तीचा हक्क, पिळवणुकिविरुध्द हक्क इ. महत्वपूर्ण हक्क व्यक्तीला देण्यात आलेले आहेत. हक्काबरोबरच व्यक्तीला काही कर्तव्यही पार पाडावी लागतात. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. घटनेत व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा समावेश हे घटनेचे महत्वाचे वैशिष्टे आहे.
*(७) धर्मनिरपेक्ष राज्य*
भारत हे धर्मातील राष्ट्र संबोधण्यात आले आहे. कोणत्याही विशिष्ट धर्माला राजाश्रय न देता सर्व धर्मांना समान लेखण्यात आले आहे. प्रत्येकाला आपआपल्या धर्माप्रमाणे प्रार्थना करण्याचा, आचरण ठेवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. सर्व धर्मीयांना समान लेखण्यात आले. असून धर्म, जात पंथ, याद्वारे भेदभाव न करता सर्वाना समान संधी देण्यात आली आहे.
*(८) एकेरी नागरिकत्व*
भारतात संघराज्यात्मक पध्दतीचा स्वीकार केलेला असूनही केंद्राचे व घटक राज्याचे असे वेगळे नागरिकत्व व्यक्तीस देण्यात आलेले नाही. प्रत्येक भारतीय यास संघराज्याचे नागरिकत्व देण्यात आलेले आहे. राष्ट्रीय ऐक्य वाढीस लागावे यासाठी एकेरी नागरिकत्वाची पध्दत स्वीकारण्यात आली आहे.
*(९) एकच घटना*
ज्याप्रमाणे एकेरी नागरिकत्वाच पुरस्कार करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणेच देशातील सर्व नागरिकांसाठी एकाच घटनेची तरतूद करण्यात आली आहे. घटक राज्यांना स्वतंत्र अशी घटना बनविण्याचा अधिकार नाही. घटक राज्यांना संघराज्याबाहेर फुटून निघण्याचा अधिकार नाकारण्यात आलेला आहे.
*(१०) राज्यघटना हीच सर्वश्रेष्ठ*
देशाचा सर्वोच्च कायदा म्हणजे त्या देशाची राज्यघटना होय. राज्यघटनेच्या सर्वश्रेष्ठत्वाला आव्हान देता येत नाही. राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायाधीश, मंत्री यांना राज्यघटनेची एकनिष्ठ राहण्याबाबत शपथ घ्यावी लागते.
*(११) जनकल्याणकारी राज्याची निर्मिती*
भारताचा राज्यकारभार जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फत चालतो. निवडणूक पध्दतीने निवडण्यात येतो. जनता आपणास हवे असणारे सरकार निर्माण करू शकते व हे सरकार जनकल्याणासाठी बांधील असते.
*(१२) मार्गदर्शक तत्वे*
व्यक्तीला मूलभूत हक्कांना कायदेशीर मान्यता असते. मूलभूत हक्कांची शासनाकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून पायमल्ली झाल्यास संबंधिताला न्यायालयात दाद मागता येते. मात्र मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत हे धोरण लागू पडत नाही. मार्गदर्शक तत्वे व्यक्तीला कल्याणासाठी असली तरी ती सरकारने पाळलीच पाहिजेत असे सरकारवर बंधन नसते. मार्गदर्शक तत्वे ही नावाप्रमाणे मार्ग दाखविण्यासाठी उपयुक्त ठरतात. भारतीय घटनेतील काही निवडक मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे (१) जीवनावश्यक गोष्टी सर्वाना मिळाव्यात (२) राज्यातील सर्वासाठी एकच मुलकी कायदा असावा (३) राज्यातील सर्व स्त्री -पुरुषांना समान वेतन असावे. (४) १४ वर्षाखालील सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण असावे (५) संपत्तीचे केंद्रीकरण होऊ नये (६) देशातील साधनसंपत्ती चे समाजहिताच्या दृष्टीने वाटप व्हावे. (७) दारुबंदी व इतर उपायांनी लोकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे.
(१४) स्वतंत्र न्यायालय व्यवस्था
लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी न्यायालयांना स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे. भारतास एकेरी न्यायव्यवस्था आहे. सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, जिल्हा, कोर्ट व इतर दुय्यम न्यायालये यांची एक साखळी निर्माण करण्यात आली आहे. न्याय व्यवस्थेवर राजकीय सत्तेचा दबाब येऊ नये यासाठी विधिमंडळ व कार्यकारीमंडळ यांच्या पासून न्यायमंडळाची व्यवस्था स्वतंत्र करण्यात आली आहे. न्यायाधीशांची नेमणूक बदली, बढती, पगार, या सर्व गोष्टींना संरक्षण देऊन न्यायाधीशांकडून कार्यक्षम व निपक्षपाती न्यायाची अपेक्षा करण्यात आली आहे.
(१५) राष्ट्रपती व त्यांचे आणीबाणीचे अधिकार
*भारताचा राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहे.* त्यांची निवड संसद सदस्य व विधानसभा सदस्यांकडून क्रमदेय निवड पध्दतीने होत असते. सर्व महत्वपूर्ण गोष्टी राष्ट्रपतींच्या नावे होत असल्या तरी प्रत्यक्षात मंत्रिमंडळाच्या हाती सत्ता केंद्रित झाली आहे. भारताच्या राष्ट्रपतीला कायदेविषयक अंमलबजावणीविषयक आर्थिक बाबीविषयी घटक राज्याविषयक, न्यायविषयक व संकटकाल विषयक अशा सहा प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत. भारतीय राष्ट्रपतीला मिळालेला संकटकाल विषयक अधिकार अत्यंत महत्वाचा आहे.
*(१३) हिंदी भाषेस राष्ट्रभाषेचा दर्जा*
भारतीय राज्यघटनेत भाषाविषयक धोरण स्पष्ट करण्यात आले आहे. अनुच्छेद ३४३ मध्ये स्पष्ट घोषणा करण्यात आली आहे की, भारत या संघराज्याची अधिकृत भाषा देवनागरीतील हिंदी ही राहील. प्रादेशिक राज्यकारभार ज्या त्या प्रादेशिक भाषेमधून चालविण्याबाबत घटनेत स्पष्ट करण्यात आले आहे. इंग्रजी एक जादा भाषा म्हणून राहील. आंतराष्ट्रीय व्यवहार व हिंदी समजू न शकणार्या राज्यांना केद्र सरकारशी व्यवहार करण्यासाठी इंग्रजीचा वापर करता येईल.
*(१४) प्रौढ मताधिकार*
भारतीय लोकशाहीने प्रौढ मतदार पध्दतीचा स्वीकार केलेला आहे. १८ वर्षावरील सर्व स्त्री पुरुषास मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. निवडणूक मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. लोकसंख्या व विस्ताराच्या दृष्टीने भारतासारख्या विशाल देशात प्रौढ मताताधिराने लोकशाहीचा प्रयोग राबविण्यात येत आहे. सनदी नोकरांच्या निवडीसाठी पब्लिक सर्व्हिस कमिशन (लोकसेवा अयोग मंडळ) ची स्थापना करण्यात आली.
🌿 *जगातील सर्वांत मोठे सार्वभौम व व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचे भारतीय संविधान*📚✍🌹

Friday, 25 November 2016
संविधान दिन घोषवाक्ये
-
२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करताना नक्की उपयोगी पडतील.
घोषवाक्य , घोषणा !
१. जब तक सूरज चाँद
तब तक संविधान
२. विवेक पसरवू जनाजनात
संविधान जागवू मनामनात
३. समता, बंधुता, लोकशाही
संविधानाशिवाय पर्याय नाही
४. कर्तव्य, हक्कांचे भान
मिळवून देते संविधान
५. संविधान एक परिभाषा है
मानवता की आशा है
६. संविधानावर निष्ठा
हीच व्यक्तीची प्रतिष्ठा
७. संविधानाची मोठी शक्ती
देई आम्हा अभिव्यक्ती
८. मिळून सारे देऊ ग्वाही
सक्षम बनवू लोकशाही
९. संविधानाची कास धरू
विषमता नष्ट करू
१०. सर्वांचा निर्धार
संविधानाचा स्वीकार
११. संधीची समानता
संविधानाची महानता
१२. संविधानाने दिले काय?
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय
१३. संविधान आहे महान
सर्वांना हक्क समान
१४. लोकशाही गणराज्य घडवू
संविधानाचे भान जागवू
१५. संविधानाचा सन्मान
हाच आमचा अभिमान
१६. भारत माझी माऊली
संविधान त्याची सावली
१७. श्रद्धा, उपासनेचे स्वातंत्र्य
हाच संविधानाचा मूलमंत्र
१८. नको ताई घाबरू
चल संविधान राबवू
१९. जर हवी असेल समता
तर मनात जागवू बंधुता
२०. सबसे प्यारा
संविधान हमारा
२१. अरे, डरने की क्या बात है?
संविधान हमारे साथ है
२२. संविधानाची महानता
विविधतेत एकता
२३. देशभरमे एकही नाम
संविधान! संविधान!
२४. समानता कशाची?
दर्जाची, संधीची
२५. अरे, सबके मुँह में एकही नारा
संविधान हमारा सबसे प्यारा
२६. लोकशाहीचा जागर
संविधानाचा आदर
२७. तुमचा आमचा एकच विचार
संविधानाचा करू प्रचार
२८. ना एक धर्म से, ना एक सोच से
ये देश चलता है संविधान से!
२९) दर्जाची, संधीची, समानता,
हीच संविधानाची महानता
३०) समानता संधींची,
संविधानाच्या गाभ्याची
३१) स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय,
हाच संविधानाचा हेतू हाय
३२) संविधानाची अफाट शक्ती,
मुक्तविचार अन् अभिव्यक्ती
३३) संविधान सर्वांसाठी,
हक्कासाठी, न्यायासाठी
३४) ऊठ, नागरिका, जागा हो,
संविधानाचा धागा हो
३५) जातीयतेच्या बेड्या तोडू,
संविधानाने भारत जोडू
३६) संविधान आपले आहे कसे ?
सर्वांना न्याय देईल असे
३७) संविधानाने दिला मान,
स्त्री-पुरुष एकसमान
३८) संविधानाचा विचार काय ?
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय
३९) संविधान देते समान पत,
एक व्यक्ती – एक मत
४०) घरात कोणत्याही धर्माचे,
समाजात मात्र संविधानाचे
४१) अत्याचार-जुलूम नष्ट करा,
संविधानाचा ध्यास धरा
४२) भारताचे संविधान,
भारतीयांचा सन्मान
४३) स्वातंत्र्य, समता, बंधुता,
संविधान सांगते एकात्मता
४४) वंचिताना देई उभारी,
भारतीय संविधान लय भारी
४५) बाबासाहेबांचे योगदान,
भारताचे संविधान
४६) लोकशाहीचे देते भान,
भारतीय संविधान
४७) भारताचा अभिमान,
संविधान ! संविधान !
४८) समाजाला जागवू या,
संविधान रुजवू या
४९) सर्वांना देई दर्जा समान,
संविधानाचे काम महान
५०) संविधानाचे आश्वासन,
सर्वांना कायद्याचे संरक्षण
५१) आपला देश, आपले सरकार,
संविधानाने दिला अधिकार
५२) संविधान भारताचा आधार,
कुणी नसेल निराधार
५३) हक्क बजावू, कर्तव्य पाळू
प्राणपणाने संविधान सांभाळू
५४) संविधानाची हीच ग्वाही,
उच्च-नीच कोणी नाही
५५) नको राजेशाही, नको ठोकशाही,
संविधानाने दिली लोकशाही
५६) भारताचे एकच विधान,
संविधान ! संविधान !
Tuesday, 22 November 2016
मराठी वाचन लेखन सराव भाग ४
शारदा विद्यामंदिर
प्राथमिक अनगांव
मराठी वाचन लेखन सराव २०१६/१७
प्र. जोडया लावून तयार
झालेला शब्द लिहा .
१) का a) ना उत्तरे :-
१) ............................
२) मा b) दी २) .............................
३) बा c) दा
३) .............................
४) ना d) बा
४) ............................
५) दा e) का
५) ............................
६) दी f) मा
६) ............................
प्र. खाली दिलेल्या
अक्षरांवरून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करून लिहा.
१) घ , र , स =
घर , रस, सर
२) ळ, न , पा = ----------------------------------
३) ब, र , स= ----------------------------------
४) वे , स, के,
ळ = ----------------------------------
५) का, न, म,
र, ग = ----------------------------------
प्र. खालील अक्षरांना ‘ ै ’ हे चिन्ह जोडा व तयार होणारे
अक्षर त्यापुढील शब्दाच्या
सुरुवातीला लिहा.
१) ब +
ै = बै - बैल
२) क + ै
= ------- - ......री
३) म + ै = ------- -
......ना
४) स + ै = ------- -
......निक
५) प + ै
= ------- - ......सा
प्र. खालील अक्षरांना ‘ ौ ’ हे चिन्ह जोडा व तयार होणारे
अक्षर त्यापुढील शब्दाच्या
सुरुवातीला लिहा.
१) च + ौ =
चौ चौदा
२) अ + ौ =
......... ..............
३) ग + ौ =
......... ..............
४) अ + ौ =
......... ..............
५) क + ौ = .........
.............
@ विवेक शेळके
मराठी वाचन लेखन सराव भाग ३
शारदा विद्यामंदिर
प्राथमिक अनगांव
मराठी वाचन लेखन सराव २०१६/१७
प्र. वाचा आणि लिहा .
ब
--------------------------------------------------------------------------------------
भ
-------------------------------------------------------------------------------------
म
-------------------------------------------------------------------------------------
य
-------------------------------------------------------------------------------------
र
--------------------------------------------------------------------------------------
ल--------------------------------------------------------------------------------------
व
--------------------------------------------------------------------------------------
श--------------------------------------------------------------------------------------
ष
--------------------------------------------------------------------------------------
स--------------------------------------------------------------------------------------
ह---------------------------------------------------------------------------------------
ळ--------------------------------------------------------------------------------------
क्ष--------------------------------------------------------------------------------------
ज्ञ--------------------------------------------------------------------------------------
प्र. खाली दिलेल्या
अक्षरांची बाराखडी पूर्ण करा.
१) ग-------------------------------------------------------------------------------------------
२) ठ-------------------------------------------------------------------------------------------
३) त-------------------------------------------------------------------------------------------
४) प-------------------------------------------------------------------------------------------
५) व-------------------------------------------------------------------------------------------
@ विवेक शेळके
मराठी वाचन लेखन सराव भाग २
शारदा विद्यामंदिर
प्राथमिक अनगांव
मराठी वाचन लेखन सराव २०१६/१७
प्र. वाचा आणि लिहा .
क का
कि की कु
कू के कै
को कौ कं
कः
ख
-----------------------------------------------------------------------------------
ग
-----------------------------------------------------------------------------------
घ
------------------------------------------------------------------------------------
च
------------------------------------------------------------------------------------
छ
------------------------------------------------------------------------------------
ज
------------------------------------------------------------------------------------
झ
------------------------------------------------------------------------------------
ट
-------------------------------------------------------------------------------------
ठ
-------------------------------------------------------------------------------------
ड
-------------------------------------------------------------------------------------
ढ
-------------------------------------------------------------------------------------
ण
-------------------------------------------------------------------------------------
त
-------------------------------------------------------------------------------------
थ--------------------------------------------------------------------------------------
द
--------------------------------------------------------------------------------------
ध
-------------------------------------------------------------------------------------
न
-------------------------------------------------------------------------------------
प
-------------------------------------------------------------------------------------
फ
-------------------------------------------------------------------------------------
@ विवेक शेळके
मराठी वाचन लेखन सराव भाग १
शारदा विद्यामंदिर
प्राथमिक अनगांव
मराठी वाचन लेखन सराव २०१६/१७
प्र . रिकाम्या जागा भरा.
अ ......... इ ........... .............
ऊ
ऋ .............. ऐ ............
............. अं अः
प्र. रिकाम्या जागा भरा.
१) क
............ ग .............
२) च
............ ज .............
३) ड
............ ण ............
४) द
............ न .............
५) ष
............ ह .............
प्र. खालील शब्दातील ल, ठ, ए या अक्षरांखाली रेघ ओढा.
१) पालवी २) गाठ
३) एकाकी ४) कलम
५) ठराव ६) पाठ
७) एक ८) लसूण
९) पालखी १०) एकता
प्र. खालील शब्द वाचा व
लिहा .
मगर खळबळ दिवा सनई
................... .................... ................... ...................
वही
विमान मिरची जेवण
.................. .................... ...................... ....................
खोड चौकोन बंदूक सायकल
................... ..................... ..................... ....................
गाजर कढई बाहुली वासरू
................. ................... ................... ....................
@ विवेक शेळके
Subscribe to:
Posts (Atom)