आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Wednesday 15 January 2014

महिला सबलीकरण

महिला सबलीकरण म्हणजे स्त्रियांचे आध्यात्मिक, राजनैतिक, सामाजिक किंवा आर्थिक सामर्थ्‍य वाढविणे. यामध्‍ये त्‍यांच्या स्‍वत:च्‍या क्षमतांसंबंधी त्‍यांचा आत्‍मविश्वास विकसित करण्‍याच्‍या अधिकाराचा समावेश आहे. सबलीकरणामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:

* स्‍वत: निर्णय घेण्‍याचे सामर्थ्‍य
* योग्‍य निर्णय घेण्‍यासाठी माहिती आणि इतर साधने वापरास उपलब्ध असणे
* निवड करण्यासाठी विस्‍तृत पर्याय असणे (फक्‍त हो/नाही, किंवा/तर - असे नाही)
* सामूहिक निर्णय घेतांना दृढ निश्‍चय घेण्‍याची योग्यता
* परिवर्तन घडवून आणण्‍याच्‍या योग्‍यतेबाबत सकारात्मक विचारसरणी
* वैयक्तिक किंवा सामूहिक सामर्थ्‍यामध्‍ये सुधारणा घडविण्‍याचे कौशल्‍य आत्‍मसात करण्‍याची योग्यता
* लोकशाही पध्‍दतीने इतरांचे दृष्टिकोन बदलण्‍याची योग्यता
* अखंड आणि स्‍व-पुरस्‍कृत विकास प्रक्रिया आणि परिवर्तनात सहभाग घेणे
* स्‍वत:ची सकारात्मक प्रतिमा तयार करणे आणि नकारात्मक गोष्टींवर ताबा मिळविणे

No comments: