आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Thursday, 3 January 2013

सोलापूर- एक ऐतिहासिक वारसा

इतिहास
  • सोलापूरला एक ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे. .. पूर्व २०० वर्षापासून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, अहमदनगरची निजामशाही, आदिलशाही, मराठे-पेशवे ब्रिटिश या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्याने अनुभवल्या. यादवांच्या काळात या भागाला सोन्नलगी म्हटले जात होते. मुघल राजवटीत यास संदलपूर असेही म्हटले जात होते. ब्रिटिश काळात सोलापूर हे नाव रूढ झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. सोलापूरचा इतिहास रोमांचक आहे. मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय पातळीवरील सर्व राजकीय-सामाजिक घडामोडींचे पडसाद सोलापूमध्ये उमटत असत. पहिल्या महायुद्धानंतर भारतात कामगारांनी मोठा संप पुकारला. सोलापूरलाही जानेवारी, १९२० मध्ये कामगारांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात संप पुकारला होता.१९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीत सोलापूरकर हिरिरीने सहभागी झाले होते. या सत्याग्रहात दारुबंदीचा प्रचार करण्यासाठी काही तरुण कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. या वेळी शंकर शिवदारे हा तरुण तिरंगा हातात घेऊन पुढे धावला ब्रिटिशांच्या गोळीबारात बळी पडला. हा शंकर शिवदारे सोलापूरचा पहिला हुतात्मा. या हौतात्म्यामुळे सोलापूरकर पेटून उठले. पण दि. , मे, १९३० या दोन दिवसांत तत्कालीन कलेक्टर नाईट याने जमावांवर अमानुष गोळीबार केला. अनेक नागरिक गोळीबारात बळी पडले. या आंदोलनादरम्यान दि.,१०,११ मे, १९३० असे तीन दिवस सोलापूर ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली नव्हते, मुक्त होते. भारतातील (काही काळासाठी) ‘स्वतंत्रझालेला असा हा पहिला भाग! मे- जून, १९३० मध्ये सुमारे ४९ दिवस मार्शल लॉ हा कायदा सोलापूरला लागू होता. या काळात सोलापूरच्या निरपराध युवकांना फाशी देण्यात आले. अब्दूल कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा जगन्नाथ शिंदे हे सोलापूरचे युवक दि. १२ जानेवारी, १९३१ रोजी धीरोदात्तपणे फासावर चढले. या प्रेरणादायी क्रांतिपर्वामुळेच सोलापूरला हुतात्म्यांचे शहर म्हटले जाते. पुतळ्यांच्या माध्यमातून आज या हुतात्म्यांची स्मृती सोलापुरात जतन करण्यात आली आहे. १९३०-३१ मधील या घटनांचे संदर्भ तत्कालीनकेसरीमध्ये आढळतात.१२ जानेवारी १९३१ रोजी या लढ्यातील चार वीर फाशी गेले. आजही तो दिवस सोलापूरकर हुतात्मा दिन म्हणून पाळतात. तसेच पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचा जिल्हा; सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलगू, कन्नड मराठी असा भाषा-त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे. पर्यटन, फलोत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग, शिक्षण, आरोग्यसेवा कापड उद्योग (हातमाग, यंत्रमाग) या क्षेत्रांमध्ये जिल्ह्याचा विकास साधण्याची क्षमता निश्र्चितच आहे.
नाव
"सोलापूर" ह्या नावाचा उगम 'सोला (सोळा)' आणि 'पूर (गावे)' या दोन शब्दापासून झाला आहे. असे मानले जाते की, सध्याचे सोलापूर शहर हे अहमदपूर, आदिलपूर, काळजापूर, खडारपूर, खान्देरवाडी, चपळदेव, जामदारवाडी, फतेहपूर, मुहम्मदपूर, राणापूर, शेखपूर, सन्दलपूर, सोनापूर सोन्नलगी, सोलापूर आणि वैदकवाडी ह्या सोळा गावांपासून बनले आहे.
भूगोल
उपनगरे
सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १४८४४. चौरस किलोमीटर आहे.सोलापुरातील सरासरी पर्जन्यमान ५४५. मिलिमीटर (महाराष्ट्रातील सर्वात कमी) आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ३८,४९,५४३(.. २००१) आहे. भीमा नदी जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. जिल्ह्यात डोंगराळ भाग जवळजवळ नाही.
सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेस अहमदनगर उस्मानाबाद; पूर्वेला उस्मानाबाद, दक्षिणेस सांगली विजापूर जिल्हा (कर्नाटक) तर पश्र्चिमेस सांगली, सातारा पुणे हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या उत्तर, ईशान्य पूर्व भागात बालाघाटच्या डोंगररांगा आहेत. तसेच पश्र्चिम नैर्ऋत्य या भागांत महादेवाचे डोंगर आहेत. जिल्ह्याचा इतर भाग सपाट, पठारी आहे. या जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण कोरडे आहे, तसेच थोडे विषमही आहे. काही भागांत उन्हाळ्यात कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाते.
जिल्ह्यात वायव्येकडून आग्नेयेकडे वाहणारी भीमा नदी जिल्ह्याचे दोन भाग करते. भीमेची जिल्ह्यातील लांबी सुमारे २९० कि.मी. आहे. भीमा पंढरपूर येथे चंद्रभागा या नावाने ओळखली जाते. नीरा-भीमा संगम माळशिरस तालुक्यात, तर भीमा-सीना संगम दक्षिण सोलापूर तालुक्यात हत्तरसंग-कुडल येथे होतो. जिल्ह्यातून सीना, नीरा, भोगावती, हरणी, बोटी, माण या छोट्या-मोठ्या नद्या वाहतात.
सोलापूर-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर माढा तालुक्यात उजनी येथे भीमा नदीवर धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या पश्र्चिम मध्य भागांत पाणीपुरवठा सुलभतेने होतो. १९८० मध्ये बांधून पूर्ण झालेल्या उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंतसागर असे म्हटले जाते. शेतीसाठी सिंचन, पिण्यासाठी पाणी, उद्योगांना पाणी, साखर कारखान्यांना पाणी, विद्युतनिर्मिती असे अनेक उद्देश साध्य करणारा हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या धरणाच्या परिसरात फ्लेमिंगो (रोहित) पक्षी आढळतात. भीमा-सीना जोडकालव्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यांना लाभ होतो. भीमा-सीना बोगदा हा आशिया खंडातील सर्वांत मोठा(?) बोगदा आहे. उजनी धरणातून या बोगद्याद्वारे सीना नदीत पाणी सोडले जाते. याचबरोबर जिल्ह्यात सहा () मध्यम पाणीप्रकल्प आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यात एकरूखे (हिप्परगी) तलाव आहे. याचाही फायदा आसपासच्या भागांतील लोकांना होतो.
मुख्य उपनगरे -
  • सोलापूर
  • माढा
  • कुर्डूवाडी
  • पंढरपूर
हवामान
हवामान तपशील: Solapur
महिना
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर
वर्ष
सरासरी कमाल °सेफॅ)
30.9
(87.6)
34.0
(93.2)
37.4
(99.3)
39.7
(103.5)
40.1
(104.2)
35.0
(95)
31.7
(89.1)
31.0
(87.8)
31.8
(89.2)
32.5
(90.5)
31.0
(87.8)
30.0
(86)
३३.७६
(
९२.७७)
सरासरी किमान °सेफॅ)
16.0
(60.8)
18.0
(64.4)
21.6
(70.9)
24.8
(76.6)
25.3
(77.5)
23.4
(74.1)
22.4
(72.3)
21.9
(71.4)
21.6
(70.9)
20.9
(69.6)
17.9
(64.2)
14.9
(58.8)
२०.७३
(
६९.३१)
वर्षाव मिमी (इंच)
2.2
(0.087)
4.6
(0.181)
3.8
(0.15)
11.2
(0.441)
36.9
(1.453)
111.5
(4.39)
138.8
(5.465)
137.3
(5.406)
179.8
(7.079)
97.4
(3.835)
23.2
(0.913)
4.8
(0.189)
७५१.
(
२९.५८७)
संदर्भ: IMD


मतदारसंघांच्या पुनर्रचनेनुसार सोलापूर जिल्ह्यात एकूण लोकसभा ११ विधानसभा मतदारसंघ आहेत. तसेच ६८ जिल्हा परिषद मतदारसंघ १३६ पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
लोकसभा मतदारसंघ () : सोलापूर, माढा माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, सांगोले, माळशिरस या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून सातारा जिल्ह्यातील माण फलटण या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. बार्शी हा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे.
विधानसभा मतदारसंघ (११) : मोहोळ, उत्तर सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर शहर, मध्य सोलापूर शहर, अक्कलकोट, पंढरपूर , करमाळा, माढा, सांगोले, माळशिरस, बार्शी.


 रंगभूमी
सोलापूर मध्ये "हुतात्मा स्मृति मंदिर" हे नाट्य गृह आहे. शहराच्या केंद्र स्थानी असलेल्या या नाट्य गृहात वेगवेगळे नाटकाचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात.
 चित्रपट
सोलापूर हे कर्नाटक Aandhra pradeshacya सीमेवर असल्यामुळे येथे मराठी बरोबरच तेलगू कन्नड चित्रपट पण प्रदर्शित होतात. हिन्दी चित्रपटांची जास्त चलती होते. प्रख्यात अभिनेते अतुल कुलकर्णी यांचे बालपण शिक्षण सोलापूर मध्ये झाले आहे.
 धर्म-अध्यात्म
शहर हे कर्नाटक वा आंध्र प्रदेश च्या सीमेलगत असल्याने येथे विविध धर्माचे लोग आढळून येतात.
 शिक्षण
आज सोलापूर शहर शैक्षणिकदृष्ट्या एक उत्तम केंद्र बनू पाहत आहे. एक जिल्हा-एक विद्यापीठ या योजनेतील विद्यापीठ सोलापूर येथे निर्माण करण्यात आले आहे. सोलापूर विद्यापीठाची स्थापना ऑगस्ट, २००४ मध्ये झाली. या अंतर्गत आज जिल्ह्यात एकूण ६१ विविध प्रकारची महाविद्यालये आहेत. त्यांपैकी सुमारे ३५ महाविद्यालये सोलापूर शहरात आहेत. शहरात वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विधी, समाजसेवा, उद्यानविद्या, स्थापत्यशास्त्र, शिक्षणशास्त्र, वस्त्रविद्या - अशा सर्व शाखांमधील शिक्षण उपलब्ध आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून, तसेच मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद या भागांतून आणि कर्नाटकातील बिदर, गुलबर्गा विजापूर या जिल्ह्यांतून शिक्षणासाठी विद्यार्थी सोलापूरला येत असतात.
खेळ
दिवंगत क्रिकेटपटू पॉली उम्रीगर यांच्या कारकिर्दीची सुरुवात सोलापुरात झाली पुढे ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले. नुकतीच (२००८ मध्ये) कु. अनघा देशपांडे हिची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. कु. अनघाने नुकत्याच झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
  • डॉक्टर नसीमा पठाण [ साहित्य शैक्षणिक क्षेत्र ]
  • Dr. द्वारकानाथ कोटणीस १९३८ मध्ये चीन ला पाठवलेल्या वैद्यांपैकी एक प्रसिद्ध वैद्य. (दुसरे सिनो - जपानी युद्ध)
  • सरदेशमुख – Academy award winner,
  • ..कुलकर्णी, निसर्ग तज्ञ , पक्षितज्ञ , १९७२ मध्ये महाडोक पक्ष्याचा शोध
 पर्यटन स्थळे
  • भुईकोट किल्ला
  • सिद्धेश्वर मंदिर
  • कंबर तलाव

No comments: