आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Thursday, 4 October 2012

Valvant

                                 वाळवंट

वाळवंट हे अनेक भौगोलिक रचनांपैकी एक असून पृथ्वीचा बराच भूभाग वाळवंटांनी व्यापला आहे. तथापि वाळवंट हा शब्द केवळ वाळूने व्यापलेल्या प्रदेशालाच लागू होत नाही तर इतर काही भौगोलिक रचनादेखील वाळवंट या संज्ञेत येतात.

प्रकार

वाळवंटांची दोन मुख्य प्रकारांमध्ये विभागणी करता येते.

उष्ण वाळवंटे

वाळूने व्यापलेला प्रदेश ही व्याख्या केवळ उष्ण वाळवंटांसाठीच लागू होते. नावाप्रमाणे उष्ण वाळवंटातील तापमान अतिउष्ण ते शीत या पट्ट्यात येते.

वैशिष्ट्ये

सर्वसाधारणपणे उष्ण वाळवंटाची पुढील वैशिष्टे सांगता येतील.
  • भौगोलिक वैशिष्ट्ये
  1. वाळूने व्यापलेला प्रदेश. वाळूच्या टेकड्या आणि त्यावरील वैशिष्ट्यपूर्ण अशा वळ्या
  2. हवेतील बाष्पाचे आणि जमिनीतील आद्रतेचे अत्यल्प प्रमाण
  3. वर्षभरातील पावसाची अत्यल्प सरासरी
  4. विषम तापमान (कमाल आणि किमान पातळीमधील फरक ३० ते ६० अंश सेल्सिअस पर्यंत)
  5. अत्यंत कमी वेळात निर्माण होणारी आणि नष्ट होणारी वाळूची प्रचंड वादळे
  6. दिवसा अत्यंत उष्ण अशी हवा आणि त्यामुळे होणारे परिणाम उदा. मृगजळ
  7. क्वचितच दिसणारे मरूस्थल किंवा ओऍसिस (Oasis)
  • जैविक वैशिष्ट्ये
अत्यंत विषम आणि प्रतिकूल वातावरणातही टिकून राहणाऱ्या वनस्पती आणि प्राणी हे वाळवंटाचे एक जैविक वैशिष्ट्य.
  1. निवडुंग कुटुंबातील व ताड कुटुंबातील (उदा. खजूर) तसेच काही खुरटी व काटेरी झुडुपे वाळवंटात सर्वत्र आढळतात.
  2. सरडा व साप या सारखे सरपटणारे प्राणी.
  3. उंदीर व खार या सारखे कृदंत वर्गातील प्राणी.
  4. गिधाडे व गरुड यांच्यासारखे उड्डाणाचा लांब पल्ला असणारे पक्षी.
  5. काही वैशिष्ट्यपूर्ण कीटकदेखील मरूस्थलापासून काही अंतरापर्यंत दिसतात.
  6. मरूस्थलाजवळील जैवसंपदा मात्र अनेक प्रकारे वेगळी असू शकते, उदा. बदकासारखे पक्षी.

प्रमुख वाळवंटे

  • गोबी वाळवंट
  • सहारा वाळवंट

शीत वाळवंटे

टुंड्रा प्रदेश व आर्क्टिक प्रदेश वगैरेंसारखे भूभाग शीत वाळवंटात येतात. येथे वाळूच्याऐवजी बर्फ पसरलेला असतो.








थरचे वाळवंट हे भारत व पाकिस्तान या दोन देशांच्या सरहद्दीवरचे वाळवंट आहे.
नासाच्या उपग्रहाने घेतलेले थर वाळवंटाचे चित्र
२००००० चौरस कि.मी. क्षेत्रफळ असलेले हे वाळवंट आकारमानाने जगातील सातव्या व आशियातील तिसऱ्या क्रमांकाचे आहे.[१]
सरस्वती नदी

सीमा

भारतात थरच्या पूर्वेला सतलज नदीअरवली पर्वतरांग असून दक्षिणेला कच्छचे रण आहे. पश्चिमेला हे वाळवंट पाकिस्तानात सिंधू नदीपर्यंत पसरले आहे. भारतातील राजस्थान राज्याचा ३/५ भाग तसेच गुजरात व हरियाणातला काही प्रदेश या वाळवंटाने व्यापला आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांताचा पूर्व भाग (थरपरकार जिल्हा) व पंजाब प्रांताचा दक्षिणेकडचा काही भाग थरमध्ये येतो.

निर्मिति

थर वाळवंटाचा जन्म हा एक वादाचा विषय असून काही भूवैज्ञानिकांच्या मते हे वाळवंट ४००० वर्षे ते १ लाख वर्षे इतके जुने आहे, तर काहींच्या मते हा भूप्रदेश शुष्क होण्यास त्यापेक्षा बऱ्याच आधी सुरुवात झाली होती. अगदी अलीकडे (इ.पू. २०००) सरस्वती नदी अदृश्य झाल्यानंतर हा प्रदेश वालुकामय झाला असाही एक मतप्रवाह आहे. वाळवंटात लुप्त होणारी वर्तमान काळातील घग्गर नदी म्हणजेच सरस्वती यावर मतभेद असले तरी खालील निरीक्षणे संशोधनांती विश्वासार्ह वाटतात.
  1. सतलज व यमुना ह्या नद्या कधी काळी घग्गर / सरस्वतीच्या उपनद्या होत्या पण भूगर्भातील चकत्यांच्या हालचालींमुळे त्यांचे प्रवाह बदलले. परिणामतः मुख्य नदी आटली.
  2. कर्बौत्सर्जनाद्वारे कालमापन केले असता हडप्पा व काली बंगा संस्कृतीचे स्थलांतर इ.पू. २००० च्या काळात पाण्याच्या तीव्र दुर्भिक्ष्यामुळे झाले असे अनुमान निघते.[२]

अर्वाचीन साहित्यातील उल्लेख

या प्रदेशाचा रामायणांत लवणसागर असा उल्लेख आढळतो. नंदिस्तुति (ऋग्वेद १०.७५)मधील दाखल्यानुसार सरस्वती नदी सतलज व यमुनेच्या मधोमध होती. महाभारतात देखील सरस्वती नदी वाळवंटात लुप्त होत असल्याची नोंद आहे.

भूविज्ञान

थरमधील वाळूच्या टेकड्या आणि सांडणीस्वार

सजीव सृष्टी

चिंकारा हरीण
काळवीट नर व मादी
खेजडी वृक्ष

वनस्पती


No comments: